Tuesday, September 13, 2022

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही ; एकीकडे फडणवीस गेले रशियाच्या दौऱ्यावर, तर अजितदादा आणि मुख्यमंत्री शिंदे यांची झाली तडकाफडकी भेट...काय आहे बातमी...?

 वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. मात्र, सध्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मविआ सरकार कोसळल्यापासून आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे सरकारवर हल्लाबोल करत आहेत. महाराष्ट्रातील दोन मोठे प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सरकारवर टीका केली. शिवसेना-राष्ट्रवादीकडून टीका होत असताना राज्यात वेगळ्या राजकीय भेटीगाठी देखील होताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशिया दौऱ्यावर गेले असताना या भेटीगाठी होत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक भेट घेतली.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा आजचा टायमिंग वेगळा आहे. कारण देवेंद्र फडणवीस सध्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. रशियामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. दुसरीकडे आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील पशूंमध्ये वाढता लम्पि स्किन आजार  आणि थांबलेला विकास निधीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अजित पवार सह्याद्री अतिथीगृहात गेले आहेत.
मात्र, राज्यातील गेल्या काही दिवसांपून राजकीय घडामोडी पाहता या भेटीकडे विशेष लक्ष लागलं आहे.अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात  हे देखील शिंदेंच्या भेटीसाठी गेले होते.
या भेटीनंतर थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बजेटला कामे आली त्यांना स्थगिती दिली गेली, ती उठवावी,अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली. डीपीडीसी होत नाही. कामे होत नाही. कामे लवकर मार्गी लावावी, अशी मागणी केल्याचे थेरात यांनी सांगितले

काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे प्रमुख नेते मुख्यमंत्री शिंदे यांना आज अचानकपणे फडणवीस रशिया दौऱ्यावर गेले असताना भेटल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय हे होईल सांगता येत नाही हेच खरे!...पाहूया पुढे काय होतंय ते !
 

 

No comments:

Post a Comment