Monday, August 31, 2026

कृष्णा कालवा सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी १२५ कोटींचा निधी मंजूर

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; चार तालुक्यांतील शेतीला होणार मोठा लाभ

कराड, ता. ३१ : कराड तालुक्यासह वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यातील तब्बल १३,३६६ हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभदायक ठरणाऱ्या कृष्णा कालव्याची सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी भाजपा-महायुती सरकारने १२५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या या निधीतून कृष्णा कालव्याची आवश्यक सुधारणा, बंदिस्तीकरण तसेच काँक्रीट लायनिंगची कामे करण्यात येणार आहेत.

कृष्णा कालव्याच्या दुरावस्थेचा प्रश्न कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २६ फेब्रुवारी २०२६ रोजी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून, त्यांनी कृष्णा कालव्याच्या समस्येकडे राज्याचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन कालव्याच्या सुधारणेसाठी २०० कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. तसेच जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडेही त्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. 

विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात जलसंपदा मंत्री ना. विखे-पाटील यांच्या कराड दौऱ्यादरम्यान आमदार डॉ. भोसले यांनी त्यांच्यासमवेत कृष्णा कॅनॉलची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी कृष्णा कालव्याचे सिंचनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व, त्यावर अवलंबून असलेली चार तालुक्यांतील शेती, पाण्याची गळती व शेतीचे नुकसान तसेच कालवा बंदिस्त करण्यासाठी व त्याच्या सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या निधीची सविस्तर माहिती मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

याची गांभीर्याने दखल घेत, जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ७५ अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, तसेच १९३ पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी १५,००० कोटींच्या दीर्घ मुदतीच्या कर्जास मान्यता दिली आहे. या माध्यमातून सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे व वितरिकांच्या वितरण प्रणालीत सुधारणा करणे आदी कामांना निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत कृष्णा कृष्णा कालवा सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी मंजूर झालेला १२५ कोटींचा निधी कराडसह ४ तालुक्यातील सिंचन व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 

हा निधी मंजूर केल्याबद्दल या भागातील शेतकरी व नागरिकांमधून राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे सर्वस्तरातून आभार मानले जात आहेत. 
-------------------------

चौकट

चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा

कृष्णा कालव्याच्या सुधारणा व बंदिस्तीकरणामुळे पाण्याची गळती कमी होऊन उपलब्ध पाण्याचा अधिक प्रभावी वापर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कालव्यावर अवलंबून असलेल्या कराड, वाळवा, पलूस व तासगाव या चार तालुक्यांतील शेतीला अधिक नियमित व कार्यक्षम पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. 
----------------------------

प्रतिक्रिया

भाजपा-महायुती शासनाने कृष्णा कालवा सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा मनापासून आनंद आहे. या निधीतून कालव्याची सुधारणा, बंदिस्तीकरण आणि काँक्रीट लायनिंगची कामे होऊन पाण्याची गळती कमी होईल आणि उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करता येईल. या निर्णयामुळे चार तालुक्यांतील १३,३६६ हेक्टर सिंचन क्षेत्राला मोठा लाभ मिळणार असून, हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल मी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
- आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार जाहीरमहाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशनकडून घोषणा; १२ सप्टेंबरला होणार वितरण

वेध माझा ऑनलाइन।
ग्रामीण अर्थकारणाला चालना देत जनसामान्यांना भक्कम आर्थिक आधार देणाऱ्या, कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, १२ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 

राज्यातील सहकारी नागरी बँकांचा महासंघ असलेल्या दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनकडून दरवर्षी सहकारी बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांच्या कार्याची दखल घेत, सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने त्यांचा गौरव केला जातो. सन २०२५-२६ या वर्षासाठी कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ५०१ कोटींपेक्षा अधिक आणि १००० कोटींपर्यंत ठेवी असलेल्या बँकांच्या गटातून कृष्णा बँकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

कृष्णा सहकारी बँकेने चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठा विस्तार केला आहे. बँकेने सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत, ग्राहकांना मोबाईल बँकींगसारख्या अत्याधुनिक सोयी उपलब्ध करुन देत ग्राहकहित जपले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे अशा ४ जिल्ह्यात २७ शाखा व १ विस्तारीत कक्षाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कृष्णा बँकेला नुकतीच रिझर्व्ह बँकेकडून ठाणे, सोलापूर व रत्नागिरी जिल्ह्यात कार्यविस्तारास मंजुरी मिळाली आहे. ग्राहक सेवा, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर या चतु:सुत्रीचा अवलंब करत कृष्णा बँक आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देत आहे.

या पुरस्काराचे वितरण १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील सुंदरवाडी परिसरातील ‘एक्सप्रेस इन हेरिटेज’ येथे होणार आहे. या पुरस्कारामुळे कृष्णा बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, याबद्दल बँकेचे सर्व सभासद, संचालक मंडळ, ग्राहक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे गटाचे टेन्शन वाढल्याची चर्चा ; सुप्रीम कोर्टातील आगामी निकालामुळे शिंदे गटात खळबळ, सर्व मंत्री आणि आमदार घाबरलेत: ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा :

वेध माझा ऑनलाइन :
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुनावणी सुरूच आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे गटाचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. शिवसेना कुणाची, यावरून सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू आहे. त्याचवेळी दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रक्षा बंधनाच्या दिवशी मुंबईत आले होते. मुंबईत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संवादावरून उपहासात्मक टीका संजय राऊत यांनी केली. सुप्रीम कोर्टातील आगामी निकालामुळे शिंदे गटात खळबळ असून सर्व मंत्री आणि आमदार घाबरले असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी अमित शहा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी संजय राऊत म्हणाले, ‘ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी काल गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत शिंदेंनी अमित शहांना सांगितलं की, साहेब, आमचे आमदार आणि मंत्री फार घाबरले आहेत. सर्व जण धक्क्यात आहेत. त्यांचे साहेब म्हणाले, काय झालं? त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून अस्वस्थ आहेत’. त्यावर अमित शहा म्हणाले, ‘मी आहे, टेन्शन घेऊ नका’. गेल्या महिन्यात संसदेचं अधिवेशन सुरू असताना गद्दार खासदार हे शिंदे पुत्रांसोबत अमित शहांना भेटले. तेव्हाही दोन खासदारांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी देखील अमित शहा यांनी सर्व काही ठिक होईल, असे सांगितले. त्याची चिंता करू नका. सर्व माझ्यावर सोपवा’. देशाचं सुप्रीम कोर्ट यांच्या खिशात आहे का? उघडपणे सुप्रीम कोर्टावर भाष्य केले जात आहे. अशामुळे देशावरील न्यायव्यवस्थेचा विश्वास नष्ट होतो’.
‘अमित शहा मुंबईत येतात किंवा दिल्लीत बसतात. त्यावेळी गद्दार जाऊन भेटतात. ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची चिंता करू नका, असं म्हणतात. फडणवीसही तसंच म्हणतात. राहुल नार्वेकरही सांगतात, मी जे सांगितलं, तोच निकाल. एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री तेच सांगत आहे. आता न्यायालयांना कळवणं, हेच आमचं कर्तव्य आहे, असे राऊतांनी पुढे सांगितले.

संजय राऊत यांनी आमचा न्यायालय आणि संविधानावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. सत्य आणि धर्माचा विजय होणार असून न्यायव्यवस्था ही अधर्माच्या बाजूने जाणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. बुडत्याचा पाय खोलात, असं काल त्यांच्याबाबतीत झाल्याची टीका राऊतांनी केली.

‘चांगभलं’चे संपादक हैबतराव संपतराव आडके यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान ;

वेध माझा ऑनलाइन।
सामाजिक, पत्रकारिता, साहित्य, कला, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ९ मान्यवरांचा मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान, कराड यांच्यावतीने विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. यावेळी ‘चांगभलं’चे संपादक व पत्रकार हैबतराव संपतराव आडके यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंती व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि. २९) येथील नवीन शासकीय विश्रामगृहातील सभागृहात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा ओबीसी विभागाचे नेते भानुदास माळी, डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे, महात्मा फुले जयंती महोत्सव समिती महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अॅड. संभाजीराव मोहिते, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, नासिरभाई इनामदार, दिग्विजय सूर्यवंशी, जगन्नाथ कुंभार, देवदास माने, राहुल काळोखे, सुरेश बडेकर, भास्कर तडाके, चंद्रकांत साठे, रामभाऊ दाभाडे, माणिक अवघडे, आनंदी अवघडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुरस्कारार्थींचा शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांना ‘मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान जीवनगौरव पुरस्कार’, प्रसिद्ध कवी, लेखक व व्याख्याते दंगलकार नितीन सुभाष चंदनशिवे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार’, सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक शिरीष बाबुराव जंगम यांना ‘महात्मा फुले राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’, तर प्रा. दीपक सर्जेराव तडाखे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
तसेच मलकापूरचे नगरसेवक भीमाशंकर इराप्पा माहूर यांना ‘महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श उद्योजक पुरस्कार’, एनआयएस राष्ट्रीय कोच व कुस्ती प्रशिक्षक प्रा. पै. अमोल हरिबा साठे यांना ‘राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’, तर ‘चांगभलं’चे संपादक व पत्रकार हैबतराव संपतराव आडके यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ तर 'राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार - नितीनभाऊ आवळे यांना आणि
'राज्यस्तरीय लोकसेवा पुरस्कार - जगन्नाथ कुंभार यांना प्रदान करण्यात आला.

Saturday, August 29, 2026

नगरसेवक सुहास जगताप यांच्या पुढाकारातून साकारले ‘स्नेहाचे रक्षाबंधन’ ;

वेध माझा ऑनलाईन।
भाऊ-बहीण यांच्या अतूट प्रेमाचे आणि पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण कराड येथील रामकृष्ण गीता मंडळाच्या ज्येष्ठ महिलांनी यंदा आगळ्यावेगळ्या आणि भावनिक पद्धतीने साजरा केला. कराड नगरपरिषदेचे नगरसेवक व भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुहास भैया जगताप यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात महिलांनी एकमेकींना औक्षण करून राख्या बांधल्या आणि सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प केला.

रक्षाबंधन म्हटले की बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो, अशी आपली पारंपरिक भावना आहे. मात्र बदलत्या सामाजिक परिस्थितीत अनेक कुटुंबांतील सदस्य नोकरी, व्यवसाय, शिक्षण अथवा अन्य कारणांमुळे वेगवेगळ्या शहरांत किंवा परदेशात वास्तव्यास आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आणि बहीण प्रत्यक्ष भेटू शकतीलच असे नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही परिस्थिती अधिक जाणवते.
याच भावनेतून रक्षाबंधनाच्या सणाला सामाजिक स्नेहाचा नवा अर्थ देण्याचा प्रयत्न रामकृष्ण गीता मंडळाच्या महिलांनी केला. ‘आपणच एकमेकींच्या बहिणी आणि एकमेकींच्या आधारस्तंभ’ अशी भावना व्यक्त करत ज्येष्ठ महिलांनी एकमेकींना राखी बांधली. पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. एकमेकींना शुभेच्छा देत आनंद, समाधान आणि आपुलकीच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.
नात्यांच्या पलीकडे जपला माणुसकीचा धागा
रक्षाबंधनाचा धागा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता मैत्री, स्नेह, आपुलकी आणि परस्पर सहकार्याशी जोडण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ज्येष्ठावस्थेत एकटेपणा जाणवू नये, महिलांना एकमेकांचा भावनिक आधार मिळावा आणि सामाजिक जीवनातील त्यांचा सहभाग कायम राहावा, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश होता.
 रामकृष्ण गीता मंडळाच्या ज्येष्ठ महिलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. नगरसेवक सुहास जगताप यांच्या पुढाकारातून साकारलेले हे ‘स्नेहाचे रक्षाबंधन’ कराडकरांसाठी एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला.

Friday, August 28, 2026

आता दूध महागणार...!;


वेध माझा ऑनलाइन
मुंबईत 1 सप्टेंबरपासून दुधाच्या दरात प्रति लिटर 9 रुपयांची वाढ होणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, याचा थेट परिणाम मुंबईकरांवर होणार आहे. जनावरांच्या वाढत्या किमती आणि पशुखाद्याच्या दरात झालेली वाढ ही या दरवाढीमागची प्रमुख कारणे आहेत. यामुळे दुग्ध उत्पादक संघाला दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, असे संघाने स्पष्ट केले आहे.

सध्या मुंबईत दुधाचा घाऊक दर प्रति लिटर 93 रुपये आहे. 1 सप्टेंबरपासून ही वाढ लागू झाल्यानंतर, तो 102 रुपये प्रति लिटर इतका होईल. ही दरवाढ 1 सप्टेंबर 2026 पासून लागू होऊन 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत वैध राहील. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना दुधासाठी जास्त पैसे मोजावे लागतील, हे निश्चित आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून आशियाई पदकविजेत्या श्रीशा जाधवचे कौतुक ;

वेध माझा ऑनलाइन।
आशियाई स्तरावर कांस्यपदक पटकावत कराड, सातारा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारी कु. श्रीशा सागर जाधव ही राज्यातील खेळाडूंसाठी प्रेरणादायी आदर्श आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य संधी, सुविधा आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. Asian Short Track Speed Skating Trophy 2026 स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेल्या श्रीशाने आपल्या कुटुंबीयांसह आणि प्रशिक्षक योगेश लोंढे यांच्यासमवेत कराड येथील निवासस्थानी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी श्रीशाचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराडसारख्या शहरातील एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. अत्याधुनिक सुविधा नसतानाही श्रीशाने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. अशा खेळाडूंना शासन, क्रीडा संस्था आणि समाजाने अधिकाधिक पाठबळ देण्याची गरज आहे. भविष्यात श्रीशा आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून भारताचा तिरंगा उंचावेल, असा मला विश्वास आहे.

वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी स्केटिंगला सुरुवात केलेल्या श्रीशाने कराड येथील योगेश स्केटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षक योगेश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. रोलर स्केटिंग आणि रोलबॉलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर तिची वाटचाल आईस स्केटिंगकडे वळली. महाराष्ट्रात या खेळासाठी आवश्यक सुविधा नसतानाही तिने देहरादून येथे प्रशिक्षण घेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली.

श्रीशाच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या. नियमित सरावाचे मैदान बंद झाल्यानंतर तिने कराडमधील डांबरी रस्त्यांवर सराव सुरू ठेवला. कब्रस्तान परिसरातील रस्ता आणि वॉटर हाऊस परिसरातील रस्त्यांवर दररोज तासन्तास सराव करत तिने आपली तयारी कायम ठेवली. अत्याधुनिक सुविधा नसतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवले आणि त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवले.

१७ ते २० ऑगस्ट २०२६ दरम्यान झालेल्या Asian Short Track Speed Skating Trophy 2026 स्पर्धेत ११ वर्षांखालील ३३३ मीटर गटात कांस्यपदक पटकावत श्रीशाने ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या या यशामागे आई कल्याणी जाधव, वडील सागर जाधव, आजी अरुणाताई जाधव यांचा पाठिंबा आणि प्रशिक्षक योगेश लोंढे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.
डांबरी रस्त्यावरच्या सरावातून आशियाई पदकापर्यंत पोहोचलेली श्रीशा जाधव आज अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणेचा स्रोत ठरत आहे.

Wednesday, August 26, 2026

मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंसाठी मोठा झटका ; मुंबईत आझाद मैदान वगळता कुठेही आंदोलन करण्यास मनाई ; राज्याच्या गृह विभागाचे तातडीचे आदेश :

वेध माझा ऑनलाइन
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 1 सप्टेंबर रोजी मुंबईत महामोर्चा आयोजित केला आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांना आंदोलनापूर्वीच मोठा झटका बसला आहे. राज्याच्या गृह विभागाने तातडीचे आदेश काढून मुंबईत आझाद मैदान वगळता कुठेही आंदोलन करण्यास मनाई केली आहे. आझाद मैदानातही एका दिवसाच्यावर आंदोलन करता येणार नाही. तसेच आखून दिलेल्या वेळेतच आंदोलन करता येणार आहे. त्यामुळे जरांगे आणि हाकेंसाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

राज्याच्या गृह विभागाने मुंबईतील आंदोलनाबाबतचे आदेश काढले आहेत. आझाद मैदान वगळता मुंबईत कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे आणि जाहीर सभा घेण्यास राज्याच्या गृह विभागाने पूर्णपणे बंदी घातली आहे. आझाद मैदानात आंदोलन पुकारल्यास केवळ एक दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी दिली जाईल. त्यानंतर मैदानात थांबल्यास दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

नेपाळमध्ये महापुरामुळे हाहाकार! तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; त्यामध्ये 105 भारतीयांचा समावेश ; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त ;

वेध माझा ऑनलाइन।
नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे खळबळ उडाली आहे. या पुरामुळे रसुवा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर समोर आलेल्या व्हिडिओंमधून या नैसर्गिक आपत्तीची भीषणता दिसून येत आहे.

नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे खळबळ उडाली आहे. या पुरामुळे रसुवा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर समोर आलेल्या व्हिडिओंमधून या नैसर्गिक आपत्तीची भीषणता दिसून येत आहे. काही ठिकाणी शांत वाहणाऱ्या नद्या काही क्षणांतच रौद्र रूप धारण करताना दिसत आहेत, तर अनेक ठिकाणी पूल, रस्ते, वाहने आणि इमारती पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून जाताना दिसत आहेत. आतापर्यंत या पुरामुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पुरात 105 भारतीय पर्यटक बेपत्ता झाले आहेत.

105 भारतीयांसह 400 लोक बेपत्ता
नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे 105 भारतीय पर्यटक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये 31 तीर्थयात्रींचा समावेश असून ते मानसरोवर यात्रेसाठी जात होते. ही माहिती नेपाळ टुरिझम बोर्डाने दिली आहे. बोर्डाकडून बेपत्ता झालेल्या भारतीय पर्यटकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. नेपाळ टुरिझम बोर्डाच्या माहितीनुसार, पुरात एकूण सुमारे 400 पर्यटक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये 291 परदेशी पर्यटक आहेत, तर 90 हून अधिक पर्यटक नेपाळचे नागरिक आहेत. नेपाळ न्यूजच्या माहितीनुसार, बेपत्ता पर्यटकांपैकी 37 जण भारतीय वंशाचे एनआरआय आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, अमेरिका, मलेशिया, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचाही बेपत्ता पर्यटकांमध्ये समावेश आहे.

Tuesday, August 25, 2026

मलकापूर रस्ता : भूसंपादनाआधीच टेंडर; उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या भूमिकेवर जागेचे मिळकतदार वसीम सय्यद यांचे प्रश्नचिन्ह ; न्यायिक लढा देण्याचा इशारा ;

वेध माझा ऑनलाईन।
मलकापूर नगरपरिषद हद्दीतील वाखानवस्ती ते कराड-ढेबेवाडी रस्ता (एमडीआर-५५, किमी ७/२०० ते ८/०००) या प्रस्तावित रस्त्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू असताना संबंधित जमिनींचे भूसंपादन अद्याप पूर्ण झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. सुमारे ७ कोटी ८२ लाख ८४ हजार ७७८ रुपयांच्या या कामासाठी शासनाकडून दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. मात्र, बाधित शेतकरी व मिळकतधारकांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असताना प्रक्रिया पुढे नेण्याऐवजी प्रथम संबंधित जमिनींचे मालकी हक्क व कायदेशीर स्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते वसीम सय्यद यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले...
मलकापूर रस्त्याच्या प्रस्ताव व प्रक्रियेबाबत २२ मार्च २०२२ रोजी लेखी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास चार वर्षे उलटूनही या प्रश्नावर ठोस तोडगा निघालेला नसल्याचेही सय्यद यांनी सांगितले. 
दरम्यान, मलकापूरचे तत्कालीन व विद्यमान उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी ठराविक मिळकतधारकांसोबत बैठका घेतल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. ५ एप्रिल २०२६ रोजी मलकापूर नगरपरिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या बैठकांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी भूसंपादन व मिळकतधारकांच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चार महिने उलटल्यानंतरही एकही बैठक झाली नसल्याचे सय्यद यांनी नमूद केले.
या प्रक्रियेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मलकापूर रस्ता, भूसंपादन, जमिनींचे मालकी हक्क, ट्रस्टची भूमिका तसेच बाधित शेतकरी व मिळकतधारकांच्या अडचणी याबाबत माहिती देण्यात आल्याचेही सय्यद यांनी सांगितले.
गट क्रमांक २७६ वरून वाद
मलकापूर रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या गट क्रमांक २७६ मधील जमिनीच्या मोबदल्यावरूनही वाद असल्याचे सांगण्यात आले. नोव्हेंबर २०२२ मध्ये १७०/२०२२ क्रमांकाने जुम्मा मस्जिद (मनोरे) ट्रस्ट, कराड यांनी भूसंपादनातून मिळणारा मोबदला ट्रस्टला मिळावा, असा दावा दाखल केल्याचे नमूद करण्यात आले.
याच काळात वक्फ बोर्ड, औरंगाबाद यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन गट क्रमांक २७६ ही संपूर्ण मिळकत वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचा दावा केला आणि भूसंपादनाचा मोबदला वक्फ बोर्डाकडे जमा करण्याची मागणी केल्याचे सांगण्यात आले.
संबंधित मिळकत सुमारे १७ ते १८ एकर असून ती देवस्थान इनाम वर्ग-३ची आहे. ही जमीन सेवेकरी यांना मुलाणकी म्हणून देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे जुन्या महसूल नोंदी, मालकी हक्क आणि त्यानंतर झालेले जमीन व्यवहार यांची अधिकृत अभिलेखांच्या आधारे सखोल तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या भूमिकेवर प्रश्न
मलकापूर रस्त्याच्या कामाच्या संपूर्ण प्रक्रियेशी नगरपरिषदेचा थेट संबंध नसल्याचे मुख्याधिकारी जितेंद्र जगताप यांनी सांगितल्याचा दावा सय्यद यांनी केला. मात्र, रस्ता नगरपरिषद हद्दीतून जात असल्याने नगरपरिषद संबंधित प्रक्रियेत उपस्थित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्याकडून संबंधित व्यक्तींसोबत बैठका घेतल्या जात असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखालील बैठक संपल्यानंतरही उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, ट्रस्टच्या काही व्यक्तींमध्ये बैठक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिकृत बैठक संपल्यानंतर अशा बैठका कशासाठी झाल्या, त्यामध्ये कोणती चर्चा झाली, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी सय्यद यांनी केली आहे.

