वेध माझा ऑनलाईन।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यात तर्कवितर्क आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काही नेत्यांकडून हा अपघात घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात असताना, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी या चर्चांना थेट आव्हान देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना अशा गंभीर घटनेला वेगळी कलाटणी देणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
उज्ज्वल निकम यांनी अजित पवार यांच्या अपघातासोबतच जस्टिस लोया यांच्या मृत्यूबाबत होणाऱ्या दाव्यांवरही भाष्य केले. पुराव्यांशिवाय केवळ संशयाच्या आधारावर निष्कर्ष काढणे हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये राजकारण टाळले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
त्या विमानात नेमके किती प्रवासी होते? :
विमानात 5 की 6 लोक होते, या प्रश्नावर उज्ज्वल निकम म्हणाले की, खासगी विमानाच्या प्रत्येक उड्डाणाची अधिकृत नोंद विमान प्राधिकरणाकडे असते. मात्र, त्या विमानात सहा प्रवासी होते, असा कोणताही अधिकृत पुरावा आजवर समोर आलेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता तपास यंत्रणांच्या निष्कर्षांची वाट पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अपघाताच्या वेळी विमानात मोठ्या प्रमाणात इंधन असल्याने आग तीव्र झाली आणि त्यामुळे मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे यामागे कट असल्याचे म्हणणाऱ्यांनी ठोस पुरावे सादर करणे आवश्यक आहे. केवळ संशय व्यक्त करून विषयाला वेगळी दिशा देणे योग्य नाही,
No comments:
Post a Comment