वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांतुन गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात कराड येथील एकाचा मृत्यू झाला आहे या अपघातात 4 जण जखमी झाल्याचेही समजते
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर महामार्गावरील खड्ड्यांमुळे चार चाकी पलटी झाली आणि एकाला आपला जीव गमवावा लागला आहे कराड येथील मुजावर कॉलनीतील वसीम सय्यद असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे तर हुजेपा सय्यद असे जखमी मुलाचे नाव आहे वसीम सय्यद हे तीन प्रवाशांसह आपल्या पंधरा वर्षीय हुजेपाला घेऊन त्यांच्या चार चाकी वाहनाने गावी निघाले होते पुणे सातारा महामार्गावरील कापूरहोळ उड्डाण पुलावर खड्डा चुकवताना एक दुचाकी समोर आल्याने त्यांनी ब्रेक दाबला यामुळे झायलो कार पलटी झाली आणि तिने तीन पलट्या खाल्ल्या मोठा आवाज आल्याने शेजारील पंपावरील प्रशांत सुके मनोज कोंडे व इतर प्रवाशांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले व उपचारार्थ दाखल केले उपचारापूर्वीच वसीम सय्यद यांचा मृत्यू झाला होता
दरम्यान, होजेपा यांच्यासह जावेद इनामदार शेरोनिसा इनामदार शाहरुख मुजावर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत
दरम्यान, हे खड्डे आणखी किती जणांचे जीव घेणार? किती घरे उध्वस्त करणार ? हाच यानिमित्ताने संपुर्ण राज्यासमोरचा प्रश्न आहे दरवषी हजारोंच्या आकड्यासह अनेकजण आपला जीव रस्त्यावरच्या खड्यात गमावतात तरीही शासन याप्रश्नी गंभीर का नाही? हाच प्रश्न लोकांना आजही पडलेला आहे...
No comments:
Post a Comment