Saturday, January 1, 2022

कोरोनाला रोखण्यासाठी नाइट कर्फ्यूचा उपयोग नाही, त्याला शास्त्रीय आधारही नाही ; जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांचे मत...

वेध माझा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. यापूर्वीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातून सावरण्यासाठी नाइट केंद्रातील मोदी सरकारने नाइट कर्फ्यू लावण्याबाबत राज्यांना निर्देश दिले होते. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ  डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोना रोखण्यासाठी किंवा कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाइट कर्फ्यूचा उपयोग नसून, त्याला शास्त्रीय आधारही नाही, असे सांगितले आहे. 

सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोना नियंत्रणासाठी भारतासारख्या देशाने नेमके काय करावे? याबाबत मोलाचा सल्लाही दिला आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये करोनाला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी भाष्य केले आहे. यावेळी बोलताना डॉ. स्वामीनाथन यांनी भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशांनी कशा प्रकारच्या उपाययोजना करायला हव्यात, नाईट कर्फ्यू का उपयोगी नाही, याविषयी भूमिका मांडली आहे.


नाइट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही शास्त्रीय आधार नाही

नाइट कर्फ्यूला कोणताही आधार नाही. कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी विज्ञानावर आधरित, पुराव्यांवर आधारित उपाययोजना आवश्यक आहेत. अशा प्रकारच्या उपाययोजनांची एक यादीच करता येऊ शकेल. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाइट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. भारतासारख्या देशांनी या विषाणूला आवर घालण्यासाठी वैज्ञानिक आधारांवर धोरण ठरवायला हवे, असे स्वामीनाथन म्हणाल्या.

No comments:

Post a Comment