जुन्या व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी
१९२० पासून विविध व्यवहार झाल्याने सध्याच्या मालकी हक्काचा गुंता निर्माण झाल्याचे वसीम सय्यद यांनी सांगितले. पूर्वीच्या हक्कदारांनी केलेल्या जमीन विक्री व्यवहारांसह त्यानंतर झालेल्या हस्तांतरणांची महसूल अभिलेखांच्या आधारे तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
२८ डिसेंबर २०१७ रोजी मलकापूर नगरपरिषदेने केलेल्या करारात जुम्मा मशीद ट्रस्टने संबंधित जमिनीचे बागायती पीक घेत असल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले. त्याच ट्रस्टने २०१९ मध्ये वक्फ ट्रिब्युनल न्यायालयात दावा दाखल केल्याचेही नमूद करण्यात आले.
गट क्रमांक २७६, वक्फ बोर्ड व ट्रिब्युनलमधील प्रकरणे तसेच संबंधित विश्वस्तांची कायदेशीर पात्रता यांची कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘आपले सरकार’वर तक्रार
सातारा जिल्हा वक्फ अधिकारी म्हणून काम पाहणारे इम्रान अस्लम मुलाणी यांच्या नियुक्तीच्या अधिकृततेबाबत ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार दाखल केल्याचे सय्यद यांनी सांगितले. या तक्रारीवर आवश्यक कार्यवाहीसाठी वक्फ बोर्डाला आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले; मात्र त्यानंतर नेमकी काय कार्यवाही झाली, याबाबत स्पष्टता नसल्याचा दावा त्यांनी केला.
वक्फ बोर्डाच्या कार्यपद्धतीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित प्रश्न सोडविण्याऐवजी कार्यपद्धतीमुळे अनेक प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत असल्याचा आरोप त्यांनी केला.असेही वसीम सय्यद म्हणाले...

विकासाला विरोध नाही’
मलकापूर रस्त्याच्या कामाला विरोध नाही. मात्र, शासनाचा निधी योग्य पद्धतीने खर्च व्हावा आणि कोणत्याही शेतकरी अथवा मिळकतधारकावर अन्याय होऊ नये, यासाठी प्रथम मालकी हक्क व भूसंपादनाची कायदेशीर स्थिती स्पष्ट करावी. बाधितांना विश्वासात घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि कायदेशीर मालक निश्चित करून नियमानुसार त्यांनाच मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
“रस्ता झाला पाहिजे; विकासकामाला विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली कोणत्याही शेतकरी अथवा मिळकतधारकाच्या मालकी हक्कावर गदा येता कामा नये. संबंधित कागदपत्रांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी झाल्याशिवाय पुढील भूसंपादन व रस्त्याचे काम सुरू करू नये. विकास हवा; मात्र हक्क अबाधित ठेवूनच,” अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार वसीम सय्यद यांनी मांडली.
या प्रकरणात मलकापूर नगरपरिषदेने केलेल्या कराराची कायदेशीरता, संबंधित ट्रस्टची अधिकृतता, वक्फ बोर्डाचे दावे, गट क्रमांक २७६ची मालकी तसेच उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची भूमिका या सर्व बाबींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रश्न सुटला नाही तर न्यायालयीन मार्गाने लढा देणार असल्याचेही वसीम सय्यद यांनी स्पष्ट केले.

जनतेच्या मनातला "आपला माणूस' ; सतीश भोंगाळे ; सतीश भोंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा ;

वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या राजकीय क्षेत्रात नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत राहणारे सतीश भोंगाळे यांनी पद नसतानाही जनसेवेची आपली वाटचाल कायम ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांची "आपला माणूस' म्हणून ओळख  निर्माण झाली आहे.

गेल्या दहा वर्षांपासून लोकशाही आघाडीच्या माध्यमातून, विशेषतः मार्केट यार्ड परिसरातील आपल्या प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी भोंगाळे सातत्याने उपलब्ध राहिले आहेत. 
परिसरातील नागरी समस्या, छोट्या-मोठ्या विकासकामांचे प्रश्न किंवा एखाद्या नागरिकाची वैयक्तिक अडचण असो, त्यासाठी ते संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असतात.
नगरपालिका राजकारणात सक्रिय असलेल्या अनेक लोकप्रतिनिधींसोबतच नागरिकांच्या प्रश्नांसाठी पद नसतानाही उपलब्ध राहणाऱ्या कार्यकर्त्यांचीही स्वतंत्र ओळख निर्माण होते. सतीश भोंगाळे हे त्याचे उदाहरण ठरत आहेत. नगरसेवक पदावर नसतानाही नागरिक स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी मांडतात, ही त्यांच्या सामाजिक कार्याची पावती मानली जात आहे.
गेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, निवडणुकीतील पराभवाने भोंगाळे यांच्या सार्वजनिक जीवनातील सक्रियता कमी झालेली नाही. पद गेले, मात्र जनसेवेची भावना कायम राहिली, अशीच त्यांची कार्यपद्धती राहिली आहे.
दरम्यान, सतीश भोंगाळे यांची मित्रपरिवारातही स्वतंत्र ओळख आहे अनेक मित्रांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेम, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि चित्रपटांविषयीची आवड या माध्यमातून या मित्रपरिवाराची वीण अधिक घट्ट झाली आहे.
सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक नातेसंबंध जपत नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून सतीश भोंगाळे यांची आपला माणूस ओळख निर्माण झाली आहे. 
निवडणुकीचा निकाल बदलला, पण नागरिकांशी असलेले नाते बदलले नाही, हे त्यांच्या आजवरच्या कार्यातून अधोरेखित होते.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना जुलैचा हप्ता; रक्षाबंधनामुळे ३ हजार रुपये मिळणार?

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी आणि गेमचेंजर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे देऊन महिलांच्या खात्यावर ३ हजार रुपये जमा केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ३ हजार रुपये देण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

२०२४ मध्ये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित देण्यात आले होते. त्यामुळे यंदाही जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अंतिम निर्णय शासनाकडून अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे.
दरम्यान, जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून तब्बल ३४४.७४ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आले आहेत. या निधीचा वापर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी करण्यात येणार आहे. निधी वर्ग करण्यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागातील निधी वळवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या निधी वळवण्याचा परिणाम संबंधित विभागांच्या इतर योजनांवर होत असल्याची चर्चा आहे.
यापूर्वीही लाडकी बहीण योजनेसाठी विविध विभागांमधून निधी वळवण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये जानेवारीच्या हप्त्यासाठी ९८.४५ कोटी रुपये, तर जून २०२५ मध्ये एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी ४१० कोटी रुपये वळवण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
आता जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३४४.७४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने लाभार्थी महिलांचे लक्ष हप्ता कधी जमा होणार याकडे लागले आहे. त्यातच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचे हप्ते एकत्र देऊन ३ हजार रुपये मिळणार असल्याची चर्चा असल्याने महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र, ३ हजार रुपयांच्या हप्त्याबाबत अधिकृत निर्णय होईपर्यंत केवळ चर्चेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सरकारसाठी गेमचेंजिंग ठरलेली आणि अति महत्त्वकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ओळखली जाते. या योजनेअंतर्गत, पात्र असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत मिळते. पण या महिन्यामध्ये रक्षाबंधन असल्यामुळे महिलांना 3000 रुपये मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

2024मध्ये लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना 3000 रुपये मिळाले होते. त्यामुळे आता या महिन्यातदेखील जुलै आणि ऑगस्टचा हफ्ता मिळून महिलांना 3000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
2024मध्ये लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना 3000 रुपये मिळाले होते. त्यामुळे आता या महिन्यातदेखील जुलै आणि ऑगस्टचा हफ्ता मिळून महिलांना 3000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून ३४४.७४ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आले आहेत.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून ३४४.७४ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आले आहेत.
सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यासंदर्भातील शासन निर्णय  जारी करण्यात आला. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सातत्याने सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागाचा हजारो कोटींचा निधी वळवला जात आहे. त्याचा परिणाम या दोन्ही विभागांच्या इतर योजनांवर जाणवू लागला आहे.
सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सातत्याने सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागाचा हजारो कोटींचा निधी वळवला जात आहे. त्याचा परिणाम या दोन्ही विभागांच्या इतर योजनांवर जाणवू लागला आहे.
यापूर्वी लाडकी बहिण योजनेसाठी वळवलेला निधींमध्ये फेब्रुवारी २०२६ जानेवारीच्या हप्त्यासाठी ९८.४५ कोटी रुपये, जून २०२५ एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी ४१० कोटी रुपये निधी वळवल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी लाडकी बहिण योजनेसाठी वळवलेला निधींमध्ये फेब्रुवारी २०२६ जानेवारीच्या हप्त्यासाठी ९८.४५ कोटी रुपये, जून २०२५ एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी ४१० कोटी रुपये निधी वळवल्याचे समोर आले आहे.




Saturday, August 22, 2026

ग्रामस्थांच्या हृद्य सत्काराने भारावल्या रेठरे बुद्रुकच्या तीन कर्तृत्ववान भगिनी ; माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि वीरपत्नी विनिता कामटे यांचा ग्रामस्थांकडून गौरव

वेध माझा ऑनलाईन।
रेठरे बुद्रुक, ता. २२ : राजकीय क्षेत्रात, न्यायव्यवस्थेत आणि साहित्य क्षेत्रात आपल्या अतुलनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या रेठरे बुद्रुकच्या तीन कर्तृत्ववान भगिनींचा आज ग्रामस्थांनी भव्य नागरी सत्कार केला. या हृद्य सत्काराने रेठरे बुद्रुकच्या कर्तृत्ववान माहेरवाशिणी माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती सौ. रेवती मोहिते-डेरे आणि सुप्रसिद्ध लेखिका वीरपत्नी विनिता अशोक कामटे या तिघी बहिणी भारावून गेल्या. 

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते तसेच आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भावपूर्ण सोहळा पार पडला. फेटा, शाल, श्रीफळ, मानपत्र, रेठरे बासमती तांदूळ, रेठरा पेढा आणि रेठरा तूप देऊन तिन्ही भगिनींचा गौरव करण्यात आला.

माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या कृष्णाघाटाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त व कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित कार्यक्रमानिमित्त ॲड. चव्हाण यांच्यासह त्यांच्या भगिनी रेवती मोहिते-डेरे आणि विनिता कामटे आज कराड येथे आल्या होत्या. यानिमित्ताने रेठरे बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. 

या सत्काराला उत्तर देताना बालपणींच्या आठवणींना उजाळा देत ॲड. वंदनाताई चव्हाण म्हणाल्या, आमच्या मूळ गावात होत असलेला हा सत्कार आमच्यासाठी खूप विशेष आहे. रेठरे बुद्रुकला मोठी नैसर्गिक समृद्धी लाभली आहे. अनेक थोर व्यक्ती या गावाला लाभल्या आणि त्यांनी गावाची ओळख देशभर निर्माण केली. आम्ही तिघी बहिणी अनेक वर्षांनी एकत्र गावी आलो. आज गावकऱ्यांनी दिलेला प्रेमाचा ओलावा अनुभवला. त्यामुळे आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. यापुढे वारंवार गावाला यावे लागेल. आम्ही पुण्यात वाढलो, तरी आम्ही रेठरे बुद्रुकच्या आहोत, हे अभिमानाने सांगतो.

आजचा सत्कार हा केवळ आम्हा तिघींचा सत्कार नाही. तर ज्या पालकांनी आपल्या मुलींना स्वप्ने पाहायला शिकवले आणि ती स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी बळ दिले, त्या सर्व पालकांचा हा सत्कार आहे. आमच्या वडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे व शिक्षणामुळेच आम्ही या उंचीवर पोहचू शकलो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या घरातील मुलींना आणि महिलांना पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या भाषणात या तिन्ही कर्तृत्वान भगिनींच्या कार्याचा विशेष गौरव करत, त्या रेठरे बुद्रुकच्या आहेत ही गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा सत्कार आयोजित घेण्यात आला आहे. मुली शिक्षणात पुढे जात असून, नवीन पिढीला अधिकाधिक संधी देण्याची गरज आहे. कृष्णा समूहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत असून, महिलांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, रेठरे बुद्रुकला प्रगत गाव करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्या गावाचा आणि मतदारसंघाचा देशात आदर्श निर्माण करणे, हा आमचा संकल्प आहे. 

डॉ. इंद्रजित मोहिते यांनी तिन्ही बहिणींच्या कर्तृत्वाचा उल्लेख करताना, राजकारण, न्यायव्यवस्था, लेखन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटविला असून, चांगले संस्कार आणि उत्तम शिक्षणामुळे हे शक्य झाल्याचे सांगितले. 

सरपंच हणमंत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी मानपत्राचे वाचन केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. जि. प. सदस्य सौ. प्रियांका साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ॲड. हेमंत चव्हाण, राहुल कामटे, जि. प. सदस्य शैलजा शिंदे, पं. स. सभापती नंदाताई यादव, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, कराडचे नगरसेवक शिवाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सांगली महिला जिल्हाध्यक्ष सौ. सुश्मिता जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



लहानपणीच्या आठवणींना उजाळा

रेठरे बुद्रुकमधील लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण म्हणाल्या, लहानपणी आम्ही चुलत भावंडांसोबत शेतात जायचो. शेजाऱ्यांकडे पोहे खायचो. आमचे वडील आम्हाला मंदिर आणि नदीजवळ घेऊन यायचे. आम्ही या निसर्गाचा आनंद लुटायचो. आमचे वडील या नदीत पोहले आहेत. ज्या नदीचा आम्ही लहानपणी आनंद घेतला, त्याच नदीवर घाट बांधण्याचे भाग्य मला लाभले, याचा विशेष अभिमान आहे.


केस गावातील अतिक्रमणावर कारवाई कधी होणार? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड तालुक्यातील कैसे गावातील अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत संबंधित प्रशासनाकडे निवेदने व पत्रव्यवहार करण्यात आला असून, कारवाईसाठी आवश्यक साहित्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात कारवाईला अद्याप सुरुवात झालेली नाही.

अतिक्रमणामुळे सार्वजनिक जागा, रस्ते व नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही केवळ आश्वासने मिळत असल्याने “अतिक्रमणावर कारवाई नेमकी कधी होणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, अतिक्रमण हटविण्यासाठी तातडीने प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन विलंब न करता कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कारवाई रखडली असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने अतिक्रमण हटवावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

जिल्हा बँकेवरून महायुतीत ठिणगी; सामंतांचा गोरे यांना प्रतिइशारा‘आम्ही तुम्हाला का चालत नाही, हे जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजेंना विचारू’; साताऱ्यातील भाजप-शिवसेना वादावर सामंजस्याचा सल्ला ;

वेध माझा ऑनलाईन।
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीवरून महायुतीतील अंतर्गत राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सहकारी बरोबर आले तर विचार करू‘ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवू,’ असे सांगत ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे संकेत मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी कराडमध्येच त्याला जोरदार प्रतिइशारा दिला.
“आम्ही जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विचारू की, आम्ही तुम्हाला का चालत नाही? महायुती म्हणून ही निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे. मात्र नाही जमलं, तर आम्हीही काय गप्प बसणार आहोत का?” असा सवाल करत सामंत यांनी गोरे यांच्या भूमिकेला थेट प्रत्युत्तर दिले.

कराड येथील हॉटेल विट्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप-सेना वाद बाजूला ठेवा; अन्यथा विकासाला फटका
सातारा जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षावरही सामंत यांनी भाष्य केले. “सातारा जिल्ह्यातील भाजप-सेना वादाचे राजकारण बाजूला ठेवले, तरच जिल्ह्याचा विकास होऊ शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत भाजपचे मंत्री आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचे सांगत, दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे सामंत यांनी नमूद केले.

धनुष्यबाणाच्या निकालाबाबत सामंत १०० टक्के आशावादी
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणावर बोलताना सामंत यांनी बाहेर सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर जोरदार टोला लगावला.“सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना बाहेर वेगवेगळे दावे आणि चर्चा सुरू आहेत. अ‍ॅक्टमध्ये काय आहे, याची मला माहिती आहे; मात्र सर्वोच्च न्यायालयात याचिका सुरू असल्याने त्यातील कायदेशीर बाबींवर मी बाहेर भाष्य करणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी बाहेरून या प्रकरणावर सातत्याने भाष्य करणाऱ्यांवर नाव न घेता त्यांनी निशाणा साधला. “जे बाहेर बोलतात, ते कदाचित सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे असतील, त्यांना अगाध ज्ञान असेल असा खोचक टोला सामंत यांनी लगावला.
धनुष्यबाणाच्या निकालाबाबत आपण १०० टक्के आशावादी असल्याचे सांगत सामंत म्हणाले, “आम्ही काही वावगं केलेलं नाही. आम्ही कोणाचा पक्ष बळकावलेला नाही. आम्ही ज्या पक्षात होतो, त्याच पक्षात असताना झालेल्या घडामोडींची संपूर्ण भूमिका न्यायालयासमोर मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आहे.”

जरांगे-पाटील, लक्ष्मण हाके यांची भेट घेणार
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे-पाटील आणि लक्ष्मण हाके या दोघांचीही आपण भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे-पाटील यांच्या भेटीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी उद्या चर्चा करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच लक्ष्मण हाके हेही आंदोलन करत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“दोन समाजांमध्ये कोणत्याही प्रकारची जातीय भिन्नता किंवा तेढ निर्माण होऊ नये, ही सरकारमधील सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे सामंत यांनी सांगितले.

एकूणच, 
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणातील अंतर्गत मतभेद पुन्हा ऐरणीवर आले आहेत. ‘महायुती म्हणून लढण्याची इच्छा; पण नाही जमले तर आम्हीही गप्प बसणार नाही,’ या सामंतांच्या वक्तव्यामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Friday, August 21, 2026

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित युवकचे प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर यांचे कराडात स्वागत ; यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी नतमस्तक; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पोपटराव साळुंखेंनी केले स्वागत ; लोकशाही आघाडीतर्फे त्यांचे अभिनंदन ;

वेध माझा ऑनलाईन।
 महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले नवनिर्वाचित युवकचे प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर आज कराड दौऱ्यावर आले होते. यावेळी कराड शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कराड शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी लोकशाही आघाडी कराड शहरातील पदाधिकारी, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांच्या वतीनेही विशाल वाकडकर यांचे स्वागत करून प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, विशाल वाकडकर यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी भेट देत नतमस्तक होऊन अभिवादन केले. त्यानंतर आदरणीय स्व. पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात युवकांची मोठी संघटनात्मक फळी उभी राहील. त्यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक संघटनेला निश्चितच नवी उभारी मिळून पक्ष संघटना अधिक मजबूत आणि गतिमान होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी लोकशाही आघाडी कराड शहरचे पदाधिकारी, हितचिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्र प्रदेश शरदचंद्र पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या  प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर आज कराड दौऱ्यावर आले होते कराड शहरात त्यांचे स्वागत राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कराड शहर अध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी केले

यावेळी लोकशाही आघाडी कराड शहरच्या पदाधिकारी,हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या वतीने देखील त्यांचे स्वागत करून त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले. 

दरम्यान कराडच्या यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन ते त्याठिकाणी नतमस्तक झाले त्यानंतर आदरणीय स्व पि डी पाटीलसाहेबांच्या प्रतिमेस त्यांनी अभिवादन केले
नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांची मोठी फळी उभी राहून पक्ष संघटनेला निश्चितच नवी उभारी मिळेल आणि पक्ष संघटना अधिक मजबूत व गतिमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला व त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या...

यावेळी लोकशाही आघाडी कराड शहरचे पदाधिकारी,हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या वतीने देखील त्यांचे स्वागत करून त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या

"राजमाता जिजाऊ’ या नावाने पाच बसेसचा लोकार्पण सोहळा कराड आगारात उत्साहपूर्ण वातावरणात पडला पार ; आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते नारळ फोडून बसेस प्रवाश्यांच्या सेवेत दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कराड आगाराच्या ताफ्यात नव्या पाच आरामदायी बसेस दाखल झाल्या आहेत. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने सजविण्यात आलेल्या या पाचही बसेसचा लोकार्पण सोहळा आज कराड आगारात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते नारळ फोडून व विधिवत पूजन करून या बसेस प्रवासी सेवेत दाखल करण्यात आल्या.

कराड आगाराच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल झाल्यामुळे आगाराच्या प्रवासी वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे. विशेषतः कराड शहरासह तालुक्यातील तसेच विविध मार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना यामुळे अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. नव्या बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना चांगल्या दर्जाची सेवा देण्यास मदत होणार असून, जुन्या बसेसवरील वाहतुकीचा ताणही काही प्रमाणात कमी होण्यास हातभार लागणार आहे.
नव्या बसेस आगारात दाखल होताच त्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने सजविलेल्या या बसेसने आगार परिसराचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत बसचे विधिवत पूजन करून प्रवासी सेवेसाठी त्या रवाना करण्यात आल्या.
यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी नव्या बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगली सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग असून, प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणे आवश्यक आहे. कराड आगाराच्या ताफ्यात नव्या बसेसची भर पडल्याने या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे मानले जात आहे.

या लोकार्पण सोहळ्यास कराड नगरपरिषदेचे नगरसेवक जयवंतराव पाटील, गणेश पवार, आशुतोष डुबल, शिवाजी पवार अतुल शिंदे,  शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र माने... यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, कराड आगाराचे आगारप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, नव्या बसेस नियमित प्रवासी सेवेत दाखल झाल्याने कराड आगारातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. नव्या सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, आगाराच्या ताफ्यात आधुनिक व आरामदायी बसेसची भर पडल्याने प्रवाशांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

Thursday, August 20, 2026

कराडचे भाजपचे नगरसेवक धावून आले नागरीकांच्या सुरक्षेसाठी ; भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा ;कराड पालिकेला दिले निवेदन :

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील वाढत्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे कराड नगरपरिषदेतील गटनेते विजय वाटेगावकर व भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना निवेदन देत भटक्या श्वानांचे लसीकरण व निर्बिजीकरण तसेच आक्रमक स्वभावाच्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारण्याची मागणी केली आहे.

शहरातील विविध भागांमध्ये भटक्या व आक्रमक श्वानांचा वावर वाढला असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळ-संध्याकाळ रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी श्वानांच्या हल्ल्याच्या तसेच नागरिकांना चावा घेण्याच्या घटना घडत असल्याने नगरपरिषदेने या विषयावर तातडीने प्रभावी व शास्त्रोक्त उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कराड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील भटक्या श्वानांचे लसीकरण व निर्बिजीकरण करण्याबाबत विषय मंजूर झालेला आहे. तसेच भटक्या श्वानांच्या नियंत्रणासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे.
शहरातील सर्व भटक्या श्वानांचे टप्प्याटप्प्याने अंतर्गत शास्त्रोक्त पद्धतीने निर्बिजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात यावे. लसीकरण व निर्बिजीकरण झालेल्या श्वानांची ओळख पटण्यासाठी आवश्यक मार्किंग करून त्याची प्रभागनिहाय नोंद ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच नागरिकांच्या तक्रारींच्या आधारे आक्रमक व नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या श्वानांची स्वतंत्र नोंद तयार करून, अशा श्वानांबाबत लागू नियम व न्यायालयीन निर्देशांनुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या कामासाठी आवश्यक असल्यास मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय संस्था, पशुवैद्यकीय डॉक्टर किंवा अधिकृत संस्थेची नियुक्ती करावी. त्याचबरोबर अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक बाबी, निविदा व कार्यादेशाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
भटक्या व आक्रमक श्वानांबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार नोंदणी व कार्यवाही प्रणाली निर्माण करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून तसेच नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या निर्णयाची आणि न्यायालयीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी या विषयावर विलंब न करता कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी विजय वाटेगावकर व भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्याकडे केली आहे.

Wednesday, August 19, 2026

नगरसेवक आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांच्या समस्या सोडविणार : तेजश्री पाटसकर

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील नवनिर्वाचित अपक्ष नगरसेविका सौ तेजश्री सुदर्शन पाटसकर यांच्या पुढाकारातून ‘नगरसेवक आपल्या दारी’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांच्या थेट भेटी घेऊन त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्याबरोबरच शासनाच्या विविध योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती त्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर या उपक्रमाद्वारे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच आयुष्मान कार्ड, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना, स्वयंरोजगाराच्या संधी आणि युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
‘एक घर, एक योजना आणि प्रत्येक कुटुंब शासनाशी जोडले गेले पाहिजे’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे तेजश्री पाटसकर यांनी सांगितले. 
सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गुरुवार पेठ यांसह कराड नगरपरिषद हद्दीतील विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा तसेच शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे भाजप युवा मोर्चाचे नेते सुदर्शन पाटसकर यांनी यावेळी सांगितले.

Tuesday, August 18, 2026

कराड पालिकेचे भाजपचे नेते गुंड्याभाऊ वाटेगावकर म्हणाले...पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांकडे तब्बल ५० वर्षे ढुंकूनही न पाहणाऱ्यांनी दीड वर्षाच्या कामाचा हिशोब मागणे हास्यास्पद ;

वेध माझा ऑनलाईन।
पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांकडे तब्बल ५० वर्षे ढुंकूनही न पाहणाऱ्यांनी आज दीड वर्षाच्या कामाचा हिशोब मागणे हास्यास्पद आहे. शहरातील ज्या प्रश्नांकडे तुम्ही अथवा तुमच्या नेत्यांनी सातत्याने डोळेझाक केली, ते प्रश्न सोडविण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशावेळी त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी विरोधकांनी स्वतःची उंची तपासावी, असा जोरदार टोला कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांना लगावला आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी पाटण कॉलनी झोपडपट्टी प्रश्नाबाबतचे निवेदन वर्तमानपत्रांना प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात घेतलेल्या आक्षेपांवर सडेतोड प्रत्युत्तर देणारे निवेदन कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात श्री. वाटेगावकर यांनी म्हटले आहे, की नामदेव पाटील यांचे कराड शहराच्या विकासासाठी नेमके योगदान काय? शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी किती वेळा आवाज उठवला? किती प्रश्न मार्गी लावले? याचे उत्तर आधी त्यांनी जनतेला द्यावे. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरालगत असलेल्या पाटण कॉलनी झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी हक्काचा निवारा मिळावा, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले निवडून आलेल्या पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहेत. या प्रश्नावर अगदी विधानसभेत आवाज उठवून, या प्रश्नाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. याशिवाय या प्रश्नातील कायदेशीर गुंतागुंत लक्षात घेऊन, त्यातून मार्ग काढण्यासाठी शासनस्तरावर प्रत्येक टप्प्यावर पत्रव्यवहार करुन, हा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने सकारात्मक वाटचाल केली आहे. 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडून आल्यानंतर तातडीने ११ डिसेंबर २०२४ रोजी पाटण कॉलनीतील जागेचा वापर बदलून बेघरांसाठी घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे पत्र दिले. १६ डिसेंबर २०२४ रोजी कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तसा प्रस्तावही पाठवला. तसेच नगररचना योजना क्रमांक १ मधील संबंधित जागेवरील ‘पार्किंग’चे नामाभिधान बदलून, ‘बेघरांसाठी घरे’ करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमातील तरतुदींनुसार परवानगी मागण्यात आली.

दरम्यान, १८ डिसेंबर २०२४ रोजी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पाटण कॉलनीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करत उच्चस्तरीय हस्तक्षेपाची मागणी केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशामुळे व आ.डॉ. भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अवघ्या ५ महिन्यात म्हणजेच दि. ८ एप्रिल २०२५ रोजी नगररचना विभागाच्या संचालक स्तरावर या प्रकरणाचा पुढील पत्रव्यवहार आणि प्रशासकीय पाठपुरावा सुरू झाला. 

पुढे दिनांक ५ मे २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने कराड नगरपरिषदेला याप्रकरणी पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट निर्देश दिले. संबंधित जागेचे स्थान, सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा, पार्किंगची आवश्यकता आणि इतर बाबींचा विचार करून ‘पार्किंग’चे नामाभिधान बदलून, ‘बेघरांसाठी घरे’ करण्यासंबंधी योग्य निर्णय घेऊन, ‘महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६’च्या कलम ३७ अन्वये प्रस्ताव सादर केल्यास शासनस्तरावर गुणवत्तेनुसार निर्णय घेतला जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

या सर्व घडामोडी पाहता पूर्णपणे स्पष्ट होते, की पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासियांचा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ठोस प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. असे असताना नामदेव पाटील मात्र प्रसिद्धीच्या हव्यासापायी व स्वत:च्या नेत्यांची निष्क्रीयता लपविण्यासाठी आमदारांकडेच कामाचा हिशोब मागत आहेत, हे हास्यास्पद आहे. 

खरंतर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या प्रश्नासाठी गेल्या दीड वर्षात केलेले प्रयत्न तारखेनिशी या निवेदनात आम्ही मांडले आहे. नामदेव पाटील यांनी हिम्मत असेल तर त्यांनी अथवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाटण कॉलनीतील नागरिकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या ५० वर्षांत काय प्रयत्न केले? या प्रश्नावर यापूर्वी किती पत्रे दिली? किती वेळा मंत्रालयात पाठपुरावा केला? किती प्रस्ताव शासनाकडे पाठवले? कोणते निर्णय घेतले? याचा हिशोब त्यांनीच जनतेसमोर द्यावा, असे आव्हान श्री. वाटेगावकर यांनी दिले आहे.

आ.डॉ. अतुलबाबांचा प्रत्यक्ष पाठपुरावा!
- १० डिसेंबर २०२४ : कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन आरक्षण क्र. ४८ मधील पार्किंगचे नामांतर करून बेघरांसाठी घरे करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी
- १६ डिसेंबर २०२४ : नगरपरिषदेने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवून आरक्षण बदलास शासनाची परवानगी मागितली.
- १८ डिसेंबर २०२४ : आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करून उच्चस्तरावर पाठपुरावा केला.
- ८ एप्रिल २०२५ : नगररचना संचालक स्तरावर पुढील पत्रव्यवहार व प्रशासकीय पाठपुरावा सुरू
- ५ मे २०२६ : राज्य नगरविकास विभागाने कराड नगरपरिषदेला याप्रकरणी पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट निर्देश दिले

‘उलटा चोर कोतवाला को डाटे’
ज्या भागात राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण राहतात, त्याच पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न ५० वर्षांत त्यांना सोडविता आलेला नाही. अशावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर योग्य व सकारात्मक पाठपुरावा करत असताना, त्यांनाच या कामाचा हिशोब मागण्याची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी कृती म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को दाटे’, अशीच असल्याची टीका विजय वाटेगावकर यांनी केली आहे.

नदीत प्लास्टिक फेकणाऱ्यांना सौरभ पाटलांनी भररस्त्यात झापले; माजी नगरसेवक सौरभ पाटील यांच्या स्वच्छतेबाबतच्या भूमिकेची पुन्हा आली प्रचिती ;


वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील राजकारणात अनेक नेते त्यांच्या वेगळ्या कार्यशैलीमुळे ओळखले जातात. मात्र, स्वच्छता हा केवळ प्रचाराचा विषय न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीतून जपणाऱ्या नेत्यांमध्ये माजी नगरसेवक तथा नगरपालिकेचे माजी गटनेते सौरभ पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या याच स्वभावाची प्रचिती सोमवारी पुन्हा एकदा आली.

इस्लामपूर येथे एका साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर सौरभ पाटील हे ताकारी मार्गे कराडकडे परतत होते. कारवे परिसरात आल्यानंतर त्यांच्या नजरेस एक धक्कादायक प्रकार पडला. मुंबई परिसरातील नोंदणी असलेल्या एका चारचाकी वाहनातून पुलावरून थेट नदीपात्रात प्लास्टिकच्या पिशव्या फेकण्यात येत होत्या.
हा प्रकार पाहताच सौरभ पाटील यांनी संताप व्यक्त करत संबंधित वाहनचालकाला थांबवले. नदीत प्लास्टिक फेकून प्रदूषण वाढवणाऱ्या त्या व्यक्तीला त्यांनी चांगलेच सुनावले. 'निसर्गाबाबत कोणतीही जबाबदारी नाही का? सार्वजनिक ठिकाणी अशी बेजबाबदार कृती कशी करता?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी संबंधित वाहनाच्या पुढील भागात स्टेअरिंगजवळ पोलिसांची टोपी ठेवलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावरूनही त्यांनी त्या व्यक्तीला जाब विचारला. 'टोपी पुढे ठेवली म्हणजे नियम मोडण्याचा परवाना मिळतो का?' असा थेट प्रश्न करत त्यांनी संबंधित व्यक्तीला माफी मागण्यास भाग पाडले.
विशेष म्हणजे, स्वच्छतेच्या मुद्द्यावर सौरभ पाटील यांची भूमिका नेहमीच आक्रमक राहिली आहे. शहरात असो किंवा बाहेरगावी, सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या व्यक्तींना ते वेळोवेळी जाब विचारत असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नदी, पर्यावरण आणि सार्वजनिक स्वच्छता याबाबतची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे, हा संदेश त्यांनी या घटनेतून पुन्हा एकदा दिला. त्यामुळेच कराड आणि परिसरात स्वच्छतेचा कट्टर पुरस्कार करणारा नेता म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
निसर्गाचे रक्षण केवळ भाषणातून होत नाही, तर चुकीच्या कृतींना वेळीच रोखण्याच्या धाडसातून होते, हे सौरभ पाटील यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिले.

Monday, August 17, 2026

कराडच्या सोमवार पेठेत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात महाविद्यालयीन युवती जखमी; ऍड विराज जांभळे व बाळासाहेब उमराणी यांनी युवतीची कुत्र्याच्या तावडीतून केली सुटका ; याबाबत पालिका प्रशासनाला कळवून देखील दुर्लक्ष केल्याचा सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांचा आरोप ;

वेध माझा ऑनलाईन।
सोमवार पेठेतील शिखरे वाड्यासमोर भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एका महाविद्यालयीन युवतीला दुखापत झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याच कुत्र्याने एका वृद्ध महिलेवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील अनिल कुलकर्णी यांची कन्या तिच्या आईसोबत घरी जात असताना शिखरे वाड्यासमोर अचानक तेथील भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात युवतीच्या हाताला व पायाला दुखापत झाली.
घटनास्थळी उपस्थित असलेले ॲड. विराज जांभळे आणि माजी नगरसेवक बाळासाहेब उमराणी यांनी प्रसंगावधान राखत संबंधित युवतीची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. त्याचवेळी एका वृद्ध महिलेवरही त्या कुत्र्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांनी चार दिवसांपूर्वीच सोमवार पेठ परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याची माहिती कराड पालिका प्रशासनाला दिली होती. तसेच, या कुत्र्यांमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही केली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप उंडाळकर यांनी केला आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवतीचे वडील अनिल कुलकर्णी यांनीही भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. 'आज माझ्या मुलीला कुत्र्याने चावा घेतला आहे. उद्या आणखी कोणालाही या भटक्या कुत्र्यांचा त्रास होऊ शकतो,' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

या घटनेमुळे सोमवार पेठ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

काँग्रेस नेते नामदेवराव पाटील यांचा आमदार अतुलबाबांना प्रश्नांचा भडिमार ;काय म्हणाले...? निवडणुकीपूर्वी १५ दिवसांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते तुम्ही दोन वर्षांत काय केले, याचा हिशोब द्या...

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील पाटण कॉलनी येथील झोपडपट्टीच्या प्रश्नावर दक्षिण कराडचे आमदार आज पत्रकार परिषद घेऊन चव्हाण कुटुंबावर आरोप करीत आहेत. मात्र, इतरांवर आरोप करण्यापूर्वी निवडणुकीपूर्वी पाटण कॉलनीतील झोपडपट्टी धारकांना दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? याचे उत्तर आमदारांनी जनतेला द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष नादेवराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

कराडच्या पाटण कॉलनीतील झोपडपट्टीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, ही वस्तुस्थिती आहे. हा प्रश्न केवळ राजकीय इच्छाशक्ती चा नसून जमिनीच्या मालकीचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा कायदेशीर प्रश्न आहे. संबंधित जमिनीच्या मालकीबाबत न्यायालयीन वाद प्रलंबित असल्याने या प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्यास कायदेशीर अडचणी आहेत. त्यामुळे यापूर्वीच्या सरकारांच्या काळात हा प्रश्न का सुटला नाही, यावर राजकीय आरोप करण्यापेक्षा सध्याच्या लोकप्रतिनिधींनी स्वतः दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी काय केले, हे सांगणे अधिक महत्त्वाचे आहे.

निवडणुकीपूर्वी १५ दिवसांचे आश्वासन; आता दोन वर्षे झाली!
दक्षिण कराड विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या जाहीर सभेत आमदारांनी निवडून आल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत पाटण कॉलनी झोपडपट्टीचा प्रश्न मार्गी लावू आणि झोपडपट्टी धारकांना कायम स्वरूपी जमिनीचे हक्क मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते.

आज त्या आश्वासनाला जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मग या दोन वर्षांत नेमके काय झाले? प्रश्न किती पुढे गेला? कोणते प्रस्ताव तयार झाले? कोणत्या विभागांशी बैठक झाली? न्यायालयीन अडचणी दूर करण्यासाठी कोणते प्रयत्न झाले? याची माहिती आमदारांनी जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्वरित कारवाई’ नंतर पुढे काय झाले?
या प्रश्नासंदर्भात आमदारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते आणि त्यावर ‘त्वरित कारवाई करा’ असा शेरा देण्यात आल्याचे सांगितले जाते. जर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले असतील, तर त्यानंतर प्रशासनाच्या पातळीवर कोणती कार्यवाही झाली, याची माहिती जनतेला मिळणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही दोन वर्षांत प्रश्न सुटला नसेल, तर त्यामागील कारण काय? संबंधित विभागांकडून कोणती माहिती मागविण्यात आली? किती बैठका घेण्यात आल्या?  कोणते प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, झोपडपट्टी धारकांच्या कायम स्वरूपी पुनर्वसन अथवा जमिनीच्या हक्काबाबत आजची स्थिती काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आमदारांनी द्यावीत.

आश्वासन पूर्ण झाले तर स्वागतच!
पाटण कॉलनीतील झोपडपट्टी धारकांना कायम स्वरूपी हक्क मिळवून देण्याचे आश्वासन जर प्रत्यक्षात पूर्ण झाले, तर त्याचे निश्चितच स्वागत केले जाईल. कारण हा प्रश्न कोणत्याही पक्षाचा नसून वर्षानुवर्षे या भागात राहणाऱ्या सामान्य नागरिकांच्या भवितव्याचा प्रश्नआहे.

आरोप-प्रत्यारोपांपेक्षा कामाचा लेखाजोखा द्या
कुणाच्या काळात हा प्रश्न प्रलंबित राहिला, कुणाला जमिनीच्या व्यवहाराची किती माहिती आहे, यावर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा सध्याच्या लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनावर त्यांनी किती काम केले, हा जनतेचा मूलभूत प्रश्न आहे.

त्यामुळे दक्षिण कराडच्या आमदारांनी इतरांवर आरोप करण्याऐवजी प्रथम पाटण कॉलनीतील झोपडपट्टीधारकांना दिलेल्या आश्वासनाचा दोन वर्षांचा कृती अहवाल जनतेसमोर सादर करावा असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे




Sunday, August 16, 2026

कराडची कन्या... सई थिटे भेदक गोलंदाजीमुळे युएई संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र

वेध माझा ऑनलाईन।
मूळची कराडची आणि सध्या दुबईत वास्तव्य करणाऱ्या अवघ्या १५ वर्षांच्या सई थिटे हिने युएईच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघातील निवडीचे सोने केले. तिच्या भेदक गोलंदाजीमुळे युएईचा संघ आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी- २० विश्वचषक आशिया कप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.  संघातील सर्वात युवा खेळाडू म्हणून ती संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
 
मलेशियातील स्पर्धेत सईने उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यांमध्ये मोलाची कामगिरी बजावत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विश्वचषक पात्रता फेरीत सईने अत्यंत निर्णायक क्षणी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळवून दिले!  "युएई संघाला विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी शेवटच्या षटकात ६ धावांचा बचाव करायचा होता आणि ही महत्त्वपूर्ण शेवटची ओव्हर सईने टाकली; मलेशियाला विजयासाठी केवळ ६ धावांची गरज असताना, तिने पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला. शेवटच्या दोन चेंडूंवर तीन धावांची गरज असताना, तिने केवळ एक धाव दिली आणि युएईच्या संघाने आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक आशिया कप २०२७' मधील आपले स्थान पक्के केले. संपूर्ण सामन्यातील तिची गोलंदाजी अतिशय किफायती ठरली; तिने ४ षटकांत १ बळी घेत २५ धावा दिल्या.
दहावीच्या परीक्षांच्या काळातही सईने अभ्यासासोबत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेत उत्कृष्ट समतोल साधला. पाचवीत असतानाच युएईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने दुबईमध्ये राहून गेली पाच वर्षे सातत्याने कठोर सराव, अथक मेहनत करून  स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे. या यशामागे आई प्राजक्ता व वडील निखिल थिटे यांचे क्रिकेटवरील अपार प्रेम, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन यांचा सिंहाचा वाटा आहे. 

कराडचे विशाल थिटे यांची ती पुतणी असून  पूजा साहित्यचे नारायण कुलकर्णी यांची ती नात आहे.

सामन्याचा सारांश
२९ जुलै, २०२६ स्थळ: क्वालालंपूर, मलेशिया
नाणेफेक: युएई संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युएई धावसंख्या: १९.३ षटकांत सर्वबाद ९५ (अल मसीरा जहांगीर ३१)
मलेशियाची धावसंख्या: २० षटकांत ९४/६
निकाल: युएई  संघ एक धावेने विजयी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील 7 जणांनी सलग तीन निवडणुकीमध्ये दुबार मतदान केले; 70 वर्षे तुमच्या घरात राजकारणाची मोठी पदे असताना एखादा उद्योगतरी कराडात आणायचा होता, ; तुम्ही निष्क्रिय आहात म्हणून लोकांनी तुम्हाला डावललय ; आमदार अतुलबाबांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पलटवार ;

वेध माझा ऑनलाईन। दुबार मतदान नोंदणीच्या मुद्द्यावरून कराडच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपांना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

कृष्णा हॉस्पिटल परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधला. स्वतःवर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावताना त्यांनी चव्हाण यांच्या कुटुंबीयांच्या मतदान नोंदणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दुबार मतदानाच्या नोंदणीबाबत करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा करताना भोसले म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सात जणांची विविध ठिकाणी मतदान नोंदणी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी दोन वेळा मतदान केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मागील विधानसभा निवडणुकीतील पराभव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अद्याप स्वीकारता आलेला नसल्याचे दिसत असल्याची टीका करत, लोकांनी त्यांना नाकारल्याचे वास्तव त्यांनी मान्य करावे, असा सल्लाही भोसले यांनी दिला.

'५८ हजार बोगस मतदारांचा आकडा कुठून आला?'
दुबार मतदानाच्या मुद्यावर भाष्य करताना भोसले यांनी ५८ हजार बोगस मतदारांचा दावा हास्यास्पद असल्याचे म्हटले. स्थलांतरित, मृत आणि इतर मतदारांची आकडेवारी लक्षात घेतली तर एवढ्या मोठ्या संख्येचा आधार काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने कोणताही आरोप करताना वस्तुस्थिती तपासणे आवश्यक असल्याचे सांगत, केवळ राजकीय आरोपांसाठी बिनबुडाचे दावे करणे योग्य नसल्याची टीकाही त्यांनी केली.

'७० वर्षांच्या राजकीय वारशाचा हिशेब द्या'
चव्हाण कुटुंबाच्या अनेक दशकांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करताना भोसले यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरूनही त्यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात परिसराच्या विकासासाठी कोणते उद्योग आणले, स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीसाठी कोणते प्रयत्न केले, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.
आपल्या दीड वर्षांच्या कामाचा हिशेब मागणाऱ्यांनी स्वतःच्या अनेक दशकांच्या कारकिर्दीचे मूल्यांकन करावे, अशी टीकाही त्यांनी केली.

गोपीनाथ मुंडे आणि अमित शाह यांच्यावरील वक्तव्यांवरही आक्षेप
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्याबाबत चुकीची विधाने करणे योग्य नसल्याचे भोसले म्हणाले. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी संयम बाळगावा, असेही त्यांनी सांगितले.

'कराडमध्ये नेकलेस रोड होणारच'
पत्रकार परिषदेत कराडमधील बहुचर्चित नेकलेस रोड प्रकल्पाचाही उल्लेख करण्यात आला. हा प्रकल्प कराडच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचा पुनरुच्चार करत, या प्रकल्पाचे थ्री-डी सादरीकरण सत्ताधाऱ्यांसमोर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार भोसले यांनी दिली.

Saturday, August 15, 2026

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते या... पृथ्वीराजबाबांच्या गौप्यस्फोटावर पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया -

वेध माझा ऑनलाईन।
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे. "मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक होते. त्यांच्या पक्षप्रवेशाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मान्यता दिली होती. पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी नकार दिला होता. गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस पक्षप्रवेशासाठी केंद्रात मंत्रिपदाची अट ठेवली होती. तसेच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आपल्याला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागले. तसेच केंद्रात मंत्रिपद दिले नाही तर नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत, असं गोपीनाथ मुंडे म्हणाले होते", असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या विषयावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या...
" आता त्यांच्याविषयी आम्ही वक्तव्य करणं उचित नाही. कारण त्यावेळी राजकारणात आम्ही  नव्हतो. याशिवाय त्याचं आता औचित्यही नाही. पृथ्वीराज चव्हाण काही म्हणाले असतील. माझी त्यावेळी उपस्थिती नसेल. मी त्यावर प्रतिक्रिया देत नाही. याशिवाय उपस्थित असले तरी त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर सगळ्यांसमोर बोलणं उचित नाही. त्या काळाबद्दल टिप्पणी मला करता येणार नाही. कारण त्यावेळी मी नव्हते. ज्या संघटनेला गोपीनाथ मुंडे यांनी एवढं मोठं वटवृक्ष बनवलं, त्यांनी संघटनेला भरभरून दिलं, त्यानंतर मला असं वाटत नाही की, अशा पद्धतीने त्यांच्या विषयी विचार करण्याची आवश्यकता आहे."

"राजकारणात आजच्या परिस्थितीत अजूनही त्यांचं नाव लोकं घेतात. मग ते कोणत्याही अर्थाने घेत असतील. मी नाही म्हणत की, पृथ्वीराज बाबांनी गोपीनाथ मुंडे यांचं काम अनादराने घेतलं आहे. आदरानेच घेतलं असेल. आता माझ्याविषयीदेखील परवा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टिप्पणी केली. ते देखील अनादर करत नाहीत. मीडिया काय करतो, कुठल्यातरी एका कार्यक्रमाचं स्टेटमेंट काढतो आणि पंकजा मुंडे नाराज आहे, असा प्रश्न विचारतो."असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रीया थांबवली

'

कराडच्या गब्बर ग्रुपच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त जिलेबी वाटपातून राष्ट्रप्रेमाचा संदेश ; विविध मान्यवरांची उपस्थिती ; गब्बर ग्रुपचे सर्वत्र होतय कौतुक ;

वेध माझा ऑनलाईन।
सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय उपक्रमांच्या माध्यमातून कराडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गब्बर ग्रुपच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे जिलेबी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रप्रेमाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून समूहाने देशभक्तीचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाला शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

गेल्या अनेक वर्षांपासून गब्बर ग्रुप सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे. राष्ट्रप्रेम, सामाजिक एकता आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या समूहाने विविध उपक्रमांद्वारे समाजात वेगळा ठसा उमटवला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात येणारा कार्यक्रम हा गब्बर ग्रुपच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी गब्बर ग्रुपच्या वतीने स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे जात, धर्म, पक्ष आणि विचारधारा यापलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याबरोबरच सामाजिक एकोपा वाढविण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मानले जाते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त मिठाई आणि जिलेबीचे वाटप करून आनंद सर्वांसोबत वाटण्याची परंपरा गब्बर ग्रुपने अनेक वर्षांपासून कायम ठेवली आहे. या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जातो. यंदाही मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.
विशेष म्हणजे, गब्बर ग्रुपच्या कार्यामागे प्रसिद्धीची अपेक्षा नसून सामाजिक बांधिलकीची भावना आहे. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता समाजासाठी सातत्याने काम करण्याची भूमिका या समूहाने स्वीकारली आहे. त्यामुळे गब्बर ग्रुपची ओळख केवळ एका सामाजिक संस्थेपुरती मर्यादित राहिलेली नसून तो कराडच्या सामाजिक अस्मितेचा अविभाज्य भाग बनला आहे.
कोरोनाच्या कठीण काळातही गब्बर ग्रुपने समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. अनेक गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि जेवणाची मदत करण्यात आली. तसेच, आवश्यक वस्तूंचे वाटप करून संकटग्रस्त कुटुंबांना आधार देण्याचे काम करण्यात आले. संकटकाळात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका या समूहाने सातत्याने जपली आहे.याशिवाय, आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठीही गब्बर ग्रुपने अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून दिली आहे. युवकांना सामाजिक कार्याशी जोडणे, समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, ही या समूहाच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
सामाजिक एकता, राष्ट्रप्रेम आणि माणुसकीचा वारसा जपत कराडच्या मातीमध्ये रुजलेला हा समूह आज एका भक्कम वटवृक्षाप्रमाणे समाजाला आधार देत आहे.समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या या समूहाच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
वेध माझा ऑनलाइन।
सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय उपक्रमांच्या माध्यमातून कराडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करणारा गब्बर ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून निःस्वार्थपणे कार्यरत आहे. राष्ट्रप्रेम, सामाजिक एकता आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या समूहाने विविध उपक्रमांद्वारे समाजात वेगळा ठसा उमटवला आहे.आज 15 ऑगस्ट च्या निमित्ताने राष्ट्रप्रेमाप्रति आपली बांधीलकी जपत या ग्रुपच्या वतीने दरवर्षी प्रमाणे जिलेबी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करत आपल्या देशभक्तीचे दर्शन दिले आहे शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते

दरवर्षी १५ ऑगस्टनिमित्त गब्बर ग्रुपच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातो. जात, धर्म, पक्ष आणि विचारधारा यापलीकडे जाऊन युवकांसह समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम या उपक्रमातून केले जाते. स्वातंत्र्यदिनानिमित्त मिठाई आणि जिलेबीचे वाटप करून आनंद सर्वांसोबत वाटण्याची परंपरा अनेक वर्षांपासून कायम ठेवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे गब्बर ग्रुपची ओळख मर्यादित राहिलेली नसून, तो कराडच्या सामाजिक अस्मितेचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

कोरोनाच्या काळातही गब्बर ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि जेवणाची मदत केली. तसेच, आवश्यक वस्तूंचे वाटप करून संकटग्रस्त कुटुंबांना आधार देण्याचे काम केले. कठीण परिस्थितीत समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका या समूहाने सातत्याने जपली.आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठीही गब्बर ग्रुपने अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून दिली आहे. युवकांना सामाजिक कार्याशी जोडणे, समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, ही या समूहाच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सामाजिक एकता, राष्ट्रप्रेम आणि माणुसकीचा वारसा जपत कराडच्या मातीमध्ये रुजलेला हा समूह आज एका भक्कम वटवृक्षाप्रमाणे समाजाला आधार देत आहे.आज 15 ऑगस्ट च्या निमित्ताने राष्ट्रप्रेमाप्रति आपली बांधीलकी जपत या ग्रुपच्या वतीने दरवर्षी प्रमाणे जिलेबी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आपल्या देशभक्तीचे दर्शन दिले आहे शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते


दुबार मतदार नोंदणीच्या मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हाण पुन्हा आक्रमक; पत्रकारांना म्हणाले... दुबार मते वेळेत कमी केली असती तर आज आमदार कोण झाले असते, तुम्हीच सांगा'

वेध माझा ऑनलाईन।
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कथित दुबार मतदार नोंदणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत स्वतःला यापूर्वीपेक्षा अधिक मते मिळाल्याचा दावा करत, दुबार मतदारांची नावे वेळेत कमी करण्यात आली असती, तर या मतदारसंघात आमदार म्हणून कोण दिसले असते, असा थेट सवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

आज कराड येथे पाटण कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ४० हजारांहून अधिक मतदारांची बोगस नोंद झाल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. यापूर्वीही त्यांनी हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला होता. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी मतदार यादीची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले.

दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील आठ ते नऊ जणांची दुबार मतदार नोंदणी असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले.

भाजपच्या वतीने यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन चव्हाण यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची मतदार नोंदणी दुबार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजित चव्हाण, स्वीय सहाय्यक श्री. आवळकर तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते. मात्र, या विषयावर स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथमच सविस्तर भूमिका मांडली.

यावेळी कराड शहरात सध्या चर्चेत असलेल्या 'नेकलेस रोड' प्रकल्पाबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती घेणार असल्याचे सांगितले. तसेच, माहिती घेतल्यानंतरच आपण याबाबतची भूमिका स्पष्ट करू, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, कराड दक्षिण मतदारसंघातील दुबार मतदार नोंदणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आल्याने आगामी काळात भाजपकडून याविषयी काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

माझ्या कुटुंबावरील दुबार मतदान नोंदणीचा विरोधकांचा आरोप खोटा ; कराडच्या "नेकलेस रोड' बद्दल योग्य माहिती घेऊन त्यावर बोलेन; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

वेध माझा ऑनलाईन
कराड दक्षिण च्या यावेळच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत  मागील निवडणुकीत मला
पडलेल्या मतांपेक्षा अधिक मते पडली आहेत मग जर दुबार मते त्याचवेळी कमी केली असती तर या ठिकाणी आमदार म्हणून कोण दिसले असते हे तूम्हीच सांगा... असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा यांनी बोलताना पत्रकारांना केला...
या मतदार संघात 40 हजारहुन अधिक मतदार  बोगस नोंद झाल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला

त्याचवेळी...
तुमच्या कुटुंबातील 8 ते 9 जणांची दुबार मतदार नोंदणी असल्याचा आरोप तुमच्यावर  विरोधकांनी केला होता...या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी हा आरोप खोटा असल्याचे सांगितले...याविषयी ये पहिल्यांदाच बोलले आहेत...भाजप ने त्यांच्या कुटुंबातील मतदारांची दुबार नोंद असल्याचे सांगत पत्रकार परिषद घेतली होती...त्याचे उत्तर पृथ्वीराज बाबांचे पुतणे इंद्रजित चव्हाण व स्वीय सहायक श्री आवळकर तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन दिले होते ...मात्र आज ते स्वतः याविषयी आज प्रथमच बोलले आहेत...

कराडच्या 
"नेकलेस रोड' च्या शहरातील चर्चेविषयी बोलताना ते म्हणाले...मी याबाबत निश्चित माहिती घेऊन माझं याबाबतच म्हणणं आपल्याशी बोलेन...

" वेध माझा ' च्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट ; राज्याच्या राजकारणात खळबळ ; म्हणाले... गोपीनाथ मुंडे भाजपमधून काँग्रेसमध्ये येणार होते...बैठका झाल्या...सगळं ठरलं... आणि...काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाईन।
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडमध्ये त्यांच्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे...

वेध- माझा ने विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना पृथ्वीबाबा म्हणाले...
गोपीनाथ मुंडे भाजपमध्ये मोठ्या पदावर असताना काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक होते...त्यांची भाजप मध्ये घुसमट होत होती...नागपूरचे "ते दोघे' त्यांना निवडणुकीत पाडतील व राजकारणात अडचणीत आणतील असेही मुंडे म्हणाले होते...असेही पृथ्वीराजबाबा यावेळी म्हणाले

ते पुढे म्हणाले...
मुंडे यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी स्वतः सोनिया गांधींची संमती होती...अहमद पटेल यांनी देखील तयारी दाखवत त्यांच्याशी बैठका केल्या... मी देखील त्यांना काँग्रेसमध्ये घ्यायची तयारी दाखवत त्यांना कोणते मंत्रिपद द्यायचे याबाबतही चर्चा केली होती... त्यांच्याशी एका हॉटेलमध्ये गुप्त बैठका देखील यासंदर्भात आम्ही केल्या होत्या...मात्र त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग या प्रवेशासाठी तयार झाले नाहीत...,  त्यामुळे मी मनमोहन सिंग तयार नाहीत असा निरोप मुंडे यांना दिला... मुंडे नाराज झाले... आणि  गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येऊ शकले नाहीत...त्यावेळी गोपीनाथ मुंडे मला म्हणाले होते... तुम्ही माझा राजकीय खून केलात... हे वाक्य मी अजूनही विसरू शकलो नाही...असा मोठा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे... त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे...
यावर भाजपकडून यावर काय 
रीऍकशन येते हेच आता पहायचं आहे

Thursday, August 13, 2026

कराडच्या ‘नेकलेस रोड’ प्रकल्पाचे सादरीकरण; नगरसेवकांकडून प्रश्नांची सरबती - या प्रकल्पाचे थ्री डी सादरीकरण करण्यात यावे - नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची सूचना ;

वेध माझा ऑनलाईन।
 कराड शहराभोवती प्रस्तावित करण्यात आलेल्या बहुचर्चित ‘नेकलेस रोड’ प्रकल्पाचे सादरीकरण आज गुरुवारी कराड नगरपालिकेच्या सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. या वेळी सत्ताधारी यशवंत व लोकशाही आघाडीसह विरोधी भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. 

प्रकल्पाच्या प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रकल्पाची उद्दिष्टे, संभाव्य विकासकामे आणि त्यातून शहराला होणारे फायदे यांची माहिती दिली.

बैठकीस नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, मुख्याधिकारी प्रशांत हटकर यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता देसाई यांनी व्हिडिओ चित्रफितीच्या माध्यमातून या प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यांनी प्रकल्पाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत शहराच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करताना चार प्रमुख बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचे सुशोभीकरण, शहरातील वाहतूक सुलभीकरण, नदीकाठाचा विकास अर्थात रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आणि पर्यावरण संरक्षणाचा समावेश आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकल्पाची अंदाजित किंमत ६८० कोटी रुपये असून सध्या त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पात जुन्या कोयना पुलापासून नवीन कृष्णा पुलापर्यंत नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर नदीकाठी घाटांची उभारणी, परिसराचे सुशोभीकरण, बगीचे आणि नागरिकांसाठी विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

सादरीकरणादरम्यान नगरसेवकांनी प्रकल्पाच्या व्यवहार्यता, खर्च, पर्यावरणीय परिणाम आणि भविष्यातील नियोजनाबाबत विविध शंका उपस्थित केल्या. काही नगरसेवकांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात अधिक माहिती देण्याची मागणी केली. त्यावर उपअभियंता देसाई यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

दरम्यान, या प्रकल्पाचे सादरीकरण सध्या प्राथमिक स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रकल्पाची अधिक सविस्तर माहिती मिळण्यासाठी अद्ययावत थ्री डी सादरीकरण करण्यात यावे,
अशी सूचना नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी केली.

Wednesday, August 12, 2026

कराडमध्ये तिरंगा रॅली चे यशस्वी आयोजन ; आमदार अतुलबाबांच्या आवाहनाला कराडकरांचा जबरदस्त प्रतिसाद ;सुमारे 8 ते 10 हजार नागरिकांचा सहभाग ; भारत माता की जय च्या जयघोषाने शहर परिसर दुमदुमला ; 325 फुटाच्या तिरंगा झेंड्याचे आकर्षण ;

वेध माझा ऑनलाईन।
राज्यभर तिरंगा रॅलीचे आयोजन होत असताना आज कराड तालुक्याच्या वतीने तिरंगा रॅली कराडात पार पडली यावेळी बोलताना आमदार अतुलबाबा म्हणाले...  आज या रॅलीमध्ये सर्व जातीधर्मीयांनी एकत्र येऊन एकीचे बळ दाखवले आहे यामुळे चांगला संदेश समाजात गेला आहे युवा पिढीच्या हातात देशाचे भविष्य आहे देशभक्ती व निष्ठा आज या युवकांनी दाखवली आहे पंतप्रधान मोदी नी शिक्षणाचे खुले दार युवकांसाठी देशात विविध फेकल्टी च्या माध्यमातून खुले केले असल्याने मोठ्या प्रमाणात युवक व युवती शिक्षणाचा आपला पाया भक्कम करत देशात आपलं नाव मोठं करताना दिसत आहेत

आजच्या या रॅलीला परिसरातील स्वातंत्र सैनिक, विद्यार्थी, तसेच शहर व परिसरातील जवळजवळ 8 ते 10 हजार नागरिक उपस्थित राहिले या सर्वांचे मनापासून आभार असेही आमदार अतुल भोसले म्हणाले दरम्यान यावेळी 325 फुटाच्या झेंड्याचे याठिकाणी आकर्षण ठरले 
यावेळी भारत माता की जयघोषाने शहर परिसर दुमदुमून गेला 

दरम्यान आजच्या तिरंगा रॅलीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीचे देखील आमदार भोसले यांनी कौतुक केले व त्यांचेही आभार मानले

आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजप नेते विक्रम पावसकर जिल्ह्याचे पदाधिकारी धनंजय पाटील मलकापूरचे भाजपचे नेते आर आबा तसेच माजी शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह शहरातील भाजपचे सर्व नगरसेवक नगरसेविका शहर व तालुक्याचे  पदाधिकारी तसेच प्रशासकीय सर्व अधिकारिवर्ग नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते