Tuesday, November 1, 2022

प्रितीसंगमापासून काही अंतरावर गोटे- सैदापूर येथील नागरिकांना कृष्णा नदी पात्रात मगरीचे दर्शन झाले

वेध माझा ऑनलाइन - आटके, टेंभू, खोडशी गावानंतर टेंभू- सैदापूरकरांना नदीपात्रात मगरींचे दर्शन झाले होते आता गोटे व सैदापूर मध्ये असलेल्या कृष्णा नदीपात्रात पोहणारी मगर मोबाईल कॅमेऱ्यात नुकतीच कैद केली आहे मगरीच्या वावरामुळे त्या ठिकाणीच्या परिसरात भितीचे वातावरण आहे.

कराड तालुक्यात कोयना- कृष्णा नदीपात्रात मगरीचे दर्शन वारंवार घडू लागले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी टेंभू येथे मोठ्या मगरीचे दर्शन झाले होते. त्यानंतर खोडशी येथेही तब्बल 10 फुटी मगर चक्क रस्त्यावर पाहायला मिळाली. वनविभाग आणि रेस्क्यू टीमने 10 फुटी मगर पकडली. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच कराडच्या प्रितीसंगमापासून काही अंतरावर गोटे- सैदापूर येथील नागरिकांना कृष्णा नदी पात्रात मगरीचे दर्शन झाले. मगरीच्या वावरामुळे कराड तालुक्यातील नदीकाठच्या गावात भितीचे वातावरण आहे.


No comments:

Post a Comment