Thursday, September 14, 2023

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले , मात्र अटी मान्य झाल्या का ? काय आहेत जरांगे पाटील यांच्या अटी ...?

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणासाठि उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज उपोषण सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठि उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी, (14 सप्टेंबर) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा सतरावा दिवस असून आता ते उपोषण मागे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण मुख्यमंत्री शिंदे यांचाशी झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी फळाचा रस घेऊन हे उपोषण मागे घेतले.

मराठा अरक्षणाबाबतीत मुख्यमंत्री शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असतानाच मंत्रिमंडळातील काही मंत्रीही यावेळी उपस्थित होते. मंत्री रामकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत, गिरीश महाजन, संदीपान भूमारे, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर हे यावेळी आंदोलनस्थली उपस्थित आहेत. गेल्या सतरा दिवसापासून जरांगे पाटील करत असलेल्या उपोषण मागे घेण्यासाठी हे मंत्री सतत प्रयत्न करत असल्याचे दिसत होते. आता, सरकारच्या प्रयत्नांना यश आले असून शिंदे सरकारकडून आरक्षणाचा तिढा आता सुटेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे आपल्याला न्याय मिळवून देतील असा विश्वास जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या पाच अटी
1. सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल काहीही आला तरी 1 महिन्यानंतर मराठा समाजातील लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत.

2. महाराष्ट्रात मराठा समाजावर मराठा आंदोलनादारम्यान दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.

3. अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे.

4. उपोषण सोडतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित असावेत.

5. उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाज आणि राज्य सरकारमध्ये मध्यस्थी करावी.

No comments:

Post a Comment