सातारा जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रक्रिया गटातून मी माझा अर्ज आज भरला आहे तसेच ऍड उदयदादा पाटील यांनीही सोसायटी गटातून अर्ज भरला आहे जिल्ह्यात महायुती म्हणून या निवडणुकीत आम्ही सगळे सामोरे जाणार आहोत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आम्ही महायुती म्हणून लढत आहोत त्यामुळे या निवडणुकीत माझा अर्ज वरिष्ठ नेत्यांनी सांगितला तर राहील...आणि महायुतीसाठी थोडं पुढं- माग व्हावं लागलं तर तशीही माझी तयारी आहे...मात्र उदयदादा पाटील उंडाळकर हे सोसायटी गटातून महायुतीचे फिक्स उमेदवार असतील असे आमदार अतुल भोसले यांनी आज स्पष्ट केलं
आज आमदार अतुलबाबा यांनी या निवडणुकीसाठी प्रक्रिया गटातून आपला अर्ज दाखल केला त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली
दरम्यान
महायुती म्हणून राष्ट्रवादी सेना आणि भाजप लढणार असल्याने सेना भाजप तसेच राष्ट्रवादी च्या बाजूचे पारडे या निवडणुकीत जड झाल्याचे सध्यातरी चित्र आहे त्यामुळे सोसायटी गटातून महायुतीच्या मदतीने ऍड उदयदादा पाटील यांचा विजय सुकर होणार हे आता जवळजवळ स्पष्टच झाले आहे
No comments:
Post a Comment