वेध माझा ऑनलाइन - कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान हा भूकंप झाला भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्चर स्केल इतकी होती मात्र कोयना धरणाला कोणताही धोका नाही अशी कोयना धरण व्यवस्थापनाने माहिती दिली आहे.
कोयना धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान कोयना परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला हा भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा होता तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस पाच किलोमीटर होता तसेच भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल होती.. दरम्यान या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाला या भूकंपापासून कोणताही धोका नसल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे..
No comments:
Post a Comment