वेध माझा ऑनलाइन - येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा 'आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार' भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम,याना येत्या १७ सप्टेंबर रोजी आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या १४ व्या 'स्मृतिदिनी' सकाळी ११ वाजतां यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन, कराड येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आदरणीय स्व पी डी पाटील प्रतिष्ठांनचे उपाध्यक्ष डॉ अशोक गुजर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे
जेष्ठ संपादक, विचारवंत मधुकर भावे यांचे हस्ते व राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, आणि सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे,
प्रतिष्ठानचे वतीने सकाळी ९.३० वाजतां आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या श्री शिवाजी हायस्कूल शेजारील 'समाधीस्थळी' पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे सदर समारंभाकरिता कराडकर आणि परिसरातील नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment