वेध माझा ऑनलाइन - राज्यात एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या एक दिवसानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्रकारांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी भूतकाळातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. उद्धव ठाकरेम्हणाले की, जर गृहमंत्री अमित शाहांनी मला दिलेलं वचन पूर्ण केलं असतं तर आज राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असता. मात्र हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही.
पुढे ते म्हणाले की, 2019 मध्ये युतीदरम्यान मी अमित शहा यांना म्हणालो हो, की, अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असेल. जर त्यांनी हे मान्य केलं असतं तर आघाडी सरकारसोबत युती करावी लागली नसती. आणि आता अडीच वर्षांनंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असता
No comments:
Post a Comment