Saturday, August 26, 2023

शुक्र या ग्रहावर एलियन असल्याची शक्यता ; नासा शास्त्रज्ञाच्या दाव्याने खळबळ ;

वेध माझा ऑनलाईन।  आपल्या मनात एलियन बद्दल अनेक प्रकारचे प्रश्न देखील निर्माण होतात.
एलियन या विषयावर भरपूर चित्रपट देखील बनले आहेत. एलियन हा विषय आपल्यासाठी नेहमीच कुतूहलाचा राहिलेला आहे. आणि
आता अशातच नेशनल एयरोनॉटिक्स एंड स्पेस एडमिनिस्ट्रेशन च्या एका वैज्ञानिकाने असा दावा केला आहे की, सौलर सिस्टममध्ये एलियनचे अस्तित्व असून शुक्र या ग्रहावर एलियन असल्याची शक्यता आहे.

डेलीमेल च्या रिपोर्टनुसार हा दावा नासाचे वैज्ञानिक डॉक्टर मिशेल थेलर यांनी केला आहे. डॉक्टर थेलर हे अमेरिकेतील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर येथे एक रिसर्च साइंटिस्ट आहेत. मोठ्या मजबुतीने केलेल्या ह्या दाव्यात डॉक्टर थेलर म्हणतात की, शुक्र ग्रहावर कार्बन डाइऑक्साइड ने भरलेल्या वातावरणात जीवनाचे संभावित संकेत मिळाले आहेत. कुठेतरी एलियन नक्कीच अस्तित्वात आहेत असे देखील त्यांनी सांगितले. शुक्र या ग्रहावर 475°C (900°F) तापमान आहे. एलियन असल्याचा दावा करणारे डॉक्टर थेलर इंटरव्यूमध्ये म्हणाले की, शुक्राच्या वातावरणात जीवनाचे संभावित संकेत दिसून येतात. याचबरोबर डॉक्टर असेही म्हणाले की, शुक्राचे वातावरण पाहून असे दिसून येते की , जसे हे बैक्टीरिया द्वारा निर्मित आहे.
शुक्र हा पृथ्वीच्या समान आकार आणि द्रव्यमान ग्रह आहे. म्हणूनच त्याला अनेकदा पृथ्वीचा जुळा ग्रह असे देखील म्हटले जाते. शुक्र ग्रहाचा आकार पृथ्वी सारखा असला तरीही शुक्र ग्रहावरचे वातावरण आणि पृथ्वीवरचे वातावरण दोघांमध्ये प्रचंड फरक आहे. शुक्राचे तापमान 867°F (464°C) असून , दबाव पृथ्वीपेक्षा 92 पट अधिक आहे. शुक्राच्या वातावरणात ९६ टक्के कार्बन डाइऑक्साइड आहे. शुक्र या ग्रहाबद्दल विशेषबाब म्हणजे हा ग्रह सल्फ्यूरिक एसिड असलेल्या ढगांनी घेरलेला आहे. यामुळे शुक्राचे पृष्ठभाग पाहणे अशक्य आहे. यामुळेच ऍस्ट्रोनॉमर्स यांचा म्हणणं आहे की शुक्र ग्रहावर मनुष्यांचा अस्तित्व असणे अशक्य असून शुक्र हा ग्रह सौर मंडळातील सर्वात गरम ग्रह आहे. शुक्र ग्रहावरील तापमानामध्ये काच देखील विरघळू शकते. त्यामुळे डॉक्टर मिशेल थेलर यांनी केलेला दावा किती खरा आणि किती खोटा हे समजणे कठीण आहे.

Friday, August 25, 2023

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांची कराड सिटी सोसायटीस सदिच्छा भेट ; चेअरमन झाकीर पठाण यांनी केले स्वागत ...


वेध माझा ऑनलाइन। दि. कराड सिटी को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड कराड या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार नितीन राऊत यांचे सुपुत्र तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी संस्थेच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. संस्थेतर्फे चेअरमन झाकीर पठाण यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदयभानू चीब, सहप्रभारी एहसान खान, महासचिव श्रीनिवास नालेमवार, प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड, सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरजीत कांबळे, कराडचे  माजी नगरसेवक विजय मुठेकर, सुहास पवार यांनी संस्थेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक सभासद, ठेवीदार, खातेदार यांनीही संस्थेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
 
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन झाकिर पठाण, व्हाईस चेअरमन इजाज पटेल, संचालक रियाज मुल्ला, श्रीकांत मुळे, तेजस जाधव, अन्सार कच्छी, अबिद आली काझी, नासिम पठाण, विद्याताई थोरवडे, नाजमीन पठाण, उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत व्हाइस चेअरमन इजाज पटेल यांनी केले तर आभार सेक्रेटरी शेरखान पठाण यांनी मानले.कार्यक्रम पार पाडण्यासाठी  उप सेक्रेटरी नंदकुमार संकपाळ, शाखा प्रमुख मुकुंद वीर, कु. श्वेता देसाई, शबिता शेख, अपूर्वा फकीर अन्वर यांनी परिश्रम घेतले.

साताऱ्याजवळ टायर फुटून अपघात ; एकाच कुटुंबातील 3 जण ठार ;

वेध माझा ऑनलाइन।  पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या तवेरा गाडीचा साताऱ्याजवळ टायर फुटल्याने भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 3 जण ठार झाल्याची घटना घडली. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट नजीक आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवी मुंबईहून जयसिंगपूर कडे निघालेल्या तवेरा गाडीचा अचानक टायर फुटल्याने तवेरा गाडी समोर कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या बोलेरो पिकअपला धडकली.

मृतांमध्ये निखिल श्रीकांत सवाखंडे (वय- 30), प्रियांका निखिल सवाखंडे (वय- 32), शशिकांत यदुनाथ सव्वाखंडे (वय-63) यांचा समावेश आहे. तर इतर जखमींवर जिल्हा शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे सर्व राहणार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत.
अपघात एवढा मोठा भीषण होता की यामध्ये तवेरा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून घटनास्थळावरून अपघातग्रस्त गाड्या हटवल्या आहेत. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे

कोयनानगरजवळ भीषण अपघात ; दोन तरूण जागीच ठार ; एक तरूण गंभीर

वेध माझा ऑनलाईन। कोयनानगरजवळ शुक्रवारी रात्री आयशर- दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन तरूण जागीच ठार झाले असून एक तरूण गंभीररित्या जखमी झाला आहे. धीरज बनसोडे, प्रणय कांबळे, अशी मृतांची नावे आहेत. दुचाकी चालक प्रसाद कदम हा तरूण गंभीर जखमी असून त्याच्यावर पाटण ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोयनानगरनजीकच्या गोषटवाडी गावच्या हद्दीत एका धोकादायक वळणावर आयशर टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. वाहनांची धडक होताच दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यात दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच कोयनानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी तरूणाला तातडीने पाटण ग्रामीण रूग्णालयात उपचारसाठी दाखल केले. अपघातानंतर तरूणांच्या नातेवाईक, मित्रमंडळींनी पाटण ग्रामीण रूग्णालयात मोठी गर्दी केली होती.


पक्षाच्या विरोधात जाऊन मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्यावर कारवाई करावी ; शरद पवार गटाकडून मागणी ;

वेध माझा ऑनलाईन।  राष्ट्रवादीतील ज्या नऊ आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मंत्रीपदाची शपथ घेतली, आणि ज्या दोन खासदारांनी त्यांना साथ दिली त्यांच्यावर आता कारवाई करावी अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून विधिमंडळाचे अध्यक्ष आणि लोकसभेच्या सभापतींना देण्यात आलं आहे.

अनुसूची 10 प्रमाणे नऊ आमदार आणि दोन खासदारांवरती अपात्रतेची कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. पण त्यांना दिलेल्या नोटिसीला अद्याप उत्तर दिलेलं नाही.

पक्षाच्या वतीने अजित पवार गटाने शरद पवार गटाला एक नोटिस पाठवली होती. त्यावर अद्याप शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आलं नाही. पण यासाठी किती कालावधी लागू शकतो याची कल्पना नाही, त्यामुळे या आमदारांवर कारवाई सुरू करा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.

अजित पवार राष्ट्रवादीत परत येणार ; मोठ्या नेत्याने केला दावा ;

वेध माझा ऑनलाईन। शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फूट नसल्याचे वक्तव्य केल्यानं राजकारणात चर्चेला उधान आलं आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली असून अजित पवार राष्ट्रवादीत परत येणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मन वळवण्यात शरद पवार यशस्वी झाल्याचं शरद पवार यांच्या एकूणच वक्तव्यावरून दिसून येतं. त्यामुळे अजित पवार स्वगृही परततील असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. महाविकास आघाडीत शरद पवारांबाबत कोणताही संभ्रम नसल्याचेही पटोले म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.जे पक्ष भाजपाविरोधात लढायला येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. 

आम्ही महायुती सोबतच : 
सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधारे आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आम्ही निवडणूक आयोगालाही तसे कळवलं आहे. आमच्या दृष्टीनं कोणताही गोंधळ नाही. आम्ही एनडीएच्या बैठकीला गेलो होतो. अजित पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. आम्ही बीडमध्ये सभा घेत आहोत. निवडणुकीला अजून सात ते आठ महिने आहेत. आम्ही महायुतीत निवडणुका लढवणार असून राज्यात वेगळे निकाल पाहायला मिळतील, असा विश्वास अजित पवार गटाचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
पवार काय म्हणाले ते ऐकलं नाही. सुप्रिया काय म्हणाल्या ते ऐकलं. एकीकडे 9 मंत्र्यांवर कारवाई होणार, असं शरद पवार गटाने म्हटलं आहे. तर दुसरीकडे आमचेच नेते असल्याचं ते सांगतात. हा विरोधाभास आहे. काँग्रेसचे महान नेते काय म्हणाले ते मला माहीत नाही. काँग्रेसने आपले घर सांभाळावे.असंही तटकरे यांनी म्हटलं आहे.
वेध माझा ऑनलाईन । जी.के. गुजर मेमोरीयल चॅरीटेबल ट्रस्टच्या डॉ. अशोक गुजर इन्स्टिट्यूटस ऑफ फार्मसी B Pharmacy महाविद्यालयाला सन 2023-24 पासुन फार्मसी कौन्सील ऑफ इंडियाने 60 जागेसाठी मान्यता दिली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक गुजर यांनी दिली.

बी फार्मसीची केंद्रीभुत प्रवेश प्रक्रीया सुरु असुन प्रवेश फेरीच्या प्रक्रीयेच्या तिस-या फेरीमध्ये महाविद्यालयाचे नाव दाखल झाले असुन परिसरातील फार्मसी करण्या-या विदयार्थ्यानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या सचीव डॉ. माधुरी गुजर यांनी केले. अदयावत प्रयोगशाळा उच्चविद्याविभूषित प्राचार्य, शिक्षक वर्ग, परिपुर्ण भौतिक सुविधासह वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. संस्थेने मागील 15 वर्षापासून दर्जेदार शिक्षणाची परंपरा ही दौलतराव आहेर अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या रुपाने जपली आहे.सातारा जिल्हयातील तसेच जिल्हयाबाहेरील हजारो विदयार्थी उच्च शिक्षण घेऊन नामंकीत कंपन्यात नोकरी करत आहेत.

नव्याने विकसीत होत असलेल्या बी फार्मसी चालु शैक्षणीक वर्षासाठी प्रवेश प्रक्रीया राबविली जाणार असुन सीईटी दिलेल्या विदयार्थांनी संर्पक साधण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष इंद्रजीत गुजर यांनी केले. (महाविद्यालयाचा कोड नं. 16112) असा आहे.