Tuesday, July 9, 2024

बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार?तिसऱ्या आघाडी चे दिले संकेत

वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणूक संपली अन् आता वेध लागलेत ते विधानभा निवडणुकीचे… अशात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. प्रहारचे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी  बोलताना मोठं विधान केलं आहे. बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. मी शिंदे सरकारवर नाराज नाही. पण जर या सरकारने शेतकऱ्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. तर मात्र आम्हाला राज्यामध्ये तिसरी आघाडी करावी लागेल, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

बच्चू कडू यांनी दिले तिसऱ्या आघाडीचे संकेत
मी सरकारवर नाराज नाही. पण जर सरकारने शेतकऱ्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. तर मात्र आम्हाला राज्यामध्ये तिसरी आघाडी उघडावी लागेल. तिसऱ्या आघाडीच्या मार्फत आम्ही 15 ते 17 जागा या विधानसभेमध्ये लढवू आणि त्या जिंकू देखील, असा आम्हाला विश्वास आहे. शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत जे मार्गी अद्यापही लागलेले नाहीत. त्यामुळे वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यावा लागेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment