सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज कराड सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे नेते ऍड. उदयसिंह पाटील उंडाळकर आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पाटील यांच्यात लढत होत असून यानिमित्ताने महायुतीत बंडखोरी झाली असल्याचे चित्र निर्माण झाले असल्याने कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर जमा असल्याचे पाहायला मिळत आहे
राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी 146 मतदारांपैकी आपल्यासोबत 105 मतदारांना सहलीवरून ट्रॅव्हल्स मधून कराडच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल मतदान केंद्रावर आणले आहे.त्याचा सोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, डॉ. सुरेश भोसले हेही होते.यावेळी आमदार अतुलबाबांनी उदयदादा हेच या निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला
No comments:
Post a Comment