कराडच्या उपनगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार? या चर्चा सध्या सुरू आहेत लोकशाही आघाडीचे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष व यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले नगरसेवक पोपटराव साळुंखे यांच्या नावासाठी सध्या शहरातून जोरदार मागणी होत आहे आणि त्यांचेच नाव या पदासाठी सर्वात पुढे आहे अशी चर्चा असल्याने तेच उपनगराध्यक्ष होतील असे खात्रीलायक सांगितले जात आहे...पोपटराव साळुंखे हे गेली 30 वर्षे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सर्वत्र परिचित आहेत...अडचणीच्या काळात त्यांच्याबरोबर कोण असेल... तर ते नाव म्हणजे पोपटराव साळुंखे... असेच नेहमी म्हटले जाते...
पोपटराव साळुंखे यांनी कायमच माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना कोणत्याही अपेक्षेशिवाय साथ दिली आहे... भले, भले अनेकजण आम्ही निष्ठावन्त आहोत असे म्हणत दुसऱ्या पार्टीच्या नेत्याच्या जवळ जाताना दिसतात...मात्र पोपटराव साळुंखे यांनी असल्या राजकारणाला कधीही महत्व दिले नाही... त्यामुळे पर्यायाने त्यांचा आदर नेहमीच सगळीकडेच राखला गेला...निष्ठावन्त असावा तर असा...असे त्यांचे नाव घेऊन आजही बोलले जाते...
पोपटराव साळुंखे हे युवकांचे आयडॉल मानले जातात त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे युवकांचे आशास्थान म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते प्रत्येक सामाजिक कामात त्यांचे नेहमी मोठे योगदान दिसते
राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत खासदार निलेश लंके यांच्याशी असणार्या त्यांच्या मैत्रीची राज्यात चर्चा असते कराड शहरासह राज्यभरातील अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचा परिचय आहे
मागील 2016 च्या पालिका निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला मात्र त्यातून खचून न जाता अक्षरशः दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी आपले सामाजिक कार्य चालूच ठेवले बाळासाहेब पाटील यांचे मार्गदर्शन तरुणांची साथ व मोठ्यांचे आशीर्वाद त्यांना नेहमीच मिळाले आणि याच जोरावर त्यांनी यावेळी झालेल्या निवडणुकीत भरघोस यश मिळवत आपली सिद्धता सिद्ध केली त्यांनी कराडच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात मोठे यश मिळवले आहे
कराडचे नूतन नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव येत्या नवीन वर्षात 1 जानेवारीला
नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील...त्याचवेळी लोकशाही आघाडी च्या वतीने कराडचे उपनगराध्यक्ष म्हणून पोपटराव साळुंखे यांचे नाव माजी आमदार बाळासाहेब पाटील जाहीर करतील अशीही चर्चा आहे...
No comments:
Post a Comment