Thursday, September 14, 2023

विक्रम पावसकरांचा पुसेसावळी घटनेशी संबंध नाही ; कराडच्या पत्रकार परिषदेतील माहिती ;

वेध माझा ऑनलाइन ।  ज्या पोस्टवरून पुसेसावळी येथे दंगल उसळली सोशल मीडियावर ती पोस्ट टाकणाऱ्या आरोपींना हजर करणारे व त्यांना पाठीशी घालणारे  कराड मधील अल्ताफ शिकलगार, साबीर मुल्ला सातारचे सादीक शेख, रमजान कागदी, जमीर शेख व पुसेसावळीतील बागवान यांना अटक झाली पाहिजे. कोयनेच्या जंगलात होणाऱ्या कथीत बॉम्बस्फोट प्रकरणात तसेच पीएफआयशी त्यांचा संबंध असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्यांचा तपास करण्यासाठी आम्ही प्रशासनाशी चर्चा करणार आहोत. तसेच काहीही संबंध नसताना पुसेसावळीतील दंगलीशी विक्रम पावसकरांचा संबंध जोडला जात आहे. या मागणीसाठी जर मोर्चा काढण्यात आला तर हिंदूत्ववादी संघटना प्रतिमोर्चाकाढून त्याला उत्तर देणार असल्याचा असा इशारा हिंदूत्ववादी संघटनांनी दिला आहे

बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, चंद्रकांत जिरंगे, काकासाहेब जाधव, राहुल यादव, सागर आमले, रुपेश मुळे, अजय पावसकर यांच्यासह हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

विनायक पावसकर म्हणाले, जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू असताना अल्पसंख्यांक समाजाचे लोक जमाव कसा गोळा करू शकतात हा आमचा प्रश्न आहे. जमाव जमला तेव्हा प्रशासन काय करत होते ? याचा खुलासा त्यांनी करावा. हिंदूंनी 15 ऑगस्टला मोर्चा काढला. त्यानंतर पंधराव्या दिवशी पोस्ट टाकणाऱ्यांना जामीन झाला. त्या सगळ्याचा उद्रेक होण्याची वेळ येवून का दिली. त्याच त्या मुलाने पुन्हा तेच धाडस कसे काय केले. याची चौकशी झाली पाहिजे. त्या सर्वांमागे वरील सहा व्यक्तींचा संबंध आहे. अल्ताफ शिकलगार, सादीक शेख, रमजान कागदी, जमीर शेख, सादीक मुल्ला, बागवान ही लोक अत्यंत घातक आहेत. कोयनानगरला मध्यंतरी बॉम्ब प्रशिक्षण प्रकार उघडकीस आला त्याच्याशी यांचा सबंध आहे असा आमचा दावा आहे. त्या अनुषंगाने चौकशी करण्याची प्रशासनाला मागणी आहे. त्यांना सातत्याने सोशल माध्यमांवरील पोस्ट बाबत माहिती असते. त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे या सगळ्या वातावरण गढूळ करणाऱ्या लोकांना अटक झाली पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी आहे. श्री. जिरंगे म्हणाले, कोणताही हिंदू पहिली सुरवात करत नाही. मात्र सुरवात ज्यांच्याकडून होते. त्यांच्यावर कारवाई होत नाही. याउलट सकल हिंदू समाजासाठी कार्य करणाऱ्या विक्रम पावसकर सारख्या नेत्यांवर नाहक आरोप केले जातात. त्यांना अटक करण्याची मागणी केली जाते. त्यासाठी मोर्चाचा घाट घातला जातो. ही सगळी परिस्थिती घातक आहे. त्यामुळे त्यांनी मोर्चा काढला तर त्याला प्रतिमोर्चाने उत्तर द्यायची तयारी केली आहे. देश आणि राष्ट्र कार्यासाठी एखाद्याचा मृत्यू झाला तर तो शहीद घोषीत केला जातो. मात्र येथे शहीदचा अर्थ वेगळा लावून त्यांनी केलेला उल्लेख चुकीचा आहे. वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांमध्ये अल्पसंख्यांकच का आहेत. पुसेसावळीत काही युवकांनी आलमगिर औरंगजेब असा वॉटस ग्रुप काढला होता. तो काय देशभक्तीचे प्रतिक होते का. त्या ग्रुपची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी यावेळी करण्यात आली यावेळी राहूल यादव, काकासाहेब जाधव व रुपेश मुळे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment