Tuesday, July 9, 2024

डॉ अतुलबाबांनी कराडच्या स्टेडियमसाठी भरघोस निधी आणत जिंकली कराडकरांची मने ; कराडच्या दत्त चौकात कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा ;;

वेध माझा ऑनलाइन ।
कराडच्या स्टेडियमच्या विकासासाठी कराड दक्षिणचे भाजप नेते डॉ अतुल भोसले यांनी नियमित पाठपुरावा केला होता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी या स्टेडीयमचा विकास आराखडा देखील सादर करत या विकासासाठी भरगोस निधी देण्याची मागणी देखील केली होती त्यानुसार राज्यातील युती सरकारने डॉ अतुल भोसले यांच्या या मागणीला ग्रीन सिग्नल देत सुमारे तब्बल 96.50 कोटी मंजूर केले आहेत कराडातील क्रीडाप्रेमींमधून डॉ अतुल भोसलेचे अभिनंदन होत आहे 

दरम्यान अतुलबाबांमुळे कराडच्या स्टेडियमसाठी भरघोस निधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत कराड शहरातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी व कराडातील खेळाडू प्रशिक्षक तसेच "डाॕ अतुल भोसले प्रतिष्ठानच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कराडच्या दत्त चौकात येऊन आनंदोत्सव साजरा करत लाडू वाटप केले...

No comments:

Post a Comment