Sunday, January 23, 2022

आज जिल्ह्यात 1124 बाधीत,368 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1124 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 368 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 11 कराड 181 खंडाळा 69 खटाव 120 कोरेगांव 47 माण 50 महाबळेश्वर 2 पाटण 59 फलटण 103 सातारा 333 वाई 88 व इतर 47आणि नंतरचे वाढीव 11 असे  आज अखेर एकूण 1124 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 368 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Saturday, January 22, 2022

आज जिल्ह्यात 1554 बाधीत, 1052 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1554 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1052 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 28 कराड 325 खंडाळा 80 खटाव 105 कोरेगांव 89 माण 60 महाबळेश्वर 29 पाटण 69 फलटण 222 सातारा 408 वाई 76 व इतर 49आणि नंतरचे वाढीव 14 असे  आज अखेर एकूण 1554 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 1052 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Friday, January 21, 2022

पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या धाडसी पित्याचे कौतुक करीत मुलाची केली विचारपूस... बिबट्याच्या वाढत्या घटनांबाबत विविध मागण्यांचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

वेध माझा ऑनलाइन -  कराड तालुक्यातील किरपे येथील धनाजी देवकर या शेतकऱ्याच्या मुलावर 20 जानेवारी रोजी बिबट्याने हल्ला केल्यावर त्याच्या वडिलांनी बिबट्याशी झुंज देत आपल्या मुलाला वाचविले या धाडसाबद्दल माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिण चे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी फोनवरून कौतुक करीत त्यांना धीरही दिला. 

आ.चव्हाण काही कामानिमित्त मुंबईला असल्याने त्यांनी फोनवरून त्या पित्याची चौकशी केली व त्यांना धीर देत मुलाच्या उपचाराचा खर्च शासन करेल असे सांगितले. तसेच आ.चव्हाण यांनी वनअधिकाऱ्यांशी चर्चा करीत बिबट्याचा वारंवार होत असलेला उपद्रव टाळण्यासाठी वनविभागाने या भागात पिंजरे लावून बिबट्याना पकडून जंगलात सोडण्याची व्यवस्था करावी. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा तसेच या बाबत स्वतः आ.चव्हाण सुद्धा पाठपुरावा करणार आहेत. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा वावर असलेल्या भागात जाऊन तेथील ग्रामस्थांचे भीतीचे वातावरण कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी चर्चा कराव्यात, तसेच पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे अश्या काही सूचना आ. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

बिबट्याचा मानवी वस्तीत वाढत असलेला वावर यासाठी आ.चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करीत वनविभागाकडून योग्य उपाययोजना बिबट्याचा वावर असलेल्या भागात केल्या जाव्यात. तसेच वनविभागाच्या तालुका अधिकाऱ्यांना पिंजरे लावण्याचे अधिकार दिले जावेत तसेच कराड तालुक्यात संक्रमण उपचार केंद्र उभारण्याचा वनविभागाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून त्यास तात्काळ मंजुरी मिळावी अश्या काही मागण्या या पत्रात आहेत.

आज जिल्ह्यात 1652 बाधीत, 1022 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1652 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1022 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 25 कराड 268 खंडाळा 99 खटाव 68 कोरेगांव 127 माण 95 महाबळेश्वर 16 पाटण 92 फलटण 159 सातारा 560 वाई 95 व इतर 35 आणि नंतरचे वाढीव 13 असे  आज अखेर एकूण 1652 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 1022 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Thursday, January 20, 2022

राज्यात गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46 हजार 197 नव्या रुग्णांची भर...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  46 हजार 197  नव्या रुग्णांची भर झाली असून 37 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 52, 025 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  काल राज्यात कोरोनाच्या  43 हजार 697 रुग्णांची नोंद झाली होती म्हणजे आज अडीच हजार रुग्णांची वाढ झाली आहे
 
राज्यात आज 125 ओमायक्रॉनबाधितांची नोंद 


राज्यात आज  125 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  आतापर्यंत 2199 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1144 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

राज्यात आज 37 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 37 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.92 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 69 लाख 67 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52 टक्के आहे.  सध्या राज्यात 24 लाख 21 हजार 501 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3391 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 27 लाख 45 हजार 348  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

गुरुवारी मुंबईत 5,708 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गुरुवारी मुंबईत 5,708 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 440 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  मागील २४ तासांत मुंबईत 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  सध्या मुंबईतील 44 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 5,708 रुग्णांपैकी 550 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 4,795 रुग्णांमध्ये कोणताही लक्षणेही नाहीत.  आल्याने 38 हजार 093 बेड्सपैकी केवळ 4,857 बेड वापरात आहेत.  सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 96 टक्के इतका आहे

बिबट्याचा लहान मुलावर हल्ला ; वडिलांनी वाचवले मुलाचे प्राण ...किरपे गावातील घटना...

वेध माझा ऑनलाइन - किरपे ता. कराड येथे बिबट्याने 5 वर्षाच्या लहान मुलावर हल्ला करून त्याला उसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. गुरुवार 20 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परंतु,  मुलाच्या वडिलांनीच प्रसंगावधान दाखवून बिबट्याचा प्रतिकार करत मुलाचे प्राण वाचवले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच किरपे येथे बिबट्याने ऊसतोड मुजराच्या मुलाचा प्राण घेतला होता. तसाच हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

राज धनंजय देवकर (वय 5) रा. किरपे ता. कराड असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लहान मुलाचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून व वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, किरपे येथील शेतकरी धनंजय देवकर व त्यांचा मुलगा राज देवकर हे गुरुवारी सायंकाळी  त्यांच्या शेतात काम करत होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास धनंजय देवकर हे शेतीचे काम उरकून घरी जाण्यासाठी निघाले. दरम्यान, त्यांनी शेती अवजारांची आवराआवर सुरू केली. साहित्य (कैची) पिशवीत भरून ठेवताना त्यांचा लहान मुलगा राज धनंजय देवकर (वय ५) हा त्यांना मदत करत होता. तो खाली वाकून अवजार उचलून देत असताना बाजूच्या शेतातून बिबट्याने अचानक राज देवकर याच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्याच्या मानेला पकडून ओढून त्याला शेतात जाण्याचा प्रयत्न केला. 
यावेळी राजचे वडील धनंजय देवकर यांनी प्रसंगवधान दाखवत अतिशय धैर्याने आपल्या मुलाचे पाय पकडून त्याला बिबट्याच्या तोंडातून सोडविण्यासाठी ओढू लागले. तसेेच मदतीसाठी त्यांनी आरडा-ओरडाही केला. या झटापटीत शेतालगत असलेल्या तारेचे कुपनाला बिबट्या धडकल्याने त्याला मुलाला उसाच्या शेतात ओढून न्हेता आले नाही. त्यामुळे बिबट्या त्या मुलाला तेथेच सोडले. ही संधी पाहून तात्काळ धनंजय देवकर यांनी त्यांच्या मुलाला उचलून घेतले. त्यानंतर बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली.  
सुदैवाने या घटनेत लहान मुलगा राज देवकर याचे प्राण वाचवण्यात त्याचे वडील धनंजय देवकर यांना यश आले. परंतु, या हल्ल्यात राज देवकर याच्या मानेला व कानाला बिबट्याचे दोन दात जोरात लागले आहेत. तसेच त्याच्या पाठीवर व पायावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यानंतर धनंजय देवकर व ग्रामस्थांनी त्याला तात्काळ उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलवले आहे. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात 1533 बाधीत,973 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1533 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 973 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 18 कराड 338 खंडाळा 82 खटाव 113 कोरेगांव 88 माण 52 महाबळेश्वर 31 पाटण 61 फलटण 172 सातारा 460 वाई 76  व इतर 27 आणि नंतरचे वाढीव 15 असे  आज अखेर एकूण 1533 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 973 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.