Tuesday, September 22, 2026

आज भूकंपाचा सौम्य धक्क जाणवला : भूकंपाचे केंद्र सातारा जिल्ह्यात ; किती वाजता आणि कुठे हा धक्का जाणवला ? तीव्रता किती ?

वेध माझा ऑनलाइन।
जिल्ह्यात आज पहाटे ३ वाजून २९ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता 2.4 रिश्टर इतकी होती. भूकंपाचे केंद्र सातारा जिल्ह्यात असून ते 17.373 अंश उत्तर अक्षांश आणि 73.769 अंश पूर्व रेखांशावर नोंदविण्यात आले आहे.

या भूकंपाची खोली जमिनीखाली सुमारे 5 किलोमीटर होती. पहाटेच्या वेळी भूकंपाची नोंद झाल्याने काही नागरिकांना परिसरात सौम्य हादरे जाणवल्याची शक्यता आहे. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी अथवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने त्याचा परिणाम मर्यादित राहिला.
जिल्ह्यात यापूर्वीही अधूनमधून सौम्य स्वरूपाचे भूकंप नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या संकेतस्थळावर तसेच ‘भूकंप’ ॲपवर या भूकंपाची नोंद उपलब्ध करण्यात आली आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Monday, September 21, 2026

आता खेळाडूंची गैरसोय होणार दूर! नरेंद्र लिबे यांचे प्रयत्न झाले सक्सेस! नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा पुढाकार; वेध माझा चा पाठपुरावा ; ओपन स्पेसमधील मैदान तात्पुरते सरावासाठी उपलब्ध ; नगरसेवक नरेंद्र लिबे यांची प्रत्यक्ष पाहणी; मैदानाची साफसफाई व तयारीला वेग

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे काम सुरू असल्यामुळे खेळाडूंना सराव व विविध खेळांसाठी मैदान उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे खेळाडूंची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नगरसेवक व स्वतः राष्टीय खेळाडू असलेले नरेंद्र लिबे यांनी याबाबत आवाज उठवला होता 
त्यासंदर्भात काल त्यांनी वेध-माझा शी बातचीत केली होती वरच्या दर्जाचा खेळाडू सरावासाठी मैदान उपलब्ध नसल्याने जिल्हा स्तरावर देखील पोहोचू शकत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती.

त्यांनतर वेध-माझा ने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती...त्यानुसार या विषयाचा पाठपुरावा करत आज लग्गेच याबाबतचा निर्णय झाल्याचे नगरसेवक लिबे यांनी वेध-माझा शी बोलताना आज सांगितले 

लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पुढाकार घेत कराड नगरपरिषद हद्दीतील श्री हॉस्पिटल समोरील मोकळी जागा स्टेडियमचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

मैदान उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी खेळाडूंनी नगराध्यक्ष यादव यांची भेट घेतली होती. यावेळी नगरसेवक नरेंद्र लिबे यांनी स्वतः खेळाडू असल्याने याबाबतची अडचण समजून घेत ती नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. खेळाडूंना सरावासाठी जागा मिळणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन नगराध्यक्ष यादव यांनी तत्काळ सकारात्मक निर्णय घेतला.

दरम्यान, आज सकाळी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मैदानाची साफसफाई व आवश्यक तयारी करताना नगरसेवक नरेंद्र लिबे यांनी स्वतः उपस्थित राहून संबंधितांना सूचना दिल्या. 

यावेळी नरेंद्र लिबे यांच्यासह महेंद्र भोसले सर अतुल पाटील, दिलीप चिंचकर, हनमंत साखरे आदी खेळाडू उपस्थित होते

खेळाडूंना सरावासाठी मैदान योग्य पद्धतीने तयार करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
स्टेडियमचे काम पूर्ण होईपर्यंत खेळाडूंचा सराव खंडित होऊ नये, या उद्देशाने नगरपरिषदेने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे. 

“मैदानाचे काम सुरू असले तरी खेळाडूंचा सराव थांबता कामा नये; खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचं भाजपा आमदार मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांना थेट आव्हान ; म्हणाले...निवडणूक अर्जासोबतच्या शपथपत्रात मी माझ्या संपत्तीचा तपशील दिलेला आहे, सरकार तूमचे आहे, मग लावा माझी चौकशी;

वेध माझा ऑनलाईन।
सह्याद्री कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माझ्यावर वैयक्तिक आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. निवडणूक अर्जासोबतच्या शपथपत्रात मी माझ्या संपत्तीचा तपशील दिलेला आहे. सरकार तुमचं आहे, म्हणता तर मग लावा माझी चौकशी, असं थेट आव्हान बाळासाहेब पाटील यांनी भाजपा आमदार मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांना दिलं.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते

ते म्हणाले...
आनंदराव जाधव, विठ्ठलतात्या जाधव, राजाभाऊ देशपांडे यांच्यासारखे ज्येष्ठ सभासद वार्षिक सभेत प्रश्न विचारायचे.
त्यावेळी तीन तीन तास सभा चालायची त्यांच्यासाठी स्वतंत्र मंडप आणि माईकची व्यवस्था केली जायची. त्या परंपरेला यंदा छेद देण्याचा प्रयत्न झाला. याचा अर्थ एकच आहे की उत्तरे तुम्हाला ऐकायची नव्हती. कारखान्यावर काहीतरी आरोप करायचा, अशा प्रकारची विरोधकांची वृत्ती होती, असा आरोप बाळासाहेब पाटील यांनी केला.
आपण संयम ठेवला पाहिजे. आपल्याला संस्था चालवायची आहे. पुढे जायचे आहे,
आपण एका मर्यादेपर्यंत संयम ठेवला. अंगावर आल्यावर आपण बघूच... असा सूचक इशारा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याच दोन्ही भाजपा आमदारांना दिला.
यंदा सह्याद्री कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणार आहोत  प्रतिदिन 11 हजार टनापेक्षाही अधिक गळीत आपण करणार आहोत असेही ते म्हणाले





क्रीडा नगरीतच खेळाडूंच्या विजयाला ‘ब्रेक’! नवे स्टेडियम उभे राहतेय; पण तोपर्यंत खेळाडूंनी सराव करायचा कुठे? तंत्रशुद्ध सरावावर होतोय परिणाम; स्पर्धांमधील कामगिरी घसरल्याची क्रीडा क्षेत्रात खंत ;

वेध माझा ऑनलाईन।
ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्यासारख्या दिग्गज मल्लांनी ज्या कराडच्या मातीत सराव केला, ज्या भूमीने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे असंख्य खेळाडू घडविले, त्या क्रीडा नगरीतच आज खेळाडूंना सरावासाठी मैदान शोधण्याची वेळ आली आहे! कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे काम सुरू असल्याने खेळाडूंसाठी पर्यायी मैदान उपलब्ध नसल्याचा थेट फटका त्यांच्या सरावाला आणि स्पर्धेतील कामगिरीला बसत असल्याची खंत क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

कराडमध्ये नवीन स्टेडियम उभारण्याचे काम सुरू आहे. भविष्यातील क्रीडा विकासाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असली तरी आजचा खेळाडू उद्याच्या स्टेडियमची वाट पाहत बसू शकत नाही. त्याला आज मैदान हवे, आज सराव हवा आणि आजच स्पर्धेसाठी तयारी हवी. मात्र, तात्पुरत्या स्वरूपातही पुरेसे मैदान उपलब्ध नसल्याने खेळाडूंची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

मैदान म्हणजे खेळाडूच्या मेहनतीचे, तंत्राचे आणि भविष्यातील यशाचे ते व्यासपीठ असते. नियमित आणि तंत्रशुद्ध सरावाअभावी खेळाडूंच्या तयारीवर परिणाम होत असून त्याचा फटका स्पर्धांच्या निकालातही जाणवत असल्याची भावना क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे,  राष्ट्रीय स्तरावर पदके मिळविणारे आणि कराडचे नाव उज्ज्वल करणारे काही खेळाडू आज मैदानाअभावी जिल्हास्तरीय स्पर्धेतही अपेक्षित कामगिरी करू शकत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. वरच्या स्तरावर बक्षीस मिळविणाऱ्या खेळाडूंना जिल्हास्तरावरच संघर्ष करावा लागणे ही परिस्थिती कराडसारख्या ऐतिहासिक क्रीडा नगरीला निश्चितच शोभणारी नाही.

खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आहे मग अडथळा नेमका कुठे आहे? मैदानाचा! हा अडथळा दूर करण्यासाठी तात्पुरते का होईना, पर्यायी मैदान उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

“स्टेडियमचे काम पूर्ण होईपर्यंत खेळाडूंनी थांबायचे का?” असा सवाल आता क्रीडाप्रेमी उपस्थित करीत आहेत. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून नगरपालिका, क्रीडा विभाग आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत खेळाडूंसाठी पर्यायी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

कराडची क्रीडा परंपरा ही केवळ भूतकाळाची आठवण नाही ही परंपरा पुढे नेण्यासाठी आजच्या खेळाडूंना मैदान मिळणे आवश्यक आहे. नवीन स्टेडियमच्या कामाचे स्वागतच पण त्या कामाच्या काळात खेळाडूंच्या कारकिर्दीला ‘ब्रेक’ लागता कामा नये, एवढीच अपेक्षा


नगरसेवक 
राष्ट्रीय खेळाडू नरेंद्र लिबे म्हणाले...

स्टेडियमचे काम सुरू आहे, ठीक आहे...
पण खेळाडूंनी सराव करायचा कुठे?
राष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना आज जिल्हास्तरावरच थांबावे लागत असेल, तर ही कराडच्या क्रीडा नगरीसाठी धोक्याची घंटा नाही का? असा सवाल खेळाडू व नगरसेवक नरेंद्र लिबे यांनी याविषयी बोलताना केला

पुन्हा एकदा भाजपने दिला काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला ;

वेध माझा ऑनलाइन
मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के सुरूच आहेत. आता पुन्हा एकदा भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. हा काँग्रेस पक्षासाठी तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या तसेच चिखलीच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे शिलेदार असलेले माजी आमदार तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे हे भाजपच्या गळाला लागले असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
राहुल बोंद्रे यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.  काँग्रेस पक्षाने आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक संधी आणि पदे दिली, तसेच जिवाभावाची अनेक माणसं दिली, असे सांगत बोंद्रे यांनी काँग्रेससोबतच्या आपल्या प्रदीर्घ प्रवासाच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.  मुकुल वासनिक यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात करून दिली आणि अत्यंत प्रेम व मार्गदर्शन दिले, तर हर्षवर्धन सपकाळ यांनी भावाप्रमाणे प्रेम दिल्याचेही बोंद्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. मात्र आता राजकीय वळणावर आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राहुल बोंद्रे यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.


कोयना सहकारी बँकेच्या उंब्रज शाखेचे बुधवारी उद्घाटन ; भाजपचे आमदार मनोज घोरपडे,धैर्यशील कदम हे राहणार उपस्थित; सुरेश भोसले यांच्या हस्ते होणार उद्घाटन ;

वेध माझा ऑनलाईन।
कोयना सहकारी बँक लि., कराडच्या उंब्रज शाखेचे बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, उंब्रज, ता. कराड येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. या स्थलांतर समारंभाचा शुभारंभ यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, रेठरे बुद्रुकचे चेअरमन तथा कृष्णा उद्योग समूहाचे कुटुंबप्रमुख मा. डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे, विधानपरिषद सदस्य मा. आ. धैर्यशील कदम, कोयना सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य मा. ॲड. उदयसिंह पाटील (दादा) तसेच युवा नेते मा. आदिराज पाटील (बाबा) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

उंब्रज व परिसरातील सभासद, खातेदार, व्यापारी, उद्योजक, शेतकरी तसेच नागरिकांना अधिक चांगल्या बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शाखेचे स्थलांतर करण्यात येत आहे. नव्या जागेमुळे ग्राहकांना अधिक सुलभ, प्रशस्त व सोयीस्कर वातावरणात बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहेत.
बदलत्या काळानुसार आधुनिक बँकिंग सेवा, डिजिटल सुविधा आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्यावर बँकेचा विशेष भर असून, उंब्रज शाखेच्या स्थलांतरामुळे या परिसरातील ग्राहकांना त्याचा अधिक लाभ मिळणार आहे.
उंब्रज व परिसरातील सर्व सभासद, खातेदार, ग्राहक, व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांनी या स्थलांतर समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष कृष्णत पाटील, उपाध्यक्ष साहेबराव शेवाळे व संचालक मंडळाने केले आहे.

                

हिरण्यकश्यपू वधाचा थरार अनुभवण्यासाठी आझाद चौकात रेकॉर्डब्रेक गर्दी!

वेध माझा ऑनलाईन।
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवजवान गणेश मंडळ, आझाद चौक यांच्या वतीने साकारण्यात आलेल्या ‘नरसिंह अवतार’ या जिवंत देखाव्याला कराडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, देखावा पाहण्यासाठी दररोज रेकॉर्डब्रेक गर्दी होत आहे. विशेषतः भगवान नरसिंहांनी भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी घेतलेला अवतार आणि हिरण्यकश्यपूचा केलेला वध हा प्रसंग पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा, संस्कार आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न नवजवान गणेश मंडळाने केला असून, ‘नरसिंह अवतार’ हा जिवंत देखावा कराड शहरातील गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे.
वैभव भोसले, अतुल पाडळे, रितेश नलवडे, कृष्णा काटवटे, श्रीधर मुळे, सिद्धप्रसाद मुळे, अंकुश नलवडे, ज्ञानेश्वर भस्मे, विनायक काटकर, बाल कलाकार रुद्र नलवडे यांच्या  या देखाव्यात प्रमुख भूमिका आहेत.

नरसिंह अवताराच्या जिवंत देखाव्याला रेकॉर्डब्रेक गर्दी!आझाद चौकातील नवजवान गणेश मंडळाचा आध्यात्मिक संदेश ठरतोय भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ;

वेध माझा ऑनलाईन
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कराड शहरातील नवजवान गणेश मंडळ, आझाद चौक यांच्यावतीने साकारण्यात आलेल्या ‘नरसिंह अवतार’ या जिवंत देखाव्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दर्शनासाठी रेकॉर्डब्रेक गर्दी होत आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिक मोठ्या संख्येने या देखाव्याला भेट देत आहेत.
भगवान विष्णूंचा चौथा अवतार मानल्या जाणाऱ्या नरसिंह अवताराची कथा आणि भक्त प्रल्हादाची अढळ श्रद्धा या देखाव्यात प्रभावीपणे सादर करण्यात आली आहे. भक्ती, श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याचा अखेर विजय होतो, असा आध्यात्मिक संदेश या जिवंत देखाव्यातून देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे केवळ धार्मिक कथानक सादर करण्यापुरता हा देखावा मर्यादित न राहता सत्य, श्रद्धा, संस्कार आणि वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाचा विजय हा सामाजिक संदेशही देत आहे. त्यामुळे हा देखावा भाविकांसह युवक आणि बालकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
देखाव्याची मांडणी, पात्रांचा अभिनय, प्रकाशयोजना आणि प्रसंगाचे सादरीकरण यामुळे प्रत्यक्ष नरसिंह अवतार आपल्या डोळ्यांसमोर साकारल्याचा अनुभव भाविकांना मिळत आहे. त्यामुळे दररोज आझाद चौक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत असून, गणेशोत्सवाच्या उत्साहात या देखाव्याने विशेष रंग भरला आहे.
परंपरा, भक्ती आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम साधणाऱ्या नवजवान गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे कराडकरांकडून कौतुक होत आहे.

Sunday, September 20, 2026

श्री गणेश फार्मा प्रो हब एलएलपी होलसेल औषधांच्या दुकानात विविध पदांवर भरती सुरू ; आकर्षक पगारासह सुविधा मिळणार ; कोणकोणत्या पदांसाठी ही नोकर भरती सुरू आहे... त्यासाठी वाचा बातमी...आणि करा एक फोन... दिलेल्या नंबरवर...

वेध माझा ऑनलाईन।
मलकापूर येथील इंगवले नगर नाकोडा स्टील शेजारी असलेल्या श्री गणेश फार्मा प्रो हब या होलसेल मेडिकल व्यवसायामध्ये विविध पदांवर काम करण्यासाठी मुला-मुलींसह कामगारांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

        
        या जॉबसाठी खालील               लोकेशनवर भेटा.. माहितीसाठी 9822060246 या नम्बरबर संपर्क करा...

याठिकाणी काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पुढे यावे, असे आवाहन फर्मच्या वतीने करण्यात आले आहे. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, अनुभव, कामाची क्षमता व पदानुसार योग्यतेचा विचार करून आकर्षक पगार देण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या भरतीबाबत माहिती देताना फर्मचे संचालक म्हणाले की, 
संस्थेच्या वाढत्या कामकाजासाठी विविध पदांवर मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मेहनती, जबाबदार आणि काम करण्याची इच्छाशक्ती असलेल्या तरुण-तरुणींना तसेच अनुभवी कामगारांना येथे रोजगाराची संधी दिली जाणार आहे.रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, 

अधिक माहितीसाठी 9822060246 या नम्बरबर संपर्क करावा असे आवाहन फर्मच्या संचालकानी केले आहे.


या फर्ममध्ये खालील पोस्टसाठी...
अर्जंट जागा भरायच्या आहेत...

Saturday, September 19, 2026

मनासारखा राजा, राजासारखं मन असणारा कराडचा "राजा'(king) माझे जिवलग मित्र लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव याना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे हे माझे पत्र...

वेध माझा ऑनलाईन।

प्रिय राजू... वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आज कराडच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा वाढदिवस...

पण माझ्यासाठी आजचा दिवस केवळ नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसाचा नाही;
तर माझ्या गेल्या ३५ वर्षांपासूनच्या अतिशय जिवलग मित्राचा, माझ्या भावाचा वाढदिवस आहे...!

राजू म्हणजे...
पहिल्यापासूनच राजासारखं मन असलेला माझा मित्र!

आपण दोघेही दहावी उत्तीर्ण झालो. तू शिवाजी हायस्कूलमधून आणि मी टिळक हायस्कूलमधून. त्यानंतर अकरावीच्या वर्गात आपण एकत्र आलो. त्यावेळी कुठे माहीत होतं, की वर्गात सुरू झालेली ही ओळख पुढे आयुष्यभराच्या मैत्रीत आणि अक्षरशः भावाच्या नात्यात रूपांतरित होईल!

पण ती झाली... आणि अशी झाली की गेली ३५ वर्षे आमच्यातील मैत्री, आपुलकी आणि वैचारिक नातं आजही तितकंच घट्ट आहे.

या नात्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यात कधीही अपेक्षा नव्हती... हिशोब नव्हता... स्वार्थ नव्हता. होती ती फक्त निरपेक्ष मैत्री!

माझ्या आयुष्यात एक काळ असा आला, जेव्हा मी माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या एका कठीण टप्प्यातून जात होतो. त्या काळात तू केवळ माझ्या सोबत नव्हतास, तर माझी सावली बनून उभा होतास.

माझी ताकद माझ्यात टिकवून ठेवण्यासाठी तू जे केलंस, ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.

आम्ही अक्षरशः एका ताटात जेवलोय...
मी माझ्या घरापेक्षा तुझ्या घरीच अधिक असायचो. तुझे बंधू संजय, विजय आणि प्रशांत यांच्या सोबत मला कधीच वेगळं मानलं गेलं नाही. उलट, लोक मला तुमच्या घरचा आणखी एक भाऊ म्हणूनच ओळखायचे.

तुझी मोठी बहीण रंजना सणस आणि तुझी वहिनी, स्व. उज्वला विजय यादव... या दोघींच्या राख्या माझ्या मनगटावर कधीच चुकल्या नाहीत.

मला बहीण नाही, ही भावना माझ्या मनात कधी निर्माणच झाली नाही... कारण ज्या दिवशी माझ्या हातावर राखी बांधली जात नव्हती, त्या दिवशी तुमच्या घरच्या बहिणींनी आणि वहिनीने माझ्या मनगटावर भावाचं नातं बांधलं होतं.

राजू सातारला शिकायला असताना तर आमची मैत्री आणखीच रंगली होती. मी कराडहून त्याच्याकडे वारंवार जायचो. तो आमच्या दोघांसाठी डबा आणायचा आणि आम्ही दोघे त्याच डब्यात जेवायचो.

त्या डब्यात फक्त अन्न नव्हतं...
त्या डब्यात आमच्या मैत्रीची चव होती!

आणि मग आला तो काळ...

वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी राजू पहिल्यांदा पोस्ट ऑफिस परिसरातून कराड पालिकेच्या पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरला. तेव्हा अख्खं गाव त्याच्या पाठीशी उभं राहिलं.

कदाचित नियतीने त्याच दिवशी लिहून ठेवलं असावं—

“हा २३ वर्षांचा युवक एक दिवस कराडचा राजा नव्हे, तर कराडकरांच्या विश्वासाचा लोकनियुक्त नगराध्यक्ष होईल!”

आज ते स्वप्न सत्यात उतरलेलं पाहताना मित्र म्हणून माझ्या मनात जी भावना आहे, ती शब्दांत मावणारी नाही.

गेली तीन दशके नगरपालिका आणि कराड शहराच्या विकासाशी जोडलेला तुझा प्रवास आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. कराडच्या बदलत्या गरजा ओळखून तू ‘कराड फेज टू’ या नवनिर्माणाच्या संकल्पनेचा ध्यास घेतलास. विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि मोठ्या निधीच्या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा देण्याचे प्रयत्न केलेस.

नगराध्यक्ष झाल्यानंतरही तुझ्या निर्णयांमध्ये तुझ्या संस्कारांची झलक दिसली. नगराध्यक्षपदाचे मानधन आणि बैठकीचे भत्ते स्वीकारून ते स्वतःकडे न ठेवता जनरल फंडात जमा करण्याचा निर्णय असो किंवा नगराध्यक्षांचे वाहन न वापरण्याचा निर्णय असो—पदापेक्षा जबाबदारी मोठी मानणारा माझा मित्र राजू मला त्यातून पुन्हा दिसला.

तुझ्या वडिलांचा, शिक्षणतज्ञ व शाहीर आत्माराम यादव यांचा शैक्षणिक वारसा तू पुढे नेत आहेस, याचा मला विशेष अभिमान वाटतो.

कराड नगरपरिषद शाळा क्रमांक ३ साठी स्वतःच्या खिशातून लाखो रुपये खर्च करून संगणक कक्ष, गणवेश, बांधकाम आणि रंगरंगोटी करून देण्यापासून ते पालिकेच्या शाळांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यापर्यंतचा तुझा प्रवास हा केवळ राजकीय नाही; तो एका संवेदनशील माणसाचा प्रवास आहे.

आज कराडचा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून तुझ्याकडे पाहताना मला अभिमान वाटतो...

पण खरं सांगू?

मला सर्वाधिक अभिमान वाटतो तो ‘
आजही माझ्यासाठी तितकाच जिवलग असलेल्या  ‘राजू’चा!

कारण पदं येतात... जातात...
सत्ता बदलते... काळ बदलतो...
पण काही नाती काळाच्या पलीकडे जातात.

आपली ३५ वर्षांची मैत्री हे त्याचं जिवंत उदाहरण आहे.

राजू...

तू आज कराडचा लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेस. हजारो लोकांच्या अपेक्षा तुझ्याशी जोडल्या आहेत. शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे.

पण माझ्यासाठी तू आजही तोच आहेस...

अकरावीच्या वर्गात माझ्यासोबत बसलेला,
सातारला दोघांसाठी डबा आणणारा,
एका ताटात माझ्यासोबत जेवणारा,
माझ्या वाईट काळात माझी सावली बनून उभा राहणारा,
आणि सुख-दुःखात कोणतीही अपेक्षा न ठेवता माझ्या सोबत राहणारा माझा मित्र ‘राजू’!

तुझं मन असंच मोठं राहो...
तुझ्या हातून कराडच्या विकासाची मोठी कामं घडोत...
तुझ्या नेतृत्वाला यश मिळो...
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—

आज पदामुळे तुझी ओळख मोठी झाली असली, तरी माणूस म्हणून तू जसा आहेस, तसाच कायम राहा...

कारण माझ्यासाठी...

“राजेंद्रसिंह यादव” आणि “राजू” हे माझ्या आयुष्यातील एका अतूट, निरपेक्ष आणि भावासारख्या नात्याचं नाव आहे!

माझ्या जिवलग मित्राला,

वाढदिवसाच्या मनःपूर्वक, मनापासून आणि अनंत शुभेच्छा!

तुला उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो आणि कराडच्या विकासासाठी तुझ्या मनात असलेली प्रत्येक स्वप्नं पूर्ण होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!


तुझा मित्र

अजिंक्य गोवेकर-संपादक/ पत्रकार/वेध-माझा...


Friday, September 18, 2026

मनासारखा राजा, राजासारखं मन असणारा कराडचा "राजा' ; लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत इतिहास घडला आणि लोकप्रिय, तरुण तडफदार व धडाडीचे नेतृत्व असणारे राजेंद्रसिंह यादव यांनी थेट नगराध्यक्षपदी विजय मिळवला. लोकप्रिय नेता ते लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी झेप घेणाऱ्या राजेंद्रसिंह यादव यांच्या रूपाने कराडकरांनी थेट नगराध्यक्ष निवडणुकीतून आपला नेता निवडला आहे. कराडच्या नवनिर्माणाचा संकल्प घेऊन राजेंद्रसिंह यादव विकासाची फेज टू ही संकल्पना राबवत आहेत.
कराड शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या ध्यानात घेऊन विकासाची नवी संकल्पना आखण्याची गरज होती. गेली तीन दशके नगरपालिकेच्या माध्यमातून सक्रीय असणाऱ्या राजेंद्रसिंह यादव यांनी कराड शहराची गरज ओळखून ‘कराड फेज टू’ या कराडच्या नवनिर्माणाचा संकल्प सोडला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हजारो कराडकरांच्या साक्षीने एकनाथ शिंदे यांनी राजेंद्रसिंह यादव यांना कराडच्या विकासासाठी 100 कोटींपेक्षा जास्त निधी देण्याचा शब्द दिला. प्रत्यक्षात यादव यांनी जिद्दीने प्रयत्न करून 325 कोटी रूपयांचा निधी कराडसाठी खेचून आणला. यातून कराडच्या भुयारी गटर योजनेचे अद्ययावतीकरण व पाणी योजनेचे अद्ययावतीकरण अशी महत्वाची कामे मार्गी लागली. याबरोबरच शहरात स्मारक सुशोभीकरण, रस्ते, गटर्स अशा विविध कामांच्या माध्यमातून शहराचा मेकओव्हर होऊ लागला.
या दरम्यानच्या काळात नगरपालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत सुमारे 10 हजारांच्या मताधिक्याने राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्षपदी विजयी झाले. याबरोबरच त्यांच्या यशवंत आघाडी व लोकशाही आघाडीची नगरपालिकेमध्ये बहुमताने सत्ता आली. नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारताना राजेंद्रसिंह यादव यांनी आर्थिक शिस्तीचा धडा घालून देत नगराध्यक्ष पदाचे मानधन, जनरल मिटींगचे भत्ते न स्वीकारता ते जनरल फंडात वर्ग करण्याचा निर्णय घेतला. नगराध्यक्षांचे वाहनही न वापरण्याचा निर्णय घेतला.
गेली तीन दशके नगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना राजेंद्रसिंह यादव यांना पालिका कामकाजाची खडान्खडा माहिती झाली आहे. याविषयावर ते तासन्तास बोलतात. त्यावेळी त्यांच्या अभ्यासूपणाची झलकही नागरिकांना दिसते. कराड नगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी नियमितपणे मिळावे, यासाठी त्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पाणी योजनेच्या अद्ययावतीकरणात हे बदल दिसणार आहेत. शहराचा चेहरामोहरा बदलावा, शहर सुशोभित दिसावे, यासाठी स्मारक सुशोभीकरण, चौक सुशोभीकरण, स्वच्छता या विषयांना त्यांनी प्राधान्य दिले आहे. शहर विकासाच्या त्यांच्या स्वत:च्या संकल्पना असून त्या राबवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून शहरातील विकासकामांसाठी निधी उपलध व्हावा, यासाठी ते सतत प्रयत्न करत आहेत.
वडील शिक्षणतज्ञ, शाहीर आत्माराम यादव यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे  नेताना त्यांनी आपल्या प्रभागातील कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3 साठी स्वत:च्या खिशातून दहा लाखांहून अधिक रुपये खर्च करून संगणक कक्ष, विद्यार्थ्यांना गणवेश, शाळेचे बांधकाम आणि संपूर्ण रंगरंगोटी करून दिली. आज ही शाळा त्यांच्या छत्रछायेखाली देशभर नावलौकिक मिळवू शकली. आज या शाळेला पीएम श्री मानांकन, नवीन इमारतीसाठी 10.55 कोटीचा निधी मिळाला आहे. नगराध्यक्ष झाल्यानंतर पालिकेच्या दहाही शाळांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या सुविधांमुळे पालिकेच्या शाळांमध्ये शिकणारा गरीब घरचा विद्यार्थी देखील कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यां समोर स्पर्धा करू लागला आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘जय जवान’चा तिरुपती बालाजी अवतरला! मंदिर प्रतिकृती ठरतेय कराडकरांचे आकर्षण; देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

वेध माझा ऑनलाईन।
कराडच्या शुक्रवार पेठेतील जय जवान श्री गणेश मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यंदा तिरुपती बालाजी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. भव्य आणि आकर्षक देखाव्यामुळे हा देखावा गणेशभक्तांसह कराडकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, दर्शन व देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

जय जवान श्री गणेश मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून कराडच्या गणेशोत्सवाला सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक देखाव्यांची वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. यंदा मंडळाचे ५० वे वर्ष अर्थात सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने विशेष आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.
मंडळाच्या आतापर्यंतच्या गाजलेल्या देखाव्यांमध्ये इच्छापूर्ती कलश, भुताची गुहा, चालता-बोलता प्रश्नमंजुषा, अष्टविनायक दर्शन, अक्षरधाम मंदिर, एड्स जनजागृती सजीव देखावा आणि गंगोत्री मंदिर यांचा समावेश आहे. या देखाव्यांना कराडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्याच परंपरेला पुढे नेत यंदा तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
सुवर्ण महोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, नगरसेविका किशोरी शिंदे, नगरसेवक आशुतोष डुबल तसेच भाजप युवा नेते अतुल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी जय जवान श्री गणेश मंडळ उत्सव समिती २०२६चे अध्यक्ष सचिन औंधकर, उपाध्यक्ष अमोल पोकळे, खजिनदार संदीप कालेकर, सचिव प्रसाद तोडकर, तसेच ट्रस्टी मंडळाचे अध्यक्ष शंतनू कालेकर, उपाध्यक्ष प्रशांत माळवदे, खजिनदार उमेश बाचल, सचिव आकाश बाचल यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक परंपरा आणि कलात्मक देखाव्यांची परंपरा जपणाऱ्या जय जवान मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीने यंदाच्या गणेशोत्सवात विशेष रंग भरला आहे.

गणेश मंडळाच्या आरतीतून जनतेशी नाळ जोडणारे अतुलबाबा-शिवेंद्रसिंहराजे! कराडच्या गणेश मंडळांना दुचाकीवरून भेटी; सामान्यांमध्ये मिसळत नेत्यांनी साधला थेट संवाद ;कराडमध्ये चर्चेला उधाण!

वेध माझा ऑनलाइन।
गणेशोत्सवाच्या उत्साहाने कराड शहर आणि परिसर भक्तिमय झाला असताना सार्वजनिक गणेश मंडळांच्या आरत्या, दर्शन आणि विविध कार्यक्रमांना राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीही पाहायला मिळत आहे. आमदार अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते शहरातील विविध गणेश मंडळांमध्ये आरतीचे कार्यक्रम सुरू असतानाच, आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही कराड शहरातील गणेश मंडळांना भेटी देत गणरायाची आरती केली.

विशेष म्हणजे, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार अतुलबाबा भोसले यांनी शहरातील विविध गणेश मंडळांना दुचाकीवरून फिरत भेटी देत कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला. मोठा ताफा किंवा औपचारिक स्वागतापेक्षा गणेशोत्सवाच्या वातावरणात सामान्य नागरिकांमध्ये मिसळण्याच्या या पद्धतीची सध्या शहरातील गणेश मंडळांमध्ये चर्चा रंगली आहे.

गणेश मंडळात पोहोचल्यानंतर आरतीमध्ये सहभागी होणे, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधणे, गणेशभक्तांच्या शुभेच्छा स्वीकारणे आणि त्यांच्यासोबत काही क्षण घालवणे, यामुळे दोन्ही नेत्यांनी आपुलकीचा संदेश दिल्याचे मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.

सातारा जिल्ह्यात भाजपचे प्रमुख नेते म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अतुलबाबा भोसले यांची स्वतंत्र राजकीय ओळख आहे. सातारा परिसरात शिवेंद्रसिंहराजे तर कराडमध्ये अतुलबाबा भोसले, अशी स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. मात्र गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक आणि धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने दोन्ही नेते नागरिकांमध्ये प्रत्यक्ष मिसळताना दिसल्याने त्यांच्या या शैलीची चर्चा आता गणेश मंडळांमध्येही होत आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, आपुलकी आणि नागरिकांशी संवाद साधण्याचे माध्यम ठरतो. त्याच पार्श्वभूमीवर नेते आणि सामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी करणाऱ्या या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कराडच्या गणेश मंडळांमध्ये सध्या आरतीसोबतच या दोन्ही नेत्यांच्या साधेपणाच्या शैलीचीही चर्चा रंगताना दिसत आहे.

सह्याद्री साखर कारखान्याच्या सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; सभास्थळी राडा५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या १५ मिनिटांत गुंडाळल्याचा विरोधकांचा आरोप; आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम यांची प्रतिसभा

वेध माझा ऑनलाईन।
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज सत्ताधारी व विरोधी गटातील कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे चर्चेत आली. सभेच्या ठिकाणी दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भाजपचे आमदार मनोज घोरपडे आणि विधान परिषद आमदार धैर्यशील कदम हे कार्यकर्त्यांसह सभास्थळी उपस्थित झाले. यावेळी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सभास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले; मात्र काही काळ कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे चित्र होते.
दरम्यान, मुख्य सभा गुंडाळल्यानंतर आमदार मनोज घोरपडे व आमदार धैर्यशील कदम यांनी त्याच ठिकाणी प्रतिसभा घेत सत्ताधारी गटावर प्रश्नांची सरबत्ती केली. "बाळासाहेब पाटील यांनी सभा का गुंडाळली? ६५० कोटी रुपयांचे कर्ज कशासाठी घेतले? या कर्जाची परतफेड कशी करणार?" असे सवाल उपस्थित करण्यात आले.

सह्याद्री साखर कारखाना हा शेतकरी सभासदांच्या मालकीचा असून सभासदांना कारखान्याच्या कारभाराबाबत प्रश्न विचारण्याचा आणि त्याची उत्तरे मिळण्याचा अधिकार आहे. मात्र, सभा अवघ्या १५ मिनिटांत गुंडाळण्यामागचे कारण काय, असा सवालही आमदार घोरपडे व कदम यांनी प्रतिसभेत उपस्थित केला.

"कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांसह ६५० कोटी रुपयांच्या कर्जाबाबत सरकार दरबारी चौकशी लावणार," असे आमदार मनोज घोरपडे व आमदार धैर्यशील कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सह्याद्री सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांसाठी महत्त्वाचा असून तो शेतकऱ्यांच्या मालकीचा कायम टिकला पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न असल्याचेही दोन्ही आमदारांनी यावेळी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकारामुळे सह्याद्री कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधी गटातील संघर्ष चव्हाट्यावर आला असून, ६५० कोटींच्या कर्जाचा मुद्दा तसेच मोफत साखर देण्याचे जाहीर करूनही ती साखर मोफत का दिली जात नाही... या मुद्यांसह अवघ्या १५ मिनिटांत सभा गुंडाळल्याचा आरोप देखील चर्चेत असल्याने कारखान्याच्या कारभाराबाबत आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान पत्रकारांशी बोलताना कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी विरोधक आमदारांचे सर्व आरोप फेटाळून लावले 

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा ; भाजप आमदार धैर्यशील कदम मनोज घोरपडे यांची सभेत एन्ट्री ; सभेच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण मोठा पोलीस बंदोबस्त ; मोफत साखरेच्या मुद्यावरून सत्ताधारी - विरोधक आमनेसामने ; कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील यांच्याकडून मध्यस्थीची भूमिका ;


वेध माझा ऑनलाईन।
आज सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा पार पडली त्यामध्ये सत्ताधारी व विरोधी गटात राडा झाला यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

दरम्यान या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भाजप आमदार मनोज घोरपडे, विधान परिषद आमदार धैर्यशील कदम सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत उपस्थित झाले. यावेळी  कार्यकर्त्यांची सभास्थळी हामरीतुमरी झाल्याचे पहायला मिळाले. 
सभेठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभा ठिकाणी राडा झाला त्यानंतर पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांततेच आवाहन करण्यात आले. मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते

यानंतर भाजप चे आमदार मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी त्याच ठिकाणी दुसरी प्रतिसभा घेत बाळासाहेब पाटील यांनी सभा का गुंडाळली?650 कोटींच कर्ज कशासाठी घेतलं?त्याची परतफेड कशी करणार याबाबत प्रश्न विचारून आम्ही या कारखान्याची सरकार दरबारी चौकशी लावणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले
साखर कारखाना हा शेतकरी सभासदांसाठी महत्वाचा आहे शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे त्यांना प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत मात्र सभा केवळ 15 मिनिटात गुंडालायच कारण काय?असा सवालही या प्रतिसभेत दोन्ही आमदारांकडून विचारण्यात आला
सह्याद्री कारखाना शेतकरी सभासदांसाठी टिकला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे असेही हे दोन्ही आमदार म्हणाले

पी डी पाटील यांच्या नावाचा पुरस्कार भाग्याचा!सयाजी शिंदे :

वेध माझा ऑनलाईन।
महाराष्ट्र म्हटलं की यशवंतराव चव्हाण,यशवंतराव चव्हाण म्हटलं की कराड अन् कराड म्हटलं की पी डी पाटील असे समीकरण तयार झाले आहे. आणि आज यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत दिवंगत पी डी पाटील यांच्या नावाने सुरू असणारा प्रतिष्ठानचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' मला प्रदान करण्यात आला हे मी माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन सिनेकलाकार सयाजी शिंदे यांनी केले.

कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृति सदनात गुरुवारी आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सयाजी शिंदे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील होते.कवी, लेखक अरविंद जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कराडचे नगराध्यक्ष राजेंद्र यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांची उपस्थिती होती. 

सयाजी शिंदे म्हणाले मला आजवर अनेक पुरस्कार मिळाले पण हे पुरस्कार घेताना मला नेहमी प्रश्न पडतो की हा पुरस्कार घेऊन करायचं काय त्याप्रमाणेच हा पुरस्कार घेताना देखील मला तो प्रश्न पडला त्यावेळी याच कराड तालुक्यातील वसंतगड येथे वृक्षारोपण चळवळ राबवणाऱ्या मुलांना मदत करायची आणि वसंतगड पुन्हा एकदा हिरवा करण्याचा मानस मी मनाशी बाळगून असून तो संकल्प पुढे नेण्यासाठीच हा पुरस्कार मला बळ देणार आहे. 

अरविंद जगताप म्हणाले,अनेक कार्यक्रमांमध्ये एखाद्या व्यक्तीला भेट काय द्यावं असा प्रश्न मला पडतो पण आज सयाजी शिंदेंना भेटल्यानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने झाडे भेट देऊन ती जतन करण्याचा संकल्प करायला लावावा अशी नवी प्रेरणा मला यामधून मिळाली आहे.अन् चांगल्या लोकांनी चांगले विचार,चांगली कामे नव्या पिढीसमोर जावेत म्हणून पुरस्कार स्विकारले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.


Thursday, September 17, 2026

शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पत्र; काय आहे पत्रात ?

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील दिग्गज नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी हे पत्र लिहिलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या पाऊस नाहीय. जुलै महिन्यानंतर म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. एल निनोचा हा इफेक्ट आहे. पावसाळा सुरु होण्याआधीच हवामान विभागाने एल निनोमुळे यंदा पाऊस कमी होईल असा अंदाज वर्तवला होता. आता त्याचे परिणाम दिसून येत आहेत.
पाण्याअभावी शेतकऱ्याला पेरणी करता येत नाहीय. आधीच जी पेरणी केलेली आहे, तिथे पाऊस नसल्यामुळ पिकाचं नुकसान होत आहे. जनावरांना खायला चारा नाही. पिण्यासाठी पाणी नाहीय. राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. म्हणून शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीच्या उपायोजनांची मागणी केली आहे.

क्रेडाई कराडच्या विविध मागण्यांवर नगरपरिषद प्रशासनाची सकारात्मक चर्चा

वेध माझा ऑनलाईन।
नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली क्रेडाई कराडचे पदाधिकारी,  मुख्याधिकारी, कर अधिकारी तसेच नगररचना विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत कराड शहरातील मालमत्ता कर व नगररचना विषयक विविध मुद्द्यांवर सकारात्मक नुकतीच चर्चा करण्यात आली.

क्रेडाई कराडच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भाड्याने देण्यात आलेल्या मालमत्तांवरील मालमत्ता कराची आकारणी तुलनेने अधिक होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सदर कर आकारणीमुळे मोठ्या ब्रॅण्ड्सना कराड शहरात व्यवसायासाठी आकर्षित करण्यात अडचणी येत असून, त्याचा शहराच्या आर्थिक विकास व रोजगारनिर्मितीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. पुणे, नाशिक आदी शहरांमध्ये वाणिज्य वापराच्या तुलनेत आकारण्यात येणाऱ्या कराच्या धर्तीवर कराड शहरातील कर आकारणीबाबत शासनस्तरावर सकारात्मक विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच, मालमत्ता करासाठी करपात्र/दरयोग्य मूल्य निश्चित करताना केवळ प्रत्यक्ष भाडे, बाजारभाडे, व्यावसायिक उलाढाल किंवा उत्पन्न यांचा आधार न घेता मिळकतीची वाजवी वार्षिक भाडेक्षमता व लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींचा विचार करण्यात यावा, असा मुद्दाही क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. याबाबत प्रशासनाने विद्यमान कायद्यातील तरतुदीनुसार कर आकारणी होत असल्याचे स्पष्ट केले. सदर विषयासाठी आवश्यक कायद्यातील बदल शासनस्तरावर होणे अपेक्षित असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

मा. नगराध्यक्ष यांनी क्रेडाई कराड यांनी मांडलेल्या मागण्या व शहराच्या विकासाच्या दृष्टीने उपस्थित केलेले मुद्दे रास्त असल्याचे नमूद करून, प्राप्त निवेदनानुसार सकारात्मक कार्यवाही करण्याची भूमिका व्यक्त केली. याबाबत सर्वसाधारण सभेत चर्चा झाल्याप्रमाणे आवश्यक ठराव मंजूर करून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यास मा. नगराध्यक्ष यांनी मान्यता दिली.

नगररचना विषयक विविध मुद्द्यांवरही सकारात्मक चर्चा
बैठकीदरम्यान कराड शहरातील पुररेषा व नगररचना विषयक महत्त्वाच्या बाबींवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये ब्ल्यू लाईन व रेड लाईन पुररेषेचे अद्ययावत डिजिटल सर्वेक्षणाच्या माध्यमातून फेरसर्वेक्षण व पुनर्लोकन करणे, नदीपात्र व ब्ल्यू लाईनदरम्यानच्या क्षेत्रात चिपळूण व कोल्हापूर शहरांच्या धर्तीवर बांधकाम परवानगीबाबत विचार करणे, नदीपात्र व रेड लाईनदरम्यानच्या क्षेत्रात बेसमेंट पार्किंगला परवानगी देणे तसेच पुररेषेमुळे बाधित शहरांच्या समस्यांबाबत गठीत समितीमध्ये मा. नगराध्यक्ष किंवा मा. मुख्याधिकारी, कराड नगरपरिषद यांचा समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

वरील सर्व विषयांवर उपस्थितांमध्ये सकारात्मक व विधायक चर्चा झाली असून, कराड शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देण्यासाठी शासनाच्या प्रचलित नियम व धोरणांच्या चौकटीत आवश्यक त्या बाबींचा पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.

या बैठकीस नगरपरिषद सदस्य मा. श्री. जयंत काका पाटील, मा. श्री. अल्ताफभाई शिकलगार, मा. श्री. फारुखभाई पटवेकर, क्रेडाई कराडचे अध्यक्ष दीपक रेनाक, तनय जाधव, सतीश यादव, महेश पाटील, आपासाहेब पवार, मकरंद जाखलेकर, आदिक पवार, प्रशांत पाटील (सेक्रेटरी), अमित सूर्यवंशी, ओंकार कुंभार यांच्यासह कराड नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कराड शहराचा आर्थिक, व्यावसायिक व नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यात समन्वयातून सकारात्मक पावले उचलण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे’गावी जाणार, नेमकं कारण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्या जिल्ह्यातील आपल्या मूळगावी दरे येथे गणपती दर्शनासाठी रवाना झाले आहेत. गावच्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने ते दरे गावी भेट देत असून, स्थानिक लोकांशी संवाद साधणार आहेत. हा प्रवास त्यांच्यासाठी वैयक्तिक आणि भावनिक दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण ते आपल्या कुटुंबासमवेत आणि ग्रामस्थांसोवेत पारंपरिक उत्सवात सहभागी होतील. राज्याच्या प्रमुखांनी आपल्या मूळगावी येऊन सणात सहभागी होणे, हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नेहमीच एक महत्त्वाचा क्षण असतो.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा अशाच एका महत्त्वाच्या क्षणाची नोंद घेतो. अहमदाबाद येथून थेट दरे गावी पोहोचल्यानंतर ते १९ तारखेला मुंबईला परतणार असल्याची माहिती उपलब्ध आहे. हा दौरा राजकीय व्यस्ततेतून वेळ काढून पारंपरिक सणांमध्ये सहभागी होण्याचे त्यांचे प्रामाणिक प्रयत्न दर्शवतो. 

जरांगे-पाटील यांची शिवराळ भाषा यापुढे सहन केली जाणार नाही ; .... रामोशी समाजाचे नेते व जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांचा इशारा ;

वेध माझा ऑनलाईन।
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे- पाटील यांचे आंदोलन सुरू आहे, यासंदर्भात तुमची भूमिका काय ? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दौलतनाना शितोळे म्हणाले, मराठा समाजात अनेक गोरगरीब कुटुंबं आहेत. त्यामधील ज्यांच्या नोंदी सापडतील, त्यांना दाखले मिळावेत, आरक्षण मिळावे. त्याला आमचा विरोध नाही. मनोज जरांगे-पाटील यांना यासाठी आंदोलन करण्याचा सरकार बरोबर भांडण्याचा, जाब विचारण्याचा लोकशाहीत संविधानाने अधिकार दिला आहे. ते त्यांनी करावे आणि त्यांना आरक्षण देताना इतरांवर कोणावर अन्याय होऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी. मात्र राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलताना जरांगे-पाटील यांनी खालच्या पातळीवर जावून फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत शिवराळ भाषा वापरू नये. त्यांची शिवराळ भाषा  यापुढे सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा रामोशी समाजाचे नेते व जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी आज कराडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिला 

भाजपा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांची आज गुरुवारी कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. महाराष्ट्रातील रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या विविध मागण्या महायुती सरकारने मान्य केल्याबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी  संवाद यात्रा आयोजित केली असल्याचे शितोळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी संघटनेचे राज्याचे युवक अध्यक्ष सुधीर नाईक, जिल्हाध्यक्ष दादासो मंडले, ज्येष्ठ सल्लागार सुरेश मंडले, आनंदराव जाधव, बहिर्जी नाईक यांचे वंशज आबासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष मल्हारी गुजले, अरूण गुजले आदी उपस्थित होते.

