Thursday, September 14, 2023

...आता धनगर समाजाची आरक्षणाची मागणी ! ; पंढरपूर- सातारा रस्त्यावर केला रस्ता रोको ;

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वत्र आंदोलनातून मागणी केली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना आता धनगर समाजाने देखील धनगर आरक्षण मिळावे यासाठी आज गुरुवारी पंढरपूर जिल्ह्यातील माळशिरस येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदाेलनामुळे पुणे, सातारा, पंढरपूर आणि अकलूज रस्त्यावरील वाहतूक २ तासाहून अधिक काळ ठप्प झाली हाेती.

धनगर आरक्षणसाठी माळशिरस तालुक्यातील धनगर समाज आता आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आता धनगर समाजाने रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे.धनगर समाजाच्या विविध मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात यासाठी धनगर समाजाने रास्ता रोको केला.
त्यामुळे पुणे, पंढरपूर , सातारा आणि अकलूज रस्त्यावरील वाहतूक सुमारे २ तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती. राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक असताना चौंडी येथील धनगर बांधवांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून आता धनगर समाज आक्रमक झाला आहे.

No comments:

Post a Comment