Friday, March 8, 2024
महायुतीच्या जागावाटपाचा मुद्दा ; शिंदे, अजित पवारांच्या जागावाटपाच काय ठरलं ?
वेध माझा ऑनलाईन । महायुतीच्या जागावाटपावर मुंबईत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर दिल्लीत भाजपच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली आणि त्यातून समोर आलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या चार खासदारांचं तिकीट धोक्यात आल्याची माहिती आहे. तर या चार मतदारसंघात भाजप आपले उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागावाटपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटले, वास्तविकेच्या आधारावर जागावाटप करा… म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची ताकद पाहूनच विजयी होऊ शकतो का? हे पाहून किती जागा द्यायच्या हे भाजप स्पष्ट करेल. विशेष म्हणजे हे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या भाजपच्या नेतृत्वाशी झालेल्या बैठकीनंतर केलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्या बैठकीत चर्चा झालेला फॉर्म्युल्यानुसार, भाजप ३५ ते ३७ जागा, शिंदेंची शिवसेना ८ ते ९ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ३ ते ४ जागा मिळणार असल्याची चर्चा आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment