पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली असून याप्रकरणी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांना निर्देश दिले आहेत. कारण, राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. त्यामुळेच, पोलिसांवर दबाव टाकून त्यांच्याकडून हे प्रकरण दाबलं जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. आता, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणी एका आयजी अधिकाऱ्याकडे अंगुलीनिर्देश केले आहेत.
वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा हे IG म्हणजेच पोलीस महानिरीक्षक आहेत, मी माहिती घेतली असून या मांमांचा धाक दाखवून दोन्ही सुनेवर हगवणे कुटुंबीयांनी अत्याचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. जालिंदर सुपेकर या शशांकच्या IG मामावर 500 कोटींच्या स्कॅम संदर्भात चौकशी सुरू आहे,
एवढच नाहीतर जळगाव मध्ये सासरे होते त्यांना, या IG नेच त्रास दिल्याचे पत्र लिहून त्यांनी आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं, अशी माहिती अंजली दमानिया यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.
No comments:
Post a Comment