Wednesday, September 6, 2023

सातारा जिल्ह्यात रामराजे करणार अजितदादांचे स्वागत ? ; त्या संदर्भात आज बैठकीचे आयोजन केल्याची माहिती... ;

वेध माझा ऑनलाइन । राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यामधून पुढे मार्गस्थ होणार आहेत.अजितदादांच्या स्वागतासाठी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार  रामराजे नाईक निंबाळकर हे आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे  10 सप्टेंबर रोजी सातारा येथून कोल्हापूरकडे मार्गस्थ होणार आहेत. तरी त्यांच्या स्वागताच्या नियोजनासाठी सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये आज, गुरुवार दि. 07 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे अशी माहिती मिळत आहे.

No comments:

Post a Comment