Friday, August 7, 2026

लोकशाही आघाडी शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहे; –पत्रकार परिषदेत गुंड्याभाऊ वाटेगावकर यांचा आरोप ;

वेध माझा ऑनलाईन।
: कराड नगरपालिकेतील राजकारण दिवसेंदिवस अधिकच तापत असून भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. विरोधी गटनेते गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी लोकशाही आघाडीवर टीका करत, शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून पालिकेतील राजकारण घडवून आणले जात असल्याचा आरोप केला. तसेच नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव हे चुकीची उत्तरे देऊन कराडकर नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

वाटेगावकर म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे संपूर्ण राज्याचे दैवत असून त्यांच्या समाधीलगत होणाऱ्या नेकलेस रोडसाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा मार्ग शहराच्या विकासाला चालना देणारा ठरेल. शहरातील विविध विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध होत असतानाही सत्ताधारी खोटे आरोप करून त्या निधीचा उपयोग टाळत आहेत. यामध्ये विकासापेक्षा राजकारणच अधिक दिसत असून त्यामुळे शहराचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कराड नगरपालिकेच्या विकासाची तुलना आजूबाजूच्या पालिकांशी केली असता कराड विकासाच्या बाबतीत मागे पडल्याचेही त्यांनी नमूद केले. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराचा पुनरुच्चार करत, सध्या सुरू असलेल्या कामकाजातही त्याच प्रकारच्या अनियमितता सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
आपल्यावर खंदारे यांच्या वाहनातून प्रवास केल्याचा करण्यात आलेला आरोप फेटाळून लावत वाटेगावकर म्हणाले, "हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. मी त्यांच्या गाडीत बसण्याचा प्रश्नच येत नाही."
नगराध्यक्षांकडून आमदार डॉ. अतुल भोसले यांना चुकीची माहिती दिली जात असल्याच्या आरोपावर ते म्हणाले, "नगराध्यक्ष आरोप करत असले तरी स्वतः आमदारांनी कधीही असे आरोप केलेले नाहीत. खोटे आरोप करून शहरातील नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे."
उर्दू शाळा, ४० फुटी रस्ता तसेच शहरातील अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर भाजप सातत्याने आवाज उठवत राहील. शहराच्या विकासासाठी जेव्हा गरज भासेल तेव्हा आम्ही ठामपणे भूमिका मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक अजय पावसकर म्हणाले, सोमवार पेठेतील वादग्रस्त रस्त्याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले होते. मात्र, चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा करण्यात आला 
नगरसेवक शिवाजी पवार आणि आशुतोष डूबल तसेच अतुल शिंदे यांनीही सत्ताधाऱ्यांचे आरोप फेटाळून लावत, भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
शेवटी अतुल शिंदे म्हणाले...आमदार साहेबांच्या गुडबुक मध्ये आम्ही सगळे नगरसेवक आहोतच शिवाय आम्ही सगळे लोकांच्या गुडबुकमध्येही आहोत त्यामुळेच लोकांनी मोठ्या मतांनी आम्हाला निवडून देत पालिकेत पाठवलं आहे त्यामुळे आम्ही शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत

पत्रकार परिषदेचे आभार शहराध्यक्ष सुषमा लोखंडे यांनी मानले.
कराड पालिकेतील राजकारण आता अधिकच तापू लागल्याचे दिसत आहे सेना भाजप च्या संघर्षात आता विरोधी गट नेते गुंड्याभभाऊ वाटेगावकर यांनी लोकशाही आघाडी शिवसेनेचे च्या खांद्यावर बंदूक ठेवून पालिकेत राजकारण घडवून आणत असल्याचा आरोप केलात्यामुळे आता सेना-भाजप च्या अंतर्गत धुस्फुसित लोकशाही आघाडी ला वाटेगावकर यांनी ओढून घेत शहराच्या राजकारणात नवी वाट चोखाळली आहे दरम्यान कराडचे नगराध्यक्ष यादव यांनी केलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळून नगराध्यक्ष  आमच्या प्रश्नांची चुकुची उत्तरे देत कराडच्या नागरिकांना भरकटत ठेवत आहेत त्यात शहराचे नुकसानच असल्याचे सूतोवाच गुंड्याभभाऊ वाटेगावकर यांनी केले
सर्किट हौस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी पालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

वाटेगावकर पुढे म्हणाले...यशवंतराव चव्हाण हे आमचे व सर्व राज्याचे दैवत आहे त्यांच्या समधीलगत होणाऱ्या नेकलेस रोड साठी अतुलबाबांनी मोठा निधी आणला आहे तिथून होणार हा मार्ग शहराच्या विकासात भर घालणारा ठरणार आहे अनेक ठिकाणी अतुलबाबांच्या माध्यमातून शहरात निधी येत असताना सत्ताधारी मात्र खोटे आरोप करत तो निधी शहरांसाठी वापरण्याचे टाळत आहेत यामध्ये विकासापेक्षा राजकारण दिसत आहे आणि हे शहराच्या भविष्यासाठी योग्य होणार नाही आपल्या आसपास असणाऱ्या अनेक पालिकेच्या विकासाचा रेशीओ पहिला तर कराड पालिका खूप मागे असल्याचे दिसते हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले

घनकचरा प्रकल्पाच्या घोटाळ्याचा पुनरुचार करत त्यांनी सध्या देखील याच भ्रष्टाचाराची पुनरावृत्ती चालू असल्याचे आताच्या कामकाजावर टीका करत पटवून दिले 
ते म्हणाले...माझ्यावर खंदारे यांच्या गाडीत बसून जाण्याचा आरोप होतो तो पूर्ण खोटा आहे मी त्या खंदारे च्या तोंडाकडे पण पहात नव्हतो... गाडीत बसण्याचा प्रश्नच येत नाही
अतुल बाबांना तुम्ही खोटी माहिती देता...या आरोपावर बोलताना वाटेगावकर म्हणाले...नगराध्यक्षनी काही आरोप केले तरी स्वतः अतुलबाबा याबाबत कधी काही बोलले आहेत का? असे खोटे आरोप करून नगराध्यक्ष शहराला भरकटवत आहेत...

शहरातील उर्दू शाळा, असेल किंवा 40 फुटी रस्त्याचा विषय असेल तसेच अनेक अशा शहरातील अनेक चर्चेच्या विषयांना हात घालत आपण कराडच्या विकासासाठी नेहमीच आग्रही राहणार असून त्यासाठी ज्यावेळी बोलायची गरज भासेल तेव्हा नक्कीच बोलणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले

नगरसेवक अजय पावसकर म्हणाले...सोमवार पेठेतील त्या वादग्रस्त रस्त्याबाबत तोडगा काढू असे सांगत नगराध्यक्ष यादव यांनी मला सांगितलं होतं पण चर्चेला बसू बसू अस करत त्यांनी वेळ घालवला व त्यानंतर हा विषय सभेत पार पडला
नगरसेवक शिवाजी पवार व आशुतोष दुबल यांनीही चर्चेत सहभागी होत सत्ताधारी पार्टीच्या आरोपांना फेटाळले व पालिकेतील भाजप पार्टी अतुलबाबांच्या नेतृत्वात शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले

आभार शहराध्यक्ष सुषमा लोखंडे यांनी मानले


Thursday, August 6, 2026

कराडातील दोन हॉटेल्सना टाळे; मुदतबाह्य व संशयास्पद खाद्यपदार्थ आढळलेउपशीर्षक : अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी; अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, पुढील आदेशापर्यंत हॉटेल्स बंद

वेध माझा ऑनलाइन।
: सातारा जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने कराड शहरातील विविध हॉटेल्समध्ये विशेष तपासणी मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान दोन हॉटेल्समध्ये मुदतबाह्य तसेच संशयास्पद खाद्यपदार्थ आढळून आल्याने संबंधित हॉटेल्सना पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तपासणीदरम्यान काही ठिकाणी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आले. आढळून आलेल्या खाद्यपदार्थांची तपासणी व पुढील कायदेशीर कार्यवाही अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती मिळाली.

या कारवाईनंतर शहरात कोणत्या हॉटेल्सवर कारवाई झाली, याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली. तसेच नागरिकांनी अन्नाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कऱ्हाडमध्ये दोन हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; संबंधित हॉटेल केली सील !कोणकोणत्या हॉटेलवर झाली कारवाई ?



वेध माझा ऑनलाइन
जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने कराड शहरातील विविध हॉटेलची तपासणी मोहीम राबविली असता या कारवाईत दोन हॉटेलमध्ये मुदतबाह्य आणि संशयास्पद खाद्यपदार्थ आढळून आले त्यामुळे संबंधित हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणी दरम्यान काही ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आले. 
दरम्यान ही कारवाई शहरातील कोण- कोणत्या हॉटेलवर  झाली याबाबत शहरात चर्चा सुरू झाली आहे

दरम्यान
नागरिकांनी केलेल्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी ही विशेष तपासणी करण्यात आली. अशी  माहिती सातारा जिल्ह्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली.

मराठी साहित्यविश्वाने एक सर्जनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक गमावला - आमदार डॉ अतुल भोसले यांची लेखक श्रीनिवास कुलकर्णी यांना श्रद्धांजली ;

वेध माझा ऑनलाईन।
मराठी साहित्यविश्वातील ख्यातनाम ललित लेखक, संवेदनशील शब्दशिल्पकार आणि 'डोह'कार म्हणून सर्वदूर परिचित असलेले कराडचे ज्येष्ठ साहित्यिक मा. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक सर्जनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक गमावला आहे अशा शब्दात आमदार अतुलबाबा भोसले यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे

'डोह', 'सोन्याचा पिंपळ', 'पाण्याचे पंख' आणि 'कोरडी भिक्षा' यांसारख्या अजरामर साहित्यकृतींमधून त्यांनी मराठी भाषेला समृद्ध केले. त्यांच्या लेखणीतून ग्रामीण जीवन, मानवी संवेदना आणि निसर्गाशी असलेले नाते अत्यंत प्रभावीपणे उभे राहिले. त्यांचे साहित्य महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभर पोहोचले आणि इंग्रजीसह अन्य भाषांमध्येही अनुवादित झाले, ही मराठी साहित्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

महाराष्ट्र शासनाचा २०२५ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार तसेच अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. अर्धशतकाहून अधिक काळ त्यांनी अखंड साहित्यसाधना करत मराठी वाङ्मयाला मोलाचे योगदान दिले.

मा. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत, त्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना तसेच असंख्य साहित्यप्रेमींना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.

ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने साहित्यविश्वाची मोठी हानी –कुलकर्णी कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वाहिली श्रद्धांजली ;

वेध माझा ऑनलाईन।
कराडचे ज्येष्ठ साहित्यिक, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या शोकसंदेशात श्री. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि मूल्यनिष्ठ साहित्यिक हरपला आहे. पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा, डोह आणि सोन्याचा पिंपळ यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी आपल्या वेगळ्या अनुभवविश्वाचा अत्यंत प्रभावी आविष्कार वाचकांसमोर मांडला. त्यांच्या लेखनाला चित्रदर्शी शब्दकलेची लाभलेली जोड, चित्रकलेतील संस्कारातून आलेली दृष्यमयता, निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणातून वर्णनात उतरलेला बारकावा आणि अनुभवाच्या तळाशी पोहोचणारी पारदर्शी लेखनशैली यामुळे त्यांच्या साहित्याने एक वेगळीच उंची गाठली."

"ललित लेखनाला नवे परिमाण देणारे लेखक म्हणून श्रीनिवास कुलकर्णी यांचे नाव साहित्य क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचे साहित्य मराठीपुरते मर्यादित न राहता कानडी, बंगाली तसेच इंग्रजी भाषेतही पोहोचले. महाराष्ट्र फाउंडेशनच्या साहित्यरत्न पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा 'विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार' प्राप्त होणे ही त्यांच्या अर्धशतकाहून अधिक काळाच्या साहित्यसेवेची योग्य पावती होती. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा समस्त कराडकरांना नेहमीच सार्थ अभिमान राहिला आहे."

"श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल मी तीव्र शोक व्यक्त करतो. कुलकर्णी कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना," अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली.

Wednesday, August 5, 2026

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ भारत सरकारचे स्वतंत्र संचालक भरत पाटील (नाना) यांचे स्व जयवंतराव भोसले यांना अभिवादन । कराडचे माजी नगरसेवक हणमंतराव पवार, बापूसाहेब सावंत, आप्पा सावंत यांची उपस्थिती ।

वेध माझा ऑनलाईन।
सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा देणारे आणि कृष्णा उद्योग समूहाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणारे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (भारत सरकार)चे स्वतंत्र संचालक भरत पाटील (नाना), कराडचे माजी नगरसेवक हनुमंतराव पवार, बापूसाहेब सावंत, आप्पा सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
स्व. जयवंतराव भोसले यांनी सहकार, उद्योग, शेती, आरोग्य, शिक्षण आणि समाजकारण या विविध क्षेत्रांत भरीव योगदान देत ग्रामीण विकासाची व्यापक संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यांच्या नेतृत्वातून उभ्या राहिलेल्या विविध संस्था आणि उपक्रमांमुळे अनेकांना विकासाची संधी मिळाली.
आप्पासाहेबांनी जपलेली सहकाराची मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या विकासाची भूमिका आजच्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या कार्याचा हा समृद्ध वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

विजय वडेट्टीवार यांची कराडमध्ये मोठी वक्तव्ये म्हणाले...पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज आहेत.."त्या दोन' नेत्यांपेक्षा देवेंद्र फडणवीस हा मराठी माणूस पंतप्रधान म्हणून बरा...


वेध माझा ऑनलाइन।
कराड दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुनेत्रा पवार यांच्याबाबत झालेल्या वादावर भाष्य करताना त्यांनी इंदिरा गांधींच्या उदाहरणाचा उल्लेख केला. तसेच पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर देतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरही त्यांनी टीकेची झोड उठवली.

सुनेत्रा पवार यांच्याबाबत वापरण्यात आलेल्या "गुंगी गुडिया" या शब्दावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी "गुंगी गुडिया" असे संबोधले जात होते. हा काही अपमानास्पद शब्द नाही. त्याचे राजकारण करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेसला पूर्ण आदर असल्याचे स्पष्ट करत, "त्या गुंगी गुडिया नाहीत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपण लढवय्या आहोत, दुर्गा आहोत, झाशीची राणी आहोत हे सिद्ध करावे," अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या छायाचित्राला जोडे मारण्याचे आंदोलन करण्यात आल्याबाबत विचारले असता, वडेट्टीवार म्हणाले की, "ज्यांना खरोखर जोडे मारायला हवेत, त्यांच्यापर्यंत जाण्याची हिंमत यांच्यात नाही. सत्तेची झुल पांघरून स्वतःला वाघ समजणाऱ्यांनी आधी ती झुल काढावी, मग ते वाघ आहेत की कोल्हे, हे जनतेला दिसेल."

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एवढी मोठी राजकीय कारकीर्द असूनही त्यांना राजकारणातून संन्यास घ्यावा लागेल, अशी भावना व्यक्त करावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपमध्ये पक्षासाठी आयुष्य घालवणाऱ्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा आवाज दाबला जातो, असा आरोप करत त्यांनी पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले. "त्या काँग्रेसमध्ये आल्यास त्यांना राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्याची संधी देऊ," असे वक्तव्यही त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होण्याच्या चर्चेवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच आहे. मात्र, त्यासाठी आधी दिल्लीतील त्या दोन नेत्यांना हटवावे लागेल, तेव्हा खरा आनंद होईल," असे म्हणत त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावरही निशाणा साधला.


जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची आज १३ वी पुण्यतिथी ; कराडसह वाळवा तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे करण्यात आले पूजन; स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची आज बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी १३ वी पुण्यतिथी आहे. 

स्व. जयवंतराव भोसले यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्य यांना केंद्रबिंदू मानून कृष्णाकाठी विकासाचे नवे पर्व सुरू केले. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. तसेच कृष्णा परिवारातील अनेकविध संस्थांच्या माध्यमातून आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवित आहेत. कृष्णा रूग्णालयाच्या माध्यमातून कराडसह संपूर्ण सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याच्या परिसरातील रूग्णांना अद्ययावत अशा स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत.
त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज बुधवारी कराडसह वाळवा तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 

शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंनी पक्षफुटीवेळी घेतलेला तो निर्णय ठरणार टर्निंग पॉइंट? शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू ;

वेध माझा ऑनलाईन।
मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करताना कपिल सिब्बल यांनी संपूर्ण घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला आहे. विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग झालं, त्यानंतर हे आमदार सुरतला गेले,  सुरतहून हेच आमदार गुवाहाटीला गेले हा काही योगायोग नव्हता.  तेव्हाच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विधिमंडळ नेतेपदावरून दूर केलं, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केला आहे.
सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे. विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग झालं, त्यानंतर हे आमदार सुरतला गेले,  सुरतहून हेच आमदार गुवाहाटीला गेले हा काही योगायोग नव्हता.  तेव्हाच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विधिमंडळ नेतेपदावरून दूर केलं. एकनाथ शिंदेंनंतर  अजय चौधरींची ठाकरेंनी विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती केली. व्हिप म्हणून सुनील प्रभूंनी आमदारांची बैठकही बोलावली. निवडणूक आयोगानेच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.  बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनीच पक्षाची सूत्र स्वीकारली.  पक्षघटनेनुसार ठाकरेंनी उपनेत्यांची नियुक्ती केली नियुक्तीची माहिती देताना पक्षाच्या कलमांचा देखील उल्लेख करण्यात आला होता.  विधिमंडळात कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे आहे, असा युक्तिवाद यावेळी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला आहे.

दरम्यान भरत गोगवले यांना एकनाथ शिंदे यांनी  पक्षाचं प्रतोद केलं, हा निर्णय राज्याबाहेर झाला आहे. सर्व बंडखोर आमदार सुरत गोवाहाटीला असताना हा निर्णय झाला होता. जेव्हा हा निर्णय झाला, तेव्हा हे सर्व आमदार राज्यबाहेर होते. 2019 च्या मंत्रिमंडळात शिंदे कॅबिनेट मंत्री होते, असा युक्तिवादही यावेळी कपिल सिब्बल यांनी केला आहे.

Tuesday, August 4, 2026

सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणे योग्य नाही. इंदिराजींप्रमाणे सुनेत्रा पवार कृतीतून उत्तर देतील, ; पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया -

वेध माझा ऑनलाईन।एखादी महिला राजकारणात सक्रिय काम करत असेल तर तिला प्रोत्साहन दिले पाहिजे. काँग्रेसने नेहमीच राजकारणाची पातळी सांभाळली आहे. सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात असून एका घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणे योग्य नाही. इंदिराजींप्रमाणे सुनेत्रा पवार कृतीतून उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरील 'गुंगी गुडिया' पोस्टवरून राजकीय वातावरण तापले. बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पोस्टरला 'जोडे मारो' आंदोलन केले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या बारा वर्षात पत्रकारांना कधीही सामोरे गेलेले नाहीत. ‘५० करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा' किंवा गुजरातच्या महिलांच्याबद्दलची त्यांची वक्तव्ये जगजाहीर आहेत. पण, काँग्रेसची वेगळी परंपरा आहे. काँग्रेसने राजकारणाची पातळी सोडलेली नाही. राम मनोहर लोहियांनी इंदिराजींबद्दल जो शब्द प्रयोग केला होता. त्याला इंदिराजींनी कृतीतून उत्तर दिले होते. सुनेत्रा पवार या देखील सक्रिय राजकारणात कार्यरत असून एका घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याबद्दल पातळी सोडून बोलणे योग्य नाही. त्या देखील कृतीने उत्तर देतील, अशी अपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
बीडमधील कायदा, सुव्यवस्थेच्या अनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्नाला काहीही उत्तर न देता पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद गुंडाळली‌. त्या संदर्भात काँग्रेसच्या सोशल मीडियावर पोस्ट करत 'गुंगी गुडिया' अशी टिप्पणी करण्यात आली होती. 

दरम्यान, सुनेत्रा पवारांशी संबंधित पोस्टशी माझा कोणताही संबंध नसताना माझ्या विरोधात आरोप आणि आंदोलन करण्यात येत आहे. कोणावरही आरोप करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडीया असा केला ; हर्षवर्धन सपकाळ यांनी या विधानाचे केले समर्थन - राज्यातले राजकारण तापले ; हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी -

वेध माझा ऑनलाइन / गुंगी गुडिया प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी राहुल गांधींकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. यावरून राज्याचे राजकारण तापले असून राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या विधानाचे समर्थन केले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी राहुल गांधींकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी म्हटले की, ‘इतक्या घाण वृत्तीची काँग्रेस आहे, त्यांनी त्यांची जात दाखवून दिली. महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवेल. आम्ही त्यांना काही बोललो तर चालेल का? त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. तुम्हाला आया बहिणी आहेत की नाही. माझी राहुल गांधींना विनंती आहे की त्यांनी या अध्यक्षांना काढूण टाकले पाहिजे. काँग्रेसवाल्यांना लाज राहिली नाही.’

.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी ; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ;

वेध माझा ऑनलाइन।
"पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी केलेले योगदान कायम स्मरणात राहील. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ते खऱ्या अर्थाने शिक्षणमहर्षी होते. त्यांच्याशी आमच्या कुटुंबाचे अनेक दशकांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने वैयक्तिकरीत्याही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सतेज पाटील, संजय पाटील तसेच संपूर्ण पाटील कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे


काँग्रेस इतिहास विसरली काय? गुंगी गुडियाचे पडसाद? सत्ताधाऱ्यांकडून जोरदार हल्लाबोल काँग्रेसने सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' संबोधल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसने गुंगी गुडिया म्हणून हिणवलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना डिवचलं आहे. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील, असा खोचक सवाल काँग्रसने केला आहे. काँग्रेसच्या या विधानाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. काँग्रेसच्या या विधानाचा सत्ताधाऱ्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. हा समाचार घेतानाच काँग्रेसला जुन्या इतिहासाचीही आठवण करून दिली आहे. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे.

शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस आपला इतिहास विसरली का? असा प्रश्न आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांना देखील गुंगी गुडिया बोलले जात होतं. गुंगी गुडिया बोलणं हा महिला नेतृत्वाचा अपमान आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.

Monday, August 3, 2026

...तर कराड नगरपरिषदेवर कारवाई व्हावी म्हणून प्रयत्न करणार ; न्यायालयात जाणार ; उर्दू शाळा व संविधान भवन प्रकरणी अकिल आंबेकरी आक्रमक ; आनंदराव लादे आंदोलन करणार ;

वेध माझा ऑनलाईन।
बाराडबरे परिसरात असलेल्या कचरा डेपोला आग लागल्यानंतर येथील रहिवाशांचे जगणे मुश्किल होते. अशा कचरा डोपोनजिक नगरपालिकेने उर्दु शाळा बांधण्याचा घाट घातला आहे. विद्यार्थांच्या आरोग्याचा विचार करून योग्य जागेत शाळा बांधावी. तसेच संविधानभवनच्या ईमारतीचे कामही चुकीच्या पद्धतीने चालले आहे. या विरोधात स्वतंत्र्यदिनी कराड नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा ईशारा भिमशक्ती सामाजीक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आंनंदराव लादे यांनी दिला आहे.
तर यावेळी अकिल आंबेकरी यांनी नकाशा प्रमाणे हे काम होत नाहीये त्यामुळे कोणाच्या हट्टासाठी असे चुकीचे काम होणार असेल तर कराड नगरपरिषदेवर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून प्रयत्न करणार, न्यायालयातही जाणार असल्याचे सांगितले

पालिकेच्या वतीने चुकिच्या पद्धतीने सुरू असलेल्या उर्दुशाळा व संविधानभवनच्या कामाची माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, आनंदराव लादे, आकिल आंबेकरी, रविंद्र बेंद्रे, आसिफ मुलाणी, अमजद आंबेकरी, प्रा.श्रीरंग पाटील व नागरीक उपस्थित होते.

आनंदराव लादे व अकील आंबेकरी यावेळी पुढे म्हणाले... 
बाराडबरे परिसरात पालिकेचा कचरा डेपो, सांडपाणी निस्सारण प्रकल्प व जैववैद्यकीय कचरा निमृलन प्रकल्प आहे. ये कचरा डेपोला वारंवार आग लागण्याची घटना घडत असल्याने येथील रहिवाशांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तर अन्य दोन प्रकल्पामुळेही परिसरात दुर्गंधी पसरत असते. याबाबत येथील रहिवाशांकडून पालिकेकडे वारंवार तक्रारीही करण्यात आल्या आहेत.
असे असताना येथील कचरा डेपो नजीकच पालिकेकडून उर्दु शाळा बांधण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थांच्या आरोग्यचा गंभिर प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे पालिकेने अन्य ठिकाणी योग्य जागेत उर्दु शाळा बांधावी अशी मागणी करण्यात आली आहे. वास्तवीक शाळा ईमारत बांधण्यासाठी उच्च न्यायालयाचे काही नियम आहेत मात्र हि शाळा बांधताना पालिकेने उच्च न्यायालयाचे सर्व निर्देश पायदळी तुडवले असल्याचे लादे म्हणाले.
 कराडला सहा गुंठे जागेत संविधन भवन बांधण्यासाठी सुमारे 67 लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. कचरा डेपो नजीक असलेला पालिकेचा कोंडवाडा पाडून व येथील 40 फुट रूंदिच्या रस्त्यात 20 फूट अतिक्रमण करून बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

डिपीनुसार मंजूरी असलेल्या रस्त्यात पालिका अतिक्रमण करून हा रस्ता कचरा डेपोतून वळवण्याचा घाट घालत आहे. अध्याप मंजूरीची प्रक्रिया पुर्ण झालेली नसतानाही चुकीच्या पद्धतीने पालिकेने काम सूरू केले आहे. याविरोधात जिल्हाअधिकारी कार्यालयाकडे रितसर तक्रार करण्यात आली आहे. तरीही पालिकेचे काम सुरूच असल्याने स्वातंत्र्यदिनी पालिकेसमोर आंदोलन करण्याचा ईशारा आनंदराव लादे यांनी दिला आहे.

कराडमध्ये झाडतोडीचे लाकूड विक्रीचा आरोप; ‘हिशोब’ कुठे? तोडलेली झाडे खासगी शेडमध्ये साठवून ८ ते ९ हजारांना विकल्याचा भाजपच्या नगरसेवकांचा दावा; चौकशीची मागणी

वेध माझा ऑनलाइन
कराड शहरातील विविध पेठांमध्ये तोडण्यात आलेल्या झाडांच्या लाकडाच्या व्यवहारावरून आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तोडण्यात आलेली झाडे खासगी शेडमध्ये साठवून त्यांची तब्बल आठ ते नऊ हजार रुपयांना विक्री केली जात असल्याचा आरोप भाजप नगरसेवक गणेश पवार यांनी केला आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता, त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला.

तोडलेल्या झाडांचे लाकूड नेमके कुठे नेण्यात आले? त्याचा पंचनामा झाला का? लाकडाची विक्री झाली असेल तर त्यातून मिळालेला पैसा पालिकेच्या तिजोरीत जमा झाला का? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक गणेश पवार, अजय पावसकर, आशुतोष डुबल आणि सुमित जाधव यांनी कराडच्या वैकुंठधाम परिसरासमोरील पार्किंगच्या मोकळ्या जागेची पाहणी केली. या ठिकाणी शहरातील विविध भागांतून तोडण्यात आलेली झाडे साठवून ठेवण्यात आल्याचे आपण पाहिल्याचा दावा नगरसेवकांनी केला.

पालिकेच्या हद्दीतून तोडण्यात आलेल्या झाडांच्या लाकडाचा व्यवहार पारदर्शकपणे झाला आहे का? याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे नगरसेवकांनी म्हटले आहे. झाडतोडीपासून लाकूड साठवणूक आणि त्यानंतरच्या कथित विक्रीपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यासंदर्भात नगरसेवकांनी कराड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तोडण्यात आलेल्या झाडांची संख्या, त्यांचा पंचनामा, लाकडाचे प्रमाण, साठवणूक कुठे करण्यात आली, तसेच त्याची विक्री झाली असल्यास त्याचा हिशोब आणि मिळालेली रक्कम याबाबतची संपूर्ण माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे.

झाडे पालिकेची की कुणाच्या खिशाची?
शहरातील विकासकामे, रस्ते आणि विविध कारणांसाठी झाडे तोडली जात असतील, तर त्यातून निघणाऱ्या लाकडाची विल्हेवाट लावताना पालिका प्रशासनाने पारदर्शकता ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, तोडलेल्या झाडांचे लाकूड खासगी ठिकाणी साठवले जात असेल आणि त्याची विक्री होत असेल, तर या व्यवहाराचा अधिकृत हिशोब कुठे आहे? असा थेट सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणाची केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष पाहणी करून झाडतोडीपासून लाकूड विक्रीपर्यंतच्या संपूर्ण व्यवहाराची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी भाजप नगरसेवकांनी मागणी केली आहे.

दरम्यान, या आरोपांमुळे कराड शहरातील झाडतोडीच्या प्रक्रियेवर तसेच तोडलेल्या झाडांच्या लाकडाच्या साठवणूक व संभाव्य विक्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरसेवकांनी केलेल्या आरोपांची पालिका प्रशासन चौकशी करून सत्य बाहेर काढणार का, की या प्रकरणावर पडदा टाकला जाणार? याकडे आता कराडकरांचे लक्ष लागले आहे.

Saturday, August 1, 2026

कराडात आमदार अतुल भोसलेंच्या कामांना भाजपचे नगरसेवकच ब्रेक लावतायत’; नगराध्यक्ष यादवांचा भाजपवर पलटवार ; कराड पालिकेतील वादाला नवे वळण; ‘आमदारांना हे नगरसेवक चुकीची माहिती देत आहेत ; नगराध्यक्ष यादव यांचा गंभीर आरोप ; कराडचे राजकारण तापणार ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या वादळी सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता नवे वळण मिळाले आहे.सत्ताधारी नगरसेवक आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आणलेल्या विकासकामांना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप विरोधी भाजपकडून केला जात असताना, आता नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. 

यादव म्हणाले... 
भाजप नगरसेवकच आमदारांच्या कामांना विरोध करत आहेत त्यांनी आणलेल्या कामांच्या निविदा थांबवून हेच नगरसेवक त्यांच्या कामाना विरोध करत आहेत आणि आम्ही विरोध करतो असे म्हणत आहेत खरंतर शहराला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागतच करतो असे सांगत भाजपचे नगरसेवकच आमदारांना चुकीची माहिती देत आहेत,’ असाही थेट आरोप यादव यांनी यावेळी केला आहे.

पालिकेच्या सभेतील गोंधळाबाबत बोलताना यादव म्हणाले, ‘पालिकेला काही परंपरा आहेत. त्या परंपरा मोडण्याचे काम सभेच्या दिवशी भाजप नगरसेवकांनी केले, याचे आम्हाला वाईट वाटते.’ सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत नागरिकांना बसवून सभेच्या वेळी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होणार असल्याची शक्यता आधीच लक्षात आल्याने गॅलरीत नागरिकांना प्रवेश देण्यात आला नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

आमदारांच्या कामांना विरोध करतो, हा गैरसमज पसरवला जातोय’
आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून आणलेल्या विकासकामांना पालिका मंजुरी देत नाही, असा आरोप चुकीचा असल्याचे सांगत यादव यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ‘आमदारांच्या कामांना करण्याची आमची मानसिकता नाही, हा पूर्णपणे खोटा आणि गैरसमज पसरवणारा प्रकार आहे. तसे असते तर विरोधकांनी सांगितलेली कामे आम्ही सभेच्या विषयपत्रिकेत समाविष्ट करून घेतली असती का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याचवेळी भाजपचे नगरसेवक आमदार अतुल भोसले यांना पालिकेच्या कामकाजाबाबत चुकीची माहिती देत असल्याचा गंभीर आरोपही यादव यांनी केला.

घनकचरा प्रकल्पावरूनही पलटवार
घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत विरोधकांकडून शहरात चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप यादव यांनी केला. हा प्रकल्प तत्कालीन प्रशासनाच्या काळातील असल्याने त्याचा आजच्या परिस्थितीशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. या विषयावरून विरोधकांकडून केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

नेकलेस रोडची संपूर्ण माहिती द्या, 
नेकलेस रोड प्रकल्पावरूनही नगराध्यक्ष यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘स्टेडियम उभारणीसाठी संबंधित खात्याकडून जसे प्रेझेन्टेशन देण्यात आले, तसेच प्रेझेन्टेशन आम्हालाही दिले पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही,’ असे ते म्हणाले.
‘यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीलगत हा प्रकल्प होणार आहे. मात्र या प्रकल्पाची संपूर्ण माहितीच आम्हाला नाही. मग आम्ही मंजुरी कशासाठी द्यायची?’ असा सवाल त्यांनी केला.
यशवंतराव चव्हाण हे कराडची अस्मिता असल्याचे सांगत यादव म्हणाले, ‘समाधीस्थळालगत होणाऱ्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती पालिकेला होणे गरजेचे आहे. भविष्यात या ठिकाणच्या अस्मितेला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य होता कामा नये. अन्यथा भविष्यातील पिढी आपल्याला माफ करणार नाही.’


‘ त्यावेळी खंदारे यांच्या गाडीत बसून कोण फिरत होते?’;
सुरेश पाटील यांच्या वक्तव्याने पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ...

घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी बाग झाल्याचे दाखवून प्रत्यक्षात काम न करताही बिले काढल्याचा आरोप भाजप नगरसेवकांकडून करण्यात आला होता. या आरोपावर सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाना पाटील यांनी विरोधकांवर पलटवार केला.
‘तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या काळात हे प्रकरण घडल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी खंदारे यांच्या गाडीतून कोण फिरत होते? तेव्हा हा आरोप का केला नाही? आता तेच लोक याबाबत आरोप करत आहेत, हे हास्यास्पद आहे,’ असे पाटील म्हणाले.

यावर पत्रकारांनी, 
‘त्यावेळी आरोग्य विभागा संबंधित कोण नगरसेवक खंदारे यांच्या गाडीतून फिरत होते, त्यांचे नाव सांगा,’ असा थेट सवाल केला.
त्यावर पाटील यांनी, ‘नाव कशाला घ्यायला पाहिजे? सगळ्यांना माहिती आहे कोण होते ते,’ असे उत्तर दिले. 
त्यांच्या या उत्तरानंतर त्याठिकाणी पत्रकारांसाहित सगळेच हसायला लागले

दरम्यान पत्रकार परिषदेत झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे कराड पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक भाजप नगरसेवकांमधील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.