Tuesday, July 28, 2026

कराड पालिकेची सभा वादळी; नेकलेस रोड, बागेसह रस्ता रुंदीवरून खडाजंगी ; प्रेक्षक गॅलरी खुली करण्यावरून भाजप नगरसेवक आक्रमक; ‘फालतू’ शब्दावरून सभागृहात शाब्दिक चकमक, साडेसहा कोटींचा नेकलेस रोड व १.२० कोटींच्या बागेचा विषय तहकूब ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांवरून मंगळवारी झालेली नगरपालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. सोमवार पेठेतील रस्त्याची रुंदी कमी करण्यापासून ते साडेसहा कोटी रुपयांच्या नेकलेस रोड प्रकल्पापर्यंत विविध विषयांवर सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, प्रेक्षक गॅलरी बंद ठेवण्यात आल्याने भाजप नगरसेवकांनी ती नागरिकांसाठी खुली करण्याची मागणी करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली.
नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वसाधारण सभा पार पडली. उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीलाच सोमवार पेठेतील रस्त्याची रुंदी कमी करण्याचा विषय भाजपचे नगरसेवक अजय पावसकर यांनी मांडला. प्रस्तावित रस्त्याच्या रुंदीमुळे काही नागरिकांची घरे बाधित होण्याची शक्यता असल्याने, नागरिकांची घरे वाचविण्यासाठी रस्त्याची रुंदी कमी करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर नगराध्यक्ष यादव यांनी संबंधित रस्त्यांचा अभ्यास करून अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या.
दरम्यान, सभेची प्रेक्षक गॅलरी बंद ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. कराडच्या नागरिकांना सभा पाहण्यासाठी गॅलरी खुली करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी नगरसेवकांनी बराच वेळ आग्रह धरला.

‘फालतू’ शब्दावरून सभागृहात गोंधळ
एका विषयावर चर्चा करताना नगरसेवक अल्ताफ शिकलगार यांनी ‘फालतू’ हा शब्द वापरल्याने भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला. ‘शब्द मागे घ्या,’ अशी मागणी करत भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात काही काळ जोरदार वादावादी झाली.
यावेळी शिस्त न पाळल्यास निलंबन करण्याचा इशारा नगराध्यक्ष यादव यांनी दिला

नेकलेस रोडवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो साडेसहा कोटी रुपयांच्या नेकलेस रोड प्रकल्पाचा. या प्रकल्पाला विरोध करण्यामागचे कारण काय, असा सवाल भाजप नगरसेवकांनी सत्ताधारी गटाला केला. विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी, ‘आमदार अतुलबाबा भोसले यांनी आणलेली विकासकामे तुम्हाला करायची नाहीत का?’ असा सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांकडून खुलासा मागितला. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.
नेकलेस रोड व पर्यटन विकास प्रकल्पाबाबत अधिकृत शासकीय विभागाकडून अद्याप स्पष्टता झालेली नसल्याचे नगराध्यक्ष यादव यांनी सांगितले. पालिकेने वारंवार मागणी करूनही संबंधित प्रकल्पाचे प्रेझेंटेशन सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा विषय सध्या तहकूब करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर वाटेगावकर यांनी, ‘आमदारांनी दिलेले प्रकल्प आणि निधी वापरायचाच नाही, असे काही ठरले आहे का?’ असा प्रतिप्रश्न केला. त्यावरून पुन्हा दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद रंगला.
नगराध्यक्ष यादव यांनी हस्तक्षेप करत हा साडेसहा कोटी रुपयांचा प्रकल्प असून संवेदनशील विषय असल्याने सध्या तो तहकूब करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी भाजप नगरसेवकांनी प्रकल्पाला आपली मंजुरी असल्याचे सांगितले. मात्र सत्ताधारी गटाने विषय तहकूब केला.

१.२० कोटींच्या बागेचा विषयही तहकूब
मंगळवार पेठेतील मोकळ्या भूखंडावर सुमारे १ कोटी २० लाख रुपये खर्चून बाग विकसित करण्याच्या प्रस्तावावरही सभेत चर्चा झाली. भाजप नगरसेवकांनी बाग विकसित करण्यास कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट करत विषयाला समर्थन दिले.
मात्र, संबंधित जागेवर भविष्यात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारल्यास पालिकेला कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होऊ शकतो, अशी भूमिका सत्ताधारी गटाने मांडली. त्यामुळे या विषयावर अधिक विचारविनिमय करण्यासाठी तो तहकूब करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण स्मृती सदनासाठी साडेतीन कोटी
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती सदनातील सुधारणा कामाचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. या कामासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.
दरम्यान, पालिकेच्या प्रशासकीय कालावधीत झालेल्या घनकचरा प्रकल्प, रस्ते तसेच अन्य विकासकामांची चौकशी करण्यात येणार असल्याचेही सभेत स्पष्ट करण्यात आले.

प्रभागनिहाय सीसीटीव्ही आणि 
‘नो फ्लेक्स झोन’
सभेच्या शेवटी शहरातील विविध प्रभागांमध्ये बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत तसेच शहरातील ‘नो फ्लेक्स झोन’ निश्चित करण्याबाबतही चर्चा झाली. लवकरच प्रभागनिहाय सीसीटीव्ही व्यवस्था आणि शहरातील नो फ्लेक्स झोनची ठिकाणे जाहीर करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कराड पालिकेची जनरल मिटिंग ठरली वादळी ; नगरसेवक अल्ताफ शिकलगार यांनी एका विषयावर बोलताना "फालतू' असा शब्द वापरल्याने... भाजप नगरसेवक झाले आक्रमक ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील महत्वाच्या असलेल्या विषयांवर मंगळवारी घेण्यात आलेली नगरपालिकेची मासिक सभा चांगलीच वादळी ठरली. विविध विषयांवरील चर्चा व त्यावरून झालेली वादावादी सध्या शहरात चर्चेत असतानाच सोमवार पेठेमध्ये रस्ता कमी करण्यावरून यावेळी सुरुवातीलाच जोरदार चर्चा झाली भाजपचे नगरसेवक अजय पावसकर यांनी तो विषय मांडला. त्यावेळी लोकांची घरे त्या रस्त्यात जात आहेत. त्यामुळे ती घरे जाऊ नये यासाठी रस्त्याची रुंदी कमी करावी अशी मागणी त्यांनी केली. नगराध्यक्षांनी या रस्त्यांचा अभ्यास करून अधिकार्‍यांनी अहवाल द्यावा, अशा सूचना दिल्या.
दरम्यान यावेळी प्रेक्षक गॅलरी बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे भाजप नगरसेवक आक्रमक झाले होते...कराडच्या नागरिकांना ही गॅलरी खुली करून द्या अशी मागणी करत बराचवेळ याठिकाणी या नगरसेवकांनी आग्रह धरून ठेवला होता...
याचदरम्यान नगरसेवक अल्ताफ शिकलगार यांनी एका विषयावर बोलताना फालतू असा शब्द वापरला त्यामुळे सभागृहात भाजप नगरसेवकांनी त्यांना शब्द मागे घ्या अस म्हणत त्याठिकाणी मोठी वादावादी झालेली पहायला मिळाली 
सदर सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका यांची उपस्थिती होती. 
दरम्यान यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी नेकलेस रोडला विरोध होण्यामागचे कारण विचारत सत्ताधार्‍यांवर आरोप केले. विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी अतुलबाबा यांची आणलेली कामे तुम्हाला करायची नाहीत का... असा सवाल सत्ताधार्यांना विचारत याबाबतचा खुलासा विचारला असता... त्याला प्रत्युत्तर देताना सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली... नेकलेस रस्ता आणि पर्यटन विकास काय होणार... याबाबत कोणताही खुलासा अधिकृत शासकीय विभागाकडून झालेला नाही. पालिकेने वारंवार मागणी करूनही त्याचे प्रेझेंटेशन दिले नसल्यामुळे हा ठराव तहकूब करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष यादव यांनी सांगितले. 

विरोधी पक्ष नेते वाटेगावकर यांनी आमदारांनी दिलेले प्रकल्प व निधी वापरायचेच नाही असं काही ठरलं आहे का? असा प्रति प्रश्न केल्यानंतर पुन्हा सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार चकमक उडाली
नगराध्यक्ष यादव यांनी त्यात तोडगा काढत हा साडेसहा कोटींचा प्रकल्प आहे. हा संवेदनशील विषय असल्यामुळे आपण तो सध्या तहकूब करत आहोत असे सांगितले. यावर भाजपच्या नगरसेवकांनी याला आमची मंजुरी आहे असे स्पष्ट केले. सत्ताधारी गटाकडुन विषय तहकूब करण्यात आला. 

मंगळवार पेठेतील मोकळ्या भूखंडावर एक कोटी वीस लाखांची बाग विकसित करण्याचा विषयही या सभेत तहकूब करण्यात आला. त्यावरही भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका मांडत बाग होण्यास काही हरकत नाही अशी भूमिका घेतली. त्यावर सत्ताधारी गटात बागेला विरोध नाही मात्र तेथे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा करायचे आहे त्यातून नगरपालिकेला उत्पन्नाचा सोर्स चालू होईल त्यामुळे हा विषय तहकूब करण्यात येत आहे अशी भूमिका मांडली. 

पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती सदन मध्ये सुधारणा करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी साडेतीन कोटी रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर झाल्याची घोषणा केली. दरम्यान प्रशासकीय कालावधीमध्ये झालेल्या घनकचरा प्रकल्प, रस्ते आणि अन्य कामाची चौकशी होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. 
तसेच सभेच्या शेवटी शहरातील प्रभाग निहाय बसवण्यात येणारे सीसीटीव्ही तसेच शहरातील नो फ्लेक्स झोन एरिया लवकरच
जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले

४१ वर्षे रखडलेला खोडशी बंधाऱ्याच्या कामाचा प्रश्न अतुलबाबांनी मार्गी लावला ; २ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांनी खोडशी (ता. कराड) येथे कृष्णा नदीवर असलेल्या नवीन गेटेड बंधाऱ्याच्या उर्वरित बांधकामासाठी २ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.  तसेच हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी रविवारी (ता. २६) कराड दौऱ्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे तब्बल ४१ वर्षे रखडलेला खोडशी बंधाऱ्याच्या उर्वरित कामाचा प्रश्न आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यामुळे मार्गी लागला आहे. 

खोडशी (ता. कराड) गावाजवळ कृष्णा नदीवर ब्रिटीश कालखंडात सन १८६७ मध्ये जुन्या बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले होते. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मोठा जलसाठा होऊन, या ठिकाणापासून निघणाऱ्या ६४ कि.मी. लांबीच्या कृष्णा कालव्याद्वारे कराड, वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यामधील सुमारे ८,९७२ हेक्टर एवढे शेती क्षेत्र ओलिताखाली आले आहे. कृष्णा कालव्याद्वारे मिळणाऱ्या पाण्यामुळे हा भाग सुजलाम सुफलाम होण्यास मदत झाली आहे. पण जुन्या बंधाऱ्याचे आयुष्यमान संपत आल्यामुळे १९८५ च्या सुमारास याच नदीपात्रात एका नवीन गेटेड बंधाऱ्याचे बांधकाम सुरु करण्यात आले. ४१ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटून देखील हे काम अजूनही अपूर्ण अवस्थेतच असून, या कामाच्या पूर्ततेसाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. या निधीसाठी त्यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही मागणी केली होती. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याबाबतचा प्रश्न त्यांनी विधीमंडळात उपस्थित केला होता. 

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी वेळोवेळी मांडलेल्या या प्रश्नाची गंभीर दखल घेत, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी (ता. २७) थेट कराड दौऱ्यावर येत खोडशी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी आ.डॉ. अतुलबाबांच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत, बंधाऱ्याच्या उर्वरित कामासाठी २ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करत, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम आता लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. यामुळे सिंचन व्यवस्था अधिक सक्षम होऊन, त्याचा लाभ कराडसह वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यामधील हजारो शेतकऱ्यांना मिळणार आहे.


अर्थसंकल्पीय अधिवेशनात उठविला होता आवाज!
कृष्णा कालव्याद्वारे कराडसह, वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा होत असल्याने, खोडशी बंधाऱ्यांचे विशेष महत्व आहे. पण गेल्या ४१ वर्षांपासून रखडलेल्या बंधाऱ्याच्या उर्वरित कामाच्या निधीसाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी २५ फेब्रुवारी रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठविला होता. तसेच वेळोवेळी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत, बंधाऱ्याच्या उर्वरित कामासाठी हा निधी मंजूर झाला आहे.

सिंचनासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या खोडशी बंधाऱ्याच्या उर्वरित कामासाठी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी २.६४ कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. लवकरच या बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले असून, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने राबविला गेल्यास भविष्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणे शक्य होणार आहे. 
आ डॉ. अतुलबाबा भोसले .


Saturday, July 25, 2026

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होताच सोमन वांगचुक यांचं मोठं विधान, काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाईन।
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वांगचुक यांनी म्हटले की, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. हा निर्णय शांततापूर्ण जनआंदोलन आणि देशभरातील तरुणांच्या संयमाचा परिणाम आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वांगचुक यांनी म्हटले की, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. हा निर्णय शांततापूर्ण जनआंदोलन आणि देशभरातील तरुणांच्या संयमाचा परिणाम आहे. यासह सोनम वांगचुक यांनी हॉस्पिटसमधील एक फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी विजयाचा सिम्बॉल दाखवला आहे.

सोनम वांगचुक एक्सवर लिहिले की, ‘
हा लोकशाहीचा विजय आहे. हा थेट रस्त्यावरून उमटलेल्या प्रत्यक्ष लोकशाहीचा विजय आहे. हा शांतता, संयम आणि सातत्यपूर्ण संघर्षाचाही विजय आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज सर्वांत महत्त्वाचा असतो आणि जेव्हा नागरिक शांततापूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडतात, तेव्हा त्याचा परिणाम दिसून येतो.’

धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा ; तरीही आंदोलन चालूच राहणार ;

वेध माझा ऑनलाईन।
दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा अखेर दिला आहे. नीट पेपरफुटीमुळे धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी भूमिका सीजेपीची होती. काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही, असं सीजेपीने सांगितलं होतं. दरम्यान, प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता जंतर-मंतरवरील आंदोलन संपले आहे, अस मानले जात होते. परंतु सीजेपीने आंदोलन सुरूच राहील, असे सांगितले आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर अभिजित दीपके यांनी जंतर मंतरवरील उपस्थित हजारो तरुण आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सीजेपीच्या पुढच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. मोदी सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, असे म्हटले जात होते. परंतु तरुणांच्या ताकदीपुढे सरकारला झुकावे लागले. आपण करून दाखवले, असे म्हणत सीजेपीच्या आंदोलनला यश मिळाले, असे दीपके म्हणाले.

तसेच, आता राजीनामा झाला म्हणजे आंदोलन संपले, असे गृहित धरले जाईल. परंतु आम्ही कॉकरोच आहोत. आम्ही लगेच मैदान सोडणार नाही. आमच्या आणखी दोन मागण्या आहेत, असंही ते म्हणाले.  ज्या विद्यार्थींनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाना एक कोटीची आर्थिक मदत दिली पाहिजे. गुंडगिरी करणाऱ्या पोलिसांनी जो लाठीचार्ज केला होता, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा, सचिन शर्मा यांनी अमित शाहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून तरुणांवर लाठीचार्ज केला. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. 20 जुलैनंतर ज्या-ज्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले ते सर्व मागे घेतले पाहिजेत, अशा मागण्या त्यांनी केल्या. दरम्यान, आता दीपके यांच्या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा ; तरीही आंदोलन चालूच राहणार ;

Friday, July 24, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा ;

वेध माझा ऑनलाईन।
आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे. राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांच्या “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा विधिवत पार पडली. यंदा मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने या वारकरी दाम्पत्याला मिळाला आहे.

कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांची यंदाच्या मानाच्या वारकऱ्यांमध्ये निवड करण्यात आली होती. या मानामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये भाविकांची अभूतपूर्व आणि विक्रमी गर्दी पाहायला मिळत आहे. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रशासनाकडून सुरक्षेसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेने भारलेले वातावरण अनुभवण्यासाठी राज्यासह देशभरातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.

Thursday, July 23, 2026

ठाकरे बंधूंचं 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन ;

वेध माझा ऑनलाईन।
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज आणि NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणा करत 26 तारखेला मुंबईत शक्तीप्रदर्शन मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

राज ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा न दिल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या भावना आणि संताप सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “26 तारखेला आम्ही विद्यार्थ्यांसह शक्तीप्रदर्शन मोर्चा काढणार आहोत. मुंबईतील विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांच्या मनातील राग आणि रोष व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा असेल. हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.”

या मोर्चाची सुरुवात शिवाजी पार्क येथून होणार असून तो सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार आहे. सिद्धिविनायक येथे सरकारला सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करण्यात येणार असून त्यानंतर मोर्चाची सांगता होईल, अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा आणि ठाकरे बंधूंनी दिलेल्या या घोषणेमुळे 26 तारखेला होणाऱ्या मोर्चाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

कराडमध्ये भर पावसात काँग्रेसचे NEET पेपर घोटाळ्याविरोधात तीव्र आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

वेध माझा ऑनलाईन।
 देशभर गाजत असलेल्या NEET पेपर घोटाळ्याच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याच्या मागणीसाठी कराड शहर काँग्रेसच्या वतीने आज दत्त चौक येथे भर पावसात जोरदार आंदोलन करण्यात आले. "धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या", "मोदी सरकारचा निषेध असो", "विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो" अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान काही काळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला.

 *यावेळी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील म्हणाले,* "देशातील विद्यार्थी आणि युवकांनी शांततेच्या मार्गाने दिल्लीत मोर्चा काढला असताना त्यांच्यावर अमानुष लाठीमार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर आंदोलन केले असता त्यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. ही घटना लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असून केंद्र सरकारची हुकूमशाही वृत्ती देशाला अराजकतेकडे नेत आहे. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवरून पायउतार होत नाही तोपर्यंत विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्यांवरील अन्याय थांबणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात काँग्रेस पक्ष न्याय आणि हक्कासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील."

 *यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पवार यांनीही केंद्र सरकारवर टीका करत म्हटले की,* "NEET पेपर घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फिरले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. देशातील युवकांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्या सरकारविरोधात युवक काँग्रेस अधिक तीव्र आंदोलन उभारेल."

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल पवार, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, रवी बडेकर, कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष बाबुराव पवार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमित जाधव, प्रदेश प्रतिनिधी झाकीर पठाण, एससी काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, प्रवीण वेताळ, दिग्विजय सूर्यवंशी, देवदास माने, चैतन्य पाटील, समीर इनामदार, वसीम इनामदार, दिग्विजय जमाले, महेश पवार, तुषार लोंढे, शानूर देसाई, अजित पवार, अमित जाधव, रविराज पाटील, संग्राम काळभोर, मुकुंद पाटील, विक्रम पाटील, प्रतिक निकम, नितीन पाटील, मुबीन बागवान, उमर सय्यद, गणेश सूर्यवंशी, प्रदीप जाधव, सुरेश भोसले, युवराज कुंभार, अक्षय सुर्वे, अमोल जाधव, शाहरुख मुल्ला, सचिन पाटील यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्यांक काँग्रेस सेल, एससी काँग्रेस सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 विद्यार्थिनीच्या फलकाने वेधले लक्ष 

आंदोलन सुरू असताना रस्त्यावरून जाणाऱ्या काही महिला आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी एका विद्यार्थिनीने "आमचे भविष्य सुरक्षित करा" असा फलक हातात घेत आंदोलनात सहभाग नोंदविला. तिच्या या फलकाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले 

Wednesday, July 22, 2026

लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्र : अध्यक्षपदी डॉ. राजश्री पालकर, सचिवपदी जयश्री साने तर खजिनदारपदी विद्या मोरे

वेध माझा ऑनलाईन।
लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्रच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या वर्षासाठी अध्यक्षपदी लायन डॉ. राजश्री पालकर, सचिवपदी लायन जयश्री साने आणि खजिनदारपदी लायन विद्या मोरे यांनी पदभार स्वीकारला.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (VDG-2) लायन मंगेश दोशी यांच्या हस्ते पद व शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लायन , लायन जगदीश पुरोहित होते त्यांचे मार्गदर्शन लाभले.

या सोहळ्यास रिजन चेअरमन लायन महेंद्र कदम, झोन चेअरमन लायन गौरी चव्हाण यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर तसेच लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्रचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात लायन्स चळवळीची सेवा, समर्पण आणि मानवतेची परंपरा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, युवा विकास, रक्तदान, नेत्रदान जनजागृती तसेच गरजूंसाठी विविध सेवाभावी उपक्रम नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली अधिक व्यापक स्वरूपात राबविले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नवनियुक्त अध्यक्ष डॉ. राजश्री पालकर यांनी क्लबच्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन समाजहिताला प्राधान्य देत नावीन्यपूर्ण आणि परिणामकारक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. सचिव जयश्री साने यांनी संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान व नियोजनबद्ध करण्याची भूमिका मांडली, तर खजिनदार विद्या मोरे यांनी आर्थिक पारदर्शकता, शिस्त आणि सेवाभावी प्रकल्पांना सक्षम पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे नियोजन नेटके व आकर्षक पद्धतीने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्र समाजसेवेची उज्ज्वल परंपरा अधिक समृद्ध करेल, असा विश्वास व्यक्त केला.

Tuesday, July 21, 2026

" ती ' विकासकामे का झाली नाहीत? गावासाठी जो निधी आला आहे, तो गावासाठीच खर्च झाला पाहिजे, ; अतुलबाबांनी पत्रव्यवहार करून कराड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना विचारला होता जाब, अद्याप उत्तर आलेच नाही; आता पुन्हा फोन करून विचारणार जाब ;


वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील रखडलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर आता राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. मंजूर करून आणल्यानंतरही अनेक कामे प्रत्यक्षात सुरू न झाल्याने आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पुन्हा एकदा पालिका प्रशासनावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.पत्रकारांशी बोलताना आमदार भोसले म्हणाले, "राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कराड नगरपरिषदेकडे विशेष लक्ष आहे. शहराची प्रगती व्हावी यासाठी त्यांचे आणि माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. गावासाठी जो निधी आला आहे, तो गावासाठीच खर्च झाला पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. यापूर्वी मंजूर झालेला निधी वर्क ऑर्डर निघालेल्या विकासकामांवर का खर्च झाला नाही, कोणत्या अडचणी आहेत, याबाबत मी मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे विचारणा केली होती. मात्र अद्याप त्यांचे उत्तर आलेले नाही. आता मी त्यांना पुन्हा फोन करून विचारणा करणार आहे. काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आम्ही सहकार्य करू; पण विकासकामे थांबता कामा नयेत."असे अतुलबाबा म्हणाले आहेत

कराडच्या सर्किट हाऊस येथे जनता दरबार पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

दरम्यान गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी पालिकेत भाजपच्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की याच विषयाच्या पार्श्वभूमीवर आमदार अतुलबाबा पालिकेत लक्ष घालणार आहेत... आणि काल पत्रकारांशी बोलताना अतुलबाबांनी कराडच्या मुख्याधिकारी व्हटकर याना पहिल्यांदा पत्रव्यवहार करून याविषयी जाब विचारला असता अजूनही त्याचे उत्तर आले नाही, त्यामुळे आता पुन्हा व्हटकर त्यांना फोन करून जाब विचारणार असल्याचे म्हटले आहे त्यामुळे गटनेते वाटेगावकर म्हटल्याप्रमाणे अतुलबाबा यानिमित्ताने पालिकेत लक्ष घालू लागले आहेत असे आता स्पष्ट झाले आहे

आधी नगरसेवक, आता आमदारही आक्रमक
दरम्यान अतुलबाबांच्या या वक्तव्यामागे गेल्या काही दिवसांतील घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्या दालनात जाऊन शहरातील मंजूर विकासकामे अद्याप सुरू का झाली नाहीत, याचा जाब विचारला होता. रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, आणि इतर नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाची भूमिका समाधानकारक नसल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर आमदार भोसले यांनीही स्वतंत्रपणे मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबतची कारणे विचारली होती. मात्र त्या पत्राला अद्याप उत्तर मिळाले नसल्याने आता त्यांनी थेट दूरध्वनीद्वारेही प्रशासनाकडे खुलासा मागण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.

प्रशासन काय उत्तर देणार?
मुख्याधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्राचे उत्तर अद्याप न मिळाल्याची आमदारांची सार्वजनिक नाराजी आणि आता पुन्हा थेट विचारणा करण्याची घोषणा यामुळे कराड पालिका प्रशासनावर दबाव वाढला आहे. मंजूर असूनही कामे न होण्यामागे अडथळे नेमके कोणते आहेत, कामे का रखडली आहेत... आणि ती कधी सुरू होणार, याबाबत प्रशासनाला आता स्पष्ट भूमिका मांडावी लागणार असल्याचे दिसत आहे.

याचनिमित्ताने कराडच्या विकासाच्या प्रश्नावर राजकीय नेतृत्व आणि पालिका प्रशासन यांच्यातील ही रस्सीखेच पुढील काही दिवसांत कोणते वळण घेते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका ;

वेध माझा ऑनलाईन।
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अखिलेश यादव यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान प्रियंका गांधी यांना ज्या पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं, त्या पोलीस ठाण्यात सोनिया गांधी देखील पोहोचल्या . प्रियंका गांधी यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं, त्यानंतर सोनिया गांधी देखील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या . शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंगळवारी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर तब्बल तीन तास आंदोलन केलं.  त्यानंतर आंदोलनस्थळी पोलीस दाखल झाले, पोलिसांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अखिलेश यादव यांना देखील ताब्यात घेतलं होतं.  यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं

वेध माझा ऑनलाईन।
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीमार नंतर आज पुन्हा एकदा आंदोलन चिघळलं आहे. तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. तसेच प्रत्येक देशवासियांना मोदींच्या घरासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. मात्र अचानक आता राहुल गांधींचं आंदोलन चिघळल्याचं सांगितलं जात आहे.
आंदोलनस्थळी आता पोलीस दाखल झाले आहेत . 

एकूणच हे आंदोलन चिघळलं असून आंदोलन करणारे काही खासदार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी आंदोलन स्थळी सुप्रिया सुळे तसेच अखिलेश यादव देखील उपस्थित होते असं सांगितलं जात आहे.

राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर भाजप घेणार मोठा निर्णय ?;

वेध माझा ऑनलाईन।
राहुल गांधी यांच्या ठिय्या आंदोलनानंतर केंद्र सरकारकडून महत्त्वाची हालचाल करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आंदोलनस्थळी जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आता या भेटीनंतर जितेंद्र सिंह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 
राहुल गांधी यांनी चर्चेदरम्यान एकूण 5 प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी पहिली मागणी करण्यात आली. तसेच NEET पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर संसदेत निवेदन द्यावे आणि संबंधित प्रकरणात पारदर्शक कारवाई करावी, अशाही मागण्या त्यांनी मांडल्या.

दरम्यान, जितेंद्र सिंह आता अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत राहुल गांधी यांनी मांडलेल्या मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार पुढे कोणता निर्णय घेणार, याकडे विद्यार्थी, पालक आणि देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन।
सीजेपीच्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सीजेपीच्या 20 जुलै रोजीच्या संसद मार्चनंतर हे आंदोलन संपून जाईल, असे म्हटले जात होते. परंतु आता जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, अशी भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी स्पष्ट केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा सीजेपीचे आंदोलन जंतर-मंतरवर सुरूच आहे. दरम्यान, या आंदोलनात आता विरोधी पक्षदेखील सहभागी होत आहेत. एकीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी हे देखील सामिल झाले आहेत. गांधी हे पंतप्रधांनाच्या निवासस्थान परिसरात ठिय्या आंदोलन करत असून आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी पोहोचले आहेत. या चर्चेत नेमकं काय घडणार या कडे देशाचे लक्ष लागून आहे.

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक ;

वेध माझा ऑनलाईन।
दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी मुंबई बंदची हाक दिली आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी या मुंबई बंदमध्ये सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच नागरिकांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर यांनी पुढे आवाहन करत सांगितले की, नागरिकांनी स्वेच्छेने सेवा आणि कामकाजातून दूर राहावे. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवावीत, तर टॅक्सी, ओला आणि उबेर सेवा देखील त्या दिवशी बंद ठेवाव्यात, असे त्यांनी म्हटले. तसेच बेस्टच्या बसेस डेपोतून बाहेर काढू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली.

सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त वक्तव्य ; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांना दिली दहशतवाद्यांची उपमा ;

वेध माझा ऑनलाईन।
शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांना दहशतवाद्यांची उपमा दिली आहे. त्यावर आता या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठी मुलांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सरकार आता कोणाला आतंकवादी बोलायचं शिल्लक राहिलेलं नाही. जे सरकार विरोधात बोलतात त्यांना सरकार दहशतवादी म्हणतं. काल ही तरुण मुलं ही ग्रामीण भागातील मुलं होती. देशभरातून आलेली मुलं होती. शिक्षणासाठी लढणारी मुलं होती. त्यांना तुम्ही आतंकवादी म्हणत असाल तर तुम्ही फक्त देशभक्त. तुमचा भाजप फक्त देशभक्त दिसतो. बाकी सगळे लोक दहशतवादी वाटतात” अशा शब्दात या मुलांनी संताप व्यक्त केला. सदाभाऊ खोत यांना सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. देशद्रोही म्हणणं म्हणजे त्या आमदाराची लायकी नाही. त्यांना रस्त्यात पकडून जाब विचारला पाहिजे. मत घेताना लाज वाटली नाही का? असा सवाल या मुलाने विचारला.

राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन ;

वेध माझा ऑनलाईन।
दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून झालेल्या आंदोलनादरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. संसद मार्च रोखताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर काही आंदोलक संसद परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला. या लाठीचार्जच्या निषेधार्थ विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या इतर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7, लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. कॉक्रोज जनता पार्टी च्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध करत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे नीट पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. प्रियांका गांधी तसेच इतर नेत्या मांडी घालूनच बसल्या आहेत.

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा सवाल ; आणखी काय म्हणाल्या?

वेध माझा ऑनलाईन।
सोमवारी दिल्लीमध्ये आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, दरम्यान त्यानंतर आता या आंदोलनावर अभिजीत दिपके यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कॉकोरच जनता पार्टीच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते. या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अजूनही दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन सुरूच आहे. यावर आता अभिजीत दिपके यांच्या आई अनिता दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘लाठीचार्ज व्हायला नव्हता पाहिजे, लेकर तिथे आंदोलन करण्यासाठी गेले होते. आज एक महिना झाला तिथे त्यांचं आंदोलन सुरू आहे. तिथे कोणतीही घटना झाली नाही आणि यांनी लाठीचार्ज केला. लेकर काय दहशतवादी आहे का ते? 18 -20 वर्षांची मुलं आहेत ती. तुम्ही दहशतवाद्यांना सोडून देतात आणि तुम्ही लेकरांवर लाठीचार्ज करता, सरकारने हे योग्य केलं नाही. 

सरकारने आधी त्यांच्या मागण्या ऐकायच्या होत्या, काय ते बघायचं होतं, आणि नंतर काय तो निर्णय घ्यायचा होता. आमचे लेकर तिथे काय मार खायला गेले होते का? असा सवाल अभिजीत दिपके यांची आई अनिता दिपके यांनी सरकारला केला आहे.

सोनम वांगचुक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन।
दिल्लीतील NEET पेपरफुटी आंदोलनादरम्यान पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात. ते उपोषणावर होते ज्यामुुळे त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच प्रकरणात आता दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचे नवे निर्देश दिले आहेत.

यापूर्वी सोनम वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली आंग्मो यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या इच्छेविरुद्ध सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्याचा दावा करत त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, त्या वेळी न्यायालयाने ही याचिका स्वीकारली नव्हती.

दरम्यान, आता या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. ताज्या माहितीनुसार दिल्ली हायकोर्टाने सोनम वांगचुक यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना मेदांता रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, मेदांता रुग्णालयाच्या संचालकांना त्यांच्या उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पॅनेल तयार करण्याचे आदेशही दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानंतर आता मेदांता रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली सोनम वांगचुक यांच्यावर उपचार होणार आहेत.

शरद पवार यांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजीत दिपके यांची घेतली भेट ;

वेध माझा ऑनलाईन।
जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जंतर मंतरवर जाऊन अभिजीत दिपके यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी अभिजीत दीपके यांच्याशी संवाद साधला आहे.  ‘सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना डिटेन केलंय एकप्रकारे. आमच्या मागण्या आहेत 

विद्यार्थ्यांविरोधातील गुन्हे मागे घ्यावेत. दिल्ली आणि मुंबईतील प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे. आत्महत्या करण्यात आलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपये द्यावे, सर्व आंदोलकांवरील देशातील एफआयआर मागे घ्या तसेच वांगचुक यांना सोडा. ही आमची मागणी आहे, आमच्या चार प्रमुख मागण्या आहेत, असं यावेळी अभिजीत दिपके यांनी यावेळी शरद पवार यांना म्हटलं.

दरम्यान यावर बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की,  महाराष्ट्रात ३० महत्त्वाच्या जिल्ह्यात आंदोलन झालं. कोणताही कॉल नसताना हे आंदोलन झालं. तुम्हाला काय मदत पाहिजे, तसेच तुम्ही किती दिवस आंदोलन करणार आहात? असा सवालही यावेळी शरद पवार यांनी दीपके यांना केला. यावर बोलताना दिपके म्हणाले की,  ३१ दिवसांपासून इथे आहे. एक महिना झाला. काल जे झालं त्यामुळे सरकारचा राग आला आहे. आम्ही काय मागत होतो. आम्ही फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत होतो, असं दिपके यांनी यावेळी म्हटलं.

Thursday, July 16, 2026

कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार ;

वेध माझा ऑनलाईन।
महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच कोल्हापूरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर शहरातील नवी वाशी नाका परिसरात भाजप कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज साखरे यांच्यावर दोन जणांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत ते जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. परिसरातील CCTV फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे संबंधितांचा शोध घेतला जात आहे. 

Wednesday, July 15, 2026

:कराड पालिकेत घनकचरा प्रकल्पासह विकासकामांत घोटाळा?' नगरसेवक वाटेगावकर यांचा थेट आरोप; कराडचे राजकारण तापणार!

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपालिकेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासह विविध विकासकामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजपचे गटनेते गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी बुधवारी पालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. घनकचरा प्रकल्पातील कामांपासून ते रखडलेल्या विकासकामांपर्यंत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले त्यांनी यामध्ये घोटाळा झाल्याची शंका व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर अतुलबाबा यापुढे पालिकेत लक्ष घालणार असल्याचे त्यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले...
यावेळी नगरसेवक शिवाजी पवार, सुमित शिंदे, अजय पावसकर, आशुतोष डुबल, किशोरी शिंदे, वैष्णवी वायदंडे, शारदा माने, वर्षा वास्के, सुहास जगताप उपस्थित होते.

वाटेगावकर म्हणाले, 
घनकचरा प्रक्रिया केंद्रात बगिचा विकसित करणे, अंतर्गत रस्ते, तांबडी माती टाकणे, शोभेची झाडे लावणे आणि परिसराचे सुशोभीकरण यासाठी ठराव क्रमांक १६३ अंतर्गत सुमारे ₹१ कोटी ८१ लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला. कागदोपत्री ही कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष पाहणीत अशी कोणतीही कामे दिसून आली नाहीत. त्यामुळे संबंधित कामांचे मोजमाप, बिले आणि देयकांची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.

बायोगॅस प्रकल्प परिसरातील काही रस्त्यांची कामेही प्रत्यक्षात न होता कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आल्याची शंका व्यक्त करत, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या कारभारावरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. ओल्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया होत नसल्याने, मनुष्यबळाची कमतरता, बेल्ट वाहिनीची दुरवस्था आणि कचऱ्याचे वाढते ढीग यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.याशिवाय बीपीसीएल आणि एअरटेलच्या वाटाघाटींमध्ये हस्तक्षेप झाल्याचा संशय व्यक्त करत त्या व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शहरातील विकासकामांसाठी मंजूर झालेल्या ₹११ कोटींच्या निधीबाबत खुलासा मागण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले होते. मात्र, तीन तास प्रतीक्षा करूनही बैठक न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप वाटेगावकर यांनी केला. "सात महिन्यांपूर्वी टेंडर होऊन वर्क ऑर्डर निघालेली अनेक विकासकामे अद्याप सुरू झालेली नाहीत. हा केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा आहे की यामागे दुसरे काही कारण आहे?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नगरसेवक शिवाजी पवार यांची टिका 
नगरसेवक शिवाजी पवार यांनीही पालिका प्रशासनावर टीका करत, "पालिका निवडणुकीनंतर सहा महिने उलटले, मात्र आतापर्यंत केवळ एकच सर्वसाधारण सभा झाली आहे. विकासकामांवर चर्चा होण्यासाठी नियमित सभा होणे आवश्यक आहे. अन्यथा शहराचा विकास ठप्प होईल," असे सांगितले.
शेवटी, घनकचरा प्रकल्प, विकासकामे आणि कथित आर्थिक अनियमिततेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, तर भाजपच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवकांनी दिला. पालिकेतील कथित गैरव्यवहारांबाबत भाजपने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेची कराडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे 

Tuesday, July 14, 2026

मनसे कराड शहर अध्यक्ष सागर बर्गे यांचे वडील भिकाजी बर्गे यांचे निधन ; उद्या रक्षाविसर्जन ;


वेध माझा ऑनलाईन।
कराड येथील सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड शहर अध्यक्ष सागर बर्गे व छ. शिवाजी महाराज रिक्षा युनियनचे अध्यक्ष राहुल बर्गे यांचे वडील भिकाजी गोविंद बर्गे (वय 79) यांचे रविवार दि.12 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. 

रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम 
उद्या बुधवार दि.15 रोजी सकाळी 10 वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी कराड येथे होणार आहे.

पर्यावरण रक्षण"चा संदेश देत कराड सायकल क्लबची पंढरपूर सायकल वारी ५१ सायकलिस्टांचा १४३ किमी प्रवास; राज्यस्तरीय सायकल संमेलन, प्रदक्षिणा व सायकल रिंगणात :

वेध माझा ऑनलाईन।
"होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी..." या भक्तिभावाने कराड सायकल क्लबतर्फे आयोजित श्रीक्षेत्र पंढरपूर सायकल वारी उत्साहात पार पडली. या वारीत पाच बाल सायकलिस्टांसह एकूण ५१ सायकलिस्ट सहभागी झाले होते.

शनिवार, ११ जुलै रोजी पहाटे चार वाजता कराड येथून सायकल वारीचे प्रस्थान झाले. कराड–शामगाव घाट–मायणी–दिघंची मार्गे सुमारे १४३ किलोमीटरचा आठ ते नऊ तासांचा प्रवास पूर्ण करून दुपारी दोन वाजता सायकलिस्ट श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल झाले. वर्दीश विजय लिगाडे, अवनीश मयूर माने, शौर्य क्षितिज बेलापुरे, अनुष्का रणजित धारवट व संहिता समीर करमरकर या बाल सायकलिस्टांसह डॉ. माणिक बनकर, प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, सुनील बुधे, विनोद सावंत, अभय नांगरे, विजय मोहिते, राजू रेके, अनिल कुलकर्णी, डॉ. राहुल फासे, डॉ. संतोष टकले यांच्यासह अन्य सायकलिस्ट सहभागी झाले.

नाशिक सायकलिस्ट क्लब व पंढरपूर सायकल क्लब आयोजित राज्यस्तरीय पाचव्या सायकल संमेलनात राज्यातील १३२ सायकल क्लब सहभागी झाले होते. रविवारी सकाळी सायकल प्रदक्षिणा, रेल्वे मैदानावरील भव्य सायकल रिंगण आणि हरिनामाच्या गजरात सर्वांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर संमेलनात सहभागी होऊन सायकलिस्ट कराडकडे रवाना झाले.


प्रतिकूल परिस्थितीत १४ जणांनी रिटर्न सायकल वारी
पंढरपूरहून कराडकडे प्रचंड ऊन आणि जोरदार हेडविंडचा सामना करत जय पोद्दार, वेदांत रावळ, मनोज कुलकर्णी, प्रा. ज्ञानेश्वर भोईटे, प्रा. सदाशिव आवळेकर, डॉ. माणिक बनकर, प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, सुनील बुधे, अभय नांगरे, डबल एसआर रविराज जाधव, मुकुंद पोद्दार, प्रा. अर्जुन भिंगारे, वैभव गुरसाळे आणि चंद्रजीत पाटील या १४ सायकलिस्टांनी रिटर्न सायकल वारी पूर्ण करत जिद्द, चिकाटी आणि शारीरिक क्षमतेचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला.

Monday, July 13, 2026

११ कोटींचा निधी, ४४ कामे आणि सात महिन्यांची प्रतीक्षा; कराड पालिकेला आमदार डॉ. अतुल भोसले यांचा थेट कराडच्या मुख्याधिकारी व्हटकर यांना जाब :भाजप नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेनंतर आमदारांचे पत्र; कराडचे राजकारण तापले ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेला महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन तब्बल सात महिने उलटले. ४४ विकासकामांना मंजुरी, निधी आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली; मात्र प्रत्यक्षात अनेक कामे अजूनही सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी थेट हस्तक्षेप करत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून रखडलेल्या कामांचा खुलासा मागितला आहे.

कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी व्हटकर यांना घेराव घालत मंजूर कामांबाबत जाब विचारला होता. त्यानंतर आता आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही अधिकृत पत्राद्वारे प्रशासनाला थेट प्रश्न विचारल्याने हा वाद आणखी तीव्र झाला आहे. यामुळे कराड पालिकेतील प्रशासकीय कारभार आणि राजकीय संघर्ष दोन्ही चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

पालिकेच्या कामकाजात आमदार भोसले यांनी थेट लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर भाजप नगरसेवक अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. 

आमदार भोसले यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातून ६६८.८८ लाख रुपयांची ३० विकासकामे, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून ३९५ लाख रुपयांची १४ विकासकामे मंजूर झाली आहेत. म्हणजेच एकूण ४४ कामांसाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही बहुतांश कामे प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत.
यामध्ये शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचाही समावेश आहे. कराड–मलकापूर बैलबाजार रस्त्यासाठी १५७ लाख रुपयांचा निधी मंजूर असतानाही रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मोठमोठे खड्डे, वाहतुकीचा वाढता धोका आणि नागरिकांचा रोजचा मनस्ताप यामुळे मंजूर निधीचा उपयोग नेमका कधी होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

आमदार भोसले यांनी आपल्या पत्रात प्रशासनाकडे तीन स्पष्ट प्रश्न उपस्थित केले आहेत...
मंजूर कामे नेमकी का रखडली?
विलंबामागील जबाबदार कारणे कोणती? 
आणि ही कामे प्रत्यक्षात कधी सुरू होणार? 
याबाबत नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे कराडच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विकासकामांचा मुद्दा आता केवळ प्रशासनापुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट राजकीय जबाबदारीचा विषय बनला आहे. त्यामुळे कराडचे राजकारण आता याच मुद्यावरून तापण्याची शक्यता आहे

११ कोटींचा निधी मंजूर; ४४ विकासकामे रखडली ;आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून विचारला जाब - सात महिने उलटूनही कामे सुरू का नाहीत? कराड पालिकेचे राजकारण तापणार! यापुढे अतुलबाबा पालिकेत लक्ष घालणार ; गावात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेला महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन तब्बल सात महिने उलटले. ४४ विकासकामांना मंजुरी, निधी आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली; मात्र प्रत्यक्षात अनेक कामे अजूनही सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी थेट हस्तक्षेप करत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून रखडलेल्या कामांचा खुलासा मागितला आहे.

कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी व्हटकर यांना घेराव घालत मंजूर कामांबाबत जाब विचारला होता. त्यानंतर आता आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही अधिकृत पत्राद्वारे प्रशासनाला थेट प्रश्न विचारल्याने हा वाद आणखी तीव्र झाला आहे. यामुळे कराड पालिकेतील प्रशासकीय कारभार आणि राजकीय संघर्ष दोन्ही चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.राजकीय वर्तुळात याकडे केवळ विकासकामांचा प्रश्न म्हणून नव्हे, तर बदलत्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. 

पालिकेच्या कामकाजात आमदार भोसले यांनी थेट लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर भाजप नगरसेवक अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला प्रशासनाला वेळ देणारे नगरसेवक आता थेट उत्तराची मागणी करत असल्याने पालिका प्रशासनावरचा दबाव वाढला आहे.

आमदार भोसले यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, 
महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातून ६६८.८८ लाख रुपयांची ३० विकासकामे, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून ३९५ लाख रुपयांची १४ विकासकामे मंजूर झाली आहेत. म्हणजेच एकूण ४४ कामांसाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही बहुतांश कामे प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत.
यामध्ये शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचाही समावेश आहे. कराड–मलकापूर बैलबाजार रस्त्यासाठी १५७ लाख रुपयांचा निधी मंजूर असतानाही रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मोठमोठे खड्डे, वाहतुकीचा वाढता धोका आणि नागरिकांचा रोजचा मनस्ताप यामुळे मंजूर निधीचा उपयोग नेमका कधी होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

आमदार भोसले यांनी आपल्या पत्रात प्रशासनाकडे तीन स्पष्ट प्रश्न उपस्थित केले आहेत—
मंजूर कामे नेमकी का रखडली? विलंबामागील जबाबदार कारणे कोणती? आणि ही कामे प्रत्यक्षात कधी सुरू होणार? 
याबाबत नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे कराडच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विकासकामांचा मुद्दा आता केवळ प्रशासनापुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट राजकीय जबाबदारीचा विषय बनला आहे. मंजूर निधी असूनही विकासकामे रखडणे हा केवळ प्रशासकीय विलंब आहे की त्यामागे अन्य कारणे आहेत, याकडे आता नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

११ कोटींचा निधी मंजूर; ४४ विकासकामे रखडली ;आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून विचारला जाब - सात महिने उलटूनही कामे सुरू का नाहीत? कराड पालिकेचे राजकारण तापणार! यापुढे अतुलबाबा पालिकेत लक्ष घालणार ; गावात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेला महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन सात महिने उलटले आहेत. या योजनांतील ४४ विकासकामांसाठी निधी उपलब्ध असूनही अनेक कामांना अद्याप सुरुवात झालेली नसल्याने आमदार डॉ. अतुल भोसले यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून याबाबत खुलासा मागितला आहे.
एकूणच मंजूर कामे सात महिने उलटूनही का सुरू नाहीत? याबाबत आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून जाब विचारल्याच्या कारणाने यापुढे... अतुलबाबा पालिकेत थेट लक्ष घालणार हे निश्चितच आहे... आणि  याचनिमित्ताने कराड पालिकेचे राजकारण तापणार अशीही शक्यता आहे

कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी व्हटकर यांना घेराव घालत मंजूर कामांबाबत जाब विचारला होता. त्यानंतर आता आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही अधिकृत पत्राद्वारे प्रशासनाला थेट प्रश्न विचारल्याने हा वाद आणखी तीव्र झाला आहे. यामुळे कराड पालिकेतील प्रशासकीय कारभार आणि राजकीय संघर्ष दोन्ही चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
दरम्यान पालिकेच्या कामकाजात आमदार भोसले यांनी थेट लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर भाजप नगरसेवक अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या नगरसेवकांचा पालिका प्रशासनावरचा दबाव वाढला आहे.

आमदार भोसले यांनी पत्रात नमूद केले आहे की... 
महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत ६६८.८८ लाख रुपयांची ३० विकासकामे, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत ३९५ लाख रुपयांची १४ विकासकामे मंजूर झाली आहेत. या सर्व कामांसाठी प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध असूनही बहुतांश कामे प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत.

शहरातील कराड–मलकापूर बैलबाजार रस्त्याच्या कामासाठी १५७ लाख रुपयांचा निधी मंजूर असूनही रस्त्याची अवस्था अद्यापही खराब असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना व वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर मंजूर कामे रखडण्यामागील कारणे, त्यासाठी जबाबदार बाबी आणि ही कामे प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याबाबत नगरपरिषद प्रशासनाने माहिती द्यावी, अशी मागणी आमदार भोसले यांनी पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनीही रखडलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन कामे तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदारांनीही अधिकृत पत्राद्वारे प्रशासनाकडे खुलासा मागितल्याने शहरातील रखडलेल्या विकासकामांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Saturday, July 11, 2026

देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीकरीता आलेल्या चौघांना अटक ; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे हस्तगत : कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई;

वेध माझा ऑनलाईन।
 देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीकरीता आलेल्या चौघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली. यामध्ये चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे व एक दुचाकी असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चौघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती डीवायएसपी राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अफताब बादशाह मोमीन (वय 24), रोहन मेहबुब शेख (वय 19, दोघेही रा. रा. मुजावर कॉलनी, कराड), अमर रघुनाथ पाटील (वय 23, रा. काले, ता. कराड) व ओंकार प्रकाश हिंगणे (वय 25, रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.
डीवायएसपी राजश्री पाटील पुढे म्हणाल्या, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील यांनी कराड शहर व परिसरात बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना कराड शहर पोलिसांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शुक्रवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलीस हवालदार संदीप कुंभार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत चौघेजण विनापरवाना पिस्टल विक्रीकरीता थांबले आहेत. त्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत छापा टाकला असता तेथे अफताब मोमीन, रोहन शेख, अमर पाटील व ओंकार हिंगणे यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता चौघांकडे चार देशी बनावटीचे पिस्टल व आठ जिवंत काडतुसे व एक दुचाकी असा 3 लाख 58 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रमुखचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम, पोलीस हवालदार सतिश पाटील, संदीप कुंभार, अशोक वाडकर, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, धिरज कोरडे, दिग्विजय सांडगे, निलेश विभुते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसीन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, विजय गुरव, सोनाली पिसाळ यांनी केली.

Friday, July 10, 2026

राज्यातील नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू करावी या मागणीला यश ; आमदार अतुलबाबांनी केला पाठपुरावा;


वेध माझा ऑनलाईन।
राज्यातील नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू करावी या मागणीला अखेर यश मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना एनपीएस लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान या निर्णयासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या प्रश्नाची गांभीर्याने मांडणी केली. त्यांच्या विशेष प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील हजारो नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उप मुख्यमंञी एकनाथ शिंदे,  आमदार डॉ. अतुलबाबा भोसले,कराड चे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे अर्जुन कोळी यांनी  आभार व्यक्त केले आहेत.

कृष्णा साखर कारखान्याच्या यशाबद्दल डॉ. सुरेशबाबा भोसले यांचा भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांच्या हस्ते सत्कार -

वेध माझा ऑनलाईन।
आज कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील अभूतपूर्व यशाबद्दल डॉ. सुरेशबाबा भोसले यांचा भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री मकरंद (भाऊ) देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. धनश्रीताई मकरंद देशपांडे, भाजपचे माजी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, श्री.सिद्धू गेजगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मकरंद देशपांडे म्हणाले, "मतदारांनी दाखवलेला विश्वास हीच खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती आहे. या विश्वासाला पात्र ठरत सभासदांच्या हिताचे निर्णय आणि विकासाभिमुख कामे पुढील काळातही सातत्याने व्हावीत," अशा शब्दांत त्यांनी डॉ. सुरेशबाबा भोसले यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करत, सभासदांचा विश्वास कायम राखत कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कराड शहरातील रस्ते, स्वच्छता आणि रखडलेल्या विकासकामांवर भाजपचे नगरसेवक आक्रमक; तोडगा न निघाल्यास पालिकेत 'बोंबाबोंब' आंदोलनाचा इशारा ;

वेध माझा ऑनलाईन।
 कराड शहरातील ४५ रस्त्यांच्या कामांसाठी आमदार डॉ. अतुल भोसले आणि महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन कामांचे वर्क ऑर्डरही निघाले आहेत. मात्र प्रत्यक्षात कामांना सुरुवात होत नसल्याने, तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, रस्ते आणि कचरा गाड्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची चांगलीच कानउघाडणी केली. येत्या आठवडाभरात प्रश्नांवर ठोस तोडगा न निघाल्यास कराड पालिकेत 'बोंबाबोंब' आंदोलन छेडण्याचा इशारा  भाजपच्या नगरसेवकांनी दिला.

मुख्याधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीस नगरसेवक गुंड्याभाऊ वाटेगावकर शिवाजी पवार, अजय पावसकर, सुमित जाधव, गणेश पवार, वैष्णवी वायदंडे, आशुतोष डुबल, सुहास जगताप, सुरज माने, सचिन वास्के तसेच अतुल शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील बीपीसीएल गॅस पाईपलाईन आणि एअरटेल कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामालाही विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या कामांसाठी तीन महिन्यांपूर्वी ठराव होऊनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने रस्त्यांची कामे रखडल्याचा आरोप करण्यात आला.

भाजपचे पदाधिकारी अतुल शिंदे यांनी स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व बीएलओ संदर्भातील कॅम्पबाबत प्रश्न उपस्थित केला. राजकीय नेत्यांना अशा प्रकारचे कॅम्प घेण्यास परवानगी नसताना काही पदाधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकाराने कॅम्प आयोजित केला, असा सवाल त्यांनी केला. त्यावर मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी कोणत्याही राजकीय नेत्यांना अशा प्रकारच्या कॅम्पला परवानगी नसून, असे आयोजन झाले असेल तर ते बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले.


प्रितीसंगम बागेतील अव्यवस्थेचाही मुद्दा बैठकीत गाजला. नगरसेवक अजय पावसकर यांनी बागेत गाढवे फिरत असल्याची बाब उपस्थित करत मंदिर परिसरात खाद्यपदार्थ नेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. देवस्थान असणारा तो परिसर आहे याचे भान त्याठिकाणी ठेवणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले तसेच शहरातील तीनही बागांची योग्य देखभाल होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी गाढवे फिरल्याच्या घटनेबाबत मुख्याधिकारी व्हटकर यांनी चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र केवळ कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता संबंधित ठेकेदाराचे बिल रोखावे, अशी एकमुखी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली.

नगरसेवक आशुतोष डुबल यांनी मान्सूनपूर्व कामांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी, ड्रेनेज स्वच्छता आणि इतर प्रतिबंधात्मक कामे वेळेत न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक सुहास जगताप यांनी प्रितीसंगम बागेत नियमावली तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक असलेले फलक लावण्याची मागणी केली.


कंपन्यांसोबत बैठक घेण्याची मागणी
बीपीसीएल गॅस पाईपलाईन आणि एअरटेल कंपनीच्या केबल टाकण्यास नेमका विलंब का होत आहे, याचा खुलासा करण्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत सर्व नगरसेवकांची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली. कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे अथवा इतर कोणत्याही कारणामुळे कराड शहरातील विकासकामे रखडत असतील तर त्याचा जाब विचारला जाईल, असा इशाराही देण्यात आला. 

नगरसेवक शिवाजी पवार आक्रमक ; 
नगरसेवक शिवाजी पवार हे यावेळी आक्रमक झाले त्यांनी बैलबाजार रोडच्या कामाचा मुद्दा उपस्थित केला. नोव्हेंबर २०२५ मध्ये मंजूर झालेल्या या रस्त्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून १ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून ८ एप्रिल २०२६ रोजी कामाचे वर्क ऑर्डरही देण्यात आले. मात्र त्यानंतर गॅस पाईपलाईन व केबल टाकण्याच्या कारणामुळे काम रखडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.




Thursday, July 9, 2026

'वेध माझा'च्या पाठपुराव्याला यश; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्यानंतर कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलाची चौकशी सुरू ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे चौकशीचे आदेश

वेध माझा ऑनलाईन 
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग सलग अनेक दिवसांपासून हिरवा-निळा होत असल्याच्या गंभीर पर्यावरणीय प्रश्नावर वेध माझाने सातत्याने केलेल्या वृत्तांकनाची अखेर शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी हा प्रश्न थेट राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित करून या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग अचानक हिरवा-निळा का झाला? त्यामागील नेमके कारण काय आहे? नदीचे पाणी सुरक्षित आहे का? प्रदूषणामुळे हा बदल झाला आहे का? अशा अनेक प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वेध माझाने सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत संबंधित प्रशासनाकडे अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्याची मागणी लावून धरली होती.
या वृत्तांची दखल घेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर मांडला. त्यांनी या घटनेची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी केली.

याची गंभीर दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नदीच्या पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्याचे आणि सविस्तर अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग हिरवा-निळा होण्यामागील नेमके वैज्ञानिक कारण आता अधिकृतपणे स्पष्ट होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

कृष्णा नदी ही कराडसह परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ रंगबदल म्हणून न पाहता पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा विषय शासन स्तरावर पोहोचवल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांतील नागरिकांकडून त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे. आता अधिकृत तपासणी अहवालातून वस्तुस्थिती समोर येणार असल्याने नागरिकांचे लक्ष त्या अहवालाकडे लागले आहे.

वेध माझाने उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे अखेर शासन यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसून येत असून, आता तपासणी अहवालात काय निष्कर्ष समोर येतात आणि त्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Wednesday, July 8, 2026

फलटण तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचा वीजेच्या शॉकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना : एकमेकांना वाचवताना झाला मृत्यू!

वेध माझा ऑनलाईन।
- फलटण तालुक्यातील खामगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबप्रमुखाला विजेचा धक्का लागल्यानं त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकमेकांना विजेचा धक्का लागून कुटुंबातील चौघेही मृत्युमुखी पडल्याची माहिती फलटण ग्रामीणचे पोलीसानी दिली 

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार घराबाहेरील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने सतीश उर्फ पिसुरड्या शिंदे यांना शॉक लागला. ही बाब लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी पत्नी आणि मुलांनी धाव घेतली. मात्र, त्यांनाही विजेचा जबर धक्का बसला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

कृष्णा कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले यांची निवड ; वाळवा तालुक्यातील जे. डी. मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी वर्णी ; कार्यकर्त्यांचा जल्लोष


वेध माझा ऑनलाईन ।
येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील संचालक जे. डी. मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी वर्णी लागली आहे. या निवडीनंतर जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने तब्बल १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजयाची हॅट्रिक साधली. अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर कृष्णा कारखाना कार्यस्थळावर आज (बुधवारी) चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. 

निवडणूक निर्णय अधिकारी सौ. अपर्णा यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या निवड प्रक्रियेवेळी चेअरमनपदासाठी डॉ. सुरेश भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यासाठी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन तथा विद्यमान संचालक जगदीश जगताप हे सूचक; तर संचालक दयानंद पाटील अनुमोदक होते. तसेच  व्हाईस चेअरमनपदी जे. डी. मोरे यांनी दाखल केलेल्या अर्जासाठी संचालक सुनील पाटील हे सूचक; तर संचालक सत्यजीत पाटील हे अनुमोदक होते. यानंतर सर्वानुमते चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले व व्हाईस चेअरमनपदी जे. डी. मोरे यांची निवड जाहीर करण्यात आली. सौ. अपर्णा यादव यांच्या हस्ते नूतन चेअरमन डॉ. सुरेश भोसले व व्हाईस चेअरमन जे. डी. मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक निबंधक संजय जाधव, राहुल देशमुख, उर्मिला राजमाने उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्यात सभासदांनी सलग तिसऱ्यांदा संधी देत आमच्यावर मोठा विश्वास दाखविला आहे. येत्या ५ वर्षात अधिकाधिक ऊसदर देण्यासाठी आणि चांगल्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. कृष्णा कारखान्याला राज्यातील पथदर्शी आदर्श कारखाना घडविण्याचा आमचा संकल्प असून, यासाठी सभासदांची आम्हाला निश्चित साथ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी संचालक जगदीश जगताप, लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, आनंदा खबाले, अरविंद पाटील, बाजीराव थोरात, छबन कांबळे, दत्तात्रय देसाई, संभाजीराव पाटील, सत्यजीत पाटील, सुनील पाटील, बाळासो जगताप, संग्राम पाटील, बाबासो शिंदे, अविनाश खरात, बाजीराव निकम, सुजाता जाधव, सुनीता शेवाळे, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्यासह कराड व वाळवा तालुक्यातील विविध मान्यवर, कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आप्पासाहेबांच्यानंतर सर्वाधिक काळ चेअरमनपद भूषविण्याचा विक्रम
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी १९६१ ते १९८९ अशी सलग २८ वर्षे कृष्णा कारखान्याचे चेअरमनपद भूषवून सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला. त्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांनीही १९९९ ते २००५ अशी ६ वर्षे आणि २०१५ ते २०२६ अशी ११ वर्षे असे एकूण १७ वर्षे चेअरमनपद भूषविले आहे. त्यानंतर आता २०२६ ते २०३१ या ५ वर्षांसाठी त्यांची पुन्हा चेअरमनपदी निवड झाली आहे. त्यामुळे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्यानंतर सर्वाधिक काळ चेअरमनपद भूषविण्याचा, तसेच सर्वाधिक वेळा चेअरमनपदी निवड होण्याचा मान डॉ. सुरेश भोसले यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. तसेच सलग तिसऱ्यांदा चेअरमनपदी निवड होण्याची ऐतिहासिक हॅट्रिकही त्यांनी साधली आहे.


Monday, July 6, 2026

कृष्णा नदीच्या रंगबदलामागील सत्य का दडवल जातंय? कराड दक्षिण आणि उत्तरचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अजूनही गप्प का? याप्रकरणी 'वेध माझा' चा पाठपुरावा सुरूच राहील ;कारण हा लाखो नागरिकांच्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न आहे ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग सलग अनेक दिवस निळसर-हिरवा होत असताना आता पावसामुळे नदी गढूळ होऊन प्रदूषण अधिकच वाढेल की काय अशी भीती आहे? दरम्यान संबंधित यंत्रणांकडून अद्यापही अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. हा केवळ प्रशासकीय विलंब आहे की सत्य दडपण्याचा प्रयत्न? असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. आणि कराड उत्तर आणि दक्षिण चे लोकप्रतिनिधी अजूनही याविषयी गप्प का आहेत... हाही जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे...

या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या 'वेध माझा' मुळे हा विषय लोकचळवळीचे स्वरूप धारण करू लागला असून, प्रशासनावरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे.

नागरिकांच्या मते, लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी, शेतीशी आणि पर्यावरणाशी संबंधित इतक्या गंभीर प्रश्नावर संबंधित विभागांचे मौन अत्यंत संशयास्पद आहे. पाण्याचे नमुने नमुने घेतले का ? ते  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले का? अहवाल तयार झाला आहे का? झाला असेल तर तो जनतेपासून का लपवला जात आहे? अशा प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने तातडीने द्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
'वेध माझा' ने सातत्याने नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करून हा विषय जिवंत ठेवला आहे. त्यामुळे अनेक वर्षे दुर्लक्षित राहणारा प्रश्न आता सार्वजनिक चर्चेचा विषय बनला आहे. "हा पाठपुरावा थांबवू नका; सत्य बाहेर येईपर्यंत आवाज उठवत राहा," अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आता हा लढा अधिक व्यापक करण्याची तयारी सुरू झाली आहे. नागरिकांनी थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी उत्तर मागवून अहवाल प्रसिद्ध करण्यास भाग पाडावे, अशी भूमिका पुढे येत आहे.

याशिवाय, हजारो नागरिकांच्या सहभागातून सही मोहीम राबवून प्रशासनाला निवेदन देण्याची तयारी सुरू असून, हा प्रश्न केवळ वृत्तांकनापुरता मर्यादित न राहता जनआंदोलनात रूपांतरित करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
स्थानिक महाविद्यालये, पर्यावरण अभ्यासक आणि मान्यताप्राप्त प्रयोगशाळांच्या माध्यमातून नदीच्या पाण्याचे स्वतंत्र वैज्ञानिक परीक्षण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्याचीही मागणी होत आहे. अधिकृत अहवाल आणि स्वतंत्र परीक्षणाची तुलना झाल्यास सत्य अधिक स्पष्ट होईल, असे नागरिकांचे मत आहे.

प्रशासनाला थेट सवाल...
पाण्याचा रंग बदलून अनेक दिवस झाले, तरी अधिकृत अहवाल का नाही?
पाण्याचे नमुने तपासले की नाही?
तपासणी झाली असेल तर निष्कर्ष जनतेपासून लपवले का जात आहेत?
नदी प्रदूषित नसेल, तर प्रशासन स्पष्टपणे सांगण्यास का टाळाटाळ करत आहे?
आणि प्रदूषण झाले असेल, तर जबाबदारांवर कारवाई कधी होणार?
या प्रश्नांची स्पष्ट आणि लेखी उत्तरे मिळेपर्यंत नागरिक शांत बसणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

'वेध माझा'चा निर्धार
कृष्णा नदीच्या रंगबदलामागील सत्य, अधिकृत तपासणी अहवाल आणि जबाबदारांवरील कारवाई जनतेसमोर येईपर्यंत 'वेध माझा' चा पाठपुरावा आणखी तीव्रपणे सुरू राहील. 
कारण हा केवळ एका नदीचा प्रश्न नाही तर हा लाखो नागरिकांच्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न आहे.

कोयना धरणात एका रात्रीत पाणीसाठा 5 टीएमसीने वाढला ; मुसळधार सुरूच ! या पार्श्वभूमीवर एनडीआरएफला पाचारण ;

वेध माझा ऑनलाईन।
झालेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील जनजीवन सुरळित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं असून एक तुकडी कराडमध्ये दाखल झाली आहे.दरम्यान पश्चिम घाटमाथ्याला ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानं पाच तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना आजदेखील सुट्टी देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 93 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे एका रात्रीत पाणीसाठा 5 टीएमसीनं वाढला आहे. कोयना आणि कृष्णा नद्यांची पाणी पातळीही झपाट्यानं वाढत आहे.

Saturday, July 4, 2026

कृष्णा नदीचा रंग हिरवा झाल्याच्या प्रश्नावर 'वेध माझा'चा धडाकेबाज पाठपुरावा; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव; : अधिकृत अहवाल येईपर्यंत वेध माझा ने पाठपुरावा सुरू ठेवावा ; नागरिकांची मागणी ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा होत असल्याच्या गंभीर आणि पर्यावरणाशी निगडित प्रश्नावर सातत्याने वृत्तांकन करून हा विषय जनतेसमोर प्रभावीपणे मांडल्याबद्दल 'वेध माझा' चे नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. लोकहिताचा प्रश्न धैर्याने आणि सातत्याने मांडणाऱ्या या पत्रकारितेमुळे प्रशासनावर योग्य तो दबाव निर्माण होत असून, नागरिकांनाही वस्तुस्थितीची माहिती वेळेवर मिळत असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की... 
संवेदनशील पण काही प्रमाणात दुर्लक्षित राहिलेल्या कृष्णा नदीच्या रंगबदलाच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडल्यामुळे हा विषय जनतेच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. लोकहिताची जाणीव ठेवून केलेली निर्भीड आणि जबाबदार पत्रकारिता ही लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याचबरोबर नागरिकांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही मांडल्या आहेत. 
कृष्णा नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची अंतिम जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडे थेट तक्रार दाखल करून अधिकृत व ठोस उत्तर मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच नदी संवर्धनासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवून व्यापक जनमत तयार करावे, जेणेकरून प्रशासनाला या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही, असेही मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. स्थानिक महाविद्यालये किंवा पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या माध्यमातून स्वतंत्र पाणी परीक्षण करून वैज्ञानिक पुरावेही उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलामागील नेमके कारण स्पष्ट होईपर्यंत, संबंधित यंत्रणांनी अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करेपर्यंत आणि दोषींवर आवश्यक कारवाई होईपर्यंत या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवावा, अशी अपेक्षा नागरिकांनी 
'वेध माझा' कडून व्यक्त केली आहे.

कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण काय,?तपासणी अहवाल कोणाकडे अडकला आहे,? तो जनतेपासून का लपविला जात आहे? "लोकप्रतिनिधी' या प्रश्नावर गप्प का? जनतेत चर्चा; वेध माझा चा पाठपुरावा चालूच राहणार...

 वेध माझा ऑनलाईन।
: कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा झाल्याची घटना समोर येऊन अनेक आठवडे उलटले. या काळात नागरिकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले, पर्यावरणप्रेमींनी तपासणीची मागणी केली आणि 'वेध माझा'ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, संबंधित विभागांकडून अद्यापही अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. परिणामी, हा विलंब नेमका कशामुळे होत आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण काय,?

त्या पाण्याचा तपासणी अहवाल कोणाकडे अडकला आहे,?

तो जनतेपासून का लपविला जात आहे? 

आणि या विलंबाची जबाबदारी कोण स्वीकारणार? 

 लोकप्रतिनिधी या प्रश्नावर गप्प का?

या सगळ्या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत या प्रकरणावरील संशय कायम राहणार आहे.

आणि 'वेध माझा' या संपूर्ण प्रकरणाचा पुढेही पाठपुरावा करत राहील आणि तपासणी अहवाल, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक घडामोड जनतेसमोर आणत राहील.

दरम्यान या प्रकरणात संबंधित विभागांना नदीच्या पाण्याचे नमुने घेण्याची मागणी करण्यात येत आहे. 
मात्र, ती तपासणी करण्यात आली का? 
आली असेल तर त्या नमुन्यांचे निष्कर्ष काय आले? 
तपासणी पूर्ण झाली की नाही ? 
कोणत्या प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली? 
आणि अहवाल कोणाकडे प्रलंबित आहे?  याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नागरिकांसमोर अद्यापही ठेवण्यात आलेली नाही. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित अशा संवेदनशील विषयात प्रशासनाची ही भूमिका अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.

सध्या पावसाळा सुरू असून नदीत विविध नाले, सांडपाणी आणि शेतीमधून वाहून येणारे पाणी मिसळत आहे. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक असताना अधिकृत माहितीचा अभाव चिंतेत भर घालत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या नदीबाबत पारदर्शकता ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, नदीकाठच्या काही नागरिकांनी अद्यापही काही ठिकाणी पाण्यावर हिरवट थर किंवा रंगातील बदल दिसत असल्याचा दावा केला आहे. या दाव्यांची शासकीय स्तरावर पडताळणी झाली आहे का, याचाही खुलासा झालेला नसल्यामुळे रंगबदलाची कारणे नैसर्गिक आहेत की प्रदूषणाशी संबंधित आहेत?, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

या संपूर्ण प्रकरणात आणखी एक बाब प्रकर्षाने समोर येत आहे. कराड परिसरातील लाखो नागरिकांचे पिण्याचे पाणी, शेती आणि दैनंदिन जीवन कृष्णा नदीवर अवलंबून असताना या विषयावर लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांकडून संयुक्त पत्रकार परिषद किंवा अधिकृत निवेदनही जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे माहितीच्या अभावातून अफवा आणि संभ्रम वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे तपासणी अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियमित परीक्षण करून त्याचे अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणीही पुढे येत आहे.

कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण काय, तपासणी अहवाल कोणाकडे अडकला आहे, तो जनतेपासून का लपविला जात आहे आणि या विलंबाची जबाबदारी कोण स्वीकारणार? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत या प्रकरणावरील संशय कायम राहणार आहे.
आणि 'वेध माझा' या संपूर्ण प्रकरणाचा पुढेही पाठपुरावा करत राहील आणि तपासणी अहवाल, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक घडामोड जनतेसमोर आणत राहील.

कराडच्या मुख्य रस्त्यावरील भाजी मंडई उठवा... अन्यथा पालिकेच्या आवारात बसून भाजी विक्री करु ; सामाजिक कार्यकर्ते अभिषेक भोसले यांचा पालिका प्रशासनाला निवेदन देऊन इशारा ;

वेध माझा ऑनलाईन
कराडमधील बुधवार पेठेतील साठे इमारत मुख्य रस्त्यापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा ते नगरपालिका गेट या परिसरात रस्त्यावर भाजी मंडई बसूदेऊ नये या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक अभिषेक भोसले यांनी नुकतेच पालिका मुख्याधिकारी याना दिले यावेळी त्या परिसरातील असंख्य रहिवासी उपस्थित होते........

सदर निवेदनात म्हटले आहे की
आम्ही सर्व रहिवासी अर्जदार आपणास कळवितो की, बुधवार पेठ मधील वर नमूद केलेल्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूकडील कायमचे रहिवासी आणि व्यावसायिक (भाडे तत्वावर / मालकी हक्क) आहे.
कराड नगरपरिषद कराड यांनी भाजी मंडई ही वर नमूद केलेल्या रस्त्यावर बसू नये कारण या ठिकाणी मुख्य रस्ता, रहिवासी आणि व्यावसायिक गाळे, बाजार पेठ मुख्य रस्ता व मेडिकल आहेत व ते शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत.
त्यामुळे जे या वरील रस्त्यामध्ये येताना-जाताना सदरची मंडई येथे भरत असल्यामुळे त्यासोबत गाड्यांवरून महिला आणि पुरुष व्यक्ती भाजी मंडईतील बाजार घेत असल्यामुळे रस्त्यावर ट्राफिक जाम होत आहे याकडे नगरपरिषद कराड मधील संबंधित विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरासमोर दरवाजामध्ये शेतकरी/व्यापारी बाजार घेऊन, टेम्पो/बोलेरो/कृजर या सारख्या मोठ्या गाड्या घेऊन बसल्यामुळे घरातील व्यक्तींना ये जा करता येत नाही. भाग हा गावठाण असल्यामुळे अडचणींचा रस्ता आहे त्याभागात जर अचानक सिलेंडर स्फोट किंवा आग लागली तर अग्निशामक गाडी येणे खूप कठीण होते आणि इमर्जन्सी पेशंट आला तर पेशंटचा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आपण सदर प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी अन्यथा नगरपरिषदेच्या आवारात भाजी विक्री करण्यासाठी आम्ही बसू असा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला आहे