Sunday, May 31, 2026

80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ; राष्ट्रवादी च्या जयंत पाटील यांची टीका ;

वेध माझा ऑनलाईन।
महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’तून तब्बल 80 लाख महिला या अपात्र ठरल्या आहेत. योजना सुरू झाल्यापासून 2 वर्षांनी आतापर्यंत 80 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे. ईकेवयासी योजनेनंतर लाखो महिलांना योजनेसाठी अपात्र ठरल्या असल्याने आता केवळ 1 कोटी 66 लाख बहिणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. मात्र यावरून आताविरोधकांनी सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं असून लाखो लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्यावरून प्रश्न विचारण्यात येत आहेत. आधी शिवसेनेच्या सुषमा अंधारे, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी लाजकी बहीण योजनेवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
X या सोशल मीडिया अकाऊंटवरून जयंत पाटील यांनी एक ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आता याच लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत आहे असं जयंत पाटील म्हणाले.
देशानंतर आता राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे हे द्योतक आहे. ज्याचा पहिला फटका लाडक्या बहिणींना बसला आहे. राज्याची वित्तिय तुट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात जागतिक मंदीने अधिक भर घातली आहे. आज ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. उद्या आणखी काही लाख महिलांना काही कारणं दाखवून अपात्र केले जावू शकते आणि हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहेशासनाने या योजनेचे आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती, असा टोला जयंत पाटील यांनी सरकारला लगावला आहे.

सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना भाजपकडून उमेदवारी ;

वेध माझा ऑनलाइन।
भाजपने जाहीर केलेल्या ११ उमेदवारांच्या यादीत नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि भाजपचे सह-कोषाध्यक्ष अरुण लखानी यांचा समावेश आहे. भाजपने अरुण लखानी यांना चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अरुण लखानी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही असून मुलगी रेवती सुळे यांचे होणारे सासरे आहेत. त्यामुळे या उमेदवारीची राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे

आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अरुण लखानी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबाशी असलेल्या कौटुंबिक संबंधांवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फारच चोखपणे उत्तर दिले. मी भाजपचा जुना कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी भाजप पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. पवार साहेब हे देशातील आणि राज्यातील खूप मोठे नाव आहे. ते एक मोठे राजकीय कुटुंब आहे. त्या व्यतिरिक्त आमचे केवळ कौटुंबिक संबंध आहेत, त्यात कोणतेही राजकारण नाही, अशी प्रतिक्रिया अरुण लखानी यांनी दिली.

विधानपरिषदेसाठी सांगली-सातारा मधून भाजपकडून धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर

वेध माझा ऑनलाइन।
भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात सांगली-सातारा – मधून श्री धैर्यशील कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे

तसेच धाराशिव लातूर बीडमधून बसवराज पाटील, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीतून प्रविण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच जळगाव मधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून डॉ.राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार आता उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


भाजपचे 11 उमेदवार 
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – श्री अरुण लखानी
भंडारा-गोंदिया – श्री अविनाश ब्राह्मणकर
अमरावती – श्री प्रविण पोटे पाटील
सांगली-सातारा – श्री धैर्यशील कदम
सोलापूर – श्री राजेंद्र राऊत
अहिल्यानगर – श्री प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना – श्री सुहास शिरसाट
नांदेड – श्री अमर राजूरकर
धाराशिव-लातूर-बीड – श्री बसवराज पाटील
जळगाव – श्री.नंदकिशोर महाजन
नागपूर – डॉ.राजीव पोतदार

निर्भीड पत्रकारिता, समाजसेवा आणि लायन्स क्लबच्या उपक्रमांची प्रभावी मांडणी ; विद्या मोरे यांचा विशेष सत्कार

वेध माझा ऑनलाइन
पुणे येथे पार पडलेल्या लायन्स नॅशनल मल्टी अवॉर्ड 2026 सोहळ्यात पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल The News Bharat 24 संपादिका व अखिल भारतीय पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष  विद्या मोरे यांना लायन्स क्लब इंटरनॅशनल मल्टीपल डायमंड अवॉर्ड प्रदान करण्यात आला होता. या उल्लेखनीय यशाबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे तसेच सामाजिक कार्याला प्राधान्य देत सकारात्मक पत्रकारिता करण्याचे काम विद्या मोरे यांनी सातत्याने केले आहे. विशेषतः लायन्स क्लबच्या विविध सेवाभावी, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांना प्रभावीपणे समाजासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांना लायन्स राष्ट्रीय स्तरावरील डायमंड अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.

अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित सत्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन विद्या मोरे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या निर्भीड, अभ्यासू व समाजाभिमुख पत्रकारितेचे कौतुक केले. पत्रकारिता ही समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून सकारात्मक कार्याला प्रसिद्धी देणारे पत्रकार समाजासाठी प्रेरणादायी ठरतात, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

तसेच पुढील काळातही त्यांनी सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवत समाजहिताचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवावे, अशा शुभेच्छाही मान्यवरांनी दिल्या.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, बांधकाम सभापती अत्तर आंबेकर, दिलीप गुरव पाटील, अशोकराव पाटील, सागर बर्गे, अतुल शिंदे, समाजसेवक आनंदराव लादे, नगरसेवक नरेंद्र लिबे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष घराळ बापू, अशोककुमार चव्हाण, विवेक कुराडे, किरण पाटील, सुरज जाधव, संदीप काळे, अमर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अतुलबाबा विरोधकांवर तुटून पडले ; म्हणाले...अविनाश मोहितेना विचारा... तुम्हाला जेलमध्ये का जावं लागलं ? तुम्ही निर्दोष झालात का? कृष्णा कारखान्याच्या चेअरमनला जेलमध्ये जावं लागत... ही नामुष्कीचं...

वेध माझा ऑनलाईन।
अविनाश मोहिते जेलमध्ये गेले... आणि आता जामिनावर बाहेर आहेत ...त्यांना विचारा तुम्ही निर्दोष झालात का?...तुम्हाला जेलमध्ये का जावं लागलं ?...कृष्णा कारखान्याच्या चेअरमनला जेलमध्ये जावं लागलं... ही नामुष्की पहिल्यांदाच पहावी लागली आहे...
कृष्णा कारखाना नाथा च्या पायथ्याशी आहे म्हणून या कारखान्यात बेईमानी चालत नाही नीतिमत्ता चांगली असली पाहिजे विरोधकांना भानगडी करताना ते लक्षातच आलं नाही आणि त्यांना जेलमध्ये जावं लागलं असा घणाघात आमदार डॉ अतुल भोसले यांनी अविनाश मोहिते यांच्यावर केला 

कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनेलचा प्रचार शुभारंभ काल - शनिवारी  वडगाव हवेली येथे पार पडला त्याप्रसंगी सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते  माजी चेअरमन मदनदादा मोहिते, डॉ सुरेश भोसले , जगदीश जगताप, रयत संघटनेचे धनाजी काटकर सर, व परिसरातील कार्यकर्ते सभासद  तसेच महिला, युवक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

डॉ अतुलबाबा म्हणाले...
कष्टकरी शेतकऱ्यांच्या घामाची काळजी आत्ता त्यांना वाटतेय मग, तुमच्या पाच वर्षाच्या कालावधीत का शेतकऱ्याची काळजी केली नाही?... आपल्याला कारखाना चालवताना काही अडचण आली तर आपण तज्ञांचा सल्ला घेतो मात्र... आपले विरोधक देवरूषी बोलावतात... अंगारे धुपारे करतात... लिंबू टाचण्या कारखान्यावर फेकतात... असा कारखाना चालतो का?... अविनाश मोहिते हे साधे ग्रामपंचायत सदस्य झाले नाहीत...मग  त्यांना एवढ्या मोठ्या संस्थेचे काय कळणार? 
जेव्हा आपल्या हातात कारखाना आला तेव्हा आपल्याला कळलं की अविनाश मोहितेंनी कारखान्यात किती घोटाळा करून ठेवलाय... त्यावेळी कारखान्याची अर्थव्यवस्था बघणारे लोक यांचा कारभार बघून आपल्याला तेव्हा म्हणाले होते... की तोडणी वाहतूकीची रक्कम देण्यासाठी बँक तयार नाही... व्यापारी देणे झालेले द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत... अशी अवस्था करून या लोकांनी ठेवली होती... मी व सुरेश बाबांनी काही बँकांशी बोलणी केली तेव्हा अविनाश मोहितेंनी केलेल्या बोगस कर्जाच्या भानगडीच्या रकमेसकट पैसे आपल्याला भरायला लागणार होते... शेतकऱ्यांच्या घामाला दाम द्यायची भाषा आता हे लोक करत आहेत मग त्याचवेळी का नाही शेतकऱ्यांची काळजी केली ...? कारखान्याची अवस्था अशी का करून ठेवली? असा सवालही  आमदार भोसले यांनी केला
ते सध्या पाणीपट्टी कमी करण्याची व वीजबिल माफ करण्याच्या वलग्ना करत आहेत...हे सरकारच्या सहकार्याशिवाय शक्य नाहीये... या लोकाना शेतकरी सभासद नाकारणार असल्याने सभासदांना फसवण्यासाठी त्यांच्या या वलग्ना सुरू आहेत...

राजकारण विरहित असा सभासदांच्या हिताचा आपण नेहमीच कारभार केला आहे सहकारात नेहमीच एक न्यायाने आपले काम चालते त्यामुळे परिसरातील सर्वच राजकीय नेत्यांनी सुरेशबाबाना पाठिंबा दर्शवला आहे यावेळच्या कारखाना निवडणुकीसाठी इच्छुकांची उमेदवारीसाठी गर्दी होती...सगळ्यांना कारखान्यात संधी देणे शक्य नव्हते मात्र ज्यांना याठिकाणी संधी देता आली नाही, त्यांना इतर संस्थेत ऍडजस्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले
गेल्या 5 वर्षात आपल्या काळात कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळाले आहे उच्चांकी ऊसदर आम्ही दिला आहे  कामगारांना वेळोवेळी पगारवाढ दिली आहे सभासदांना सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो आहे तसेच कारखान्याचे एक्सपानन्शन केले आहे  गाळप क्षमता वाढवली आहे विस्तारीकरण तसेच नूतनीकरण देखील कारखान्यात केलेलं आहे अशा अनेक बाबींमुळे कारखाना आजच्या घडीला राज्यात अववल क्रमांकावर आहे . 
मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत सहकार पॅनलचा मोठ्या मताने विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला...

Saturday, May 30, 2026

डॉ सुरेश भोसले म्हणाले...अविनाश मोहितेंच्या काळात कारखाना विकावा लागला असता ; त्यांच्या काळात 1 हजार कामगार कामाला असल्याचे दाखवले, त्यांचा 5 हजार रुपये दरमहिना पगार दाखवला, कागदावर मात्र आजअखेर काहीच दिसत नाही, मग महिन्याला 50 लाख गेले कुठे?

वेध माझा ऑनलाईन।
अविनाश मोहिते कृष्णा कारखान्याचे चेअरमन असताना कारखान्याची अक्षरशः वाट लागली होती त्यांच्या सारखी प्रवृत्ती फोफावली तर कारखाना विकावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती 
मात्र आपण कारखाना हातात घेतल्यानंतर कारखाना पुन्हा सुस्थितीत आला असल्याचे डॉ सुरेश भोसले म्हणाले

कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनेलचा प्रचार शुभारंभ काल - शनिवारी  वडगाव हवेली येथे पार पडला त्याप्रसंगी सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते  माजी चेअरमन मदनदादा मोहिते, आमदार अतुल भोसले, जगदीश जगताप, रयत संघटनेचे धनाजी काटकर सर, व परिसरातील कार्यकर्ते सभासद  तसेच महिला युवक शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

डॉ सुरेश भोसले म्हणाले
ज्या अविनाश मोहितेना साध्या सोसायटीच्या सदस्य पदाचा अनुभव नाही अशा माणसाला एवढी मोठी सहकारी संस्था कशी चालवता येणार? आणि त्याचमुळे खरतर कारखाना त्यांच्या काळात अडचणीत आला त्यांना कारखानदारी मधले काहीच कळत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली 

त्यांनी व्यापारी कर्ज 15 कोटी करून ठेवले, कारखान्याची वीज, तसेच पाणी कट करण्यात आले होते, तोडणी वाहतुकीला पैसेच शिल्लक नव्हते,अग्रीकल्चर कॉलेज बंद करण्यात आले होते, डिस्लरी बंद केली होती, तोडणी कामगारांना पैसे दिले नाहीत म्हणून त्या कामगारांनी संप केला होता, 
तसेच 1000 कामगार 5 000 रुपये महिना पगाराने कारखान्यात कामाला असल्याचे दाखवून महिन्याला 50 लाख रुपये त्यांच्या पगारापोटी खर्च केले... मात्र... हे कामगार आजअखेर कागदावर कुठेच दिसत नाहीत... मग हे प्रत्येक महिन्याला 50 लाख रुपये गेले कुठे?... असा सवालही त्यांनी यावेळी केला.

ते म्हणाले... अशी बिकट परिस्थिती अविनाश मोहितेंच्या काळात होती आणि त्या परिस्थितीत हा कारखाना आपण ताब्यात घेतला मात्र अथक प्रयत्नाने हा कारखाना सध्या राज्यात अववल दर्जाचा म्हणून सध्या डौलाने उभा आहे, सुस्थितीत आहे... 
अविनाश मोहितें सारखी प्रवृत्ती फोफावली असती तर कारखाना विकावा लागला असता अशी भोतीही त्यांनी बोलून दाखवली 

ते म्हणाले
गेल्या 5 वर्षात आपल्या काळात कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळाले आहे उच्चांकी ऊसदर आम्ही दिला आहे  कामगारांना वेळोवेळी पगारवाढ दिली आहे सभासदांना सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो आहे तसेच कारखान्याचे एक्सपानन्शन केले आहे  गाळप क्षमता वाढवली आहे विस्तारीकरण तसेच नूतनीकरण देखील कारखान्यात केलेलं आहे या व अशा अनेक बाबींमुळे कारखाना आजच्या घडीला राज्यात अववल क्रमांकावर आहे . 
मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत सहकार पॅनलचा मोठ्या मताने विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला...

कराडमध्ये 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त ; कराड शहर पोलिसांची ड्रग्ज विरोधी जोरदार कारवाई ;

वेध माझा ऑनलाइन
कराड शहर पोलिसांनी 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले असून तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थांसह मोबाईल फोन आणि इनोव्हा कार असा एकूण अंदाजे 18 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काही जण वारुंजी फाटा परिसरात इनोव्हा वाहनातून मेफेड्रोन विक्रीसाठी येणार आहेत.
अशी माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती 
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.या कारवाईत समीर गुलाब शेख (रा. कोयनावसाहत, कराड), नजर महम्मद आरिफ मुल्ला (रा. मुजावर कॉलनी, कराड) आणि फरदीन दादापीर शेख (रा. सूर्यवंशी मळा, कराड) या संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 2 लाख 87 हजार 340 रुपये किंमतीचे 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पोलिसांनी जप्त केले. तसेच तीन मोबाईल फोन आणि एक इनोव्हा कारही जप्त करण्यात आली.
तसेच ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस उपनिरीक्षक निखील मगदुम, हवालदार वाडकर, पाटील, कुंभार, महिला पोलीस सांळुखे, हवालदार स्वामी, कोरडे, सांडगे, मोरे, देशमुख, पवार, महिला पोलीस पिसाळ, हवालदार विभुते, चव्हाण, मोमीन, साळुंखे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

विधान परिषद निवडणूक ; सातारा- सांगली मतदारसंघ राष्ट्रवादीकडे ! माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना संधी मिळणार ?

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधानपरिषद जागांसाठी महाविकास आघाडीचे  १५ जागांवर एकमत झाले असून काँग्रेस ८, ठाकरे गट ४ तर राष्ट्रवादी ३ जागांवर लढणार आहे; नांदेड आणि नाशिकाचा तिढा कायम आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सातारा- सांगली मतदारसंघ राष्ट्रवादी च्या वाट्याला आला आहे असे समजते त्यामुळे माजी आमदार आणि राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना याठिकाणी संधी मिळणार असेही बोलले जात आहे काँग्रेसकडे यापूर्वी हा मतदारसंघ होता त्यावेळी मोहनराव कदम हे याठिकाणी निवडून आले होते 

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ जागांसाठी विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे महायुती आणि महाविकासआघाडीत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आता महाविकासआघाडीने या सर्व १७ जागा पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मविआच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण १७ जागांपैकी १५ जागांवर जागावाटपाचे एकमत झाले असून, उर्वरित दोन जागांबाबत येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
नुकतंच मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी महाविकासआघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकासआघाडी सर्व जागा लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट आणि अटीतटीचा सामना रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे.
जागावाटपाचे प्राथमिक सूत्र निश्चित
मविआच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार राज्यातील १५ जागांचा तिढा सुटला असून पक्षांनुसार संभाव्य जागावाटप खालीलप्रमाणे असणार आहे. यात काँग्रेस ८, शिवसेना ठाकरे गट ४ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ३ जागांवर निवडणूक लढणार आहे.

काँग्रेस 
(०८ जागा): 
चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर (अहमदनगर), सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि नागपूरची पोटनिवडणूक.

शिवसेना – 
उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (०४ जागा): रत्नागिरी, जळगाव, परभणी-हिंगोली, संभाजीनगर.

राष्ट्रवादी काँग्रेस –
 शरदचंद्र पवार गट (०३ जागा): पुणे, ठाणे, आणि सातारा-सांगली.

या १५ जागांवर एकमत झाले असले तरी नाशिक आणि नांदेड या दोन मतदारसंघांवर मविआतील तिन्ही पक्षांनी काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाने आपला दावा ठोकला आहे. यामुळे या दोन जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत यावर पुन्हा एक बैठक घेऊन यावर सर्वसंमतीने अंतिम तोडगा काढला जाईल, अशी माहिती नेत्यांनी दिली आहे.

“विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा आणि नागपूरची पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार आहे. आजची जागावाटपाची चर्चा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दोन जागा वगळता इतर सर्व जागांवर एकमत झाले आहे. येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. आम्ही सर्व जण पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जात आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.




Friday, May 29, 2026

महायुतीमधील विधान परिषद जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर ; 17 जागांसाठी निवडणूक ; भाजपच्या वाट्याला तब्बल 10 जागा जाण्याची शक्यता ;

वेध माझा ऑनलाईन।
महायुतीमधील विधान परिषद जागावाटपाचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं जात असून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चर्चांना आता अंतिम टप्पा आला आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागावाटपावरून महायुतीतील तीनही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये काही जागांवरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या फॉर्म्युल्यात भाजपच्या वाट्याला तब्बल 10 जागा जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मोठं यश मिळवल्यामुळे या जागांवर भाजपचा वरचष्मा राहणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र शिवसेना शिंदे गटानेही आपल्या वाट्याच्या जागांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे चर्चेत पेच निर्माण झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 
भाजप सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, वर्धा, चंद्रपूर-गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या जागांवर निवडणूक लढवणार आहे. 

तर 
शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या जागा जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवर दावा ठोकणार असल्याचं समोर आलं आहे.

विषारी दारू प्रकरणात 14 जणांचा मृत्यू रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर धडक देत केली तोडफोड ;

वेध माझा ऑनलाइन।
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापलं आहे. विषारी दारू प्रकरणात जवळपास 14 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट घटनास्थळी जाऊन संतप्त प्रतिक्रिया दिली. यावेळी रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित दारू अड्ड्यावर तोडफोड करत निषेध व्यक्त केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विकल्या गेलेल्या विषारी दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक केली असून दारू अड्ड्याचा मालक कर्नलसिंह विरखा याच्यासह एकूण आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, या घटनेनंतर रोहित पवार स्वतः संबंधित दारू अड्ड्यावर पोहोचले. त्यांनी कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी लावलेले पत्रे उखडून टाकत काऊंटरची तोडफोड केली. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “गरीब माणूस मेल्यानंतर आम्ही शांत बसलो तर राजकारणात आम्ही फक्त टाईमपास करायला आलोय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “अशा वेळी सिस्टीम कमी पडते, त्यामुळे आम्हालाच आक्रमक व्हावं लागतं. लहान मुलींवर अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात, पण सिस्टीम वेळेवर मदत करत नाही,” असंही ते म्हणाले.
विषारी दारू प्रकरणानंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळ इच्छुक ; पडद्यामागून हालचाली सुरू !

वेध माझा -
 राष्ट्रवादी काँग्रेसमधील राज्यसभेच्या रिक्त जागेवरून राजकीय हालचालींना वेग आला असून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभेच्या या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भुजबळ यांनी अधिकृतपणे आपली इच्छा व्यक्त केली नसली, तरी पडद्यामागून त्यांनी हालचाली सुरू केल्याचा दावा केला जात आहे. तसेच राज्यसभेच्या उमेदवारीसोबतच पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावं, यासाठीही भुजबळ आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत इच्छुक असलेल्या छगन भुजबळ यांना पक्षाकडून आता केंद्रात संधी दिली जाणार का, याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीवरून पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे.

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते मानले जात असल्यामुळे त्यांना डावलणं पक्षासाठी सोपं नसल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभेसाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुणे-सातारा प्रवास होणार फक्त 1 तासाचा ! ;

वेध माझा ऑनलाइन।
पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी पुणे ते सातारा मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. पुणे-बंगळुरू महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाहतूक कोंडी पाहून या भागांत पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. NHAI च्या या उपाययोजनांमुळे पुणे ते सातारा कॉरिडोरवरील वाहतूक सुलभ होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी या मार्गाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी अलीकडेच खंबाटकी घाट आणि नवले पूल परिसराची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पुणे ते सातारादरम्यान पाच ते सहा उड्डाणपूल उभारण्याची योजना मांडली. सध्या पुणे ते सातारा प्रवासा 1.30 ते 2 तास वेळ जातो. वाहतूक कोंडी असली तर सव्वा दोन तास तर हमखास जातात. त्यात साताऱ्यातून पुढे गावात जाणाऱ्या वाहनांना तर आणखी वेळ लागतो. हाच प्रवासाचा वेळ अवघ्या 1 तासावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.

पुण्यात मृत्यूचे तांडव… मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, एकाही आरोपीला न सोडण्याचे थेट आदेश... चिंचवडमध्ये विषारी दारूने हाहाकार ; आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू...

वेध माझा ऑनलाईन
चिंचवडमध्ये विषारी दारूने हाहाकार माजवला आहे. या घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही शहरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि एकाही आरोपीला न सोडण्याचे आदेश दिले आहेत

गेल्या दोन दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड हादरून गेलं आहे. या दोन्ही शहरात विषारी दारूमुळे हाहाकार माझला आहे. एकामागून एक 14 लोकांचा या दारूमुळे मृत्यू झाल्याने सर्वच हादरून गेले आहेत. पोलिसांनीही या प्रकरणाची पाळमुळं खणून काढण्यासाठी रात्रीपासूनच तपास सुरू केला आहे. राज्याला हादरवणाऱ्या या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अॅक्शन मोडवर आले आहेत. फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशच दिले आहेत. हयगय करू नका. एकही आरोपी सुटला नाही पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. मी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. दोन्ही पोलीस आयुक्तांना समन्वयाने काम करतानाच या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश दिले आहेत. कोणाचीही हयगय करू नका. कठोर कारवाई करा, असे आदेशच दोन्ही पोलीस आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घ्यायलाही सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Wednesday, May 27, 2026

कृष्णा कारखाना निवडणुकीत ऍड. उदयसिह पाटीलांचा भोसलेंना पाठिंबा...

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा समूह आणि रयत  समूह सहकारात एकत्रितपणे काम करू लागली तर भागातील शेतकऱ्यांचे कल्याण होईल त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून आपण सहकार्य करण्याची भूमिका घेण्याची गरज आहे आणि त्याचमुळे होणाऱ्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत रयत संघटना भोसलेंच्या सहकार पॅनेलला मदत करेल असे ऍड उदयसिह पाटील उंडाळकर यांनी स्पष्ट केले

कोयना दूध संघावर रयत संघटनेच्या वतीने कृष्णा कार्यक्षेत्रातील सभासद व शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यात ऍड पाटील बोलत होते

यावेळी डॉ सुरेश भोसले म्हणाले स्व विलासकाका पाटील व स्व जयवंतराव भोसले यांनी सामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले सहकाराच्या माध्यमातून भागाला प्रगतीपथावर नेण्यासाठी देखील यातून प्रयत्न झाले ऍड उदयसिह पाटील यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणूकित आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे त्यांनाही जिल्हा बँकेसह सर्वच ठिकाणी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही  डॉ भोसले यांनी दिली

Tuesday, May 26, 2026

डॉ इंद्रजित मोहिते म्हणाले...अविनाश मोहिते कारखाना चालवण्यासाठी सक्षम नाहीत ;

वेध माझा ऑनलाइन।
मंगळवारी (दि 26 रोजी) डॉ इंद्रजित मोहिते यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलला होणाऱ्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला...
दरम्यान...सुरेश भोसलेंच्या सहकार पॅनेललाच पाठिंबा का?... अविनाश मोहितेना पाठिंबा न देण्याचे कारण काय ?...असे पत्रकारांनी यावेळी विचारले असता... 
कारखाना चालवण्यासाठी  चांगले नेतृत्व असावे लागते,त्या नेतृत्वाची प्रवृत्ती, प्रकृती, तसेच त्याची कार्यक्षमता, अनुभव, प्रशासकावर नियंत्रण, आर्थिक शिस्त, कायद्याची समज, अशा क्षमता व असे गुण त्या नेतृत्वात असावे लागतात आणि हे गुण आम्हाला त्यांच्यामध्ये दिसत नाहीत असे डॉ इंद्रजित मोहिते यावेळी म्हणाले.

एकूणच संस्थापक आणि सहकार पॅनेल यांच्यामधील दोन्ही बाजूंचा अभ्यास करूनच सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे देखील डॉ इंद्रजित मोहिते यांनी यानिमित्ताने सांगितले...ते म्हणाले “सहकार पॅनेलकडे कारखाना टिकवण्याची क्षमता आणि व्यवस्थापनाची दृष्टी दिसते. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत या निवडणुकीत राहणार आहोत, 

ते पुढे म्हणाले 
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रयत संघर्ष मंचाने अखेर आपली भूमिका स्पष्ट करत सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. “संघर्षासाठी संघर्ष करून कारखाना कमकुवत करण्यापेक्षा, आम्ही सहकार पॅनेलला साथ देत आहोत,” असे सांगत डॉ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, आमचा हा पाठिंबा अटींसह देत आहोत. सभासदांचे हित डावलले गेले तर भविष्यात निवडणुकीच्या संघर्षात उतरू, कारखाना टिकवणे आणि सहकाराची परंपरा जपणे हीच खरी जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले आर्थिक ताण आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे सहकार क्षेत्र अडचणीत आले आहे. अशा वेळी केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी संघर्ष करणे योग्य नाही,” असे सांगत संस्थापक आणि सहकार पॅनेल यांच्यातील दोन्ही बाजूंचा अभ्यास करूनच सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ इंद्रजित मोहिते म्हणाले  “सहकार पॅनेलकडे कारखाना टिकवण्याची क्षमता आणि व्यवस्थापनाची दृष्टी दिसते. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत या निवडणुकीत उभे राहत आहोत असेही त्यांनी स्पष्टपणे आज  सांगितले 

Monday, May 25, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार इद्रीस नायकवडी यांच्या आमदारकीचा मागितला राजीनामा ? काय आहे कारण?

वेध माझा ऑनलाईन।
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वाद समोर आला होता. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात एक पत्र देण्यात आलं होतं. या पत्रामध्ये राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नाव होतं, मात्र त्या पत्रात त्यांच्या पदाचा कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता. यावरून प्रफुल पटेल हे नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, या भेटीवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित होते.

दरम्यान या भेटीवेळी प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांची शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. परंतु यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया त्यावेळी दिली नाही असंही समोर आलं. या सर्व घडामोडींनंतर आता राष्ट्रवादीच्या गोटातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा नेतृत्वाकडून आमदार इद्रीस नायकवडी यांच्या आमदारकीचा राजीनामा मागण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 15 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ओएसडी यांनी इद्रीस नायकवडी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राजीनामा द्यावा अशी पक्षाकडून सूचना असल्याचं इद्रीस नायकवडी यांना सांगितलं होतं.
मात्र दुसरीकडे  इद्रीस नायकवडी यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं आहे.   उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अशी कुठल्याही प्रकारची सूचना आपल्याला कधी देण्यात आली नव्हती, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही अशी भूमिका यावर इद्रीस नायकवडी यांनी घेतली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न ; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती ;

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  राष्ट्रवादी भवनात झाली.
सातारा जिल्हाध्यक्ष मा.श्री बाळासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन करताना सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पूर्णनिरीक्षण कार्यक्रम बाबत प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावातील बुथवर मतदार यादी पूर्णनिरीक्षण काम फार बारकाईने करावे, आणि जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात सक्रिय व्हावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

प्रदेशाध्यक्ष मा.श्री शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित जनसंपर्क ठेवून संघटन वाढविण्यावर भर द्यावा, तसेच जनतेशी संपर्क वाढवा. प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम पक्ष नेतृत्वाकडून आगामी काळात होईल, असे सांगून सक्षम विरोधक म्हणून यापुढे आक्रमक पद्धतीने जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, असेही  प्रदेशाध्यक्ष मा.श्री शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

यावेळी सातारा जिल्हा विविध संघटनाच्या निवडी केल्या. यामध्ये प्रामुख्याने युवक अध्यक्षपदी समीर घाटगे, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षपदी सचिन जाधव, युवती अध्यक्षपदी कोमल घोरपडे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्षपदी शफिक शेख, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्षपदी बाळासाहेब घोरपडे, वाहतूक विभाग सेलचे अध्यक्षपदी संजय पिसाळ, इतर मागासवर्गीय सेलचे अध्यक्षपदी अनिल लोहार तसेच कामगार सेलचे अध्यक्षपदी किरण राऊत यांच्या निवडी प्रामुख्याने केल्या तसेच काही जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी निवडी यावेळी झाल्या. उर्वरित निवडी येत्या आठ दिवसात करण्यात येणार आहेत असे बाळासाहेब पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. येऊ घातलेल्या सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत पक्षाने भूमिका घेण्याबाबत विषय मांडले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सौ.संगीता साळुंखे (माई), सौ.समिंद्रा जाधव, सौ.सुवर्णाताई पाटील, सतीश चव्हाण, नरेश देसाई, प्रवीण दसके, घनश्याम शिंदे, रमेश धायगुडे पाटील, ॲड.निलेश डेरे, संतोष पवार, नितीन शिंदे, गोरखनाथ नलवडे, अतुल शिंदे, सचिन जाधव, शफिक शेख, सागर झणझणे, अनिल लोहार, शंभू खलाटे, समीर घाटगे, नंदकुमार मोरे, डॉ.सतीश बाबर, उमेश देशमुख, नलिनी जाधव, शैलजा कदम, पूजा काळे, कोमल घोरपडे, तेजस्विनी केसरकर, बाळासाहेब खलाटे, निलेश जगदाळे, बाळासाहेब फडतरे, पूजा बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराडात शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चा ; ज्या शाळा व्यावसायिक हेतूने वह्या, पुस्तके, स्टेशनरी, बूट, ड्रेस विकत आहेत, पालकांना ठराविक दुकानातून किंवा शाळेतून साहित्य घेण्याची सक्ती करत आहेत अशा शाळांवर कारवाईची मागणी ;

वेध माझा ऑनलाइन।
ज्या शाळा व्यावसायिक हेतूने वह्या, पुस्तके, स्टेशनरी, बूट, ड्रेस विकत आहेत, पालकांना ठराविक दुकानातून किंवा शाळेतून साहित्य घेण्याची सक्ती करत आहेत अशा शाळांवर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम आणि सीबीएसइ, स्टेट बोर्डाच्या नियमानुसार त्वरीत कारवाई करावी, आदींसह विविध मागण्यासाठी कराड येथील शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेच्या वतीने सोमवारपासून उपोषण सुरु करण्यात आले आहे. 
कराड शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने  सोमवारी सकाळी अकरा वाजता दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून तेथे उपोषणास सुरुवात करण्यात आली. 
तत्पूर्वी  पदाधिकाऱ्यांच्या वतीने नायब तहसीलदार (महसूल) महेश उबारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
 व्यावसायिक हेतूने शैक्षणिक साहित्याची विक्री करणाऱ्या दोषी शाळांवर कठोर कारवाई करावी. पालकांना ठराविक दुकानातून किंवा शाळेतून साहित्य घेण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी. शाळांनी कमिशनसाठी लावलेली महागडी खासगी प्रकाशनाची पुस्तके त्वरीत बंद करावीत सीबीएसईसाठी एनसीईआरटी बोर्डाचीच पुस्तके तसेच स्टेट बोर्डासाठी बालभारतीचीच पुस्तके लावणे बंधनकारक करावीत. प्रत्येक शाळेने शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी किमान दोन महिने आधी आवश्यक पुस्तके आणि वह्यांची यादी जाहीर करावी. पालकांना शैक्षणिक साहित्य खुल्या बाजारातून कोठेही खरेदी करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे परिपत्रक शाळेने पालकांना लेखी स्वरुपात द्यावे. बेकायदेशीर विक्री करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द किंवा दंड करण्याची कारवाई व्हावी. शाळा आणि विशिष्ठ पुस्तक विक्रेते यांच्यातील आर्थिक व्यवहाराची शिक्षण विभागातर्फे चौकशी व्हावी. पालकांसाठी एक स्वतंत्र हेल्पलाईन नंबर किंवा तक्रार निवारण केंद्र कायमस्वरुपी सुरु करावे आदी मागण्यासाठीभे आंदोलन करण्यात आले.

सुप्रिया सुळेंचे व्याही भाजपकडून विधानपरिषदेच्या रिंगणात उतरणार !वडेट्टीवार म्हणाले ...विधान परिषदेची ही 100 कोटींची निवडणूक आहे , सामान्य माणूस ही निवडणूक लढू शकत नाही;

वेध माझा ऑनलाइन 
आगामी विधानपरिषद निवडणुकीत चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा विधान परिषदेच्या जागेवरुन भाजपकडून सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुप्रिया सुळे  यांनी रविवारी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना आपल्या लेकीच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका दिली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत मुलगी रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी हे उपस्थित होते. त्यानंतर भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीत अरुण लखानी यांना उमेदवारी मिळण्याच्या चर्चेने आणखीनच जोर धरला आहे. याबाबत सोमवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. 

अरुण लखानी असू देत किंवा कुठल्या दुसरे उद्योगपती असू देत, शेवटी ते उद्योगपतीच आहेत. आता तर त्यांचे संबंध मोठ्या राजकीय परिवाराशी जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला या निवडणुका आवाक्याबाहेरच्या आहेत. किमान आमच्यासारख्या तरी लोकांच्या आमच्या आवाक्याच्या बाहेरच्या दिसत आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

वडेट्टीवार म्हणाले,...

अशा निवडणुकांमध्ये व्यापारी आणि उद्योगपती पैसे गुंतवतात. अशाने या विधानपरिषद निवडणुका या कंत्राटदार आणि उद्योगपतींच्या हातात जातील. सामान्य माणूस भविष्यात विधानपरिषदेत दिसणार नाही. 
विधानपरिषदेच्या प्रत्येक मतासाठी 15 लाखांचा रेट ठरला आहे. काही नगरसेवकांना पाच लाख रुपयांचे टोकन देऊन उचलण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे योग्य माणसाची निवड होणे दूरच राहिले आहे. 

एकनाथ शिंदेंच्या आमदारांची हॉटेलात गुप्त बैठक; महत्वाची माहिती आली समोर! भाजपला बसणार धक्का !

वेध माझा ऑनलाईन।
जळगावमध्ये शिंदे गटातील आमदारांची एक गुप्त बैठक झाली आहे. एका खासगी हॉटेलमध्ये ही बैठक झाली असून तिला मंत्री गुलाबराव पाटील हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगावमधील एका खासगी हॉटेलात शिवसेना आमदारांची गोपनीय बैठक झाली आहे. या बैठकीनंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्यासह शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल पाटील उपस्थित होते. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्जा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु जळगावची जागा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या जागेवरून ते आपल्या मुलाला संधी द्यावी, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे भाजपानेही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळेच आता भाजपा आणि शिंदे गटाची रस्सीखेच सुरू असताना आता जळगावात झालेली ही गुप्त बैठक चर्चेचा विषय ठरली आहे.

काय आहे माहिती...
जळगाव विधान परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटलांसह शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचं एकमत झालं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जळगाव विधान परिषदेची जागा ही शिवसेनेलाच मिळायला पाहिजे, यावर शिवसेनेचे आमदार ठाम आहेत. महायुतीमध्ये जळगावची जागा शिवसेनेला मिळाली नाही तर भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत देऊ, असा निर्णय या बैठकीमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी घेतला आहे.
भाजपप्रमाणेच जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची देखील ताकद, त्यामुळे कुठलीही तडजोड करणार नसल्याची भूमिका या बैठकीमध्ये आमदारांकडून घेण्यात आली आहे. दरम्यान या बैठकीनंतर आता जागा शिवसेनेला द्यावी, अथवा मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी देण्याबाबतची आग्रही भूमिका मांडण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचे शिष्टमंडळ उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एलपीजी गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय ; नवा नियम लागू, …

वेध माझा ऑनलाइन।
अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील दोन्ही देशांमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. अमेरिका आणि इस्त्रायलसोबत युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यानंतर या ठिकाणी अमेरिकेनं देखील नाकेबंदी केली. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे भारतासह अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. आखाती देशांमधून होणारा कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे भारतात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा तुटवडा जणावत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता एलपीजी गॅस सिलिंडरबाबत सरकारकडून एक अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता ज्या लोकांच्या घरात पाइपलाइनच्या माध्यमातून नॅचरल गॅसचा पुरवठा होतो, त्या लोकांना एलपीजी गॅसचं सिलिंडर मिळणार नाहीये.सोमवारीच यासंदर्भात सरकारच्या वतीने आदेश जारी करण्यात आला आहे. आदेश जारी झाल्यानंतर तात्काळ प्रभावाने या निर्णयाची अमलबजावणी देखील करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार आता ज्यांच्या नावावर पीएनजीचं कनेक्शन आहे, अशा लोकांना आता एलपीजीचा पुरवठा करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. याचाच अर्थ आता एकाच व्यक्तीला एलपीजी आणि पीएनजी असे दोन कनेक्शन मिळणार नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी  सरकारकडून काही अत्यावश्यक पाऊलं उचलली जात आहेत, त्याचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Saturday, May 23, 2026

एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना ;

वेध माझा ऑनलाईन
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासकरून जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 17 पैकी 16 जागांवर सर्व पक्षांचे एकमत झालेले आहे, मात्र एका जागेवर शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी दावा केल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी सुटणार असल्याची माहिती समोर आली आहे, कारण एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत.


breaking...

ईचलकरंजी महापालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार धैर्यशील माने यांची छायाचित्रे काढून टाकल्याने वाद ;

वेध माझा ऑनलाईन।
ईचलकरंजी महापालिकेतील स्थायी समितीच्या दालनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार धैर्यशील माने यांची छायाचित्रे काढून टाकल्याने संबंधित पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना शहरप्रमुखानी याबाबत विचारणा केली त्यामुळे पालिकेत वाद निर्माण झाला आहे शिवसेनेने या सर्व प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे

Breaking news...

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आ. मनोजदादा घोरपडे यांचा पुढाकार ; कराड उत्तरसाठी तब्बल १७६ नवीन डी.पी. मंजूर ; शेतकरी व ग्रामस्थांना मिळणार मोठा दिलासा ;

वेध माझा ऑनलाइन। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी पुढाकार घेतला असून, कराड उत्तरसाठी तब्बल १७६ नवीन डी.पी. मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतीसाठी ९७ तर गावठाण अंतर्गत ७९ डी.पी. बसविण्यात येणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा पूर्णतः ग्रामीण व शेतीप्रधान भाग असून या भागातील बहुतांश नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना वारंवार मोटार ट्रिप होणे, लाईट जाणे, डी.पी. जळणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शेतीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत होते.

या समस्येची गंभीर दखल घेत आमदार मनोजदादा घोरपडे यांनी शेतातील जुने व कमी क्षमतेचे डी.पी. बदलण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या ठिकाणी ६० क्षमतेचे डी.पी. आहेत त्या ठिकाणी आता १०० क्षमतेचे डी.पी. बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे अतिरिक्त वीज भार कमी होऊन वीज पुरवठा अधिक सुरळीत व अखंडित होणार असल्याची माहिती आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

ग्रामीण भागातील गावठाण क्षेत्रातही वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून वारंवार वीज खंडित होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत होता. ही समस्या दूर करण्यासाठी गावठाण अंतर्गतही मोठ्या प्रमाणात नवीन डी.पी. बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये अतित अंतर्गत ८, खोजेवाडी अंतर्गत ८, काशीळ अंतर्गत ८, नागठाणे अंतर्गत ४, तारगाव अंतर्गत १०, किरोली अंतर्गत ११, आर्वी-नागझरी अंतर्गत ८, वाठार किरोली अंतर्गत ९, पाल अंतर्गत ६ तसेच मसूर अंतर्गत ७ डी.पी. मंजूर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कराड उत्तरमधील शेती व गावठाण परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम होऊन शेतकरी व ग्रामस्थांना मोठा लाभ होणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

शरद पवार यांनी आमदार रोहित पवार यांना दिली मोठी जबाबदारी ;

वेध माझा ऑनलाईन।
शरद पवार यांनी एक मोठी जबाबदारी नातू आणि आमदार रोहित पवार यांना दिली आहे. जबाबदारी मिळाल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे साहेबांचे आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, ज्यामुळे शरद पवार गटात अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा होती. या भेटीमुळे शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार नाराज असल्याच्या आणि पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी रोहित पवारांवर एक मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.


ती जबाबदारी कोणती ?
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड करण्यात आली असून, स्वतः रोहित पवारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. रोहित पवार मागील ६ वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेवर ‘सदस्य’ म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्याकडे उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे.
रोहित पवार म्हणाले
या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत रोहित पवारांनी पोस्टमध्ये, ‘बहुजन समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आणि आज आदरणीय पवार साहेबांच्या हाती धुरा असलेल्या ‘रयत शिक्षण संस्थे’च्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आदरणीय पवार साहेब आणि संस्थेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार! मागील गेली सहा वर्षे संस्थेवर सदस्य म्हणून आणि सर्वांना सोबत घेऊन केलेल्या कामाची ही पोचपावतीच आहे, असं मी मानतो. भविष्यातही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर चालताना आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली सर्वांच्या सहकार्याने अधिकाधिक चांगल्या कामाच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील’ असे म्हटले आहे.
दुसरीकडे, सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी शरद पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी केवळ त्यांचाच एक अर्ज आल्याने ही निवड निश्चित झाली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शरद पवारांनी संस्थेच्या भावी वाटचालीबद्दल महत्त्वाचे संकेत दिले:

Friday, May 22, 2026

...तर उद्या सकाळीच मी फाशी घेतो असे जरांगे पाटील का म्हणाले ?

वेध माझा ऑनलाइन।
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या भेटीदरम्यान मनोज जरांगे यांनी विद्यार्थ्यांची अडकलेली शिष्यवृत्ती आणि आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज या मुद्द्यांवरून महायुती सरकारला लक्ष्य केले. आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रांना काही वाईट बोललो का? मग अंतरवाली सराटीत लाठीमार का करण्यात आला होता? आम्ही पैशाने किंवा पदाने फुटत नाही… 
दरम्यान मी कोणाकडून एक रुपयाही घेतल्याचे दाखवून द्या… तसे आढळल्यास उद्या सकाळीच फाशी घेतो, असे खुले आव्हान जरांगे यांनी लाड यांना दिले. 

त्यावर मी फक्त मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे. कृपया आपण आंदोलन मागे घ्यावे, मराठ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मी स्वत:हून आमदारकीचा राजीनामा देईन, अशी विनंती लाड यांनी केली. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून आहे.

विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचा गट फुटणार !

वेध माझा ऑनलाइन।
विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा गट फुटणार, असा खळबळजनक दावा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. दिवा विझताना जसा मोठा होतो, तशीच जयंत पाटील यांची अवस्था झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. सांगली जिल्हा बँकेच्या विविध विषयावरून आमदार पडळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

सांगली महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन नगरसेवक भाजपामध्ये आलेत. यापुढेही अनेक गट जयंत पाटील यांची साथ सोडतील, असे पडळकर म्हणाले. कर्नाटकातील एका कारखान्याचे महाराष्ट्रात ऑफिस दाखवून त्यांना कर्ज देता, खासदार विशाल पाटील यांना कर्ज का देण्यात आले? पूर्वी थकीत असताना २७० कोटी कर्ज कसे देता? हे सारे प्रकार चौकशीत उघड होणार असल्यामुळे पळवाट शोधायला ते न्यायालयात गेले आहेत. जयंत पाटील यांचा पावडर लावलेला चेहरा उघडा पडणार आहे. रामाच्या मंदिरात हा रावण राहतो, हे लोकांच्या लक्षात येईल, अशी टीका पडळकर यांनी केली.

भाजपची शिवसेनाला 3 ते 4 जागा देण्याची तयारी - शिवसेनेचा 7 जागांवर ठाम राहण्याचा निर्णय ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लागलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याचं चित्र समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीत 7 जागांवर आपला ठाम दावा केला आहे. शिवसेनेने भाजपसमोर आधीच्या 5 आणि नव्याने ताकद वाढलेल्या 2 अशा एकूण 7 जागांचा अधिकृत प्रस्ताव ठेवला होता अशी माहिती समोर येत आहे. 

मात्र, भाजप कडून शिवसेनेच्या या प्रस्तावाला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. भाजपने शिवसेनाला केवळ 3 ते 4 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता शिवसेनेने 7 जागांवर ठाम राहण्याचा निर्णय घेत भाजपची कोंडी केली आहे.

या सर्व राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. सरनाईक म्हणाले, "विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. यापूर्वी धुळे, कोकण या भागांत आमचे 5 आमदार होते. आता पक्षाची ताकद वाढलेली असल्यामुळेच आम्ही 7 जागांची मागणी केली आहे. यावर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील."

एकनाथ शिंदे खवळले ; संजय शिरसाट यांना 'फोन' करून कडक भाषेत दिली समज ;

वेध माझा ऑनलाइन।
गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं चित्र आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. शिरसाट यांच्या या विधानामुळे महायुतीत खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संजय शिरसाट यांना थेट फोन करून कडक शब्दांत समज दिली असून, महायुतीत फूट पडेल असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटामध्ये अंतर्गत कलह असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना डावलून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे जात असल्याच्या चर्चांना एका व्हायरल पत्रामुळे उधाण आले होते. त्यातच सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले.
याच घडामोडींवर भाष्य करताना संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक दावा केला होता. "कोणाची काही चूक झाली या वादात्मक गोष्टी आहेत. अंतर्गत गोष्ट वेगळी, पक्षातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही लोकं आमच्या संपर्कात असून आमच्याशी बोलतात. कोणाच्या नेतृत्वात काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडला आहे हे नाकारता येत नाही, त्यांच्या पक्षात काय घडतंय हे काही दिवसांत कळेल," असे संजय शिरसाट यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला.
संजय शिरसाट यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र आक्षेप घेतला. "संजय शिरसाट आमच्या पक्षावर कसे बोलू शकतात?" असा थेट सवाल त्यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांना विचारला. तसेच, "यापूर्वी समज दिल्यानंतरही शिरसाट पुन्हा राष्ट्रवादीवर भाष्य करत आहेत. यापुढे त्यांनी असे वक्तव्य केल्यास आम्ही त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करू," असा इशारा मुश्रीफ यांनी दिला होता. 

राजकारणातील कट्टर वैरी चहाच्या निमित्ताने आले एकत्र ; सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी आज दिसले एकत्र;

वेध माझा ऑनलाईन।
स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यातील राजकीय वैर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एकेकाळी मित्र असणारे हे दोन्ही नेते आता एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र, हे दोन्ही नेते आज चक्क एकमेकांना भेटून चहाचा आनंद घेताना पाहायला मिळाले.त्यामुळे त्यांच्या भेटीची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.
यापूर्वीही राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर न्यायालयात तारखांच्या निमित्ताने एकत्र आले होते. शेतकरी संघटनेच्या आंदोलनांच्या तारखेसाठी एकत्र आलेल्या या दोघा मित्रांनी त्यावेळी मात्र एकमेकांकडे पाहणे देखील टाळले होते.
यापूर्वीही राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर न्यायालयात तारखांच्या निमित्ताने एकत्र आले होते. शेतकरी संघटनेच्या आंदोलनांच्या तारखेसाठी एकत्र आलेल्या या दोघा मित्रांनी त्यावेळी मात्र एकमेकांकडे पाहणे देखील टाळले होते
 पण आज त्यांनी पु्न्हा एकत्र येत एका टेबलावर चहा घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला.त्यामुळे राजकारणातील हे कट्टर वैरी चहाच्या निमित्ताने तरी एकत्र आल्याने उपस्थितांमध्ये एकच कुतूहल निर्माण झाले. 
पण आज त्यांनी पु्न्हा एकत्र येत एका टेबलावर चहा घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
2011 मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनातून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातून इंदापूर न्यायालयामध्ये या संदर्भातील खटला सुरू आहे, या खटल्याच्या निमित्ताने हे दोन्ही नेते तब्बल 14 वर्षांनंतर इंदापूरच्या न्यायालयात एकत्रित आले. त्यानंतर दोघांनीही एकत्रित न्यायालयामध्ये हजेरी लावली. 

गेल्या दोन वर्षात नव्याने सुरु केलेल्या नवीन ठिकाणच्या कराड अर्बन बँकेच्या शाखेतून बँकेने .४५० कोटींचा अतिरिक्त व्यवसाय मिळवला - ,चेअरमन समीर जोशी यांची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन।
दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कराड (शेड्यूल्ड बँक) या अग्रगण्य बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्रात वाढ करण्याच्या महत्त्वपूर्ण पोटनियम दुरुस्तीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सहकार विभागाने मान्यता दिली आहे. सध्या बँकेचे कार्यक्षेत्र आठ जिल्ह्यात ७२ शाखाद्वारे पसरले असून आता संपूर्ण महाराष्ट्रात बँकेला शाखा विस्तार करून महाराष्ट्रातील अनेक शहरात ग्राहक सेवेच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे बँकेच्या व्यवसाय वाढीला मोठी चालना मिळणार असून, गेल्या दोन वर्षात नव्याने सुरु केलेल्या नवीन ठिकाणच्या शाखेतून बँकेने रु.४५० कोटींचा अतिरिक्त व्यवसाय मिळवला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष समीर जोशी यांनी दिली.

बँकेने डिजीटल चॅनेलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अत्यावश्यक अशा यू.पी.आय. सारख्या सेवा दिल्या असून बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी डिजीटल माध्यमांचा वापर पर्याप्त प्रमाणात करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाने निर्णय घेतले असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना डिजीटल प्लॅटफॉर्मवरील सर्व सेवासुविधा एकत्र मिळणार आहेत, असे प्रतिपादन बँकेचे उपाध्यक्ष शशांक पालकर यांनी केले.

गेल्या शंभर वर्षांहून अधिक वाटचालीत कराड अर्बन बँकेने प्रगतीची परंपरा कायम राखत व्यवसायामध्ये गत संपलेल्या आर्थिक वर्षात रु.७५० कोटी वाढीचा विक्रम साध्य केला आहे. तसेच वसुलीच्या आघाडीवर देखील नक्त एन.पी.ए.चे प्रमाण सलग तीन वर्षे 'शून्य' टक्के राखण्यात यश मिळविले आहे. मार्च २०२६ अखेर बँकेने व्यवसायाचा रु.६५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. शून्य टक्के एनपीए कायम राखणे, व्यवसाय वाढीत सातत्य ठेवणे व बँकेचा महाराष्ट्रभर विस्तार करून बँकेचा नावलौकिक वाढविणे, हेच मुख्य ध्येय ठेवून बँकेने चालू आर्थिक वर्षात आपली वाटचाल सुनिश्चित केली आहे, अशी माहिती बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम यांनी दिली.

युध्दाच्या पार्श्वभूमीमुळे पेट्रोल व डिझेल मध्ये झालेली वाढ आणि राष्ट्रीय हित लक्षात घेता, बँकेने विद्युत गाड्या घेणाऱ्या ग्राहकांसाठी तत्काळ कर्ज पुरवठ्यासाठी कमी व्याजदराची कर्ज योजना तयार केली आहे. याअंतर्गत दुचाकी वाहनांसाठी ७.७५ टक्के तर चार चाकी वाहनांसाठी ८.२५ टक्के व्याज दराने कर्जपुरवठा केला जाणार असून हा सवलतीचा व्याजदर फक्त बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांसाठी मिळणार आहे. नव्या कर्ज योजनेचा लाभ घेऊन ग्राहकांनी राष्ट्रीय हित जोपासण्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी केले.


Thursday, May 21, 2026

माजी आमदार बाळासाहेब पाटील विधान परिषदेवर जाणार ? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून चाचपणी ?

वेध माझा ऑनलाईन।
सांगली- सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे दरम्यान संख्याबळानुसार भाजप शिवसेना व अजितदादा गटाकडून एकीकडे याठिकाणी दावा केला जात असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून बाळासाहेब पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे याअगोदर या भागात सांगलीचे मोहनराव कदम निवडून आले होते या जागेवर आता राष्ट्रवादी चा दावा होऊ शकतो
शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा याठिकाणी होत आहे असे वृत्त आहे

संस्थापक पॅनेलच्या नेत्या सौ. अर्चनाताई मोहिते यांच्यासह पॅनेलच्या उमेदवारांनी भरले अर्जे ; कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका ; काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाइन
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. 

यावेळी माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या उपस्थितीत संस्थापक पॅनेलच्या नेत्या सौ. अर्चनाताई अविनाश मोहिते यांच्यासह पॅनेलच्या उमेदवारांनी  आपले उमेदवारी अर्ज भरले.

यावेळी माध्यमांशी बोलताना कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “संस्थापक पॅनेल पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरले असून सभासदांच्या न्याय हक्कासाठी आम्ही ही लढाई लढत आहोत. गेल्या अकरा वर्षांत कारखान्यात झालेल्या गलथान कारभाराविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. सरकार आणि निवडणूक यंत्रणेकडून ही निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक व्हावी, एवढीच अपेक्षा आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पॅनेल प्रमुख सौ. अर्चनाताई मोहिते म्हणाल्या, 
आम्ही ही निवडणूक सत्ता किंवा राजकारणासाठी लढवत नाही, तर शेतकरी सभासदांच्या घामाला योग्य दाम मिळाले पाहिजे यासाठी लढवत आहोत तसेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी देखील आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, 

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार नाराज ? रोहित पवार यांची पोस्ट चर्चेत /

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत असून आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मुंबईत बैठक पार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्ष चांगलेच चर्चेत असून आधी अजित पवार गटातील नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे नाराज होते, अशा चर्चा होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मात्र यामुळे शरद पवार गटात कुरबूर सुरू झाली. तटकरे आणि पटेल यांच्या भेटीमुळे शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यातच ते आज पक्षाच्या मुंबईतील बैठकीलाही अनुपस्थित असल्यामुळे नाराजच्या चर्चांना आणखीनच उधाण आलं. मुंबईला न जाता ते पुण्यात असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि चर्चा आणखीनच रंगली.
मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळताना दिसतोय, कारण खुद्द रोहित पवार यांनीच आपलं मौन सोडत या संपूर्ण मुद्यावर भाष्य केलं आहे. रोहित पवार यांनी ‘X’ वरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून (पूर्वीचं ट्विटर) एक पोस्ट लिहीत लांबलचक स्पष्टीकरण दिलं आहे. नाराजीच्या बातम्या निराधार असल्याचं त्यांनी या पोस्टमधून स्पष्ट केलं आहे. तसेच आपण शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार असल्याचं त्यांनी यातून नमूद केलं आहे.

रोहित पवार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला !! कारण अद्याप गुलदस्त्यात!

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील तीन बड्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर लगेचच राष्ट्रवादीतील आणखी एका वरिष्ठ नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. पार्थ पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
यानंतर मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवारदेखील रवाना झाले. ते मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं समोर आलं. मात्र ही भेट नेमकी कोणत्या कारणावरून घेतली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अनेकदा अशा भेटींनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडतात, त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांच्याच नजरा वळल्या आहेत. काहीवेळा ही भेट फक्त औपचारिक भेट देखील असते. एकूणच या भेटीमागचं कारण अजून गुलदस्त्यातच आहे.

मोठी बातमी ; रोहित पवार म्हणाले...जर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलिनीकरण होऊन एनडीएसोबत गेला तर मी दुसरा पर्याय निवडणार , भाजपसोबत जाणार नाही,;

वेध माझा ऑनलाईन।
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असून, राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत जाऊ शकतो अशी चर्चा अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झाली होती. अखेर बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आहे की नाही? यावर पक्षाच्या वरिष्ठांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. यावर अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी  शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.पक्षाचं विलिनीकरण होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या बैठकीला शरद पवार यांची देखील उपस्थिती होती, मात्र यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया त्यावेळी दिली नाही, परंतु शरद पवार यांच्यासमोरच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये बोलताना रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

विलिनीकरणाची चर्चा आता थंड झाली आहे, परंतु तरी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीये, तुम्ही एकटे सोडले तर राष्ट्रवादी शरद पवार गटातील इतर कोणताही नेता सरकारवर फार काही टीका करताना दिसत नाहीये, त्यामुळे लोकांना अजूनही असं वाटतं की मागच्या दाराने चर्चा सुरू आहे, समजा विलिनीकरण होऊन राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत गेला तर तुमची भूमिका काय असणार? असा प्रश्न यावेळी रोहित पवार यांना विचारण्यात आला होता.
या प्रश्नला उत्तर देताना रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. जर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलिनीकरण होऊन एनडीएसोबत गेला तर मी दुसरा पर्याय निवडेल, इतर पर्याय निवडेल पण भाजपसोबत जाणार नाही, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.  रोहित पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही काँग्रेससोबत जाणार का? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, मात्र या प्रश्नावर बोलणं त्यांनी टाळलं. मी बघेल दुसरा पर्याय निवडेल परंतु मी भाजपसोबत जाणार नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.


कृष्णे ची निवडणूक वन- साईड जिंकणार ; डॉ सुरेश भोसलेंना विश्वास ; म्हणाले... कृष्णा कारखान्याचे विस्तारीकरण व नूतनीकरण केले ;उच्चांकी दर दिला; कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पगारवाढ दिली ; सभासदांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे;

वेध माझा ऑनलाईन।
गेल्या 5 वर्षात कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळाले उच्चांकी ऊसदर आम्ही दिला कामगारांना वेळोवेळी पगारवाढ दिली अशा अनेकबाबी यशस्वीपणे करत आम्ही सभासदांना देखील सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे कारखान्याचे एक्सपानन्शन केले आहे गाळप क्षमता वाढवली आहे विस्तारीकरण तसेच नूतनीकरण देखील आम्ही कारखान्यात केलेलं आहे या व अशा बाबींमुळे कारखाना राज्यात अववल क्रमांकावर आहे त्यामुळे यावेळच्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही मागच्या वेळेप्रमाणे वन-साइड निवडून येऊ... असा विश्वास डॉ सुरेश भोसले यांनी आज व्यक्त केला

आज गुरुवारी दुपारी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते  यावेळी आमदार डॉ अतुल भोसले यांच्यासह कराडचे भाजपचे नगरसेवक आजी माजी पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी आमदार डॉ अतुल भोसले म्हणाले डॉ सुरेश भोसलेंच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याची वेगळी अशी ओळख राज्यात निर्माण झाली आहे राज्यात साखर कारखानदारीत उच्चांकी दर देणारा आपला कारखाना आहे  कृष्णा कारखान्याची राज्यात अव्वल साखर कारखाना म्हणून देखील ओळख आहे यावेळच्या निवडणुकीत सहकार पॅनेलचा मोठा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त करत, जे कोणी कृष्णेच्या विजयात वाटेकरी राहण्यासाठी प्रयत्न करतील त्या सर्वांना कृष्णेच्या प्रवाहात सन्मानाने कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी देण्याचा आमचा मानस आहे सुरेशबाबांच्या नेतृत्वात सहकार पॅनेलच्या विजयाची घौडदौड कायम राहणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला

Tuesday, May 19, 2026

सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना पाठवण्याची तयारी सुरू ;

वेध माझा ऑनलाइन
सुनेत्रा पवार या विधानसभेच्या सदस्य झाल्याने त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठवण्याची तयारी पक्षाकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे

लोकसभा निवडणुकीपासून छगन भुजबळ दिल्लीच्या राजकारणात जाण्यास इच्छुक होते. स्वत: भाजपचे जेष्ठ नेते अमित शहा यांनी त्यांचे नाव लोकसभेसाठी पुढे केले होते. मात्र, त्यावेळी महायुतीच्या वाटाघाटीचा घोळ सुरु होता, त्यातून जास्त उशीर झाल्याने भुजबळांनीच उमेदवारी करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आता याही वेळेला त्यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे. मात्र, सध्या ते राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत मंत्रीपद सोडून ते राज्यसभेचा पर्याय स्वीकारतील का, हा पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न आहे.
यावर मंत्री छगन भुजबळ यांनीच माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. मी ज्येष्ठ मंत्री आहे. त्यामुळे मला राज्यसभेवरच पाठवा असा आग्रह धरणं चुकीचं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं होतं. परंतु पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असही छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. त्यामुळे पक्षाने निर्णय घेतल्यास भुजबळांना दिल्लीला जावे लागेल अशी शक्यता आहे. परंतु भुजबळांना पक्षाकडून विचारणा न झाल्यास भुजबळ स्वत:हुन राज्यसभेवर जाण्याची मागणी करण्याची शक्यता यावेळी जवळपास नाही. कारण त्यांच्यासाठी मंत्रिपद अधिक महत्वाचं आहे.

Monday, May 18, 2026

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांचा उमेदवारी अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
रेठरे बुद्रुक (शिवनगर) तालुका कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज पासून  उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. २२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ जून असून २१ जून ला मतदान तर २३ जूनला मतमोजणी होणार आहे. 
आज पहिल्या दिवशी सोमवारी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांनी गट क्रमांक २ काले-कार्वे उत्पादक सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत कारखान्याचे संचालक जगदीशदादा जगताप, कराड पंचायत समितीचे सदस्य पै. धनंजय पाटील आदींसह कारखान्याचे माजी संचालक, सहकार पॅनलचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे यांनी टेंडर मिळवण्‍यासाठी झटणाऱ्या नगरसेवकांचा घेतला समाचार ; सभागृहात शिस्‍त पाळण्‍यासह दुजाभाव न करता एकोप्‍याने राहण्याच्या केल्या सूचना ;

वेध माझा ऑनलाइन
सातारा पालिकेच्‍या सभागृहात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी त्‍यांचे नेतृत्‍व मानणाऱ्या नगरसेवकांची बैठक घेतली. बैठकीत त्‍यांनी नगरसेवकांना सभागृहात शिस्‍त पाळण्‍यासह दुजाभाव न करता एकोप्‍याने राहण्‍याच्‍या सूचना केल्‍या. याच बैठकीदरम्‍यान त्‍यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्‍याशी चर्चा करण्‍याचे संकेत दिले.दरम्यान यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी टेंडर मिळवण्‍यासाठी झटणाऱ्या नगरसेवकांचाही समाचार घेतला


सातारा पालिकेच्‍या नुकत्‍याच झालेल्‍या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्‍यात वाद झाला होता. या वादामुळे पालिकेतील बेबनाव, कुरघोड्या, जिरवाजिरवीच्‍या राजकारणाच्‍या चर्चेला उधाण आले होते. याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्‍यांचे नेतृत्‍व मानणाऱ्या नगरसेवकांची बैठक घेत मते जाणून घेतली होती
या बैठकीत देखील उदयनराजेंसमोर मोठ्या प्रमाणात खदखद समोर आली होती. याच अनुषंगाने रविवारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठक घेत नगरसेवक, पदाधिकारी तसेच इतरांची मते जाणून घेत वादामागील नेमक्‍या मुद्द्यांची माहिती करून घेतली. यानंतर त्‍यांनी नगरसेवकांचे कान टोचत त्‍यांना सभागृहात शिस्‍त बाळगण्‍यासह सर्वांचा आदर राखण्‍याचा सल्‍ला देत झालेला प्रकार चुकीचा असल्‍याचे सांगितले.
याचवेळी त्‍यांनी सर्व नगरसेवक भाजपाच्‍या चिन्‍हावर निवडून आले असल्‍याने आघाडी किंवा इतर भेद बाळगणे चुकीचे असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. यापुढील काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्‍पष्‍ट करत शहरातील विकासकामांवर भर देण्‍याचे तसेच टेंडर मिळवण्‍यासाठी झटणाऱ्या नगरसेवकांचाही समाचार घेतला. बैठकीत नगरसेवकांनी प्रशासन सहकार्य करत नसल्‍याचा उपस्‍थित केलेल्‍या मुद्द्यावर लवकरच तशा सूचना देत प्रशासनासमवेत बैठक घेण्‍याचेही जाहीर केले

Saturday, May 16, 2026

कृष्णा कारखाना निवडणुक कार्यक्रम जाहीर ; 21 जूनला मतदान; 23 जूनला मतमोजणी ;

वेध माझा ऑनलाईन।
सातारा- सांगली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे 

सोमवार (दि 18 ) पासून
अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे 21 जूनला मतदान होणार आहे तसेच
23 जूनला मतमोजणी होईल,अशी माहिती  निवडणूक अधिकारी अपर्णा यादव यांनी दिली आहे

Wednesday, May 13, 2026

वेध माझा ऑनलाईन
साहित्य, संस्कृती आणि लोककलेचा संगम अनुभवण्याची संधी कराडकरांना २४ मे रोजी मिळणार आहे. येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने स्व.सौ. वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्व.सौ. वेणूताई चव्हाण स्मृती मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सोमवार पेठेतील नव्या श्री कृष्णाबाई प्रीतिसंगम सांस्कृतिक हॉलमध्ये सकाळी १० वाजता या संमेलनाचा शुभारंभ होणार आहे.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी चेअरमन राजन वेळापुरे, उपाध्यक्ष अनिल सोनावणे, संचालक अरुण जाधव, संजीव मोहिरे, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे, तसेच समन्वयक प्रा. अशोककुमार चव्हाण उपस्थित होते.

या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत भूषविणार आहेत. उद्घाटक म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथील कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून कराड तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सूरज जमदाडे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार साळुंखे सहभागी होणार आहेत.

संमेलनात दिवसभर विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कथाकथनकार हिम्मत पाटील यांचे कथाकथन रंगणार आहे. त्यानंतर रेडिओ व दूरदर्शनवरील लोकप्रिय शाहीर कळसकर भेदीक शाहीर मंडळ, कवठे यांचा शाहिरी कार्यक्रम सादर होईल. पुढील सत्रात प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांचा ‘गझल रंग’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. तर समारोपानंतर प्रसिद्ध दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांच्या दमदार दंगल कवितांनी संमेलनाची सांगता होणार आहे. कराड, पाटण आणि परिसरातील सुमारे ४०० साहित्यप्रेमी या संमेलनास उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सकाळी ८.३० ते १० या वेळेत संमेलनस्थळी नोंदणी करावी. नोंदणीनंतर उपस्थितांना ओळखपत्र देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेस संचालक डॉ. संतोष मोहिरे, शरदचंद्र देसाई, सुरेश भंडारी, राजेंद्रकुमार यादव, निरंजन मोहिरे, डॉ. जयवंत सातपुते, जयाराणी जाधव, सीमा विभुते, सुरेश कोळेकर, पारस विजापुरे तसेच संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

कराडमध्ये “सेवा अभियान” उपक्रम; शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांना मिळणार गती ; आमदार डॉ अतुल भोसले

वेध माझा ऑनलाईन।
आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए कराडमध्ये आले आहेत शिक्षकांच्या प्रश्नाबाबत असणारे शासन स्तरावरचे काही प्रश्न तसेच आणखी इतरही महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली त्यामुळे नक्कीच कराडमध्ये “सेवा अभियान” उपक्रम अंतर्गत शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांना गती मिळणार आहे आणि याचा नक्कीच फायदा या ठिकाणच्या शिक्षक मतदार संघासाठी महायुतीला नक्कीच होईल असा विश्वास आमदार अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे

शिक्षक व पदवीधर मतदार संघातील विविध प्रश्नांवर संबंधित लोकांशी चर्चा झाल्यानंतर आमदार भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

कराडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पी. ए. संतोष साखरेंनी पत्रकार परिषद बोलावली...पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करताच पत्रकार परिषदेतून त्यांनी चक्क पळच काढला...!!

वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधरांची प्रलंबित शासकीय कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सेवा अभियान कार्यक्रमाचे आयोजन आज हॉटेल फर्न, कराड येथे करण्यात आले होते यानिमित्ताने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक पत्रकारांशी संवाद साधणार असे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्ष प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली...आणि  पत्रकारांच्या प्रश्नाच्या माऱ्यापुढे उत्तरे देता न आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे पी ए साखरे हे तिथून अक्षरशः पळून गेले... 

त्याचे झाले असे की...
आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए श्री संतोष साखरे पत्रकार परिषद घेणार  असा निरोप होता...शिक्षकांच्या प्रश्नावर ते बोलणार असंही सांगण्यात आले होते...त्यांच्याबरोबर शिक्षक संघटनेचे काही पदाधिकारी देखील उपस्थित होते...प्रत्यक्षात पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा मात्र पत्रकारांच्या प्रश्नावर त्या संघटनेचे कोणीही पदाधिकारी किंवा स्वतः रवींद्र चव्हाण यांचे पी ए काही बोलू शकले नाहीत...त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडिमाराचा अंदाज घेत त्याठिकाणहुन पळून जाणे पसंत केले...

काही महिन्यांपूर्वी साताऱ्या जिलह्यात काही शिक्षकांनी विद्यार्थीनीशी केलेल्या काही गैर वागणुकीबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या... त्यावर चर्चा देखील झाल्या...मात्र तुमची कोणतीच भूमिका  त्यावेळी स्पष्ट दिसली नाही.. याबाबत तुम्ही आज भूमिका स्पष्ट करा...जसे... तुम्ही शिक्षकांच्या प्रश्नावर बोलता तसे शिक्षक चुकीचे वागतात त्यावरही तुम्ही बोललं पाहिजे...असे पत्रकारांनी विचारले असता...पत्रकार परिषदेत उपस्थित रवींद्र चव्हाण यांच्या पी ए ना याबाबत काहीच माहीत नाही असे दिसून आले...काहीही माहिती नसताना उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी तिसरच बरळत त्यांनी थातूरमातूर उत्तरे द्यायला सुरुवात केली...प्रॉपर काही माहिती नसताना माहिती घेऊन त्याविषयी बोलू...अशी भूमिका न घेता उगाचच फालतू बडबड करत त्यांनी वेळ घालवायला सुरुवात केली...हे पत्रकारांच्याही लक्षात आले...

त्यानंतर...
सातारा जिल्ह्यात व राज्यात दिव्यांग शिक्षकांचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून  आरोग्य विभागाने  दिव्यांग ठरवलेले शिक्षक आता ठरवले आहेत.   अनेक शिक्षक या विरोधात कोर्टात दाद मागत असून याकडे प्रशासन ठोस उपाययोजना करता दिसत नाही. त्यामुळे वर्षभरापासून या कोर्टात गेलेल्या शिक्षकांना बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागली आहे. या शिक्षकांच्या बदलीबाबत प्रशासनाने ठोस भूमिका अद्याप घेतलेली नाही... याहीविषयी त्यांना विचारले असता...याबाबतही ते काही उत्तर देऊ शकले नाहीत...पुन्हा काहीतरी फालतू बडबड करू लागताच... ही पत्रकार परिषद घेतलेल्या रवींद्र चव्हाण यांच्या पी ए ना याबाबतही काहीच माहिती नाही हेही पत्रकारांच्या लक्षात आले...मग... काही माहिती नसताना उगीचच वेळ जात नाही... म्हणून पत्रकारांशी संवाद साधत आहात का? शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या मार्केटिंगसाठी तुम्ही इथे आलाय का? असे अनेक विषय त्याठिकाणी चर्चेत येऊ लागतच... संतोष साखरे यांनी थातूरमातूर कारण सांगून पत्रकार परिषदेमधून अक्षरशः पळ काढला... 

त्यावेळी पत्रकारांनी त्यांना अडवून...तुम्ही पत्रकार परिषद बोलावली आहे...आणि तुम्हीच अस मधून पळून जाताय... हे बरोबर नाही...असे त्याना सुनावले असता.... फालतू कारण सांगून ते निघून गेले...

ज्या विषयी पत्रकार परिषद घेतली आहे...त्या विषयीची प्रॉपर माहिती आपल्याला नाही...यापुढे आपण पत्रकारांना उत्तर देऊ शकणार नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि म्हणूनच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए चक्क पत्रकारांसमोरच पळून गेले...त्यामुळे ही पत्रकार परिषद त्याठिकाणीच थांबली...
आज


सातारा जिल्ह्यात व राज्यात दिव्यांग शिक्षकांचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून  आरोग्य विभागाने  दिव्यांग ठरवलेले शिक्षक आता ठरवले आहेत.   अनेक शिक्षक या विरोधात कोर्टात दाद मागत असून याकडे प्रशासन ठोस उपाययोजना करता दिसत नाही. त्यामुळे वर्षभरापासून या कोर्टात गेलेल्या शिक्षकांना बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागली आहे. या शिक्षकांच्या बदलीबाबत प्रशासनाने ठोस भूमिका अद्याप घेतलेली नाही

Tuesday, May 12, 2026

ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांचा कराड नगरपालिकेतर्फे मानपत्र देऊन सन्मान ;


वेध माझा ऑनलाईन।
ज्येष्ठ साहित्यिक  श्रीनिवास कुलकर्णी यांना कराड नगरपालिकेतर्फे मानपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व शहरातील आजी माजी नगरसेवक मुख्याधिकारी उपस्थित होते 

श्रीनिवास कुलकर्णी यांना राज्य शासनाच्या वतीने साहित्य क्षेत्रातील मानाचा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेदेण्यात आला आहे. यानिमित्त कराड नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत कृलकर्णी यांच्या अभिनंदनाचा ठराव करून मानपत्र देण्याचा निर्णय घेतला होता.

मंगळवारी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे,लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी शहरातील आजी- माजी नगरसेवकांसाहित श्रीनिवास कृलकर्णी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन मानपत्र प्रदान केले, स्मृतिचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. 

सन्मानाबद्धल प्रतिक्रिया व्यक्त करताना उदयन कुलकणी म्हणाले की, वडीलश्रीनिवास कलकर्णी हे नोकरीच्या निमित्ताने कराडला आले. १९६५ साली त्यांची डोह ही कादंबरी प्रकाशित झाली, ती बाचून यशवंतराव चब्हाण यांनी त्यांनाबोलावून घेतले, पूढ़े हा स्नेह वाढत गेला. कुलकर्णी यांच्या कादंबरीस पहिला राज्यपुरस्कार मिळाला, त्याविळी तत्कालीन नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांनी त्यांचानगरपालिकेतर्फ सत्कार केला. आज पुन्हा नगरपालिकेतर्फ सत्कारा होत आहे.यशबंतराव च्हाण याच्यामुळेच बडिलांना धर मिळाले कराडशी आमचा ऋणकायम राहिला आहे.

राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, श्रीनिवास कुलकर्णीं हे कराड शहराच्या साहित्य क्षेत्रातील अमूल्य ठेवा आहेत. त्यांची साहित्य क्षेत्रातील कामगिरी शहरासाठीगौरवास्पद आहे. उत्तम साहित्यकृती त्यांनी निर्माण केल्या. शहरातील दोन साहित्यसंमेलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता, त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदानमूषणावह असून शासनानेही त्यांचा उचित सन्मान केला आहे.कराड नगरपालिकेनेही शहराच्या या सुपुत्रास मानपत्र देऊन गौरविले आहे.

 सौरभ पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले

नीट पेपरफुटीचे नाशिक कनेक्शन आलं समोर ; राज्यात खळबळ ; परीक्षा रद्द ;

वेध माझा ऑनलाईन
नीट पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन समोर आलं आहे. केरळ आणि राजस्थान पाठोपाठ आता नाशिक कनेक्शन देखील असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नीट पेपर ३ मे रोजी पार पडला, मात्र तो पेपर ४२ तास आधीच विद्यार्थ्यांच्या व्हाट्स अप आणि टेलिग्रामवर आला होता.600 मार्कांचा पेपर एकदम तंतोतंत असल्याचं समोर आलं होतं. यामुळे आता पेपर लीक प्रकरणी नीट परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

हे नाशिक कनेक्शन आहे काय ?

फुटलेल्या पहिल्या पेपरची कॉपी ही नाशिकमध्ये पोहोचली आणि तिथून हरियाणापर्यंत गेल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकमध्ये ही पेपरफुटी झाली पहिली प्रत तयार झाली आणि इतर ठिकाणी या प्रती पोहोचवण्यात आल्या होत्या.नाशिकमध्ये पुन्हा हे कांड समोर आल्यानं खळबळ उडाली आहे  3 मे रोजी झालेल्या पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा झाली. राजस्थानमध्ये परीक्षेच्या एक दिवसआधी एक गेस पेपर बाहेर आला. गेस पेपरमधील तब्बल 125 प्रश्न नीट पेपरमध्ये आले. फिजिक्स आणि बायोलॉजी विषयांतील अनेक प्रश्न जुळले.
परीक्षेच्या दिवशीच राजस्थानच्या सीकर पोलिसात तक्रार दाखल केली. विद्यार्थ्यांनी पुराव्यांसह एनटीएकडे तक्रार केली. एनटीएकडून राजस्थानच्या डीजीपींना पत्र देण्यात आलं. स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपनं चौकशी सुरू केली.
विद्यार्थ्यांच्या मोबाईल चॅट आणि पुराव्यांची चौकशी केली. या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी 10 हून अधिक लोक ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.


कराडात किरण मुळे मित्र परिवाराच्या वतीने प्रभाग 10 मधील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव ; विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व भेटवस्तू प्रदान ;

वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या वॉर्ड क्रमांक 10 मधील दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भाजपचे कार्यकर्ते व आमदार अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक किरण मुळे मित्र परिवाराच्या वतीनेभेटवस्तू व सन्मानपत्र देऊन या विद्यार्थ्यांचा  गौरव करण्यात आला. 
यावेळी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देण्यात आली.
तुमचे हे यश असेच उंच भरारी घेत राहो,
आणि आयुष्यातील प्रत्येक ध्येय तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करो, अशा शुभेच्छा देखील किरणं मुळे मित्र परिवाराच्या वतीने या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या
किरण मुळे मित्र परिवाराने राबवलेल्या या उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे

राष्ट्रवादीच्या नव्या यादीतून प्रफुल पटेल यांना डावललं?

वेध माझा ऑनलाईन।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेषतः पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे नाव पदाधिकाऱ्यांच्या नव्या यादीत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
“एवढ्या सिनिअर माणसाला तुम्ही घेतलं कसं नाही, हा प्रश्न मी आज विचारतो,” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी प्रफुल पटेल यांना डावलण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या नव्या पदाधिकारी यादीत अनेक बदल करण्यात आले असून, त्यात काही जुन्या नेत्यांना स्थान न मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, प्रफुल पटेल यांचे नाव वगळण्यामागे नेमके कारण काय, याबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या ; ईडीचं समन्स? साडेपाच तासांची चौकशी ; चौकशीत काय घडलं?

वेध माझा ऑनलाईन।
भोंदू अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला, इतकेच नाही तर अनेकांच्या जमिनीही हडपल्या. या प्रकरणात राजकीय कनेक्शन उघड झाल्यानंतर काही नेत्यांवर मोठे आरोप झाले. शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून काहींचे थेट खरातशी व्यवहारिक संबंध समोर आल्याचं सांगितलं जात होतं. या दरम्यान महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या चौकशीची सातत्याने मागणी होत होती. दोन दिवसांआधी त्यांची तब्बल साडेपाच तास एसआयटी चौकशी सुरु होती. यानंतर आता सूत्रांकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स जारी झाल्याची माहिती आहे. इतकेच नाही तर पदाचा गैरवापर करुन आर्थिक व्यवहार झाले का, याचा सखोल तपास होणार आहे. सूत्रांच्याच माहितीनुसार, शिवनिका संस्थेत सहभाग का आणि कसा झाला याबाबतही चौकशी होणार असं समोर आलं आहे. 

Monday, May 11, 2026

राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयरोजगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी इम्रान मुल्ला ;

वेध माझा ऑनलाइन
राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयरोजगर  संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी इम्रान मुल्ला यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महारुद्र तीकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत कराडमध्ये श्री मुल्ला याना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यापूर्वीच्या त्यांच्या कामाची दखल घेत संघटनेकडून त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला याच अनुषंगाने कराड येथे संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय अध्यक्ष श्री महारुद्र तीकुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी त्यांच्या नावाची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. 

इम्रान मुल्ला हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत त्यांचे कार्य सर्वश्रुत आहे समाजासाठी आपण काही देणे लागतो या नियमाने ते सर्वत्र कार्यरत असतात त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे त्यांची अनेक सामाजिक कार्ये लोकांच्यात चर्चेची असतात त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी केलेले आत्मदहन आंदोलन रस्ता रोको आंदोलन बेरोजगार युवक युवतीच्या न्याय हक्कासाठी बँक ऑफ महाराष्ट्रला लावलेले टाळे ठोक आंदोलन तसेच बेमुदत प्राणांतिक उपोषण नोकरी संदर्भात केलेले बेमुदत प्राणांतिक उपोषण याचा नेहमीच उल्लेख केला जातो
यावर्षी झालेली नगराध्यक्ष पदाची कराडची निवडणूक त्यांनी लढवली व त्यानी आपला लढवईया स्वभाव शहराला दाखवला आहे
या संघटनेत त्यांचा प्रवास तालुकाध्यक्ष पदावरून जिल्हाध्यक्ष ते आता राज्यअध्यक्ष असा झाला आहे हा त्यांचा प्रवास खरोखरच त्यांनी केलेल्या संघर्षाची पावती आहे आणि म्हणूनच याच त्यांच्या संघर्षाची दखल घेत कराड येथे या संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तिकुंडे यांनी त्यांच्या नावाची घोषणा करून त्यांना प्रदेशाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र दिले. इम्रान मुल्ला यांचे यानिमित्ताने सर्वत्र अभिनंदन होत आहे


कराडच्या युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने येत्या गुरुवारी (14 मे ला) आरोग्य तपासणी व विविध शासकीय योजनांच्या विशेष शिबिराचे आयोजन ; जास्तीत जास्त लोकांनी शिबिराचा लाभ घ्या ; आयोजक सुदर्शन पाटसकर यांचे जनतेला आवाहन ;

वेध माझा ऑनलाईन।
कराडच्या युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष विष्णू पाटस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या गुरुवारी (10 मे ला) सकाळी 10 ते 3 या वेळेत आरोग्य तपासणी व विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लोकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक व भाजप चे राज्याचे सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांनी दिली या कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते होणार आहे
सदर कार्यक्रमात डी वाय एस पी राजश्री पाटील प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे तहसीलदार कल्पना ढवळे व मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे

गुरुवारी 14 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून या शिबिरास सुरुवात होईल  यामध्ये होणाऱ्या आरोग्य शिबिरामध्ये डोळे तपासणी, दंत तपासणी,  रक्तदाब, मधुमेह, तसेच सामान्य वैद्यकीय तपासणीसह आयुष्यमान कार्ड तसेच आभा कार्ड या आरोग्य सुविधांचा समावेश आहे या सर्व सुविधांचा आवश्यक लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

तसेच शासकीय योजनांमध्ये सेतू विभाग , पुरवठा विभाग,(रेशन),संजय गांधी शाखा विभाग, कामगार विभाग, एस टी महामंडळ विभाग तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या सर्व लोकोपयुक्त योजनांचा समावेश आहे याही सर्व योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे

युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने येत्या गुरुवारी (दि 14 मे रोजी) पार पडणाऱ्या
या शिबिराचे आयोजक युवा नेते सुदर्शन पाटसकर हे आहेत तर नगरसेविका तेजश्री पाटसकर यांची या शिबिराची संकल्पना आहे तर प्रतिष्ठांनचे अध्यक्ष विष्णू पाटसकर यांचे सदर शिबिरासाठी मार्गदर्शन लाभले आहे 

तरी सर्वांनी या शिबिरांचा एकाच छत्राखाली लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सुदर्शन पाटसकर यांनी केले आहे

Sunday, May 10, 2026

भोंदू अशोक खरात प्रकरण एका वर्षाआधीच जगासमोर आणणाऱ्या दत्तात्रय खेमनार या पत्रकाराची चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी ;

वेध माझा ऑनलाईन ।
भोंदू अशोक खरातमुळे राज्याची अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिमा पार धुळीस मिळाली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची त्याने मोठी फसवणूक केली आहे. कोट्यवधींचा अनेकांना गंडा घातला आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करण्यात आले होते. 

दरम्यान हे प्रकरण एका वर्षाआधीच जगासमोर आणणाऱ्या दत्तात्रय खेमनार या पत्रकारांनी चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, 
जेव्हा त्यांच्या वृत्तपत्राने ही बातमी छापली, त्यावेळी चाकणकरांनीच प्रकरण बंद करण्यासाठी दबाव टाकला होता. त्यांनी एका पत्रकाराला प्रकरण जगासमोर आणल्यामुळे त्रास दिला, असेही ते म्हणाले.

पुढे दत्तात्रय खेमनार यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणातील अनेक पुरावे त्यांनी एसआयटीकडे दिले आहेत. त्यामुळे चाकणकरांना लवकरात लवकर सहआरोपी करावे.

भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची नाशिक एसआयटीसमोर चौकशी सुरू

वेध माझा ऑनलाइन।
भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची नाशिक एसआयटीसमोर चौकशी सुरू झाली आहे. आज सकाळी चाकणकर यांनी पुण्याहून नाशिकला जात तपास यंत्रणेसमोर हजेरी लावली. रूपाली चाकणकर या वकिलांसोबत चौकशीसाठी पोहचल्या. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता असा आरोप आहे. त्याशिवाय खरात यांच्या शिवानिका संस्थाच्या विश्वस्तपदी रूपाली चाकणकर होत्या. त्यामुळे आर्थिक व्यवहारांबाबतही चाकणकर यांची चौकशी करण्यात येत आहे.

एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते या रूपाली चाकणकर यांची चौकशी करत आहेत. खरातशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत ही चौकशी होत आहे. या चौकशीला हजर होण्यापूर्वी चाकणकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, आज जो एसआयटीचा तपास सुरू आहे, त्यांना काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. ती देण्यासाठी मी आली आहे. तपासात माझे पूर्णपणे सहकार्य राहील. तपास यंत्रणेला जी काही मदत लागेल ती निश्चितपणे केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.

खासदार निलेश लंके यांची प्रकृती बिघडली ; पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल ; त्यांची प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहीती आली समोर ;

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती बिघडली आहे, त्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
त्यांची प्रकृती सध्या सुधारली असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे

Saturday, May 9, 2026

सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात ;

वेध माझा ऑनलाईन।
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. मुंबई-पुणे मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. गाडीतील सर्वजण सुखरूप आहेत अशी माहिती आहे. यानंतर रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घ्या असं आवाहन त्यांनी केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मागून येणाऱ्या एका गाडीने सुळे यांच्या कारला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने गाडीतील प्रवासी सुखरूप आहेत.

अचानक झाला बॉम्बस्फोट, 15 पोलिस अधिकारी ठार ; प्रचंड हाहाकार!

वेध माझा ऑनलाईन
पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका करत आहे. मात्र, त्यांना मध्यस्थी करण्यात अपयश मिळाले. अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानचे संबंध तणावात आहेत. सीमेवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सीमेवर प्रचंड तणाव आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने मोठा हल्ला अफगाणिस्तानमध्ये केला. त्यामध्येच आता अजून एक खळबळ उडवणारी बातमी पाकिस्तानमधून येत आहे. शनिवारी पाकिस्तानमधील बन्नू येथे झालेल्या एका प्राणघातक हल्ल्याने पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा हादरली आहे. मोठा बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर लगेचच पाकिस्तानी पोलिसांना टार्गेट करत हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तब्बल 15 पेक्षा अधिक पोलिस अधिकारी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. हा हल्ला अफगाण सीमेजवळील खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या बन्नू जिल्ह्यात झाला.

कृष्णा कारखान्याच्या कामगारांना १४.९१ टक्के पगारवाढ ; चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा निर्णय; कामगार वर्गात समाधानाचे वातावरण

वेध माझा ऑनलाईन।
येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी कामगार हिताला प्राधान्य देत, एप्रिल २०२६ पासून कामगारांना तब्बल १४.९१ टक्के पगारवाढ दिली आहे. चेअरमन डॉ. भोसले यांनी गेल्या ११ वर्षात तब्बल ७ वेळा कामगारांना पगारवाढ दिली असून, यामुळे कामगार वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कृष्णा कारखान्याने ऊस गाळप, साखर उत्पादन, तंत्रज्ञानाचा वापर आणि आर्थिक व्यवस्थापन यामध्ये सातत्याने प्रगती साधताना कामगार कल्याणालाही प्राधान्य दिले आहे. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी कारखान्याच्या प्रगतीत कामगार-कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी वेळोवेळी कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. गेल्या ११ वर्षात कामगारांसाठी विविध उपक्रमांच्या आयोजनासह, वैद्यकीय, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत चांगली पगारवाढ देण्याबाबत वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. 

चेअरमन डॉ. भोसले यांनी सन २०१६ ते २०२५ या कार्यकाळात कामगारांना ६ वेळा पगारवाढ केली. नुकतीच त्यांनी सातव्यांदा पगारवाढ देत, एप्रिल २०२६ पासून कामगारांना १४.९१ टक्के पगारवाढ दिली आहे. यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच कारखान्याविषयी कामगार वर्गात आत्मीयता आणि विश्वास वृद्धिंगत झाला आहे. 


डॉ सुरेश भोसले म्हणाले...
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच, कामगारांच्याही हिताचा विचार करणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. गेल्या ११ वर्षांत सातत्याने पगारवाढ देऊन आम्ही कामगारांच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लावण्याचे काम केले आहे. येत्या काळातही कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचा आमचा मनोदय आहे.
----------------------------------------------------------
गेल्या ११ वर्षात ७ वेळा पगारवाढ
जानेवारी २०१६ : ९.९३ टक्के
नोव्हेंबर २०१६ : २०.५६ टक्के
डिसेंबर २०१९ : १०.७८ टक्के
मार्च २०२१ : १५.६५ टक्के
ऑक्टोबर २०२३ : ११.५७ टक्के
ऑक्टोबर २०२५ : १२ टक्के
एप्रिल २०२६ : १४.९१ टक्के

एसआयटी कडून निदा खानची चौकशी सुरु ; फरार असताना कोणी मदत केली हेदेखील शोधले जाणार ;


वेध माझा ऑनलाईन
नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील महिला सुत्रधार निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. तिला लवकरच कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. 
या प्रकरणात आता एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला सहआरोपी करण्यात आले आहे. मतीन पटेलवर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याने फरार आरोपी निदा खानला ४२ दिवस घरात ठेवलं होतं.
आता याप्रकरणी एसआयटी प्रमुख संदीप मिटकेंकडून निदा खानची चौकशी सुरु आहे. आयुक्तालय कार्यालयात चौकशी सुरु झाली असून यामध्ये फरार असताना कोणी कोणी मदत केली याचीदेखील चौकशी केली जाणार आहे.