Wednesday, October 19, 2022

टेम्बु परिसरात मगरीचा वावर ; त्या परिसरातील ग्रामस्थ,मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा...

वेध माझा ऑनलाईन - कराड नजीक टेंभू येथील कृष्णा नदीत 8 फूटी मगरीचा वावर वारंवार दिसून येत आहे. तिचा व्हिडिओ काहींच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे तेथील परिसरात भीतीचं वातावरण आहे

गेल्या काही दिवसापासून भल्या मोठ्या मगरीचा वावर असून या मगरीचे दर्शन वारंवार शेतकरी ग्रामस्थ तसेच मच्छीमारांनाही होत आहे. बहुसंख्य वेळा कृष्णा नदीच्या काठावर ही मगर विश्रांती घेत असल्याचेही शेतकऱ्यांनी पाहिले आहे. या मगरीची विश्रांती कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. याबाबत टेंभू पोलीस पाटील यांनी वन विभागाशी संपर्क करून याबाबतची माहिती दिली. वन विभागाने या बाबीची गंभीर दखल घेत टेंभू येथील कृष्णा नदीच्या काठावर मगर प्रवण क्षेत्र असा फलक लावला आहे. सर्व शेतकरी ग्रामस्थ मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment