कराड पालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता कोणत्या पार्टीचे कोण स्वीकृत नगरसेवक पालिकेत एन्ट्री करणार याच्या चर्चा सुरू आहेत लोकशाही आघाडीकडून जयंतकाका पाटील स्वीकृत म्हणून पालिकेत एन्ट्री करतील अशी चर्चा सुरू आहे त्याचबरोबर सौरभ पाटील यांचेही नाव अग्रक्रमाने चर्चेत आहे लोकशाही आघाडीचे जेष्ठ नेते सुभाषराव पाटील आणि पार्टीचे निष्ठावन्त कार्यकर्ते जयंत बेडेकर यांचीही नावे चर्चेत आहेत...मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पार्टीचे नेते माजी आमदार बाळासाहेब पाटील हेच घेणार असल्याने नेमकी कोणाची वर्णी लागणार याची मोठी चर्चा आहे
लोकशाही पार्टीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील यांचे नाव यावेळी लोकशाही आघाडीकडून स्वीकृतसाठी चर्चेत आहे त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने केलेले आतापर्यंतचे काम खूप मोठे आहे यावेळच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम व 6 नगरसेवकावरून 13 वर ही नगरसेवक संख्या जाण्यासाठी केलेले प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत अशी चर्चा आहे यशवन्त आघाडी व लोकशाही आघाडी यांचे एकत्रीकरण करण्यामागे त्यांचे यशस्वी प्रयत्न कारणीभूत असल्याचेही सांगण्यात येत आहे जयंतकाका पाटील यांच्या नावाची कराड पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे
सौरभ पाटील हे लोकशाही आघाडीचे युवा नेते म्हणून परिचित आहेत संयमी आणि अभ्यासू म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे मागील निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून येऊन नगरसेवक संख्या कमी असताना देखील अडचणीच्या काळात सताधाऱ्यांपुढे त्यांनी मांडलेले शहरातील विषय व त्यातून गाजवलेल्या पालिकेच्या सभा आजही चर्चेत असतात बहुमत नसतानाही लोकांसाठी कामे करून घेण्याचे कसब दाखवत त्यांनी आपली राजकीय परिपकवता त्यावेळी दाखवली आहे त्यांच्या त्यावेळच्या कामाच्या पद्धतीनेच गटनेता म्हणून त्यांनी आपली छाप सोडण्यात यश मिळवले आहे ...त्यांचीही यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागेल अशी चर्चा आहे
शहरातील लोकशाही गटाचे नेते सुभाषराव पाटील यांचाही पालिकेच्या राजकारणाचा मोठा अनुभव आहे त्यांचीही अभ्यासू राजकारणी म्हणून ओळख आहे शहराच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे शहरातील विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय नेहमीच जनतेत चर्चेचे राहिले आहेत त्यांचीही स्वीकृतसाठी शहरात चर्चा आहे
माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक जयंत बेडेकर यांचेही नाव स्वीकृत म्हणून चर्चेत आहे 24x7 सामाजिक कार्य करण्यासह पार्टीसाठी प्रामाणिक व चोख काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्याची शहर व परिसरात ओळख आहे त्यांचीदेखील स्वीकृतसाठी चर्चा आहे
दरम्यान याविषयीचा अंतिम निर्णय लोकशाही आघाडीचे नेते माजी आमदार बाळासाहेब पाटील हेच घेणार आहेत त्यामुळे स्वीकृतसाठी कोणाची वर्णी लागते हे यानिमित्ताने पहायचे आहे
No comments:
Post a Comment