वेध माझा ऑनलाइन। सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 26 गुन्हेगारांवर हददपारीची कारवाई करण्यात आली आहे. दि. 27 ते दि. 29 या काळासाठी हा आदेश लागू असणार असल्याचे आदेश म्हटले आहे.
सार्वजनीक गणेशउत्सव कालावधीमध्ये शांतता राहावी यासाठी कार्यकारी दंडाधिकारी सातारा यांचेकडे हददपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास कार्यकारी दंडाधिकारी सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाणे हददीतील एकुन 26 गुन्हेगारांवर दि.27 ते 29/9/2023 रोजीचे सकाळी 12 वा पर्यंत या कालावधी करीता सातारा, कोरेगाव, जावली तालुका क्षेत्रामधुन हददपारीचा आदेश देण्यात आला आहे.
आदेशाप्रमाणे...
लिंब (तीनजण), कोंडवली (एकजण), माळ्याचीवाडी (एकजण), कण्हेर (एकजण), नागेवाडी (एकजण), तासगाव (दोनजण), देगाव (दोनजण), मालगाव (दोनजण), कोंडवे (एकजण),साबळेवाडी- नुने (एकजण), परळी (तीनजण), कळंबे (एकजण),
नागेवाडी (दोनजण), लिंब (एकजण), शेंद्रे (दोनजण) आणि तासगाव येथील एक आणखी एकजण असा 26 जणांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment