Sunday, April 9, 2023

अयोध्येत राम मंदिराला जेवढे सागवान लागेल ते महाराष्ट्र देणार ; मुख्यमंत्री शिंदे यांनी केली घोषणा

वेध माझा ऑनलाइन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार, मंत्र्यांसह नियोजित  अयोध्या दौऱ्यासाठी शनिवारी विशेष विमानाने लखनौमध्ये दाखल झाले.  यावेळी त्यांचे लखनाै विमानतळावर ढाेल-ताशांच्या गजरात स्वागत भव्य स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना माेठा हार आणि गदा देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान राम मंदिराला जेवढे सागवान लागेल ते सर्व महाराष्ट्र राज्य देणार अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी यावेळी केली 

ते म्हणाले लखनऊ ते अयोध्या दरम्यानचा पूर्ण परिसर भगवामय झाला आहे. राममय झाला आहे. सर्व रामभक्त अयोध्येत आले आहेत. रवी राणा इथली माती घेऊन जाणार आहेत. तिथे ११४ फुटी हणुमानाची मूर्ती उभारली जाणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. माझे जे स्वागत झाले त्याबद्दल मी आभार मानतो बाळासाहेब ठाकरे, करोडो रामभक्तांचे स्वप्न होते, राम मंदिराचे निर्माण व्हावे. मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे सर्व खोटे ठरविले. मोदींनी त्यांच्याच काळात मंदिराचे काम सुरु केले आहे. तारीखही सांगितली आहे. जे विचारत होते त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले दरम्यान राम मंदिराला जेवढे सागवान लागेल ते महाराष्ट्र देणार अशी घोषणाही एकनाथ शिंदेंनी यावेळी केली 

ते पुढे म्हणाले हनुमान चालिसा वाचणाऱ्याना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकले होते. हे पाप करणारे रावण की राम आहेत, हे तुम्हीच सांगा. साधुंचे हत्याकांड झाले तेव्हा हे चुप बसलेले. आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही. आम्ही त्यांचे रक्षण करणार. महाराष्ट्रात आता प्रभू रामांच्या आशिर्वादाने बनलेले सरकार काम करणार आहे, असा मी विश्वास देतो असेही एकनाथ शिंदे म्हणाले

आज 24 जण सापडले कोरोना पॉझिटिव्ह ; सातारा जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या झाली 107 ...

वेध माझा ऑनलाइन - आज सातारा जिल्ह्यात कोरोनाची रुग्णवाढ आढळून आली आहे जिल्हा आरोग्य यंत्रणेने आज 24 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यात एकूण 107 एवढी सक्रिय कोरोना रुग्ण संख्या झाली आहे

Saturday, April 8, 2023

विलासकाकांच्या पश्चात ही निवडणूक होत आहे ; व्यक्तिगत स्वार्थासाठी प्रस्थापित लोकं सर्वसामान्यांच्या हक्कावर टाच आणत आहेत,त्यांचे अतिक्रमण थोपवा ; ऍड उदयसिंह पाटील

वेध माझा ऑनलाइन - विलासकाकांच्या पश्चात ही निवडणूक होत असून, संघटनेच्या माध्यमातून आपण सभासदांसमोर जाणार आहोत. समविचारी लोकांची मोट बांधून ही निवडणूक लढवली जाईल. व्यक्तिगत स्वार्थासाठी प्रस्थापित लोकं सर्वसामान्यांच्या हक्कावर टाच आणत आहेत. समाजावरील अतिक्रमण थोपवणे गरजेचे आहे. तसेच पुरोगामी विचारांची पाठराखण व्हावी हेही तितकेच गरजेचे असल्याचे स्पष्ट मत ऍड उदयसिह पाटील यांनी आज रयत संघटनेच्या वतीने पाचवड फाटा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केलं

ते म्हणाले, विलासकाकांनी सर्वसामान्यांना ताकद देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. मध्यंतरी सत्तेत आलेल्या मंडळींनी बाजार समितीवर सुमारे पन्नास कोटी रुपये कर्ज केले. पण काकांनी पुन्हा बाजार समितीची सत्ता घेतली. आणि आज हीच बाजार समिती आता तीन कोटी रुपयांची ठेव बाळगून आहे. आता त्याच मंडळींना सत्ता हवी आहे. विरोधी एकत्र आलेल्या मंडळींनी त्यांचा मूळ विचार बाजूला ठेवला आहे. विरोधकांना लोकांना गुलाम करून स्वतःची सत्ता राखण्यासाठी बाजार समितीची सत्ता हवी आहे.

ते म्हणाले रयत सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त झाला आहे. हे विलासकाकांच्या मार्गदर्शनाखाली घडले. याच कारखान्याच्या विस्तारवाढीला विरोधकांनी अडथळा आणला आहे. काकांनी सर्वसामान्यांना सत्ता दिली. हेच सूत्र घेवून बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही उमेदवार उभे केले आहेत. वैचारिक परिवर्तन घडवण्याची गरज ओळखून सर्वजण एकत्र काम करणे गरजेचे आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बाजार समिती स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झाली. राज्यात सक्षम असणारी ही संस्था आहे. विलास काकांनी ही संस्था जोपासली आणि वाढवली.

यावेळी बाजार समितीवर बिनविरोध निवडून आलेल्या गणपत पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अशोकराव पाटील, जयवंतराव जगताप, प्रा. धनाजी काटकर, अजितराव पाटील - चिखलीकर, भानुदास माळी यांचे भाषणे झाली. अशोकराव पाटील - पोतलेकर यांनी आभार मानले


सत्तासंघर्षाचा निकाल कधीही लागू शकतो ; राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकासआघाडीमध्ये असतानाही घेतल्या तीन वेगळ्या भूमिका ; राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धक्कातंत्र पाहायला मिळणार का? चर्चा सुरू

वेध माझा ऑनलाइन  -2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात रोजच नवीन वळणं येताना दिसत आहेत, त्यातच आता मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजाकारणातल्या घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही लागू शकतो, त्यातच वेगवान घडामोडी घडत असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत, आणि या चर्चांच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका मांडली. त्याचवेळी अजित पवारांनी त्यांचे दोन दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द केले. एवढच नाही तर अजितदादांनी त्यांचा कॉनव्हॉय आणि स्टाफही सोडला आणि ते खासगी वाहनातून निघून गेले.
अजित पवार नेमके कुठे गेले? अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले का? अशा चर्चा सुरू झालेल्या असतानाच अजित पवार आज सकाळी माध्यमांसमोर आले. आपली तब्येत बरी नसल्यामुळे कार्यक्रम रद्द केल्याचं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीच्या मनात काय?
एकीकडे महाविकासआघाडीच्या माध्यमातून राज्यभरात वज्रमूठ सभांचं आयोजन करण्यात येत आहे, पण मागच्या काही दिवसांमध्ये फक्त हिडेनबर्ग रिपोर्ट नाही, तर सावरकर मुद्दा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीचा वाद, यावरून राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेतली आहे.

सावरकरांच्या मुद्द्यावरून तर शरद पवारांनी राहुल गांधी यांच्यासमोरच दिल्लीतल्या विरोधकांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे पंतप्रधानांच्या डिग्रीचा वाद सुरू असतानाच अजित पवारांनी मात्र पदवीचा मुद्दा महत्त्वाचा नसल्याची प्रतिक्रिया दिली. 2014 साली जनतेने मोदींना त्यांची पदवी पाहून मतदान केलं नव्हतं, असं अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही येण्याची शक्यता आहे, तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकासआघाडीमध्ये असतानाही घेतलेल्या या तीन वेगळ्या भूमिका यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धक्कातंत्र पाहायला मिळणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.




Friday, April 7, 2023

कराड शहरातील शिवजयंती विविध उपक्रमांनी होणार साजरी ; शिवजयंतीच्या निमित्ताने होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना तसेच दरबार मिरवणुकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहा ; विक्रम पावसकरांचे कराडकरांना आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन - प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी शहरातील शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी होणार असल्याची माहिती हिंदु एकता आंदोलनाचे सातारा जिल्ह्याध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली शिवजयंती निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती देखील त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली 

ते म्हणाले, येत्या 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता प्रीतिसंगम कृष्णा घाट येथे प्रखर हिंदुत्ववादी वक्ते व अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान होणार आहे 
21 एप्रिलला शहरातील चावडी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल 22 एप्रिल रोजी शहर व तालुक्यातील मंडळांच्या शिवछत्रपतींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल याच दिवशी सायंकाळी 4 वाजता महिलांची टू व्हीलरची रॅली येथील शिवाजी हौसिंग सोसायटीतून निघेल आणि कृष्णा घाट येथे या रॅलीची सांगता होईल नंतर त्याठिकाणी छत्रपतींची महाआरती होईल 
दिनाक 23 रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपतींची भव्य दरबार मिरवणूक पार पडणार आहे या मिरवणूकीची सुरुवात येथील पंढरीचा मारुती चौकातून होईल आणि दत्त चौक येथे या भव्य मिरवणुकीची सांगता होईल 
शिवजयंती निमित्त होणाऱ्या सर्वच कार्यक्रमांना तसेच दरबार मिरवणुकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन देखील विक्रम पावसकर यांनी यावेळी केले

माजी नगरसेवक अण्णा पावसकर तसेच रुपेश मुळे अजय पावसकर  चंद्रकांत जिरंगे कलबुर्गी काका यांच्यासह हिंदू एकताचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

आज 30 नवीन कोरोना रुग्ण आढळले ; सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स ;

वेध माझा ऑनलाइन - आज सातारा जिल्ह्यात कोरोनाची रुग्णवाढ आढळून आली आहे जिल्हा आरोग्य यंत्रणेने आज 30 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यात एकूण 93 एवढी सक्रिय कोरोना रुग्ण संख्या झाली आहे

Thursday, April 6, 2023

वीर सावरकर गौरव यात्रेचे कराडमध्ये उत्साहात स्वागत

वेध माझा ऑनलाइन -  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला उजाळा मिळावा आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्यावतीने राज्यभर वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेचे कराड येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.
कराड येथील दत्त चौक, आझाद चौक, मंडई मार्गे ही यात्रा यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे पोहचली. 'मी सावरकर' अशा टोप्या घातलेले युवक व महिला कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. याठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते आणि गौरव यात्रेचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रम पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच भाजपचा ४३ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. 
याप्रसंगी झालेल्या सभेत बोलताना डॉ. भोसले म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेले योगदान कदापि विसरता येणार नाही. इंग्रजांच्या राजवटीत देशातील लोकांवर कसा अन्याय होतोय, हे सावरकरांनी आपल्या साहित्यातून मांडले आहे. त्यांच्या साहित्यावर इंग्रजांनी बंदी आणली, पण सावरकर डगमगले नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रसंगी परदेशातूनही लढा उभारला. देशात हिंदुत्ववादी विचार रुजविण्यासाठी त्यांनी आपले अखंड आयुष्य अर्पिले. अशा स्वातंत्र्यवीरांचा अपमान होत असताना, संपूर्ण देश त्यांच्या विचारांसोबत आहे हे दाखविण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल चुकीची विधाने करून स्वतःची उंची कमी करून घेतली आहे.
विक्रम पावसकर म्हणाले, भारत हिंदूराष्ट्र व्हावे तसेच हिंदू जातीतील सर्व समाज हिंदू म्हणून एकत्र यावेत हा प्रयत्न वीर सावरकर करत होते. भविष्यात आपण त्यांच्या विचाराने चाललो नाही तर या देशात अल्पसंख्य व्हायला वेळ लागणार नाही. जवळपास ते ८३ वर्षे जगले, पण शेवटपर्यंत त्यांनी कधीही हिंदुत्वाशी तडजोड केली नाही. भविष्यात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायचा झाल्यास २०२४ ला भाजपालाच पुन्हा पूर्ण ताकदीनिशी निवडून आणण्याची गरज आहे.

यावेळी योगेश सोमण लिखित 'वीर सावरकरांचा मृत्यूशी संवाद' या नाटकाचे अभिवाचन नरेंद्र आमले व उमेश घळसाशी यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक सुहास जगताप, घनश्याम पेंढारकर, मुकुंद चरेगावकर, सुदर्शन पाटसकर, प्रशांत कुलकर्णी, प्रमोद शिंदे, शैलेंद्र गोंदकर, विश्वनाथ उटाणे, सौरभ शहा, अण्णासो काशीद यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.