वेध माझा ऑनलाइन।
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या युपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शक्ती दुबे या महिला उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, हर्षिता गोयल देशात दुसरी आली असून अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. विशेष म्हणजे हा मराठी असून महाराष्ट्रात पहिला आला आहे. अर्चित हा पुण्यातला रहिवाशी असून देशात तिसरा क्रमांक मिळवत त्याने महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे. यंदाही युपीएससी परीक्षेत महाराष्ट्राने आपली पताका फडकावली असून पुणे, ठाणेसह विविध जिल्ह्यातील उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये, मुलींनीही दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे.
युपीएससी आयोगाकडून 2024 च्या युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून upsc.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या परीक्षेत शक्ती दुबे या उमेदवाराने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून एकूण 1009 उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामध्ये, 335 सर्वसाधारण, 109 ईडब्लूएस, 318 ओबीसी, 160 एससी, 87 एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत.
विशेष म्हणजे 17 एप्रिल 2025 पर्यंत या युपीएससी परीक्षांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तर, 7 जानेवारी 2025 पासून मुलाखतीच्या राऊंडला सुरुवात झाली होती. युपीएसीकडून 2024 च्या परीक्षेसाठी आयएएस, आयपीएससह एकूण 1132 पदांसाठी भरती काढली होती.
No comments:
Post a Comment