वेध माझा ऑनलाइन। आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यांच्या अनुषंगाने बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. ‘महसुली आणि इतर निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे आहे त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणार’ असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या या घोषणेमुळे मराठा आरक्षणासाठी जालनामध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळताना राज्य सरकार काहीसे गोंधळात पडले आहे. सलग पाचव्या दिवशीही आंदोलन करणारे मनोज जरांगे हे काही नमत नाही. सरकारच्या शिष्ठमंडळाला फारशी दाद देत नाहीत, हे लक्षात आल्यावर सरकारने आता एक नवीन युक्ती शोधली आहे. जालनामध्ये उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांनी मराठवाड्यातील मराठा समाजातील लोकांना कुणबी दाखले देण्याची मागणी केली होती. आता, त्यांच्या मागणीवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
No comments:
Post a Comment