वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित आमदारांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज (10 फेब्रुवारी) रात्री घरी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत यंदा 78 आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 6 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नवोदित आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदारांसह महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार श्रीकांत शिंदेंनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहणार का?, अशी चर्चा रंगली आहे. दिल्लीमध्ये विधानसभा सचिवांकडून विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी प्रशिक्षण शाळा आयोजित करण्यात आली आहे. विधीमंडळ सचिवालयाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी 78 आमदार दिल्लीत आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीतील घरी महाराष्ट्राच्या नवोदित आमदारांना घरी जेवणाचे निमंत्रण दिल्याचं सांगितलं जात आहे.
No comments:
Post a Comment