यावेळी ते पुढे म्हणाले
पुरंदर तालुक्यातील दिवे येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक साकारण्यात येणार असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन होणार असल्याची माहितीही  शितोळे यांनी यावेळी दिली. या स्मारकाच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्रातील रामोशी, बेरड, बेडर समाज ज्या-ज्या गावांमध्ये वास्तव्यास आहे, त्या गावांमधील माती आणि पाणी आणण्याचा संकल्प जय मल्हार क्रांती संघटनेने केला आहे. भूमिपूजनाच्या वेळी राज्यातील समाजबांधव, बहुजन बांधव आणि संघटनेचे पदाधिकारी ही माती-पाणी घेऊन उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संघटनेच्यावतीने ठेवण्यात आलेल्या विविध मागण्या मान्य केल्याबद्दल राज्यातील महायुती सरकारचे त्यांनी आभार मानले. उर्वरित मागण्यांसह राज्यातील रामोशी समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्यासाठी लढा उभारण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

समाजाच्या मान्य झालेल्या मागण्यांमध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यासाठी आर्थिक तरतूद करणे, उमाजी नाईक यांची शासकीय जयंती सुरू करणे, त्यांच्या नावाने भारत आणि आंतरराष्ट्रीय पोस्टाची तिकिटे प्रसिद्ध करणे, तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार जाहीर करणे यांचा समावेश असल्याचे शितोळे यांनी नमूद केले.महामंडळाच्या माध्यमातून रामोशी समाजातील युवकांसाठी विविध कर्ज योजना उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय खानापूर येथील आयटीआय कॉलेजला शिवनेत्र बहिर्जी नाईक, पुरंदर येथील आयटीआय कॉलेजला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, जत येथील आयटीआय कॉलेजला क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण, गडचिरोली येथील आयटीआय कॉलेजला व्यंकाप्पा नाईक, तर राहता-अकोले येथील आयटीआय कॉलेजला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव राज्यशासनाकडून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्यांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो, त्याच धर्तीवर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने केली होती. शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून दरवर्षी भिवडी (पुरंदर) येथील जयंती सोहळ्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शितोळे यांनी सांगितले.

रामोशी, बेरड, बेडर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे ठोस शिफारस करण्याचे आश्वासन यापूर्वी राज्यशासनाने दिले आहे. ही समाजाची प्रमुख मागणी असून त्यासाठी यापुढील काळात लढा उभारून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची घोषणा शितोळे यांनी केली.

रामोशी, बेरड, बेडर समाजासाठी सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर शासनाने आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रशिक्षण व संशोधन संस्था स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली. समाजातील युवकांना शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था महत्त्वाची ठरेल, असे त्यांनी सांगितले.

कर्नाटक राज्यात रामोशी, बेरड, बेडर समाजाचे १८ आमदार आणि ६ खासदार असल्याचा दाखला देत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजतागायत या समाजाला विधान भवनात प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचे नमूद करून शितोळे यांनी समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली.

महाराष्ट्रातील रामोशी समाजाच्या लाखो हेक्टर वतनी जमिनींपैकी काही जमिनींची लूट झाल्याचा, तर काही जमिनी शासनाकडे जमा असल्याचा दावा शितोळे यांनी केला. अशा जमिनी समाजबांधवांना राज्य शासनाकडून परत मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

राज्यातील अनेक रामोशी, बेरड, बेडर समाजबांधव गावकुसालगतच्या वस्त्यांमध्ये राहत असून त्यांच्या वास्तव्याची अधिकृत नोंद नसली तरी ते त्या गावचे मतदार आहेत. मात्र नोंदीअभावी त्यांना घरकुले आणि इतर शासकीय सुविधांचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा शितोळे यांनी मांडला. अशा वस्त्यांमधील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक आदेश कार्यान्वित करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये रामोशी, बेरड, बेडर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. समाजातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून हातावर पोट असल्याने मुलांना बाहेरगावी पाठवून शिक्षण देणे शक्य होत नाही. परिणामी शिक्षणातील अडथळ्यांमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचे शितोळे यांनी सांगितले. त्यामुळे या किमान सहा जिल्ह्यांमध्ये समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यशासनाकडून वसतिगृहे स्थापन करण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
 
मान्य झालेल्या मागण्यांबद्दल शासनाचे आभार मानतानाच समाजाच्या उर्वरित मागण्यांसाठी पाठपुरावा सुरूच राहील. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील समाजबांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न संवाद यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे दौलतनाना शितोळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 
वेध माझा ऑनलाईन।
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे- पाटील यांचे आंदोलन सुरू आहे, यासंदर्भात तुमची भूमिका काय ? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दौलतनाना शितोळे म्हणाले, मराठा समाजात अनेक गोरगरीब कुटुंबं आहेत. त्यामधील ज्यांच्या नोंदी सापडतील, त्यांना दाखले मिळावेत, आरक्षण मिळावे. त्याला आमचा विरोध नाही. मनोज जरांगे-पाटील यांना यासाठी आंदोलन करण्याचा सरकार बरोबर भांडण्याचा, जाब विचारण्याचा लोकशाहीत संविधानाने अधिकार दिला आहे. ते त्यांनी करावे आणि त्यांना आरक्षण देताना इतरांवर कोणावर अन्याय होऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी. तसेच राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलताना जरांगे-पाटील यांनी खालच्या पातळीवर जावून शिवराळ भाषा वापरू नये. त्यांची शिवराळ भाषा  यापुढे सहन केली जाणार नाही असे रामोशी समाजाचे नेते दौलतनाना
शितोळे यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषदेत इशारा देत आपली भूमिका स्पष्ट केली

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक संवाद यात्रेच्या निमित्ताने भाजपा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांची गुरुवारी (दि. १७ सप्टेंबर) कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. महाराष्ट्रातील रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या विविध मागण्या महायुती सरकारने मान्य केल्याबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी ही संवाद यात्रा असल्याचे शितोळे यांनी सांगितले.

ते म्हणाले
पुरंदर तालुक्यातील दिवे येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक साकारण्यात येणार असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन होणार असल्याची माहितीही  शितोळे यांनी यावेळी दिली. या स्मारकाच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्रातील रामोशी, बेरड, बेडर समाज ज्या-ज्या गावांमध्ये वास्तव्यास आहे, त्या गावांमधील माती आणि पाणी आणण्याचा संकल्प जय मल्हार क्रांती संघटनेने केला आहे. भूमिपूजनाच्या वेळी राज्यातील समाजबांधव, बहुजन बांधव आणि संघटनेचे पदाधिकारी ही माती-पाणी घेऊन उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संघटनेच्यावतीने ठेवण्यात आलेल्या विविध मागण्या मान्य केल्याबद्दल राज्यातील महायुती सरकारचे त्यांनी आभार मानले. उर्वरित मागण्यांसह राज्यातील रामोशी समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्यासाठी लढा उभारण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

समाजाच्या मान्य झालेल्या मागण्यांमध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यासाठी आर्थिक तरतूद करणे, उमाजी नाईक यांची शासकीय जयंती सुरू करणे, त्यांच्या नावाने भारत आणि आंतरराष्ट्रीय पोस्टाची तिकिटे प्रसिद्ध करणे, तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार जाहीर करणे यांचा समावेश असल्याचे शितोळे यांनी नमूद केले.महामंडळाच्या माध्यमातून रामोशी समाजातील युवकांसाठी विविध कर्ज योजना उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय खानापूर येथील आयटीआय कॉलेजला शिवनेत्र बहिर्जी नाईक, पुरंदर येथील आयटीआय कॉलेजला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, जत येथील आयटीआय कॉलेजला क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण, गडचिरोली येथील आयटीआय कॉलेजला व्यंकाप्पा नाईक, तर राहता-अकोले येथील आयटीआय कॉलेजला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव राज्यशासनाकडून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्यांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो, त्याच धर्तीवर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने केली होती. शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून दरवर्षी भिवडी (पुरंदर) येथील जयंती सोहळ्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शितोळे यांनी सांगितले.

रामोशी, बेरड, बेडर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे ठोस शिफारस करण्याचे आश्वासन यापूर्वी राज्यशासनाने दिले आहे. ही समाजाची प्रमुख मागणी असून त्यासाठी यापुढील काळात लढा उभारून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची घोषणा शितोळे यांनी केली.

रामोशी, बेरड, बेडर समाजासाठी सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर शासनाने आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रशिक्षण व संशोधन संस्था स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली. समाजातील युवकांना शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था महत्त्वाची ठरेल, असे त्यांनी सांगितले.

कर्नाटक राज्यात रामोशी, बेरड, बेडर समाजाचे १८ आमदार आणि ६ खासदार असल्याचा दाखला देत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजतागायत या समाजाला विधान भवनात प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचे नमूद करून शितोळे यांनी समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली.

महाराष्ट्रातील रामोशी समाजाच्या लाखो हेक्टर वतनी जमिनींपैकी काही जमिनींची लूट झाल्याचा, तर काही जमिनी शासनाकडे जमा असल्याचा दावा शितोळे यांनी केला. अशा जमिनी समाजबांधवांना राज्य शासनाकडून परत मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. या माध्यमातून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहोचतील, असेही ते म्हणाले.

राज्यातील अनेक रामोशी, बेरड, बेडर समाजबांधव गावकुसालगतच्या वस्त्यांमध्ये राहत असून त्यांच्या वास्तव्याची अधिकृत नोंद नसली तरी ते त्या गावचे मतदार आहेत. मात्र नोंदीअभावी त्यांना घरकुले आणि इतर शासकीय सुविधांचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा शितोळे यांनी मांडला. अशा वस्त्यांमधील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक आदेश कार्यान्वित करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये रामोशी, बेरड, बेडर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. समाजातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून हातावर पोट असल्याने मुलांना बाहेरगावी पाठवून शिक्षण देणे शक्य होत नाही. परिणामी शिक्षणातील अडथळ्यांमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचे शितोळे यांनी सांगितले. त्यामुळे या किमान सहा जिल्ह्यांमध्ये समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यशासनाकडून वसतिगृहे स्थापन करण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
 
मान्य झालेल्या मागण्यांबद्दल शासनाचे आभार मानतानाच समाजाच्या उर्वरित मागण्यांसाठी पाठपुरावा सुरूच राहील. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील समाजबांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न संवाद यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे दौलतनाना शितोळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 याप्रसंगी संघटनेचे राज्याचे युवक अध्यक्ष सुधीर नाईक, जिल्हाध्यक्ष दादासो मंडले, ज्येष्ठ सल्लागार सुरेश मंडले, आनंदराव जाधव, बहिर्जी नाईक यांचे वंशज आबासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष मल्हारी गुजले, अरूण गुजले आदी उपस्थित होते.

गणेशोत्सवात भक्तीसोबत सामाजिक बांधिलकी! दिपकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवार पेठेतील श्री बाल गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम; रोटरी क्लबच्या सहकार्याने रक्तदान शिबिर, 40 ते 50 जणांचा सहभाग,:

वेध माझा ऑनलाइन।
: गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव, रोषणाई आणि देखावे नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपण्याचीही संधी! याच भावनेतून युवा नेते दिपकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड रोटरी क्लब आणि सोमवार पेठेतील श्री बाल गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे 40 ते 50 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

सोमवार पेठेतील श्री बाल गणेश मंडळाची धुरा दिपकदादा पाटील यांनी स्वीकारल्यापासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळत आहे. दरवर्षी मंडळाकडून आकर्षक गणेशमूर्ती, देखावे, विद्युत रोषणाई तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या गणेशोत्सवात या परंपरेला सामाजिक उपक्रमाची जोड देत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

आज गुरुवारी सकाळी रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. रोटरी क्लबचे प्रबोध पुरोहित आणि मंडळाचे आधारस्तंभ दिपकदादा पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 40 ते 50 रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘गणपती बाप्पा’च्या उत्सवाला समाजसेवेची जोड दिली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष, खजिनदार, मंडळाचे सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवातील आनंदासोबतच ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
वेध माझा ऑनलाईन
युवा नेते दिपकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराडच्या रोटरी क्लब व सोमवार पेठेतील श्री बाल गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज (गुरुवारी) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 40 ते 50 जणांनी रक्तदान करण्यात आल्याची माहिती देण्यात आली

सोमवार पेठेतील श्री बाल गणेश मंडळाची धुरा दिपकदादा पाटील यांनी स्वीकारल्यापासून याठिकाणी गणेशोत्सवानिमित विविध कार्यक्रम होत असतात विविध देखावे आकर्षक गणेश मूर्ती तसेच आकर्षक लायटिंग अशा विविधतेचे दर्शन याठिकाणी गणेशोत्सवावेळी प्रतिवर्षी याठिकाणी पहायला मिळते यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
आज सकाळी रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले  रोटरी क्लबचे प्रबोध पुरोहित व मंडळाचे आधारस्तंभ दिपकदादा पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम याठिकाणी संपन्न झाला या उपक्रमास 40 ते 50 जणांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी मंडळाचे अध्यक्ष तुषार देशपांडे यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष, खजिनदार, तसेच सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.  

मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांचा जरांगे यांच्यावर खळबळजनक आरोप ; म्हणाले...सेटलमेंट झाल्यानंतर जरांगेंनी आंदोलन मागे घेतले ; अंतरवाली सराटीच्या सरपंचाचा मुलगा आणि कंत्राटदार यांनी मिळून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सेटिंग केली ; आणखी काय म्हणाले...

वेध माझा ऑनलाइन।
मनोज जरांगे पाटील यांनी 20 दिवसानंतर आमरण उपोषण मागे घेतलं आहे. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जरांगे यांनी सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी वेळ दिला असून सरकारनेही ठरलेल्या वेळेत मागण्या मान्य करणार असल्याचं मान्य केल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी मात्र जरांगे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. सेटलमेंट झाल्यानंतर जरांगेंनी आंदोलन मागे घेतल्याचा मोठा दावा बारस्कर यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे.

अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खळबळजनक दावे केले आहेत. अखेर 20 दिवसानंतर उपोषण नाट्य संपलं आहे. अंतरवाली सराटीच्या सरपंचाचा मुलगा आणि कंत्राटदार यांनी मिळून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सेटिंग केली. वाळू माफिया आणि ईडी चौकशी या मुद्द्यावरून सेटिंग झाली आहे. आता ईडीची चौकशी होणार नाही. बंद खोलीत जरांगेंची सेटलमेंट झाली, असा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला आहे.

दिव्यांगांच्या दारी मदतीचा हात ! कराडमध्ये 921 दिव्यांग बांधवांना 80 लाखांचे सहाय्यभूत साहित्य; घरोघरी नोंदणी करून थेट लाभार्थ्यांपर्यंत मदत“ ; नरेंद मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिणमध्ये उपक्रम;

वेध माझा ऑनलाईन
गरज सांगण्यासाठी दिव्यांगांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, तर मदतच त्यांच्या दारी पोहोचली पाहिजे! या भूमिकेतून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत 921 दिव्यांग बांधवांना सुमारे 80 लाख रुपये किमतीचे सहाय्यभूत साहित्य वितरित करण्यात आले.

या उपक्रमामुळे दैनंदिन जीवनातील अनेक अडचणींना सामोरे जाणाऱ्या दिव्यांग बांधवांना मोठा आधार मिळाला. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि विनायक भोसले यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.
विशेष म्हणजे, केवळ कार्यक्रम आयोजित करून लाभार्थ्यांना बोलावून घेण्याऐवजी दिव्यांग बांधवांची माहिती संकलित करण्यासाठी टीमच्या माध्यमातून घरोघरी जाऊन रजिस्ट्रेशन करण्यात आले. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
40-50 हजारांच्या वस्तूही लाभार्थ्यांच्या हाती
दिव्यांग बांधवांच्या गरजेनुसार विविध सहाय्यभूत साधनांचे वितरण करण्यात आले. यातील काही साहित्याची किंमत 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत असल्याची माहिती आमदार अतुल भोसले यांनी दिली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांना या मदतीचा थेट फायदा होणार आहे.
दिव्यांगांसोबत ज्येष्ठ नागरिकांनाही आधार
या उपक्रमाचा लाभ केवळ दिव्यांग बांधवांपुरता मर्यादित न ठेवता ज्येष्ठ नागरिकांसाठीही सहाय्यभूत साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यामुळे समाजातील गरजू आणि आधाराची आवश्यकता असलेल्या घटकांना मदतीचा हात मिळाला.

आमदार अतुल भोसले यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की 921 दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले असून या साहित्याची एकूण किंमत सुमारे 80 लाख रुपये आहे. योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या या सहाय्यामुळे लाभार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात काही प्रमाणात सुलभता निर्माण होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कराड दक्षिण मतदारसंघात केंद्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी सुमारे 80 लाख रुपयांचे उपयोगी साहित्य वितरित करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांना याचा निश्चितच लाभ होईल. दिव्यांगांसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठीही हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

सांगलीच्या आराध्य दैवताच्या गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्तराधिकारी पदावरून पटवर्धन कुटुंबात वाद उफाळला ; अभिनेत्री भाग्यश्री यांनी नूतन युवराज आदित्यराजे यांना डावलून वारसदार असल्याचा दावा करत मंदिरात केली आरती ;

वेध माझा ऑनलाईन।
सांगलीच्या आराध्य दैवताच्या गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्तराधिकारी पदावरून पटवर्धन कुटुंबात वाद उफाळला आहे. अभिनेत्री भाग्यश्री यांनी नूतन युवराज आदित्यराजे यांना डावलून वारसदार असल्याचा दावा करत मंदिरात आरती केली. यावर अधिपती विजयसिंहराजे पटवर्धन यांनी भाग्यश्रीचे कृत्य चुकीचे असून १९४० च्या कायद्यानुसार आदित्यराजेच युवराज राहतील, असं स्पष्ट केलं. त्यांच्या आरोग्यविषयक चर्चांनाही पूर्णविराम दिला.

सांगलीचे आराध्यदैवत असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरातील धार्मिक विधी आणि सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्तराधिकारीपदावरून पटवर्धन कुटुंबातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. अभिनेत्री राजकन्या भाग्यश्री पटवर्धन यांनी नूतन युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना डावलून गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन उत्सवमूर्तीची आरती केल्याने या वादाला तोंड फुटले. या घटनेनंतर संस्थानच्या उत्तराधिकारीपदाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पटवर्धन कुटुंबातील मतभेद चर्चेचा विषय ठरले आहेत.या पार्श्वभूमीवर सांगली संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. १९४० च्या संस्थान कायद्यानुसार युवराज आदित्यराजे पटवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली असून, यापुढे संस्थानचा युवराज म्हणून आदित्यराजेच काम पाहतील, हा आपला निर्णय असल्याचे विजयसिंहराजे यांनी स्पष्ट केले.

भाग्यश्री पटवर्धन यांनी गणपती मंदिरात केलेली कृती चुकीची असल्याचंही ते यावेळी म्हणाले. भाग्यश्री यांच्यासह अन्य दोन मुलींनाही कुटुंबात समान मानसन्मान दिला जातो. मात्र, एकदा प्रतिष्ठापनेची पूजा झाल्यानंतर पुन्हा मंदिरात येऊन पूजा अथवा आरती करणे योग्य नसल्याचे विजयसिंहराजे यांनी म्हटले. दरम्यान, आपल्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही विजयसिंहराजे यांनी उत्तर दिलं. आपण आजारी असल्याच्या चर्चा होत असल्या तरी आपण तंदुरुस्त असून, अजूनही आपल्यात पुरेशी ताकद असल्याचे सांगत त्यांनी प्रकृतीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय घडलं ?
गणपती मंदिरात उत्सवमूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना सकाळच्या सुमारास अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन मंदिरात पोहोचल्या. प्रतिष्ठापनेसाठी उत्सवमूर्ती दरबार हॉलकडे नेण्यापूर्वी आरती करण्यात येणार होती. या आरतीसाठी नूतन युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, याच वेळी भाग्यश्री पटवर्धन यांनी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि आरती केली. त्यामुळे मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या व्यक्तींमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले आणि काही वेळातच या घटनेची चर्चा सुरू झाली.

या कृतीमागील आपली भूमिका स्पष्ट करताना भाग्यश्री पटवर्धन यांनी, राजेंची प्रकृती नेहमीच ठीक नसते आणि त्यामुळे आपल्या मुलांपैकी कोणीही उपस्थित राहून आरती करावी, अशी भूमिका घेतल्याचं सांगितलं होतं. तर आता विजयराजे पटवर्धन यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. मी आजारी असल्याचे बोलण्यात येत आलं पण मी तंदुरुस्त आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.


Wednesday, September 16, 2026

आ. डॉ. अतुलबाबांच्या पुढाकारातून उद्या विविध साहित्याचे होणार मोफत वितरण ; तब्बल ८०.७८ लाख रुपयांच्या विविध साहित्याचे होणार वाटप; ९२१ दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मदतीचा आधार!

वेध माझा ऑनलाईन।
 भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या गुरुवार दि. १७ सप्टेंबर रोजी पाचवड फाटा (ता. कराड) येथील आनंद मल्टिपर्पज हॉलमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी नि:शुल्क साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात येेेणार आहे. या शिबीरात तब्बल ९२१ पात्र दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते विविध सहाय्यभूत साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभाग योजनेंतर्गत डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकाराने दिनांक १ ते ३ जुलै दरम्यान कोयना वसाहत (ता. कराड) येथे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी शिबीर घेण्यात आले. यापैकी ९२१ पात्र लाभार्थ्यांना आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नामुळे तब्बल ८०.७८ लाख रुपयांचे विविध सहाय्यभूत साहित्य मंजूर झाले आहे. यामध्ये व्हीलचेअर, व्हीलचेअर विथ कमोड, काठी, कानाचे मशीन, कंबर पट्टा, गुडघ्याचा पट्टा, नेक बेल्ट, स्मार्ट फोन, पाठीचा पट्टा, कमोड चेअर अशा साहित्याचा समावेश आहे. 

या साहित्याचे नि:शुल्क वितरण पात्र दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या गुरुवार दि. १७ सप्टेंबर रोजी पाचवड फाटा येथील आनंद मल्टिपर्पज हॉलमध्ये सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला येताना पात्र लाभार्थ्यांनी आपले मूळ आधार कार्ड सोबत आणावे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
***

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

वेध माझा ऑनलाइन।
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अधिकच खालावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांनी त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात उपचारांची गरज असल्याचे म्हटले आहे. जरांगे पाटील सध्या पाटोदा येथे उपचार घेत असून, त्यांच्यावर गेल्या चार तासांपासून वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. आज सकाळी ते पाटोदा येथून श्रीगोंदा येथे जाण्यासाठी निघाले होते, मात्र प्रकृती बिघडल्याने ते बेशुद्ध पडले. त्यानंतर डॉक्टरांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले. आतापर्यंत त्यांना चार सलाईन देण्यात आल्या आहेत.

जिल्हा शल्य चिकित्सकांसह वैद्यकीय अधीक्षकांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली असली तरी ती अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागातील उपचारांची शिफारस करण्यात आली आहे. त्यांच्या रक्तदाब, शुगर आणि हृदयाच्या ठोक्यांवर सतत नजर ठेवली जात आहे. 

सुनेत्रा पवार यांचे रिलाँचिंग करण्याच पक्षाचा निर्णय ; आपल्या वहिनी आहेत ना !’ या नव्या घोषवाक्यासह महाराष्ट्रभर सुनेत्रा पवार यांचे दौरे आयोजित होणार;

वेध माझा ऑनलाईन।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकस्मात विमान अपघाती मृत्यूनंतर पक्षाचे जबाबदारी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर येऊन ठेपली आहे. सुनेत्रा पवार या राजकारणात नवख्या असल्याने त्यांना ही जबाबादारी कितपत सांभाळता येईल याविषयी अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडीया नावाने टीका करुन वाद ओढवून घेतला, त्यात आता राष्ट्रवादी पक्षाने आता सुनेत्रा पवार यांचे रिलाँचिंग करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळली आहे. तरी पक्षातील धुसफूस वाढल्यामुळे राष्ट्रवादीत सगळेच काही आलबेल नसल्याचेच चित्र समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर, २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांचे ‘रिलॉन्चिंग’ होणार आहे.
अजित पवार हयात असताना ‘एकच वादा, अजित दादा’ ही घोषणा लोकप्रिय झाली होती. आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या जाहीर कार्यक्रमात ही घोषणा कार्यकर्त्यांच्या तोडी असे आणि बॅनरही ही घोषणा लिहिली जात असे. मात्र आता ‘आपल्या वहिनी आहेत ना !’ या नव्या घोषवाक्यासह महाराष्ट्रभरात सुनेत्रा पवार यांचे दौरे आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते. हे रिलाँचिंग कँपेन प्रशांत किशोर यांच्या रणनीतीनुसार होणार असल्याचे सांगण्यात येते.

आशिष शेलार म्हणाले;..एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या भाषेत बोललं जातं, ते सहन केलं जाणार नाही ; मनोज जरांगेना इशारा ;

वेध माझा ऑनलाइन।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकेरी शब्दात बोललं जात आहे. त्यांचा अपमान केला जात आहे. मनोजजी, हे मान्य केलं जाणार नाही. हे सहन केलं जाणार नाही. तुम्ही तुमची भूमिका मांडा. पण आमच्या नेत्यांवर अपमानस्पद बोललं तर आता खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दात राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या भाषेत बोललं जातं, मनोज जी ते बरोबर नाही. हे अपमानास्पद आहे, असा हल्ला त्यांनी केला.

राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर कडक शब्दात हल्ला चढवला. तुम्ही तुमची भूमिका मांडा. सरकार तुमच्या प्रश्नावर सकारात्मक आहे. आम्ही समाजासोबत आहोत. पण अपमानास्पद भाषा मान्य केली जाणार नाही. हे प्रकरण अतर्क, अततायीपणा आणि अपमानास्पद पद्धतीने चाललंय ते बंद करा. सणासुदीला जनतेला त्रास होईल अशी भूमिका घेऊ नका. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, असं आशिष शेलार म्हणाले.

शिवराळ भाषेचा निषेध
मराठा समाजाचे प्रश्न गंभीर आणि योग्य आहेत. आमचा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. पण तुमची ही भाषा चालणार नाही. सुसंस्कृत महाराष्ट्राला ही भाषा योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात ही भाषा योग्य नाही. आम्ही तुमच्या शिवराळ भाषेचा निषेध करतो आणि या पुढे ही भाषा सहन करणार नाही हेही स्पष्ट करतो, असा इशाराच शेलार यांनी दिला आहे. एकनाथ शिंदेंनी समाजाबाबत भूमिका घेतली आहे. फडणवीस यांनी निर्णय घेतले आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
सरकारने मराठा समाजासाठी न्यायाची भूमिका घेतली. मराठा समाजाला अधिकार देण्याचं काम केलं. बोलघेवडेपणा करणाऱ्यांनी काही केलं नाही. मराठा समाज हे जाणतो आहे. जरांगेंना विनंती आहे, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या 14 पैकी 13 मागण्या पूर्ण झाल्या आहेत. अजून असतील तर त्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे. सणांच्यावेळी आंदोलन आणि कूच करणं बरोबर नाही, असंही ते म्हणाले.

अतर्क, अततायी आणि अपमानास्पद
जरांगे यांचं आंदोलन म्हणजे अतर्क, अततायीपणा आणि अपमानास्पद शब्दांचं आहे. अतर्क यासाठी म्हणतो ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत, ज्या न्यायिक प्रक्रियेत टिकल्या आहेत. त्या टिकवण्यासाठी सरकारने व्यवस्था उभी केली आहे. तरीही आंदोलन करणं अतर्क आहे. अतातायीपणा यासाठी की, न्यायालयात सरकार भूमिका मांडत आहे. चर्चाही करत आहे. मंत्रिमंडळ गटाची स्थापना केली आहे. तरीही टोकाची भूमिका घेणं हा अततायीपणा आहे. 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या भाषेत बोललं जातं, मनोज जी ते बरोबर नाही. हे अपमानास्पद आहे, असा हल्ला त्यांनी केला.

जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी काय दिला सल्ला ?

वेध माझा ऑनलाइन।
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यांच्या या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे. पण आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावला असल्याचे समोर आले आहे. आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिश सोळुंके यांनी अपडेट दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबर रोजी मुंबईकडे प्रस्तान केलं आहे. परंतु उपोषणामुळे वाटेतच त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली असून, त्यांना अॅडमिट होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

येत्या ५ वर्षात कृष्णा कारखान्याच्या इतिहासातील सर्वात मोठे विस्तारीकरण करणार ; डॉ सुरेश भोसले ; विक्रमी उत्पादन करणारा कृष्णा कारखाना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर ; आमदार अतुल भोसले;

वेध माझा ऑनलाइन 
कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा प्रवास हा १२०० मेट्रिक टन ते १२ हजार मेट्रिक टन असा झाला आहे.या कालखंडात कारखान्याने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे पार केले आहेत.पण येत्या ५ वर्षात कारखान्याच्या इतिहासातील सर्वात मोठे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.मला पाठीमागे चांगले काम केल्याच्या पाऊलखुणा ठेवून जायचे आहे असे सांगत आता आपली ही शेवटचीच टर्म असल्याचे प्रतिपादन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले. 

शिवनगर ता.कराड येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी उत्साहात पार पडली.सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुरेश भोसले होते.तर आमदार डॉ. अतुल भोसले,माजी आमदार भगवानराव साळुंखे, कारखान्याचे उपाध्यक्ष जयवंत मोरे यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ ,कराड मलकापूर नगरपालिकेचे नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.सुरेश भोसले म्हणाले की, आज कारखाना समोर अनेक प्रश्नही आहेत.शेतीमध्ये सुधारणा गरजेची आहे. कारखाना पुरस्कृत उपसा जलसिंचन योजनेंचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळेच त्यांचे सध्या ऑडिट सुरू केले आहे. त्यानंतर या योजनांचे नूतनीकरण की आधुनिकीकरण करायचे याचा निर्णय घेता येईल.क्षारपड जमिनीचा प्रश्न वेगळाच आहे. त्यासाठी ड्रिनेज व्यवस्था गरजेची आहे.कार्यस्थळावक्र सुधारणा करायची आहे.कर्मचाऱ्यांची कॉलनी,अंतर्गत रस्ते हे करावे लागणार आहे. कारखान्याच्या आवारात साखर ठेवण्यासाठी ५ लाख पोती क्षमतेचे एकच गोडाऊन बांधण्याचा मानस आहे.

मध्यंतरी साखरेचे दर वाढले की शेतकरी संघटनांनी लगेच पुढच्या बिलाची मागणी केली. पण हे दर लगेचच कमी झाले.आज जडात युद्धजन्य परिस्थिती आहे.त्याचेही कारखानदारीवर परिणाम होणार आहेत.इंधन दर वाढले तर वाहतूक खर्च वाढणार आहे.इतर अनेक बाबी समोर येणार आहेत. पण संकटे असली तरी कृष्णा दरात कमी पडणार नाही पुढेच राहणार असा विश्वास डॉ.सुरेश भोसले यांनी यावेळी बोलताना सभासदांना दिला. 

आमदार डॉ.अतुल भोसले म्हणाले की,गत संचालक मंडळांने चांगले काम केले यावर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निकालने शिक्कामोर्तब झाले आहे. संचालक मंडळाने गत ११ वर्षात २६९ कोटींचे दीर्घ मुक्तीचे कर्ज विविध बँकेत भरले आहे. विक्रमी गाळप विक्रमी, विक्रमी उत्पादन करणारा कृष्णा कारखाना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे ही बाब आपणा सर्वांसाठी अभिमानाची आहे. 

कृष्णा कारखान्याच्या अनेक निवडणुकीत विरोधकांनी आम्ही त्याचे खाजगीकरण करू म्हणून बेछुट आरोप केले.पण तसे घडले आहे का? असा प्रश्न सभासदांना करीत तुम्ही मोठ्या विश्वासाने हा कारखाना संचालक मंडळाकडे दिला आहे.त्यामुळे हा कारखाना उद्याही सहकारीच राहणार असे मत आमदार डॉ .अतुल भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.

विषय पत्रिकेचे वाचन मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी केले.उपस्थितांचे स्वागत उपाध्यक्ष जयवंत मोरे यांनी केले. संचालक धोंडीराम जाधव यांनी आभार मानले.



Monday, September 14, 2026

कृष्णा कारखान्यावर 'श्रीं'ची प्रतिष्ठापना गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

वेध माझा ऑनलाइन।
: य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्री गणेशाचे आगमन मोठ्या आनंदात आणि जल्लोषात झाले. व्हाईस चेअरमन जे.डी. मोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमित्रा मोरे यांच्या हस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री गणेशोत्सवाच्या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

श्री गणरायाच्या मूर्तीची विधिवत धार्मिक पद्धतीने प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, एम.के कापुरकर, वसंतराव पवार, अभिजीत कोष्टी, यासीन संदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सेक्रेटरी सिद्धेश्वर शीलवंत, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सिनिअर सिव्हिल इंजिनिअर जयवंत शिंदे, कार्यालय अधीक्षक अजित पाटील, स्टोअर किपर गोविंद मोहिते आदींसह युनियन व गणेश मंडळाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. 

या कालावधीमध्ये मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता हळदीकुंकू, बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० वाजता 'हास्य सम्राट' डॉ. संजय कळमकर यांचा 'हसण्यासाठी जन्म आपुला' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 'गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी रात्री ९.०० वाजता तुकाईदेवी एक भजनी मंडळ भवानीनगर यांचे भजन, शुक्रवार, १८ सप्टेंबर दुपारी ३.०० वाजता हळदीकुंकू तसेच सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी रात्री ९.०० वाजता श्री जयहनुमान भजनी मंडळ येडेमच्छिन्द्र यांचे यांचे भजन, मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० वाजता 'हास्यसम्राट' प्रा. अजितकुमार कोष्टी यांचा विनोदी कार्यक्रम, बुधवारी २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता प्रा. आप्पासाहेब खोत (वारणानगर) यांचे कथाकथन होणार आहे. गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे, शुक्रवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमन जाधव यांच्या हस्ते सत्यनारायण पुजा, दुपारी २.०० वाजता श्रींची विसर्जन मिरवणूक व विसर्जन होणार आहे. या कार्यक्रमांचा गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 



कुंभारगावचे सुपुत्र अधिकराव (पप्पू काका) चव्हाण यांचे निधन -

वेध माझा ऑनलाईन।
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचे चुलत बंधू तथा कुंभारगावचे सुपुत्र अधिकराव अण्णासाहेब चव्हाण (पप्पू काका) यांचे आज सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्यावर आज कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नातेवाईक आणि मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे.

