वेध माझा ऑनलाईन - नव्यावर्षांच्या पहिल्याच दिवशी कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरचे दर कमी करण्याचा निर्णय कंपन्यांकडून घेण्यात आलाय. IOCL नुसार १ जानेवारी २०२२ ला दिल्लीतील कमर्शिअल सिलिंडरची किंमत १०२ रुपयांनी कमी होऊन १९९८.५० रुपये झाली आहे.
३१ डिसेंबर रोजी १९ किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर २१०१ रुपये होते. तर चेन्नईमध्ये या कपातीनंतर १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचे दर २१३१ रुपये आणि मुंबईत हे दर १९४८.५० रुपये इतके झाले आहेत. नव्या किंमती जारी केल्यानंतर कोलकत्यात १९ किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर २०७६ रुपये झाले आहेत.
घरगुती सिलिंडरच्या किंमती 'जैसे थे'कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर कमी झाले असले तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नाही. दिल्ली आणि मुंबईमध्ये नॉन सब्सिडीच्या १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरचे दर ८९९.५० रुपये आहेत. तर कोलकात्यात याची किंमत ९२६ रुपये, चेन्नईमध्ये ९१५.५० रुपये इतकी आहे.
No comments:
Post a Comment