Tuesday, August 27, 2024

मदन भोसले माझे राजकीय विरोधकच... शरद पवार यांच्या पक्षात जरी ते गेले... तरी मला काहीच फरक पडणार नाही; आमदार मकरंद पाटील यांचे कराडात विधान ; त्यांचे बंधु खासदार नितिन पाटील यानी घेतले स्व चव्हाण साहेबांच्या समाधिचे दर्शन ;

वेध माझा ऑनलाइन ।
मदन भोसले हे माझे राजकीय विरोधकच आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात ते जरी गेले तरी मला काहीच फरक पड़त नाही माझी विचारधारा पककी आहे...माझां पक्ष आणि चिन्ह देखील ठरल आहे... माझा मतदारसंघ मी विकासाच्या जोरावर बांधला आहे... त्यामुळे भोसले कुठे गेले तरी मला काहीच फरक पडणार नाही असे स्पष्ट विधान आमदार मकरंद पाटील यानी आज कराडमध्ये केले

राष्ट्रवादी चे नेते जयंत पाटील यानी काही दिवसांपूर्वी भुइंज मध्ये जाऊन माजी आमदार व भाजपा नेते मदन भोसले यांची भेट घेवून जिल्ह्यात खलबल उडवून दिली होती त्यान्तर मदन भोसले शरद पवार यांच्या पक्षात जाणार असे बोलले जावू लागले आहे त्या पार्श्वभूमिवर आ मकरंद पाटील यांनी वरील विधान केले

दरम्यान आ मकरंद आबा यांचे बन्धु नितिन पाटील हे राज्यसभेचे खासदार झाल्यानतर ते आज यशंवतराव चव्हाण समाधीस्थळी दर्शनासाठी आले असता त्यानीही माध्यमाशी संवाद साधला... त्यावेळी त्यानी फक्त अजितदादांचे कौतुक करण्यापलीकडे काहीच भाष्य केले नाही... खासदार म्हणून जिल्ह्यासाठी तुमचे व्हिजन क़ाय असेल... असे पत्रकारानी विचारले असता...त्याचे काहीच उत्तर न देता त्यांनी काढता पाय घेतला...त्यामुळे पत्रकारांनी आश्चर्य व्यक्त केले...

दरम्यान यावेळी आ मकरंद पाटील यांना,... तुम्ही अजित पवार गटात थोड़ा लेट प्रवेश केलात...असे विचारले असता... ते म्हणाले एवढा मोठा निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विचारुन हा निर्णय मला घ्यायचा होता म्हणून मी दादाना विचार करायला थोड़ा वेळही मागितला होता... 
उदयनराजे याना आपल्या मतदार संघात इतर मतदारसंघाच्या तुलनेत कमी मताधिक्य मिळाले...यावर बोलताना ते म्हणाले...माझ्या मतदार संघात राष्ट्रवादी तसेच शरद पवार आणि अजित पवार यांचाच गजर आम्ही करत होतो... त्यामुळे लोकांना त्यातून वेगवेगळा विचार करत बाहेर पड़ण्यासाठी थोड़ा वेळ गेला... त्यामुळे लिडमध्ये फरक पडला असेल असे ते म्हणाले...

Monday, August 26, 2024

तिढा सुटेना ;" त्या ' 16 जागांवर महाविकास आघाड़ीच्या तीनही पक्षांचा दावा ; क़ाय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. पुढच्या दोन महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीमधील प्रत्येक पक्षाला सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे जागावाटपात आपल्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या जागावाटपासाठी बैठकादेखील सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडीची नुकतीच काही दिवासांपूर्वी मुंबईतील जागांच्या वाटपासाठी बैठक पार पडलेली. त्यानंतर आज पुन्हा बैठक पार पडली. या बैठकीत 16 जागांवर महाविकास आघाडीच्या पक्षांचं एकमत होताना दिसत नाही.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईतील बीकेसी येथे असणाऱ्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील जागावाटपावर चर्चा झाली. विशेष म्हणजे मुंबईतील जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आजची दुसरी बैठक होती. पण या बैठकीतही सर्व जागांवर तोडगा निघाला नाही, अशी माहिती मिळत आहे. मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. यापैकी सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न असणार आहे. कारण ठाकरे गटाचा मुंबई हा बालेकिल्ला आहे. तर काँग्रेसदेखील जास्तीत जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटालाही काही जागा हव्या आहे

आज महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत आज अतिशय महत्त्वाची बैठक आज पार पडली अशी माहिती मिळाली आहे. या बैठकीत मुंबईतील जागांच्या वाटपाबाबत चर्चा झाली. पण मुंबईतील जागावाटप संदर्भात अजूनही अंतिम निर्णय झाला नाही. कारण तीनही पक्षांचं जागावाटपाबाबत एकमत होताना दिसत नाहीय. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी जिंकलेल्या जागा सोडून इतर 16 जागांवर अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात चर्चा सुरू आहेत.

राज्यातील महायुतीचे दिगग्ज नेते लागले शरद पवारांच्या गळाला?