कै. अधिकराव (पप्पू काका) चव्हाण यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी 9:30 वाजता वैकुंठ स्मशानभूमी, कराड येथे होणार आहे.  नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

Friday, September 11, 2026

अखेर बीपीसीएल पाइपलाइनच्या कामाला मिळणार गती !! वॉर्ड १३ व १४ मध्ये मोजणी पूर्ण; पाइपलाइनचे काम मार्गी लागल्यानंतर रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना मिळणार चालना !नगरपालिका प्रशासन व बीपीसीएल अधिकाऱ्यांमध्ये चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
बीपीसीएलच्या गॅस पाइपलाइनचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते मात्र याच पार्श्वभूमीवर प्रभाग  क्रमांक १३ व १४ मध्ये बीपीसीएल पाइपलाइन जाणाऱ्या मार्गाची नुकतीच मोजणी करण्यात आली असून, पाइपलाइनचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासन व बीपीसीएल अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.
मलकापूर हद्दीपासून बैल बाजार रोडमार्गे शंभूतीर्थ चौकापर्यंत जाणारी प्रमुख पाइपलाइन तसेच कोल्हापूर नाका येथील ‘आय लव्ह कराड’ परिसरातून सुरू होणारी पाइपलाइन—पोपटभाई पंप, पटेल पेट्रोल पंपमार्गे शंभूतीर्थ चौक आणि पुढे ईदगाह मार्गे छत्रपती शिवाजी स्टेडियमपर्यंत जाणाऱ्या मार्गाची पाहणी व मोजणी करण्यात आली आहे.
तसेच बीपीसीएलला आवश्यक वर्क ऑर्डर देण्याबाबत नगरपालिका प्रशासन व संबंधित बीपीसीएल अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली असून, त्यामुळे पाइपलाइनचे रखडलेले काम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे.

एचडीडी की ओपन कट? 
वाहतुकीचा प्रश्न महत्त्वाचा
पाइपलाइनचे काम करताना एचडीडी तंत्रज्ञानाचा वापर करायचा की ओपन कट पद्धतीने काम करायचे, यासह कामासाठी लागणारा कालावधी, वापरण्यात येणारे साहित्य आणि कामाची कार्यपद्धती याबाबतही चर्चा करण्यात आली. कामाच्या काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच नागरिकांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल, याची दक्षता घेण्याची मागणी करण्यात आली.
पाइपलाइनचे काम वेळेत आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करून त्यानंतर रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत, यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला.
बैल बाजार रोडला मिळणार दिलासा
बीपीसीएल पाइपलाइनच्या कामामुळे विशेषतः बैल बाजार रोडचे रस्त्याचे काम रखडलेले आहे. पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या अवस्थेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

यावेळी नगरसेवक शिवाजी पवार,आशुतोष डुबल , सचिन वास्के, रोहन विभुते तसेच नगरपालिकेचे अधिकारी व बीपीसीएलचे अधिकारी उपस्थित होते

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील गणपती विसर्जन मार्ग आणि प्रीतीसंगम घाट परिसरात प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षिततेचा आढावा ; यूवा नेते ओंकार मुळे यांची संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी ;

 वेध माझा ऑनलाईन।
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील गणपती विसर्जन मार्ग आणि प्रीतीसंगम घाट परिसरात भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. युवा नेते ओमकार मुळे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी करून विसर्जन मार्गावरील प्रकाशव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी अमोल पवार , अब्राम मुजावर यांची उपस्थिती होती

या पाहणीस लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे मार्गदर्शन लाभले. गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रीतीसंगम घाट परिसरात हजारो भाविकांची गर्दी होते. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन मार्गावर कुठेही अंधाराचे ठिकाण राहू नये, तसेच आवश्यक त्या सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्ष यादव यांनी दिल्या.

बंद पथदिव्यांचा मुद्दा महत्वाचा
नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार ओमकार मुळे यांनी विसर्जन मार्ग, प्रीतीसंगम घाट तसेच भाविकांच्या ये-जा करण्याच्या मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी बंद असलेले पथदिवे तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता निदर्शनास आणून देण्यात आली.
गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार अतिरिक्त लाईटची व्यवस्था करणे, घाट परिसरात पुरेसा प्रकाश उपलब्ध राहील याची दक्षता घेणे, तसेच संपूर्ण विसर्जन मार्गावर प्रकाशव्यवस्था अखंडित ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
दरम्यान गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रीतीसंगम घाटाकडे मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक येतात. विशेषतः रात्रीच्या वेळी गर्दी वाढत असल्याने प्रकाशव्यवस्था हा केवळ सुविधेचा विषय नसून भाविकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित प्रश्न आहे.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांचे कार्यकर्ते, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच हजारो भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे मार्गावरील अंधाराचे ठिकाण, बंद पथदिवे किंवा अपुरी प्रकाशव्यवस्था यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने दक्ष राहणे गरजेचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

गणेशोत्सव उत्साहात, विसर्जन सुरक्षित वातावरणात व्हावे”
“गणेशोत्सव हा कराडकरांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण आहे. विसर्जनाच्या वेळी भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. विशेषतः प्रकाशव्यवस्था सुरळीत ठेवून अंधाराची ठिकाणे दूर करण्यास प्राधान्य दिले जाईल,” अशी भूमिका पाहणीदरम्यान मांडण्यात आली.दरम्यान, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विसर्जन मार्ग तसेच प्रीतीसंगम परिसरातील आवश्यक दुरुस्तीची कामे आणि प्रकाशव्यवस्थेची उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

Wednesday, September 9, 2026

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले... डीजेमुळे 40 टक्के ऐकू कमी येतय ; जळगावातील एका कार्यक्रमात संवाद साधताना सांगितली आपबिती ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यभरात डीजेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी होत आहे. अनेक जिल्ह्यांनी डीजे बंदी केली आहे. मात्र, पुण्यासारख्या शहरात डीजे बंदीचा घोळ अद्याप कायम आहे. या डीजेमुळे कुणा कुणाला काय काय अनुभव आलाय याचे किस्सेही समोर येत आहेत. राज्याच्या मंत्री मेघना बोर्डिकर यांनी त्यांच्या सख्ख्या चुलत भावाचा डीजेमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं. तर सरकारमधील दुसरे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही डीजेमुळे त्यांना 40 टक्के ऐकू कमी येत असल्याचं सांगितलंय. गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात संवाद साधताना आपबिती सांगितली आहे.

माझ्या पुतण्याचं लग्न होतं. डीजे लावण्यात आलेला होता. मला लोकांनी सांगितलं तुम्ही नाचा आणि मला नाचण्यासाठी ओढलं. त्यामुळे पुतण्याच्या लग्नात नाचलो. पण सप दिशी डीजेचा आवाज माझ्या कानावर आदळला. या डीजेच्या आवाजामुळे मला एका कानाने चाळीस टक्के ऐकू येणे बंद झाले. काहींनी मला कानाला मशीन लावायला सांगितलं. पण बहिरं वाटतं म्हणून मी मशाीन लावली नाही. त्यामुळे येत्या गणेशोत्सात तरुणांनी डीजे नाही लावला तर चांगलं होईल, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. पाटील यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कराडमध्ये कोल्ड मिक्सचा वापर करून खड्यांची दुरुस्ती ; ;

वेध माझा ऑनलाईन।
गणेशोत्सवाच्या पार्मूमीवर येथील नगरपालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरूस्ती सुरू केलीआहे. पावसाळ्यामुळे डांबराऐवजी कोल्डमिक्स डांबराने खड्डे बुजवण्यात येत आहेत. मंगळवारी सायंकाळीपाटण कॉलनीनजीक याचा शुभारंभनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्याहस्ते झाला.

राजेंद्रसिंह यादव म्हणालेकी नगरपालिकेने प्रथमच खडेबुजवण्यासाठी कोल्ड मिक्सडांबराचाकेलाआहे. पावसाळ्यामुळे नेहमीच्यापद्धतीने खड्े बुजवण्यात अडचणीयेतात, कोल्ड मिक्स डांबरानेपावसाक्यातही व भर पावसात खड्डे बुजवता येतात. त्यामुळे शहरातील संपूर्ण मिरवणूक मार्ग कोल्डमिक्स डॉंबराने खड़डेमुक्त करण्यातयेणार आहे. टप्याटप्याने संपूर्णशहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यातयेणार आहेत.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष प्रतापरावसाकुंखे, लोकशाही आघाडीचेअध्यक्ष जयंतकाका पाटील, माजीनगराध्यक्ष जयवंतराव पाटील,सभापती अल्ताफ शिकलगार,अख्तर आंबेकरी, रूपाली माने,अरूणा पाटील, आशा मुळे,विजयसिंह यादव, फारूकपटवेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुखजयवंतराव शेलार, मुख्याधिकारीप्रशांत व्हटकर, अभियंता चव्हाणयांच्यासह पालिकेचे अधिकारी वकर्मचारी उपस्थित होते.

Tuesday, September 8, 2026

अभिजीत दिपकेंना मोठा धक्का, भाजप नेत्यानं कोर्टात खेचलं; सीजेपीपुढं नवं संकट

वेध माझा ऑनलाईन।
सोशल मीडियावरील वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यासह प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याविरोधात गौरव भाटिया यांनी 2 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

 सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही या खटल्यामध्ये प्रतिवादी करण्यात आलं आहे. दरम्यान, मानहानीचा हा दावा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. आज 8 सप्टेंबर रोजी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी दोन कोटींच्या मानहानीचा दावा ठोकल्याचं सांगितलं आहे.
त्यांनी लिहिलं की, “जेव्हा मर्यादा ओलांडून तुम्ही आरोप करता, तेव्हा कायदा त्यासाठी कामी येतो. 2 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. हा खटला उद्या दिल्ली उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी घेतला केला जाणार आहे. ना सोशल मीडियावरची कुरघोडी आणि ना कुठले शाब्दिक युद्ध. फक्त तथ्य, पुरावे आणि कायदा त्याचे काम करणार आहे. त्यामुळे आता सत्याची पडताळणी जिथे व्हायला हवी तिथेच होईल, म्हणजेच न्यायालयात.”
काय आहे  प्रकरण?
दरम्यान, गौरव भाटिया आणि सौरव दास यांच्यामधील सोशल मीडियावरील वाद पाच सप्टेंबरला सुरु झाला. यामध्ये AI-निर्मित बनावट ग्राफिकद्वारे भाटिया यांच्या नावावर स्वातंत्र्य भारद्वाज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला. या ग्राफिकमध्ये भारद्वाज यांना ‘दिमागी नक्षल’ आणि ‘जातिवादी’ म्हटल्याचं भासवण्यात आल्याचा दावा भाटिया यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी माफी मागण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला होता.
दरम्यान, सौरव दासकडून पोस्ट हटवण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाटियांना आव्हानही दिलं होतं. त्यांनी सांगितलेलं की, मला वाटलेलं की हे सगळं एआयने बनवलं असेल. पण तरीही मी भाजप नेत्यांना या गोष्टी पुन्हा बोलण्याचं आव्हान देतो. मला नाही वाटतं असं करण्यात त्यांना काही अडचण असेल.
दरम्यान, सौरव यांच्याकडून ही पोस्ट डिलिट केल्यानंतर गौरव भाटिया यांनी म्हटलं होतं की, “पोस्ट फक्त 83 मिनिटांमध्ये हटवली, माफी मागितली नाही. त्यामुले पुढील काळात गुन्हा दाखल करु शकतो. त्यांनी पुढे सांगितलं की, तुम्ही बदनामी करणार, प्रोपोगेंडा सेट करणार आणि मग पोस्ट डिलिट करुन पळून जाणार, हे सगलं एवढं सोप नाही.” त्यामुळे आता या सर्व प्रकरणात पुढे काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.