वेध माझा ऑनलाइन। सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाडीची मोहीम राबवत शुक्रवारी, (22 सप्टेंबर) हातभट्टी दारू उत्पादनाच्या अनेक ठिकाणी छापे टाकले. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हात भट्टी दारू विरोधात सातत्याने मोहीम राबवण्यात येत असून मोटरसायकलीवरून वाहतूक होणारी 320 लीटर दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कामगिरी केली असून जिल्ह्यातील अनधिकृत दारू विक्रीस यामुळे आळा बसणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कामगिरीने सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने हातभट्टी दारू विरोधात शुक्रवारी शहरातील राघवेंद्र नगर येथे हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमावर कारवाई केली. सादर इसमाचे नाव गणपत पवार असून तो गणपत तांडा येथे राहणार आहे. तब्बल 320 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक त्याच्या मोटरसायकलवरून करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय, एका अन्य कारवाईत भरारी पथकाने 240 लिटर हातभट्टी दारु जप्त केली आहे. शहरातील साईबाबा चौक येथे विकास राठोड नामक इसमाच्या ताब्यातून 12,300 रुपये किमतीची 240 लिटर हातभट्टी दारु जप्त करून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादर इसमाणे दारूची साठवणूक तीन रबरी ट्यूबमध्ये केली होती.दरम्यान हातभट्टी दारू अड्यांवर छापे टाकून 240 लिटर हातभट्टी दारू व 6,350 लिटर गुळ मिश्रित रसायन असा 1,55,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपी फरार आहेत. या आरोपींचा शोध सुरू आहे.
No comments:
Post a Comment