विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना डॉ. सुरेश भोसले यांनी कार्वे येथे झालेल्या कालच्या सभेत सांगितले की अविनाश मोहितेंच्या काळात तोडणी-वाहतूक संघटनेत सुमारे ६० कोटी रुपयांचा घोटाळा झाला. तसेच ७७८ सभासदांच्या कथित बनावट सह्यांद्वारे कर्जप्रकरणे, ३२०० कामगारांची भरती आणि नोंदणी नसलेल्या १४०० कामगारांवर दरमहा सुमारे ५० लाखांचा खर्च झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या व्यवहारांमधील कोट्यवधी रुपयांचा हिशेब अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगत, ‘या घोटाळ्यांच्या पैशांतून एक नवा साखर कारखाना उभा राहिला असता,’ अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान कारखाना आमच्या ताब्यात आला तेव्हा आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. राज्यभर झालेली बदनामी दूर करून कारखाना पुन्हा उभा करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागल्याचेही सुरेशबाबांनी सांगितले
अविनाश मोहितेंची ओळख घोटाळेबाज म्हणूनच संपूर्ण परिसरात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्वे (ता. कराड) येथे आयोजित जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी चेअरमन मदनदादा मोहिते व माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते
यावेळी बोलताना डॉ. भोसले पुढे म्हणाले, की २०१५ साली जेव्हा आम्ही कारखाना ताब्यात घेतला तेव्हा व्यापाऱ्यांची देणी देण्याकरता ही पैसे नव्हते. पण गेल्या ११ वर्षांत आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे कारखान्याने नवी उंची गाठली असून, आर्थिक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल कारखान्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. येणाऱ्या ५ वर्षात सिंचन योजनांचे आधुनिकीकरण करायचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच जमीन क्षारपडमुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबविले जाणार आहे. कार्यक्षेत्रातील सर्व पाणंद रस्ते पूर्ण करायचे आहेत. तसेच ऊसदरातही एक नंबरला आम्ही राहू, अशी खात्री देतो.
गेल्या 5 वर्षात आपल्या काळात कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळाले आहे उच्चांकी ऊसदर आम्ही दिला आहे कामगारांना वेळोवेळी पगारवाढ दिली आहे सभासदांना सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो आहे तसेच कारखान्याचे एक्सपानन्शन केले आहे गाळप क्षमता वाढवली आहे विस्तारीकरण तसेच नूतनीकरण देखील कारखान्यात केलेलं आहे अशा अनेक बाबींमुळे कारखाना आजच्या घडीला राज्यात अववल क्रमांकावर आहे . मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत सहकार पॅनलचा मोठ्या मताने विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला
No comments:
Post a Comment