सातारा लोकसभा मतदार संघातून यावेळी उमेदवार कोण असणार ...या चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत...खरतर लोकशाही मध्ये कोणालाही कोणत्याही निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे, असे असताना खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे.. त्याना थेट लोकांमधून निवडणुका लढवण्याचा स्वतःचा किती अनुभव आहे हा प्रश्न असला...तरी ते पदवीधरचे उमेदवार म्हणून पदवीधर मतदारांपुढे एकदा आले होते...पण चक्क आता खासदारकीसाठी त्यांची चर्चा होतेय याचे आसचर्य सगळीकडेच व्यक्त होताना दिसतंय. त्यांना खुद्द पाटण,कराड सह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या राष्ट्रवादीमधून मोठा विरोध होत आहे अशीही चर्चा आहे...
अनेक राजकारण्यांच्या मुलांना राजकारणात आयत यावं...अस वाटत असते...पण ते समाजासाठी व त्या राजकीय पार्टीसाठी भविष्यात अडचणीचे ठरू शकते...असे अनेकजण आहेत जे पोलिटिकल बॅक ग्राउंड मधून राजकारणात आले आहेत...मग ते उदयसिंह पाटील असोत... किंवा पाटण मधील सत्यजित पाटणकर असोत...असे खूप जण आहेत...मग त्यांची सुरुवात पाहता त्यांनी अगदी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीपासून त्यांनी सुरुवात करून ते आमदारकी किंवा खासदारकी साठी आपली इच्छा व्यक्त करतात...
खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांच्याबाबत बोलायचं झालं तर...त्यांची राजकारणातील ओळख म्हणजे...श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव... एव्हढीच आहे...आणि एवढ्या ओळखीवर कोणी...मी खासदार होणार असे म्हणून चालणार नाही...तुम्हाला जिल्ह्याच्या राजकारणाचा अभ्यास किती?... विधानसभा, जिल्हा परिषद गट किंवा गण अशा ठिकाणी असणाऱ्या सामाजिक समस्या व त्याचे निराकरण कसे होऊ शकते त्यासाठी तेथील नेमकं राजकारण काय आहे... अशा अनेक बाबी असतात की ज्या लोकांच्या समस्यांशी संबंधित असतात... या प्रश्नाबाबत सारंग पाटील यांना किती माहीती आहे...हाही प्रश्न आहे...श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव आहेत ही ओळख खासदार होण्यासाठी पुरेशी नाही... वेळोवेळी होणाऱ्या बाजार समिती, ग्रामपंचायत ,पंचायत समिती जिल्हा परिषद अशा निवडणुकीत त्यांची ठोस भूमिका काय असते.? हाही नेहमीच विचारला जाणारा प्रश्न असतो...त्याचे उत्तर त्यांनी कधी कृतीतून दिलय असे आठवत नाही...
नुकताच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात राष्ट्रवादी चा मेळावा पार पडला त्यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या फ्लेक्सबोर्डवर श्रीनिवास पाटील व सारंग पाटील यांचा साधा फोटोही नव्हता...या गोष्टी बरच काही सांगून गेल्या...त्यांना राष्ट्रवादी मधून होणारा विरोध देखील मोठा चर्चेचा विषय आहेच...आणि हा विरोध का होत आहे? याचाही विचार व्हायला हवा...या पक्षात चार- चार वेळा निवडून आलेले अनुभवी आमदार आहेत...ते सर्वजण समाजकार्यात कच्चा अनुभव असणाऱ्या व्यक्तीला कसे काय समर्थन देतील? याशिवाय देखील बरीच कारणे चर्चेत आहेत?...असेही समजते...
त्यांच्या स्वतःच्या पाटण परिसरात तर त्यांचे राष्ट्रवादीसाठी ठोस काम काय? असेही पाटणकर गटाचे सुज्ञ लोक विचारतात ... काही ठिकाणी खासदार साहेबांनी पाटण तालुक्यात विरोधी गटाला निधी दिल्याचे पाटणकर गटाचे लोक सांगतात मग, अशावेळी त्यांना राष्ट्रवादी पक्षाची आठवण का येत नाही ? फक्त खासदार होण्यासाठी पक्षाची आठवण येतेय हे योग्य आहे का? अशी विचारणा देखील तेच लोक करताना दिसतात.
कराड उत्तर, कराड दक्षिण सह संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्याबाबत यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नाही...यापैकी अनेक ठिकाणी त्यांना स्पष्टपणे आणि उघड विरोध आहे...अशी परिस्थिती असताना... एखाद्याने मला खासदार व्हायचंय...अस म्हणणं कितपत योग्य आहे?
अशा लोकांनी राजकारण करताना अगदी ग्राउंड लेव्हल वर उतरून त्यातील बारकावे, समस्या, त्याचे निराकरण कसे करावे हे शिकून घेऊन मगच... खासदारकीचे स्वप्न बघायला हरकत नाही...
पदवीधरची निवडणूक हरल्यानंतरही त्यांनी लोकांशी संबंधित सामाजिक समस्यांबाबत काही उठावदार काम केल्याचेही कधीच ऐकिवात नाही...म्हणजेच...एखाद्याला सायकल चालवायचा अनुभव नसतो ...आणि तो म्हणतो मी विमानच चालवतो...पण... असं म्हणणं कितपत योग्य असते ?...आणि तसंच करायचं झालं तर,... विमानात बसलेल्या प्रवाशांचे काय होईल... हा विचार करायला नको का ? "समझदार को इशारा काफी है'... असे म्हणत जिल्ह्यात याविषयी सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत...
No comments:
Post a Comment