Tuesday, April 22, 2025

युगेंद्रची तुलना अजितदादा किंवा माझ्याशी नको, शरद पवार अस का म्हणाले

वेध माझा ऑनलाइन
युगेंद्रची  तुलना माझ्याशी किंवा अजितदादांशी करू नका असं शरद पवार म्हणाले. आम्ही राजकारणाची सुरुवात केली त्यावेळी आमच्याकडे सत्ता होती. युगेंद्र सत्ता नसताना काम करतोय असं शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांच्या उपस्थितीत युगेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी शरद पवार बोलत होते. 

युगेंद्रचा स्वभाव हा नम्र आहे, त्याला सुसंवाद ठेवायचा आहे. तो आपल्या परीने जे काही शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतोय असं शरद पवार म्हणाले. त्यावेळी त्याची तुलना ही माझ्याशी किंवा अजित पवारांशी करू नका असं ते म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, "आम्ही ज्यावेळी राजकारणात आलो त्यावेळी आमच्या हातात सरकार होतं. युगेंद्र हा सत्ता नसताना काम करतोय. त्यामुळे त्याच्या हातात कष्ट करणे हे आहे. लोकांशी जेवढा संपर्क ठेवता येईल तेवढा ठेवायचा हे त्याच्या हातात आहे. त्यासाठी तुम्हच्या सर्वांची साथ त्याला हवी आहे. त्यामुळे या क्षणी सत्तेची अपेक्षा आपण ठेवता कामा नये."
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने ते आणि त्यांचे कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला गेले होते. शरद पवारांच्या उपस्थितीत युगेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना खास शुभेच्छा दिल्या. 
आता एकट्याचे अभिनंदन किती दिवस करायचे अस म्हणत आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत, लांबवू नका असं शरद पवार म्हणतात उपस्थितांमध्ये एकच हास्य फुललं. 
युगेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा करताना शरद पवारांनी त्यांच्या वाढदिवसाची आठवण सांगितली. ते म्हणाले की, आज जमाना बदलला आहे. गावागावात केक आले आहेत. आमचा वाढदिवस हा गुळ खोबरं किंवा गुळ शेंगदाणे वाटून साजरा केला जायचा.

No comments:

Post a Comment