Tuesday, September 8, 2026

वेध माझा ऑनलाईन।
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप केला. शिंदेंचे दोन मंत्री आणि दोन प्रवक्ते आपले आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. मुंबईकडे निघाल्यानंतर मराठ्यांवर हल्ला करून मुख्यमंत्री फडणवीसांना बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या माणसांचा पण हाच प्रयत्न आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे. 

मुंबईत एकाही मराठा आंदोलकाचे रक्त निघाले तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद झालाच पाहिजे. पोलिसांनी हल्लाच केला तर पळू नका, चेंगराचेंगरी होते. येत्या १२ तारखेला राज्यभरातील मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

शिवसेना ठाकरे गटाचे १६ नगरसेवक गोत्यात?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर मुंबईत नवे आव्हान उभे राहिले आहे. दोन नगरसेवकांचे पद रद्द झाल्यानंतर आता ठाकरे गटाच्या आणखी १६ नगरसेवकांच्या विजयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटाच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी या नगरसेवकांविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. निवडणूक अर्जात जात प्रमाणपत्र, संपत्तीची माहिती, शिक्षण आणि गुन्हेगारी प्रकरणांशी संबंधित माहिती लपवल्याचे आरोप या याचिकेत करण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये मतमोजणीवेळी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत संगनमत केल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या १६ नगरसेवकांचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार. मुंबईतील या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींमुळे ठाकरे गटासमोरील अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

डॉ. अतुलबाबांच्या सूचनेनंतर शाहू चौक रस्त्याचे खड्डे बुजवले ;

वेध माझा ऑनलाइन।
शहरातील शाहू चौक ते जुना कोयना पूल रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे व दुरुस्तीचे काम मंगळवारी सुरू करण्यात आले. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सूचना दिल्यानंतर सदर रस्त्याचे काम मिळालेल्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती सुरू केली आहे.

शाहू चौक ते जुना कोयना पूल हा शहरातील वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर शासकीय विश्रामगृह आहे. त्यामुळे अनेक महनीय व्यक्तींची ये जा या रस्त्यावरून होत असते. शिवाय जुन्या कोयना पुलापासून शहरात येण्याचा प्रमुख मार्ग असल्याने वाहनांची वर्दळ जास्त असते. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना होत होता. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत होती.
 या रस्ता नव्याने कारपेट करण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सुमारे 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र पावसाळ्यामुळे हे काम अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान शहरात बीपीसीएल कंपनीची गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होणार असल्याने शहरातील रस्त्यांची कामे नगरपालिकेने थांबवली  आहेत. मात्र या रस्त्यावर गॅस पाईपलाईन टाकणार नसल्याने पावसाळा थांबल्यानंतर तातडीने रस्ता कारपेट करण्याचे काम सुरू आहे होणार आहे. तुर्तास वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबांनी ठेकेदारास या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक काम सुरू झाले होते. मात्र पाऊस आल्याने हे काम थांबवण्यात आले होते. मंगळवारी पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने हे काम सुरू करण्यात आले.
 नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय वाटेगावकर , नगरसेवक शिवाजी पवार नगरसेवक आशुतोष डुबल यांनी कामाची पाहणी केली.

सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरणासाठी शासनाने ४.५० कोटींचा निधी मंजूर करावा; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची मागणी ;


वेध माझा ऑनलाइन।
कराड शहरासह तालुक्यातील तसेच लगतच्या ग्रामीण व डोंगरी भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र असलेल्या स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरणासाठी शासनाने ४.५० कोटींचा निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आज मुंबई येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

कराड येथील स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, या रुग्णालयाची मुख्य इमारत तसेच आवारातील इतर इमारती जुन्या झाल्या असून, त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड व झीज झाली आहे. इमारतीच्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती होते. तसेच भिंतींना तडे गेले असून, जुने झालेले विद्युत व प्लंबिंगचे जाळे आणि स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था यामुळे रुग्ण, डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अशावेळी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, तातडीची दुरुस्ती, वॉटरप्रूफिंग, सिव्हिल व इलेक्ट्रिकल नूतनीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व कामांसाठी शासनाकडून ४.५० कोटींचा निधी तातडीने मंजूर करून उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. भोसले यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली. तसेच रुग्णालयाच्या इमारतीची सुरक्षितता आणि तेथील आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी या कामांना प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली.

यावेळी आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी कराड उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन, आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांना दिली.

अतुलबाबा भोसले यांची प्रतिक्रिया ; 
कराड येथील स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयावर कराड शहरासह ग्रामीण आणि डोंगरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. त्यामुळे  या रुग्णालय इमारतीच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी निधी मिळावा, याबाबत आरोग्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच हा प्रश्न मार्गी लागून रुग्णांना अधिक सुरक्षित व चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.





डॉ. अतुलबाबांच्या सूचनेनंतर शाहू चौक रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू


शहरातील शाहू चौक ते जुना कोयना पूल रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे व दुरुस्तीचे काम मंगळवारी सुरू करण्यात आले. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सूचना दिल्यानंतर सदर रस्त्याचे काम मिळालेल्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती सुरू केली आहे.

शाहू चौक ते जुना कोयना पूल हा शहरातील वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर शासकीय विश्रामगृह आहे. त्यामुळे अनेक महनीय व्यक्तींची ये जा या रस्त्यावरून होत असते. शिवाय जुन्या कोयना पुलापासून शहरात येण्याचा प्रमुख मार्ग असल्याने वाहनांची वर्दळ जास्त असते. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना होत होता. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत होती.
 या रस्ता नव्याने कारपेट करण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सुमारे 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र पावसाळ्यामुळे हे काम अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान शहरात बीपीसीएल कंपनीची गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होणार असल्याने शहरातील रस्त्यांची कामे नगरपालिकेने थांबवली  आहेत. मात्र या रस्त्यावर गॅस पाईपलाईन टाकणार नसल्याने पावसाळा थांबल्यानंतर तातडीने रस्ता कारपेट करण्याचे काम सुरू आहे होणार आहे. तुर्तास वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबांनी ठेकेदारास या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक काम सुरू झाले होते. मात्र पाऊस आल्याने हे काम थांबवण्यात आले होते. मंगळवारी पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने हे काम सुरू करण्यात आले.
 नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय वाटेगावकर , नगरसेवक शिवाजी पवार नगरसेवक आशुतोष डुबल यांनी कामाची पाहणी केली.

जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांची कृष्णा विश्व विद्यापीठ ते दत्त चौकपर्यत भव्य रॅली ;



कराड, ता. ८ : जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी कृष्णा विश्व विद्यापीठ ते दत्त चौक कराड या मार्गावर भव्य रॅली काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत, फिजिओथेरपी उपचारांबाबत जनजागृती केली.

जगभरात ८ सप्टेंबर हा दिवस फिजिओथेरपी दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा ‘हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार आणि स्ट्रोक उपचारात फिजीओथेरपीचे महत्व’ या मध्यवर्ती संकल्पनेवर जगभर प्रबोधन केले जाणार आहे. या दिवसाचे औचित्य साधून कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते रॅलीचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची ही रॅली कृष्णा हॉस्पिटल, कोल्हापूर नाका मार्गे दत्त चौकात पोहचली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत, फिजिओथेरपी उपचारांबाबत जनजागृती केली. 

यावेळी बोलताना कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदाराजुलू म्हणाले, कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता आणि हृदयरोग यांसारख्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे नियमित व्यायाम, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली यांना विशेष महत्त्व आहे. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेऊन योग्य व्यायामाचे नियोजन करावे. 

यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. एस. आनंद, डॉ. टी. पूविष्णूदेवी, डॉ. सुरज कणसे, डॉ. संदीप शिंदे, डॉ. मंदार माळवदे, डॉ. स्मिता पाटील, डॉ. तृप्ती यादव, डॉ. वैशाली जगताप, डॉ. पूनम पाटील, डॉ. नम्रता कदम, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. सत्यम भोदाजी, डॉ. प्रगती पाटील, डॉ. श्रद्धा मोहिते, डॉ. मयुरी शहा, डॉ. अंकिता दुर्गावळे, डॉ. ओंकार सोमदे, डॉ. तेजश्री कुंभार, डॉ. धैर्यशील पाटील यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी : 

कराड : कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्यावतीने काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थींनी.

श्री गणेश फार्मा प्रो हबमध्ये विविध पदांसाठी भरती ; मलकापूर येथे मुला-मुलींसह कामगारांना रोजगाराची संधी; योग्यतेनुसार आकर्षक पगार व विविध सुविधा मिळणार ;

वेध माझा ऑनलाइन
मलकापूर येथील इंगवले नगर नाकोडा स्टील शेजारी असलेल्या श्री गणेश फार्मा प्रो हब या होलसेल मेडिकल व्यवसायामध्ये विविध पदांवर काम करण्यासाठी मुला-मुलींसह कामगारांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

याठिकाणी काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पुढे यावे, असे आवाहन फर्मच्या वतीने करण्यात आले आहे. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, अनुभव, कामाची क्षमता व पदानुसार योग्यतेचा विचार करून आकर्षक पगार देण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या भरतीबाबत माहिती देताना फर्मचे संचालक म्हणाले की, 
संस्थेच्या वाढत्या कामकाजासाठी विविध पदांवर मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मेहनती, जबाबदार आणि काम करण्याची इच्छाशक्ती असलेल्या तरुण-तरुणींना तसेच अनुभवी कामगारांना येथे रोजगाराची संधी दिली जाणार आहे.
मलकापूर व परिसरातील रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, 

अधिक माहितीसाठी 9822060246 या नम्बरबर संपर्क करावा असे आवाहन फर्मच्या संचालकानी केले आहे.

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन सेवा ठप्प : रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय ; आमदार अतुलबाबांनी लक्ष घालण्याची गरज ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा आधार असलेल्या कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन सेवा ठप्प असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. शासकीय रुग्णालयात माफक दरात अथवा उपलब्धतेनुसार मिळणारी सुविधा बंद असल्याने आता रुग्णांना खासगी रुग्णालये आणि निदान केंद्रांचा रस्ता धरावा लागत आहे. मात्र, खासगी ठिकाणी सिटी स्कॅनसाठी आकारला जाणारा खर्च अनेक सर्वसामान्य कुटुंबांना परवडणारा नसल्याने आर्थिक संकटासोबतच उपचारासाठी धावपळ करण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.

कराडचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मतदारसंघातील आरोग्य सुविधांशी संबंधित प्रश्नांमध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन सिटी स्कॅन मशीनची सद्यस्थिती जाणून घ्यावी आणि संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून सेवा तातडीने पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान 
कराडचे उपजिल्हा रुग्णालय हे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे शासकीय आरोग्य केंद्र आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण येथे उपचारासाठी येतात. अपघातग्रस्त, डोक्याला दुखापत झालेले रुग्ण, अचानक प्रकृती खालावलेले रुग्ण तसेच विविध गंभीर आजारांच्या निदानासाठी डॉक्टरांकडून सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत रुग्णालयातीलच सिटी स्कॅन सेवा बंद असणे ही केवळ तांत्रिक अडचण नसून थेट रुग्णांच्या उपचाराशी संबंधित गंभीर बाब आहे त्यामुळे या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.रुग्ण आजारी आहे, त्याला निदानाची गरज आहे; मात्र ही व्यवस्था बंद असल्याने रुग्णाने उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे आणि हजारो रुपयांचा खर्च करावा, ही परिस्थिती कितपत योग्य आहे?

शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी सिटी स्कॅन केंद्रांकडे पाठविले जाते. तेथे तपासणीसाठी होणारा खर्च अनेक कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा भार टाकणारा ठरतो.
विशेषतः गरीब, शेतकरी, मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांसाठी अचानक आलेला वैद्यकीय खर्च पेलणे कठीण असते. गंभीर आजार किंवा अपघाताच्या परिस्थितीत आधीच औषधोपचाराचा खर्च सुरू असताना त्यात महागडी निदान चाचणी जोडली गेल्यास कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटण्याची शक्यता असते.म्हणूनच शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन सेवा ही केवळ एक सुविधा नसून गरजू रुग्णांसाठी जीवनावश्यक आधारव्यवस्था आहे.

मग,आरोग्य विभाग नेमका काय करत आहे?
एकीकडे शासनाकडून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्याचा दावा केला जातो. दुसरीकडे कराडसारख्या महत्त्वाच्या शहरातील उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक तपासणीची सुविधा बंद राहते, ही विरोधाभासी परिस्थिती आहे.
या व्यवस्थेत काही प्रॉब्लेम झाला असेल तर तात्पुरती पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही? रुग्णांना जवळच्या शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कोणती यंत्रणा उभी केली आहे? याबाबतही स्पष्टता आवश्यक आहे.
रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागाने केवळ  ही "सुविधा बंद आहे’ एवढी माहिती देऊन हात झटकण्याऐवजी सेवा पूर्ववत करण्यासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करण्याची गरज आहे.

आरोग्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे
कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन सेवा तातडीने सुरू करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आरोग्यमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल मागवावा, मशीन दुरुस्तीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी आणि तोपर्यंत रुग्णांसाठी पर्यायी सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आमदार अतुल भोसले 
यांनी पुढाकार घेण्याची गरज
या गंभीर प्रश्नाकडे अतुलबाबांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मतदारसंघातील आरोग्य सुविधांशी संबंधित प्रश्नांमध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन सिटी स्कॅन सेवा का बंद आहे? याबाबत सद्यस्थिती जाणून घ्यावी आणि संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून सेवा तातडीने पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.