Monday, March 23, 2026

कराडचे माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे यांच्या डोक्याला व चेहऱ्याला बसला मार ? ; पुढील उपचारासाठी थोरवडे याना पुण्याला हलवण्यात आल्याची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन।
काल मध्यरात्री 12 च्या सुमारास एका भरदाव ओम्नी गाडीने अचानक 3 ते 4 लोकांना उडवल्याची घटना घडली त्यात कराडचे माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे यांचाही समावेश आहे त्यांना काल रात्रीच उपचारासाठी कॉटेज हॉस्पिटल मधून कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले मात्र त्यांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आल्याची माहिती आर पी आय चे जिल्हा सरचिटणीस अप्पासाहेब गायकवाड व भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आनंदराव लादे यांनी दिली आहे
सिद्धार्थ थोरवडे यांची तब्बेत आता स्थिर आहे असेही ते म्हणाले 

काल मध्यरात्री एका भरधाव ओम्नी गाडीने  3 ते 4 जणांना उडवल्याची घटना घडली त्यातील एक महिला गंभीर असून जखमीमध्ये माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे यांनाही या गाडीने उडवले होते
या सर्व जखमींना उपचारासाठी प्रथम कॉटेज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचे कळले नंतर त्यांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते
मात्र सिद्धार्थ थोरवडे यांच्या डोक्याला व चेहऱ्याला जबर मार बसला असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे अशी माहिती नेते अप्पा गायकवाड व लादे यांनी दिली आहे

No comments:

Post a Comment