वेध माझा ऑनलाईन।
राज्यात अवघ्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुक होणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तयारीला सुरवात केली आहे. अशातच आता राज्यातील अनेक बडे नेते महाविकास आघाडीकडे वळू लागले आहेत. यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रशांत परिचारक यांसह अनेक नेत्यांच्या पडद्याआडून चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे.


राज्यातील लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असलेले अनेक राजकीय नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . यामध्ये अकलूज येथील रणजितसिंह मोहिते पाटील , पंढरपूर येथील प्रशांत परिचारक , इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील , पुण्यातील बापू पठारे, भुईंज येथील मदन भोसले याशिवाय कागल येथील समरजित घाटगे या प्रमुख नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पडद्याआडून चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन केलं. कारण लोकसभा निवडणुकांमध्ये फायदा होईल असे त्यांना वाटले होते. मात्र त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील महायुतीमध्ये समावेश केला. गेले कित्येक वर्ष कट्टर विरोधक राहिलेल्या नेत्यांची अनेक मतदारसंघात लोकसभेसाठी मोट बांधण्यात होती . पण आता येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महायुती सरकारमधील अनेक दिग्गज नेते पुन्हा महविकास आघाडीकडे परतण्याच्या तयारीत आहेत असे समजते.

कराड दक्षिणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी साथ द्या : डॉ. अतुल भोसले ; कराड दक्षिणमधील मुंबईस्थित रहिवाशांचा मेळावा उदंड उत्साहात संपन्न; भरपावसात मुंबईकरांची प्रचंड गर्दी

वेध माझा ऑनलाईन।
भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये विविध विकासकामांसाठी गेल्या अडीच वर्षांत तब्बल ७०० कोटींहून अधिक विकासनिधी आणला आहे. या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली असून, बहुतांशी प्रगतीपथावर आहेत. येत्या काळात कराड दक्षिणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी कटीबद्ध असून, यासाठी आपण सर्वांनी भक्कम साथ द्यावी. येत्या काळात आपल्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असून; तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी दिली. कराड दक्षिणमधील मुंबईस्थित रहिवाशांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. 

भाजपा कराड दक्षिणच्यावतीने नवी मुंबईतील गुजरात भवन सभागृहात कराड दक्षिणमधील मुंबईस्थित रहिवाशांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन मेळाव्याचे उद्‌घाटन करण्यात आले. या मेळाव्याला भरपावसाही मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली होती.

याप्रसंगी मुंबईस्थित रहिवाशांशी संवाद साधताना डॉ. भोसले म्हणाले, अनेक वर्षांपूर्वी कामाच्या शोधात आपल्या भागातील अनेक ग्रामस्थ मुंबईला आले. त्याकाळी कुणाचेही पाठबळ नसताना त्यांनी मुंबईत कष्टाने जीवन जगून, स्वत:ची ओळख निर्माण केली. आपल्या या कष्टाळू वृत्तीला माझा सलाम आहे. मुंबईत स्थायिक झाला तरी आपण आपली गावाकडची नाळ तुटू दिलेली नाही. किंबहुना गावाकडच्या प्रत्येक अडचणीच्या काळात तुम्ही मदतीसाठी सदैव पुढे असता, ही दानशूरतेची भावना अतिशय मोलाची आहे. 

भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात जवळपास ७०० कोटींचा विकास निधी आला आहे. दक्षिणमधील २२७ किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांसाठी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ४५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तसेच वाकुर्डे योजनेसाठी सरकारला कायमस्वरुपी धोरण ठरविण्यासाठी भाग पाडून, कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून नियमित थकीत रक्कम भरण्याची व्यवस्था केल्याने त्याचा आपल्या भागातील लोकांना मोठा लाभ होत आहे.  

कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून आपल्या भागातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. येत्या काळातही हा प्रयत्न कायम ठेऊन; महिला, ज्येष्ठ नागरिक, युवकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्या सर्वांनी मला भक्कम पाठबळ द्यावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले. 

नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सदस्य संपतराव शेवाळे म्हणाले, डॉ. अतुलबाबांनी कराड दक्षिणमधील गावागावात शासनाच्या माध्यमातून मोठा निधी आणून अनेक विकासकामे साकारली आहेत. शासनाच्या अनेक योजनांचा लाभ देण्यासाठी ते आपल्या भागात गावोगावी शिबीरे घेत आहेत. त्यामुळे अशा कार्यक्षम नेतृत्वाला यंदा विधानसभेत संधी देण्याची गरज आहे. तेव्हा आता डॉ. अतुलबाबांना आमदार करण्यासाठी आपण सर्व मुंबईकरांनी मनाशी खूणगाठ बांधून पूर्ण तयारीनिशी कामाला लागावे. 

यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, म्हारुगडेवाडीचे उपसरपंच अजित म्हारुगडे, जगन्नाथ म्हारुगडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, संदीप देसाई, सुरेश वाघमारे, जयवंत माटेकर यांची भाषणे झाली. 

कार्यक्रमाला ज्येष्ठ उद्योजक पोपटराव पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक बबनराव शिंदे, भाजपाचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, पांडुरंग शेटे, मोनहराव नायकवडी, प्रकाश ताटे, राजेंद्र शेवाळे, विक्रम रेपाळ, किसनराव जाधव, एकनाथ कुंभार, चंद्रकांत बांदेकर, सुनील चाळके, अरविंद शेवाळे, गणेश चाळके, जगन्नाथ म्हारुगडे, सचिन देसाई, अमोल चव्हाण, रुपेश भावके, बाजीराव खबाले, मारुती शिंगण, संदीप दबडे, रघुनाथ करमळकर, सचिन जाधव, सुरेश माटेकर, विशाल थोरात, सचिन मोहिते, पैलवान उदय शेवाळे, शिवाजी येळवे, शेळकेवाडीच्या सपरंच सुनंदा शेळके यांच्यासह विविध मान्यवर व मुंबईस्थित रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय शेवाळे यांनी प्रास्तविक केले. पंकज पाटील यांनी आभार मानले

विविध मान्यवरांचा भाजपात जाहीर प्रवेश
या कार्यक्रमात नवी मुंबईतील उद्योजक किसन जाधव (येणपे), म्हासोलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल चव्हाण, भरेवाडीचे सरपंच प्रकाश पवार, धोंडीराम काळुगडे (भरेवाडी), किशोर काळुगडे (भरेवाडी), येणपे गावचे उपसरपंच सुहास सूर्यवंशी, पोपट शेवाळे (येवती), राहुल माने, मारुती शिंगण (शिंगणवाडी) यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. डॉ. अतुल भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.

Sunday, August 25, 2024

कल्याण पूर्वेमध्ये पुन्हा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; या घटना थांबणार कधी...?

वेध माझा ऑनलाइन।
बदलापूरच्या घटनेनंतर 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे 
मानपाडा पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या प्रवीण पाटील नावाच्या आरोपीला नाशिक मधून बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणाला दोन दिवस ही उलटले नाही याआधीच आज पुन्हा घरासमोर खेळणाऱ्या एक 10 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धर्मेंद्र यादव असे या आरोपीचे नाव असून मानपाडा पोलिसांनी याला कल्याण न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याण पूर्वेच्या आडीवली परिसरातील आहे. पीडित मुलगी काही मुलांसोबत खेळत असताना एका मुलाच्या घरात गेली. त्या मुलाच्या वडिलांनी तिला आपल्याजवळ बोलावून घेतल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाचा खुलासा मुलीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर झाला, आणि त्यांनी तातडीने मानपाडा पोलीस ठाणे गाठले. जिथे पोलिसांनी गुन्हा दाखल करत मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने आणि पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू झाला. पोलिसांनी तत्काळ आरोपी धर्मेंद्र यादव याला अटक केली आहे. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

महाराष्ट्र सरकारचा पेन्शन योजनेबाबत मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार

वेध माझा ऑनलाइन ।
राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना १ मार्च, २०२४ पासून लागू करण्यात येणार आहे. ही योजना मार्च २०२४ पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (यूपीए) लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

ही योजना मार्च २०२४ पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्विकारावी हे समितीच्या शिफारशीतले तत्व मान्य करुन राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या ५०% इतके निवृत्तिवेतन आणि त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्तिवेतनाच्या ६०% इतके कुटुंब निवृत्तिवेतन आणि त्यावरील महागाई वाढ मिळेल.केंद्र सरकारने यूनिफाईड पेन्शन स्कीमची (यूपीए) घोषणा काल केली होती. यानंतर राज्य सरकारने देखील राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी या योजनेची घोषणा केली आहे. केंद्राने ही योजना कर्मचाऱ्यांना लागू केल्यानंतर महाराष्ट्र आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू करणारं पहिलं राज्य ठरलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

दरम्यान राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना १ मार्च, २०२४ पासून लागू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या आणि १ मार्च, २०२४ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्तीपश्चात वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते २९ फेब्रुवारी, २०२४ पर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वार्षिकी मधीलच लाभ लागू राहतील. १ मार्च, २०२४ पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्तिवेतनधारकास या योजनेंतर्गत निवृत्तिवेतन देण्यात येईल.


आज जयंत पाटील यांनी भाजपच्या मदन भोसले यांची घेतली भेट ; दोघांच्यात 2 तास कमराबन्द चर्चा ; काय आहे बातमी...?

वेध माझा ऑनलाईन ।
 गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. यामध्ये आज भाजपचे साताऱ्यातील नेते मदन भोसले यांचाही समावेश झाला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी मदन पाटील यांची भेट घेतली या भेटीत जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्यासमोर शरद पवार गटात येण्याचा प्रस्ताव मांडला असावा, अशी शक्यता आहे. या दोन्ही नेत्यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. जयंत पाटील हे मदन पाटील यांच्या घरातून हसतहसत बाहेर पडले. मात्र, त्यांनी भेटीबाबत काही बोलण्यास नकार दिला. आता मदन भोसले भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या गोटात दाखल होणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. भाजपमधील सर्वजण माझे मित्र आहेत, अशी मोघम प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला.