Friday, April 25, 2025

ठाकरेंच्या सेनेला सांगलीत धक्का - डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची साथ सोडणार : जाणार शिंदेंच्या शिवसेनेत ;

वेध माझा ऑनलाइन।
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्याला निमित्त आहे ते म्हणजे चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची कुडाळमध्ये घेतलेली भेट. इतकंच नव्हे तर त्यांनी शिंदेंच्यां पंक्तीला बसून जेवणाचा आनंदही घेतला. त्यामुळे चंद्रहार पाटील आता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. 
गुरुवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट घडून आली. त्यामुळे ठाकरेंच्या पैलवानानं शिवबंधन तोडण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे पैलवान पाटील एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.

No comments:

Post a Comment