वेध माझा ऑनलाइन। राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राज्य मंत्री मंडळातील एक महत्वाचे मंत्री आहेत. धडाकेबाज निर्णय घेण्यात ते अग्रेसर असतात. अशाच या मुनगंटीवार यांनी मंत्रालयात आपल्या कार्यालयाबाहेर शिवरायांची जगदंबा तलवार आणि अफजल खान याचा कोथळा काढलेले वाघनखे ठेवली आहेत. त्यांच्या कार्यालयाजवळून जाणारे अनेक जण या प्राचीन वस्तू पाहिल्याशिवाय पुढे जातच नाहीत. नव्हे तर वनमंत्री यांचे हे कार्यालय पर्यटन स्थळच झालेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार आणि अफजल खान याचा कोथळा काढलेले वाघनखे सध्या ब्रिटिश मुझियममध्ये ठेवण्यात आलेली आहेत. या प्राचीन वस्तू आपल्याला मिळाव्यात यासाठी मुनगंटीवार आग्रही आहेत. या वस्तू राज्यात परत याव्यात यासाठी ते पाठपुरावा करत आहेत. त्याला यश मिळत असताना या वस्तू कशा होत्या. त्यांचे महत्व काय आहे. हे जनतेला कळावे यासाठी मुनगंटीवार यांनी या वस्तूच्या प्रतिकृती तयार करून घेतलेल्या आहेत. त्या सध्या मुनगंटीवार यांच्या कार्यालयाबाहेर ठेवण्यात आल्या आहेत शिवाय शिवाजी महाराज यांच्या आज्ञापत्राची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. या वस्तूमधून शिवराय यांचे कर्तृत्व तर अधोरेखित होत आहे. तसेच शिवाजी महाराज यांचा पराक्रम, गनिमीकावा, प्रजेबद्दलची आपुलकी व्यक्त होत आहे.वनमंत्री मुनगंटीवार यांनी ही संकल्पना पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांना सांगताच, त्यांनी शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार आणि वाघनखे यांच्या प्रतिकृती तयार करून त्याठिकाणी दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment