महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईतील विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन यामुळे विस्कळीत झालं असून रेल्वे वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. मुंबईत सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत असून बाहेर पडणे मुश्किल झाल आहे. या एकूण सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलं आहे. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडा असं एकनाथ शिंदेनी म्हंटल आहे.
याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हंटल कि, मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मी करत आहे.
No comments:
Post a Comment