महाराष्टाच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आक्रमक नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आज बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, मी शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी धनुष्यबाण हाती घेणार आहे. काल परवा ज्या चर्चा झाल्या, त्या सर्व शिवसेनेनं मान्य केल्या आहेत.बच्चू कडूचं काम प्रामाणिकपणे राहिल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे. तर प्रहार संघटना आहे तशीच राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं
Thursday, April 30, 2026
Wednesday, April 29, 2026
बच्चू कडू म्हणाले...आमदारकीसाठी शिंदेसोबत जाण्याइतका मी नालायक नाही
वेध माझा ऑनलाइन।
विधानपरिषदेत रिक्त झालेल्या ९ जागांसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये शिवसेनेच्या कोट्यात दोन जागा आहेत. यापैकी एका जागेवर बच्चू कडूंना संधी देण्याची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू त्यांचा पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन कऱणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र बच्चू कडू यांनी विलीनकरणाचा मुद्दा फेटाळून लावला आहे. आमदारकीसाठी शिंदेसोबत जाण्याइतका बच्चू कडू नालायक नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय.
बच्चू कडूंची विधानपरिषदेवर वर्णी लागणार, विधान परिषदेवर आमदार होणार अशा चर्चा होत आहेत. या चर्चांबाबत विचारले असता बच्चू कडू म्हणाले की, मी शेतकरी शेतमजूरांचा आवाज उठवणारा माणूस आहे. शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांचा सन्मान होईल. जाती धर्माच्या नावावर लोक मेंढरासारखे जातात. आमदारकीसाठी जाणार नाही.
पदासोबत युती करणारे आम्ही नाही.
विलीनकरणाच्या बातम्या वाचल्या. खरंतर मी शिवसैनिकच होतो, शिवसेनेतून दुसऱ्या पक्षात गेलो नाही. प्रहार सुरू केली. पाठिंबा देतो म्हटलं तरी घेतला नाही. २५ वर्षे तटस्थ भूमिका घेतली. खासदारकी द्या युती करा असं म्हटलं नाही. जनतेसोबत काम केलं पाहिजे. सामान्य माणसाचा भिडू कोण असेल तर बच्चू कडू असा नारा तयार झालाय. विचारातून संघटना मोठी केलीय असंही बच्चू कडू म्हणाले
सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी भाजपच्या वाटेवर !
सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि औंध संस्थानाच्या पंतप्रतिनिधी गायत्रीदेवी या भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्या या पवित्र्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. औंध परिसरातील विकासकामांना गती देण्यासाठी गायत्रीदेवींनी भाजपचा झेंडा हाती घ्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. गायत्रीदेवी या खटाव तालुक्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
Tuesday, April 28, 2026
कराडच्या मंगळवार पेठ परिसरातील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृसिंह जन्मोत्सवानिमित्त... गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ; मोठ्या संख्येने उपस्थित रहा ; आयोजकांचे भाविकांना आवाहन ;
कराड येथील मंगळवार पेठ परिसरातील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृसिंह जन्मोत्सवानिमित्त गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६.३० ते ७.०० – पवमानसूक्त तसेच पंचसूक्त अभिषेक (नारायण सूक्त, विष्णू सूक्त, पुरुष सूक्त, श्री सूक्त व आमभृणी सूक्त) वेदशास्त्र संपन्न वरद वामन कुलकर्णी गुरुजी व मल्हारी उमराणी गुरुजी यांच्या उपस्थितीत
सकाळी ७.३० ते ८.०० – विष्णुसहस्रनाम पठण
सकाळी ८.३० ते ९.०० – वेदशास्त्र
पाठशाळेच्या वतीने मंत्रजागर
सकाळी ९.३० ते १०.०० – श्री नृसिंह बीज मंत्र जागर
सायंकाळी ४.०० ते ५.०० – शारदा भजनी मंडळ, कऱ्हाड यांचा भजन कार्यक्रम
सायंकाळी ५.३० ते ७.०० – सुप्रसिद्ध ह.भ.प. श्री. पित्रे गुरुजी, कासेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) यांचे सुमधुर कीर्तन (साथ: श्री ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ, कऱ्हाड)
सायंकाळी ७.०० ते ७.३० – श्री नृसिंह जन्मकाळ सोहळा
रात्री ८.०० ते ८.३० – हळदीकुंकू व तीर्थप्रसाद
रात्री ९.०० ते ९.३० – विष्णुसहस्रनाम मंत्रजागर
ज्या भाविकांना श्रीस अभिषेक करावयाचा आहे त्यांनी शनिवार, दिनांक २९ एप्रिल २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निक जवळ, संत सखु मंदिराचे पुढीलबाजूस, मंगळवार पेठ, कऱ्हाड येथे करण्यात आले असून ॲड. विराग अरुण जांभळे यांचे वतीने धार्मिक कार्यांत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क: मो. ९४२२६०३३९१ / ८६६८६७००९.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव, माधवी नाईक संजय भेंडे यांची नावे आघाडीवर ; प्रत्येकाने पक्षासाठी केलंय मोठं काम ;
वेध माझा ऑनलाइन ।
राज्याचं लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून 5 नावांची घोषणा झाली आहे. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधानपरिषदांच्या जागेसाठी पाच नावांची घोषणा केली. त्यामध्ये, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अहिल्यानगरमधील विवेक कोल्हेंना संधी विधानपरिषदेची संधी मिळाली आहे. सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विवेक कोल्हे यांचं नाव निश्चित झाल्याच्या कालपासून चर्चा सुरु होत्या. विवेक कोल्हे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. प्रमोद जठार हे सिंधुदुर्गमधील भाजप नेते असून त्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या 5 नावांमध्ये माधवी नाईक यांचंही नाव असून ते अनेक वर्षांपासून भाजप संघटनेत काम करतात. तर, संजय भेंडे भाजपचे उपाध्यक्ष असून ते नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, प्रमोद जठार यांनाही भाजपने संधी दिली असून जठार हे कोकणातील भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. कोकणावर अन्याय होत असल्याची भावना भरुन काढण्याचा प्रयत्न भाजपकडून या उमेदवारीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
विवेक कोल्हे...
यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वाढदिवसानिमित्ताने ही भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती होती. कोल्हे परिवाराचे नगर जिल्ह्यात वर्चस्व मानले जाते. विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. अहिल्यानगरमधील कोपरगावात काळे-कोल्हे असा जुना संघर्ष आहे. विधानसभा निवडणुकीवेळी आशुतोष काळे यांना राष्ट्रवादी कांग्रेसनं कोपरगावमधून संधी दिल्यानंतर भाजपकडून कोल्हे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले होते.
पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी
काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत प्रज्ञा सातव भाजपमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांच्या रिक्त जागेवर भाजपनं त्यांना उमेदवारी दिली आहे.
बच्चू कडू आपला पक्ष शिवसेनेत विलीन करणार, ?...बच्चू कडू यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांची शिंदे गटाच्या ऑफरबाबत एक अट...
वेध माझा ऑनलाइन
सध्या राज्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्या-त्या पक्षाकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी योग्य उमेदवाराचा शोध आणि निवड केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांना थेट विधानपरिषदेची आमदारकी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. मंत्रिपद घेऊन बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिंदे गटात विलीन करावा, असाही प्रस्ताव शिंदे यांनी बच्चू कडू यांच्यापुढे ठेवल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता मोठी माहिती समोर आली आहे. बच्चू कडू यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या ऑफरबाबत एक अट समोर ठेवल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बच्चू कडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मुंबईत एक बैठक झाली होती. या बैठकीत शिंदे यांनी बच्चू कडू यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर दिलेली आहे. सोबतच शिंदे यांनी कडू यांना मंत्रिपदही देण्यात येईल, असा प्रस्वात दिलेला आहे, असे सांगितले जात आहे. याबाबत बच्चू कडू यांनी अद्याप कोणतेही उघड भाष्य केलेले नाही. परंतु बच्चू कडू हे शिंदे गटाच्या ऑफरबाबत आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा आणि सल्लामसलत करत असल्याचे बोलले जात आहे.
पक्ष शिवसेनेत विलीन करा... पण...
सूत्रांच्या माहितीनुसार बच्चू कडू यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर पुढच्या सहा महिन्यांनी मंत्रिपद दिले जाईल, अशी ऑफर देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी सध्या विधानपरिषदेची आमदारकी घ्यावी. परंतु लगेच पक्षाचे विलिनीकरण करू नये. सहा महिन्यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतरच प्रहार जनशक्ती पक्षाचे शिंदे गटाच्या शिवसेनेत विलिनीकरण करावे, अशी भूमिका बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांची आहे.
एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं...पण...एकनाथ शिंदेंची एक अट आहे ! ...
वेध माझा ऑनलाईन
महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच काही महत्वाच्या घडामोडी घडू शकतात. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याच्या बातम्या सुरु आहेत. लवकरच विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आमदार आहेत. विधान परिषदेसाठी 28 मतांचा कोटा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन आमदार विधान परिषदेवर जाऊ शकतात. एकाजागेवर निलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. दुसऱ्या जागेवर कोणाला संधी मिळणार ? हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं. तशी ऑफर त्यांना देण्यात आली आहे. यामुळे बच्चू कडू यांचं एकप्रकारे राजकीय पूनर्वसन होणार आहे. सध्या बच्चू कडू आमदार नाहीयत.
बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर देताना त्यांच्यासमोर पक्ष विलीनीकरणाची अट ठेवली आहे. बच्चू कडू यांना त्यांचा प्रहार पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते विलीन करावा लागेल, तरच बच्चू कडू यांची विधान परिषदेवर वर्णी लागले अशी माहिती आहे. प्रहार हा बच्चू कडू यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. विदर्भात या पक्षाचं चांगलं नेटवर्क आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणण्याची प्रहार पक्षाची क्षमता नाहीय. पण कार्यकर्त्यांचं चांगलं जाळं आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं बळ वाढू शकतं.
Monday, April 27, 2026
डॉ सुरेश भोसले म्हणाले...कृष्णा बँकेची शेड्युल बँकेकडे वाटचाल ;
वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा बँकेचा १९७१ मध्ये सुरू झालेल्या प्रवासाने आज भक्कम टप्पा गाठला आहे. १९८४ मध्ये अवघ्या १५-२० कोटी ठेवी असलेल्या संस्थेने २०२६ मध्ये ३१०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हा आकडा म्हणजे ग्राहकांचा वाढता विश्वास आणि संस्थेची विश्वासार्हता याचीच साक्ष आहे. या यशामागे कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. संस्थेची खरी ताकद कर्मचारी असतात. त्यांच्या मेहनतीमुळेच संस्थेची ओळख निर्माण होते, सर्वांच्या साथीने पुढील वर्षात बँकेने ४२५० कोटींचे नवे लक्ष्य ठेवले असून, सर्व निकषांची पूर्तता करीत कृष्णाची शेड्युल बँकेकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
कृष्णा आर्थिक परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले व संचालकांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. सुरेश भोसले बोलत होते.
यावेळी कृष्णा बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासह कृष्णा आर्थिक परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कृष्णा बँकेच्या वाटचालीचा आढावा घेताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. आजच्या युगात सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षण दिले जात असून, ग्राहककेंद्री सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. स्व. जयवंतराव भोसले यांनी कृष्णा स्कूलचे विद्यापीठ करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून यशस्वीपणे साकार झाले. त्याच प्रेरणेतून आता कृष्णा बँकेला ‘शेड्युल बँक’ बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटचाल करूया. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही महत्त्वाचे निकष गाठणे आवश्यक आहे. त्यामध्ये १००० कोटींपर्यंत इतर ठेवी, शून्य एनपीए आणि विविध क्षेत्रांना व्यापक कर्जपुरवठा यांचा समावेश आहे. सध्या ३० शाखांमधून बँक सेवा देत असून, भविष्यात विस्ताराची दिशा अधिक ठोस करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ऊर्जेच्या वाढत्या गरजा आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेता सौरऊर्जा हा सर्वात प्रभावी आणि किफायतशीर पर्याय आमदार अतुल भोसले यांनी नागरिकांना उपलब्ध करून दिला आहे. युद्धासारख्या जागतिक घडामोडींमुळे ऊर्जा क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत सूर्यघर योजना लोकांना मोठा दिलासा देणारी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
कृष्णा बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी संस्थेच्या झपाट्याने झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला. कोविडपूर्वी ८३५ कोटी असलेला व्यवसाय अवघ्या सहा वर्षांत ३१०० कोटींवर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सहकारी बँकांवरील विश्वास कमी होत असताना पारदर्शकता आणि शिस्त यावर भर देत आहोत. रिझर्व्ह बँकेच्या धोरणांचे काटेकोर पालन करून ‘ए प्लस’ दर्जा आणि २०० टक्के कव्हरेज रेशो मिळवला आहे. पुढील वर्षासाठी ४२५० कोटींचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
कर्मचाऱ्यांसाठी मेरिट बेस प्रणाली राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बँकिंग क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे सांगत कामगार दिनानिमित्त कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
तसेच जयवंतराव भोसले आणि सुरेश भोसले यांच्या विचारांवर आधारित शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे कृष्णा आर्थिक परिवार मजबूतपणे उभा आहे. सर्व संस्थांचा एनपीए शून्यावर ठेवण्यात यश मिळाले असून, भविष्यातही हीच परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
आभार शिवाजीराव थोरात यांनी मानले. यावेळी कृष्णा आर्थिक परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार भोसले म्हणाले...
१० हजार घरांवर सोलर यंत्रणा बसविणार
पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील १० हजार घरांवर सोलर यंत्रणा बसविण्याचे उद्दिष्ट आहे. ३ किलोवॅटपर्यंतची प्रणाली सुमारे १.२० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर दरमहा सुमारे ३ कोटी रुपये आणि वर्षाला ३६ कोटी रुपयांची वीजबिल बचत होणार असून, मतदारसंघ ‘वीजबिलमुक्त’ करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जाणार असल्याचे आमदार भोसले यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, समाजसेविका डॉ. भाग्यश्री कुलकर्णी आणि डॉ. अंजनी शहा यांना पुरस्कार प्रदान ; श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रतिष्ठित पुरस्कारांनी केला सन्मान ;
समाजातील सकारात्मक कार्याची दखल घेत श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी यंदा साहित्य, सामाजिक सेवा आणि आदिवासी क्षेत्रातील कार्याला विशेष सन्मान मिळाला. ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील, समाजसेविका डॉ. भाग्यश्री कुलकर्णी आणि डॉ. अंजनी शहा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी या तिघांच्या कार्याचा गौरव करत, ही तिन्ही व्यक्तिमत्त्वे महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने समाजरत्ने आहेत, असे उद्गार काढले. साहित्य, मनोरुग्ण व अनाथांसाठी सेवा, तसेच वनवासी भागातील शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील योगदान यामुळे त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रजित देशमुख उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत, समाजातील चांगल्या विचारांना चालना देणाऱ्या संस्थांची गरज आज अधिक आहे. गेली १३ वर्षे सातत्याने हा विचार जपण्याचे कार्य या संस्थेने केले आहे, असे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील यांनी, आपल्या मनोगतात साहित्याच्या सामाजिक बांधिलकीवर भाष्य केले. लेखन करताना इतिहास आणि समाजाचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. साहित्य हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकृतीनंतर डॉ. भाग्यश्री कुलकर्णी आणि डॉ. अंजनी शहा यांनीही आपल्या कार्यातील अनुभव मांडले. भाग्यश्री कुलकर्णी यांनी, गेली २४ वर्षे मनोरुग्ण, अनाथ बालके आणि वृद्धांसाठी केलेल्या सेवाकार्याचा उल्लेख केला, तर डॉ. अंजनी शहा यांनी, वनवासी भागातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील आव्हाने आणि कार्याचा प्रवास उलगडला.
या समारंभात विश्वासराव पाटील व डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांना ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’, तर डॉ. अंजनी शहा यांना ‘स्व. सौ. वेणुताई चव्हाण महिला शक्ती गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
याशिवाय, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. अनिल शहा आणि स्नेहा फडणीस यांचा विशेष सत्कार करण्यात आला. म.सा.प. शाखा शहापुरीच्या वतीने मुनीर बागवान सावकार आणि विवेक वेळापुरे यांनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक चव्हाण यांनी केले, विवेक वेळापुरे यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. संतोष मोहिरे यांनी मानले. या सोहळ्यास संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य, साहित्यिक, कवी, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला : काय आहे बातमी?
वेध माझा ऑनलाईन
मुंबईतील पायधुनी भागात एका अत्यंत धक्कादायक घटनेत एकाच घरातील चार सदस्यांना आपले प्राण अकारण गमवावे लागले आहेत. रात्रीचे जेवण आणि फळ खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरात विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या भयंकर प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन या मृत्यूंमागील खऱ्या कारणाचा कसून शोध घेत आहेत.
नेमकी बातमी काय ?
रविवारी रात्रीच्या वेळी डोकाडिया कुटुंबाने आपल्या इतर नातेवाईकांसोबत मिळून बिर्याणीवर ताव मारला होता. त्यानंतर मध्यरात्री साधारण दीड वाजताच्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्ले. यानंतर काही क्षणांतच या कुटुंबातील सदस्यांना जुलाब आणि उलट्यांचा प्रचंड त्रास जाणवू लागला. त्रास इतका वाढला की घरातील चारही जण अचानक बेशुद्ध अवस्थेत कोसळले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तातडीने तेथील स्थानिक डॉक्टरांना पाचारण करण्यात आले.
वैद्यकीय तज्ज्ञ तिथे पोहोचले तेव्हा सर्वांचीच अवस्था अतिशय चिंताजनक बनली होती. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सर्व वैद्यकीय प्रयत्न निष्फळ ठरले आणि उपचारादरम्यान चौघांनीही अखेरचा श्वास घेतला. या हृदयद्रावक घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अब्दुल्ला डोकाडिया त्यांची पत्नी नसरीन डोकाडिया तसेच त्यांच्या आयशा आणि झैनब या दोन मुलींचा समावेश आहे.
दरम्यान मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून आता अन्नाचे तसेच त्या फळाचे काही नमुने जप्त करण्यात आले आहेत.
Sunday, April 26, 2026
सौ सोनल भोसेकर " रेणुकाई पुरस्काराने” सन्मानित.; नांदेड येथे परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात झाला सन्मान ;
नांदेड येथे आयोजित भव्य परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात उद्योजिका व उद्योगिनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सोनल भोसेकर यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “रेणुकाई पुरस्कार” देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, राज्यमंत्री कॅप्टन आशिष दामले, डॉ. गोविंदजी कुलकर्णी , माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, निखिल लातूरकर यांच्या हस्ते सौ भोसेकर यांचा हा सन्मान करण्यात आला.
सौ. सोनल भोसेकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे सांगण्यात आले
Saturday, April 25, 2026
आता आमदार अतुलबाबा कराड दक्षिण मतदारसंघाला "वीजबिलमुक्त' करण्यासाठी प्रयत्न करणार ; ... अतुलबाबांनी केला संकल्प आणि निर्धार ;
कराड तालुक्यातील नांदगाव आणि विंग या गावांमध्ये उभारण्यात आलेल्या पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सौर प्रकल्पांचे लोकार्पण आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या उपक्रमातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घरगुती वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान कराड दक्षिण मतदारसंघाला ‘वीजबिलमुक्त’ बनवण्याचा संकल्प करताना, हा प्रकल्प राज्यासाठी आदर्श ठरेल असा विश्वास आमदार भोसले यांनी व्यक्त केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरातील एक कोटी घरांपर्यंत पीएम सूर्यघर योजना पोहोचवण्याच्या उद्दिष्टाला गती देण्यासाठी महाराष्ट्रातून मोठे योगदान देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, उपअभियंता स्वप्नील जाधव, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, पंचायत समिती सदस्य गोविंद गावडे, मंडल अध्यक्ष सीमा साबणे, सरपंच हंबीरराव पाटील, योगेश पाटील, अवधूत इनामदार, हर्षवर्धन मोहिते, सागर पाटील, सर्जेराव थोरात, शंकरराव थोरात, सचिन पाटील, सुशांत मोहिते, अभिजीत कोठावळे, दीपक हजारे, दत्तात्रय माने, तानाजी चौरे, दत्तात्रय थोरात, मारुती मोहिते यांसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार भोसले यांनी योजनेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, मतदारसंघात सध्या सुमारे १० हजार घरांवर १ ते ३ किलोवॅट क्षमतेचे सोलार प्रकल्प उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यात ३० एप्रिलपर्यंत सुमारे दीड हजार घरांवर सोलार यंत्रणा बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पूर्वी प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आलेल्या सोलार प्रकल्पांमुळे नागरिकांना दरमहा येणारे १३०० ते २५०० रुपयांचे वीजबिल पूर्णपणे शून्यावर आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केंद्र शासनाची पीएम सूर्यघर योजना कृष्णा सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवली जात असून, राज्याच्या ऊर्जा विभागाच्या सहकार्याने नागरिकांना कोणतीही अडचण न येता प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना दर्जेदार पद्धतीने राबवली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार रोहित पवार व युवा नेते सौरभ पाटील यांची कराडात अचानक भेट...एकत्र येत खाल्ली मिसळ ...काय म्हणाले रोहित पवार?
वेध माझा ऑनलाइन।
काल शुक्रवारी माजी नगरसेवक सौरभ पाटील यांना कराडमध्ये आमदार रोहित पवार येणार असल्याचा अचानक फोन आला...ते पुण्याहून कराडात आले...थांबले... त्यांनी येथे येऊन मिसळ देखील खाल्ली... आणि ते पुढे कोल्हापूरला निघून गेले...
काय आहे नेमकी बातमी?
काल शुक्रवारी दुपारी अचानक कराडचे माजी नगरसेवक सौरभ पाटील यांना आमदार रोहित पवार कराडमध्ये येणार असल्याचा फोन आला... वेळ दुपारची... म्हणजे...जेवायचीच वेळ...त्यामुळे रोहित पवार यांनी सौरभ पाटील यांना मिसळ खायची इच्छा व्यक्त केली... मग, ...दत्त चौकातील एका हॉटेलमध्ये सौरभ तात्यांनी त्यांना मिसळ खाण्यासाठी आमंत्रण दिले... ...आमदार रोहित पवार आणि युवा नेते सौरभतात्या या दोघांसह कराडचे नगरसेवक अल्ताफ शिकलगार, उद्योजक तनय जाधव, सामाजिक कार्यकर्ते समीर कुडची राकेश शाह जीवन पाटील तसेच काही कार्यकर्त्यांनी याठिकाणी येत मिसळीचा आस्वाद घेतला...
सौरभतात्यांसारखा उमदा अभ्यासू दिलदार युवक आपल्याबरोबर राजकीय प्रवाहात सक्रिय असावा...अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि त्यांनी कराडमध्ये चालू असणाऱ्या एकूणच राजकीय घडामोडी जाणून घेतल्या... निवांत तुमच्याकडे येईन त्यावेळी भेटून बोलू, असे सांगत... त्यांनी कोल्हापूरकडे प्रयाण केले...
आमदार रोहित पवार व कराडचे युवा नेते सौरभ पाटील यांच्या या कराडमध्ये झालेल्या अचानक भेटीची चर्चा शहर व परिसरात आजही जोरदार सुरू आहे...
Friday, April 24, 2026
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला; आम आदमी पक्षात मोठी फूट ; केजरीवाल यांना मोठा धक्का ;
वेध माझा ऑनलाईन।
आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. खासदार राघव चड्ढा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोबतच आप पक्षाच्या इतरही खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर आपच्या त्या सातही खासदारांनी भाजप कार्यालयात जाऊन अध्यक्षांची भेट घेतली आहे.
आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासह अशोक मित्तल, संदीप पाठक तसेच एकूण सात खासदारांनी भाजपमध्ये सामील होण्याचं ठरवलं आहे. थेट पत्रकार परिषद घेऊन राघव चड्ढा यांनी तशी माहिती दिली आहे. या अपडेटनंतर आपचे ७ खासदार भाजप अध्यक्ष नीतीन नबीन यांना भेटण्यासाठी भाजप कार्यालयात पोहोचले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पक्षासोबत वाद चालू होते. पक्षाच्या धोरणांबाबत त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली होती. त्यानंतर आता त्यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोल 28 रुपयांनी महागणार ? सोशल मीडियावर चर्चा!
वेध माझा ऑनलाईन
आज, शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असतानाही, भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही मोठी दरवाढ केलेली नाही. ब्रेंट क्रूड ऑईलने प्रति बॅरल १०३ डॉलरचा टप्पा ओलांडल्यामुळे इंधन दरवाढीची भीती व्यक्त केली जात होती, मात्र तूर्तास भारतीयांना दिलासा मिळाला आहे.
पेट्रोल २८ रुपयांनी महागणार?
सोशल मीडियावर सध्या विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २५ ते २८ रुपयांची प्रचंड वाढ होणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र, पेट्रोलियम मंत्रालयाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, असा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही आणि नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
हवामान विभागाचे राज्यासाठी दोन भिन्न प्रकारचे यलो अलर्ट जारी ;
वेध माझा ऑनलाईन।
सध्या संपूर्ण राज्यामध्ये निसर्गाचे एक अत्यंत दुर्मिळ आणि विसंगत रूप पाहायला मिळत आहे. एका बाजूला अंगाची लाहीलाही करणारी कडक उन्हे तापत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अचानक येणारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे. हवामान खात्याने नागरिकांना या बदलत्या आणि अत्यंत विचित्र हवामानापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे महत्त्वाचे आवाहन केले आहे.
भारतीय हवामान विभागाने आज राज्यासाठी दोन भिन्न प्रकारचे यलो अलर्ट जारी केले आहेत. त्यानुसार, कोकण आणि विदर्भ प्रांतात उष्णतेच्या तीव्र लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. याउलट, मराठवाडा विभागात मात्र वादळी वाऱ्यांसह आणि भयंकर गारपिटीसह पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे. आगामी तीन तासांसाठी प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला असून, यादरम्यान आकाशात विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वेगवान वारे वाहतील. या पार्श्वभूमीवर, अत्यंत तातडीचे काम असल्याशिवाय दुपारी घराबाहेर पडू नये, असा सक्त सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.
1 मे पासून पैसे काढण्याच्या नियमात बदल ;
वेध माझा ऑनलाईन।
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कोट्यवधी सदस्यांसाठी एक अतिशय आनंददायी आणि क्रांतिकारी बातमी आहे. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी करावी लागणारी अनेक दिवसांची प्रतीक्षा आता कायमची संपणार आहे. आगामी १ मे २०२६ पासून खातेदारांना त्यांच्या हक्काची रक्कम थेट यूपीआय प्रणालीच्या माध्यमातून त्वरित स्वतःच्या बँक खात्यात वळती करण्याची महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध होणार आहे.
सध्याच्या प्रचलित प्रक्रियेनुसार, सदस्यांना त्यांचे पीएफचे पैसे हातात मिळण्यासाठी किमान ७ ते १५ दिवसांचा प्रदीर्घ कालावधी लागतो. मात्र, आता नवीन यूपीआय पेमेंट पद्धतीच्या समावेशामुळे हे काम अत्यंत वेगाने पार पडेल. विशेषतः वैद्यकीय किंवा इतर कोणत्याही तातडीच्या प्रसंगी कामगारांना अगदी काही तासांतच त्यांची हक्काची रक्कम उपलब्ध करून देणे, हा या महत्त्वपूर्ण बदलामागचा सरकारचा मुख्य हेतू आहे.
नव्या सुविधेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दररोज पैसे काढण्यावर काही विशिष्ट मर्यादा लागू केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, शिक्षण किंवा अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय खर्चासारख्या तातडीच्या कारणांसाठी सदस्य ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचा आगाऊ निधी यूपीआयचा वापर करून लगेचच काढू शकतील. यामुळे अत्यंत निकडीच्या वेळी पैशांची तत्काळ सोय होण्यास मोठी मदत मिळणार आहे.
बीडच्या तरुंगातील कैद्यांचे वाल्मिक कराड बाबतचे "ते' संभाषण व्हायरल;
वेध माझा ऑनलाईन।
गेल्या काही दिवसांपासून बीडच्या तरुंगातील कैद्यांचे संभाषण चांगलेच व्हायरल झालं आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि गँगकडून इतर कैद्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्याच अनुषंगाने सलग दोन दिवस अझहर पठाण नामक कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. त्यात पहिल्या रेकॉर्डिंग मध्ये तो वाल्मिक कराडच्या गँगकडून आपल्याला अमानुष मारहाण झाल्याचे सांगत आहे. तर दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड यांना बदनाम करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, म्हणून मी तसं बोललो असंही तोच म्हणत आहे. आता, बीड कारागृहातील कैदी सनी आठवलेची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.
बीड कारागृहात कैदी असलेल्या सनी आठवले याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून वाल्मिक कराडचा जेलमध्ये दबदबा असल्याचे त्याने म्हटले. तसेच, अजहर पठाणवर दबाव आणत आहेत, त्याला मारहाण झाली आहे, त्याचा खुबा उपसला आहे, असेही तो सांगतो. या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्याने या कॉल रेकॉर्डिंगमधून केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी जबाबदाऱ्यांचे तिहेरी वाटप ; खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी, तर जय पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती आणि पुणे ग्रामीण विभागाची जबाबदारी;सुनेत्रा पवार राज्यभर फिरुन पक्ष संघटनेचे काम पाहणार ;
वेध माझा ऑनलाईन
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासह पक्षातील सर्व महत्त्वाच्या निर्णयांची सूत्रं आणि अधिकार स्वत:च्या हाती घेणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुनेत्रा पवार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी जबाबदाऱ्यांचे तिहेरी वाटप केले आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्यभर फिरुन पक्ष संघटनेचे काम पाहतील. खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी असेल. तर अजित पवार यांचे कनिष्ठ चिरंजीव जय पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती आणि पुणे ग्रामीण विभागाची जबाबदारी असेल. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत पातळीवर बऱ्याच घडामोडी सुरु आहेत. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना बाजुला सारुन पक्षाची सूत्रे स्वत:च्या हातात घेण्याचा प्रयत्न काही ज्येष्ठ नेत्यांनी केल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांनी भविष्यात कोणताही दगाफटका टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे आपल्या कुटुंबाच्याच हातात ठेवण्याच्यादृष्टीने हा निर्णय घेतला असू शकतो, अशी चर्चा आहे
आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी भाजपात जाण्याचा घेतला निर्णय ; राघव चड्ढा यांच्यासोबत आप पक्षाच्या राज्यसभेच्या सहा खासदारांनीही भाजपातजाण्याचा घेतला निर्णय ;
वेध माझा ऑनलाईन।
देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असलेले आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ते फक्त एकटेच भाजपात जात नाहीयेत. त्यांच्यासोबत राज्यसभेचे इतरही दोन खासदार भाजपात जाणार आहेत. थेट पत्रकार परिषद घेऊन राघव चड्ढा यांनी तशी माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पक्षासोबत वाद चालू होते. पक्षाच्या धोरणाबाबत त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली होती. त्यानंतर आता त्यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राघव चड्ढा यांच्यासोबतच आप पक्षाच्या राज्यसभेच्या इतर सहा खासदारांनीही भाजपात विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.
राघव चड्ढा यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राज्यसभेत असताना त्यांनी भाजपाच्या धोरणांवर सडकून टीका केलेली आहे. राज्यसभेत त्यांनी केलेले काही भाषणं गाजलेले आहेत. राज्यसभेत त्यांनी गीग वर्कर्स, इंटरटनेट, विद्यार्थ्यांचे प्रश्न अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पक्षासोबत वाद सुरू होते. पक्षाच्या धोरणानुसार राघव चड्ढा काम करत नाहीयेत, असा आरोप आप पक्षाने केला होता. त्यानंतर आता राघव चड्ढा यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे राघव चड्ढा यांच्यासोबतच एकूण सात खासदारांनीही भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. हरभजन सिंह, स्वाती मालिवाल, राजेंद्र गुप्त, संदीप पाठक, विक्रमजित साहनी, अशोक मित्तल अशा इतर सहा खासदारांची नावे आहेत.
Wednesday, April 22, 2026
सातारा जिल्ह्यातील आयटी पार्कसाठी जमीन देण्याला राज्य सरकारची मंजुरी ; मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती प्रसिद्ध ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा ; शिवेंद्रसिंहराजेंनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार ;
वेध माझा ऑनलाइन।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (22 एप्रिल) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निर्णयांची संक्षिप्त माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामध्ये सातारा जिल्ह्यातील आयटी पार्कसाठी जमीन देण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
पुणे-बंगळुरू महामार्गावर नागेवाडी (ता. सातारा) येथील ४२ हेक्टर ५५ आर एवढी शासकीय जमीन ‘आयटी पार्क’ उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) वर्ग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात ‘आयटी पार्क’ उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी मोठा पाठपुरावा केला. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.
सातारा जिल्ह्यातील ‘आयटी’ क्षेत्राशी निगडित इंजिनियर्स आणि युवक व युवतींना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, येथील युवकांना पुणे, मुंबई यांसह अन्य राज्यातील शहरात नोकरीसाठी जावे लागू नये यासाठी सातारा तालुक्यातील नागेवाडी (लिंब खिंड) येथील शासकीय जागेत ‘आयटी पार्क’उभारण्यात यावा, यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठपुरावा सुरू केला होता. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपूर्वीच या जागेची पाहणी ‘एमआयडीसी’ विभागामार्फत करण्यात आली होती.
शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत नागेवाडी येथील गट नं. ३०८/१ येथील ४२ हेक्टर ५५ आर एवढे क्षेत्र ‘आयटी पार्क’साठी आरक्षित करण्यात आले होते. ‘आयटी पार्क’विकसित करण्याचे काम प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी ही जागा महसूल विभागाकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करणे आवश्यक होते. यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरू होता.
त्यानुसार आज मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागेवाडी येथील ४२ हेक्टर ५५ आर एवढे शासकीय क्षेत्र ‘आयटी पार्क’ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी मान्यता राज्याच्या महसूल विभागाने दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात ‘आयटी पार्क’ उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच पुढील कार्यवाही गतीने केली जाणार आहे. पुढील कार्यवाही गतीने होण्यासाठी आवश्यक त्या सूचना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
Tuesday, April 21, 2026
एकनाथ शिंदेंच्या 'त्या' इशाऱ्याला शिवेंद्रराजेंचे प्रत्युत्तर ,तर... शंभूराज देसाईंना शिवेंद्रसिंहराजे यांचा टोला ;
वेध माझा ऑनलाइन
आम्ही युती म्हणून एकत्र काम करतो आहे. जिल्हा परिषदेला जे झालं ते स्थानिक राजकारण होतं. जिल्हा परिषदेत भाजपला 28 जागांचे बहुमत मिळालं होते. मात्र, जाणून बुजून आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. एकत्र काम करू, असं आमचे म्हणणे होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
रायगडमध्ये टोकाचा विरोध असताना देखील राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केलीच ना, असे सांगत साताऱ्यात एवढा टोकाचा विरोध तरी नव्हता, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. हा जिल्ह्याचा विषय होता आणि तो विषय आता संपला आहे, असं देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे.
दरम्यान शिवसेनेचे जे सदस्य आमच्या सोबत आले त्यांना तुम्ही सांभाळू शकला नाही, असा टोला देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शंभूराज देसाईना लगावला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे या भाजपच्या पदाधिकारी आहेत. त्या भाजपच्या असल्याने आम्ही त्यांचे नाव पुढे केले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे सदस्य आमच्या सोबत आले त्यांना ते सांभाळू शकले नाहीत, असा टोला देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शंभूराज देसाईना लगावला आहे.
शिवसेनेला भाजपाचा धोका वाटतो का? हे त्यांना विचारले पाहिजे, अशी कोपरखळी देखील त्यांनी लगावली.
आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली सध्या जिल्ह्याचे काम चांगले सुरू आहे आणि त्यांच्यावर विश्वास आहे, असे देखील शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
शंभूराज देसाई यांचे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या घडामोडींवर भाष्य ; म्हणाले ; मताचा कौल शिवसेना- राष्ट्रवादीच्या युतीलाच ;
शिवसेनेच्या सातारा जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक यांचा भव्य सत्कार आणि जाहीर सभा साताऱ्यातील गांधी मैदानावर आयोजित करण्यात आली. या सभेला शिवसेनेचे मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या घडामोडींवर भाष्य केलं. ते म्हणाले साताऱ्याचं जनमत मताचा कौल शिवसेना- राष्ट्रवादीच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता. सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढत असून त्याचं कारण एकनाथ शिंदे असल्याचं देखील शंभूराज देसाई म्हणाले.
मंत्री देसाई पुढे म्हणाले...
गेल्या काही महिन्यांमध्ये नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. याच्या अगोदर जिल्हा परिषदेत शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले होते. शिवसेनेचं तिकीट मिळालं नाही म्हणून विजय पवार आघाडी करुन उभा राहिला. शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद सदस्य होते. आज आम्हाला तुम्हाला सांगताना आनंद होतो, जिल्हा परिषद सदस्यसंख्या तीन वरुन पंधरावर गेले आहेत. 29 पंचायत समिती सदस्य आहेत, जवळपास 30-32 नगरसेवक आहेत. एक पंचायत समिती सभापती, तीन पंचायत समित्यांमध्ये उपसभापती, एका नगरपालिकेचा नगराध्यक्ष लोकांच्या आशीर्वादानं निवडून आणला आहे. सामान्य जनतेच्या पाठबळावर निवडून आणलेला आहे,आज जिल्ह्यात आशावादी नेतृत्व एकनाथ शिंदे यांचं वाटतं, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
Monday, April 20, 2026
आजच्या सभेचे मला निमंत्रण नाही, फ्लेक्सवरही माझे फोटो नाहीत; मंत्री शंभूराज देसाई यांची ही पहिल्यापासूनची सवय ; आमदार महेश शिंदे यांची शेलक्या शब्दात मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर टीका ;
वेध माझा ऑनलाईन।
आज साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे त्यानिमित्ताने जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये अनेक पक्ष प्रवेश होणार आहेत निवडून आलेल्या शिवसेनेच्या झेड पी पंचायत समिती सदस्यांचे सत्कार देखील यावेळी होणार आहेत दरम्यान आजच्या या सभेचे फ्लेक्स जिल्हाभर लागले असताना त्यावर कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा फोटो लावण्यात आलेला नाहीये...
याबाबत महेश शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करत मंत्री देसाई यांची ही पहिल्यापासूनची सवय असल्याचे सांगीतले तर मला असल्या गोष्टीचा काही फरक पडत नाही कारण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मंत्री देसाई हे जिल्ह्याचे मुख्य आहेत त्यामुळे जिल्ह्याचे शिवसेना पक्षाचे निर्णय तेच घेत असतात असेही ते म्हणाले, ज्यावेळी मला बोलावले गेले तेव्हा मी गेलो , मात्र मला निमंत्रण नसेल तर मी जात नाही, आजच्या सभेलाही आपल्याला बोलावले नसल्याचे त्यांनी सांगितले मधल्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीकीदरम्यान भाजप-सेनेमध्ये झालेल्या ताणतणावाच्या प्रकारामुळे नाराज असल्याने त्यांनी मला आमंत्रण दिले नसावे... मला ते वेगळी वागणूक देत असावेत...असेही आमदार शिंदे यावेळी म्हणाले
ते पुढे म्हणाले
मंत्री शंभूराज देसाई यांचा पहिल्यापासून स्वभावच तसा आहे महाबळेश्वर येथे पर्यटन महोत्सव झाला तसेच पाटण, सातारा, कराडमध्ये कार्यक्रम झाले त्यावेळी देखील मंत्री देसाई यांनी मला बोलावले नव्हते त्यावेळी देखील माझे बॅनर वर फोटोही नव्हते त्यामुळे त्यांच्या या स्वभावाची आम्हाला सवय आहे त्यामुळे याचा मला काही फरक पडत नाही असंही आमदार शिंदे म्हणाले आहेत
माझी बायको 2011 पासून भाजप मध्येच आहे आणि ती भाजपमधूनच झेड पी ला निवडून आली आहे त्यामुळे याबाबत कोणी नाराज असायचे कारण नाही
मी पण स्वतःच्या जोरावर निवडून येतो त्यामुळे मी कोणाला त्रास द्यायला जात नाही आणि मलाही कोणी त्रास द्यायचा नाही असेही ते यावेळी म्हणाले ज्यावेळी साहेबांशी बोलेन त्यावेळी जे सत्य आहे ते मी साहेबांना सांगणार आहे असेही ते म्हणाले
Friday, April 17, 2026
तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांचा आणखी एक घोटाळा उघड! ; सोमवार पेठेत बिल्डरच्या फायद्यासाठी रस्ता वाढवला ; अजय पावसकर यांचा आरोप ; शहरातील 2 ठिकाणच्या हाकर्सझोनला भाजपचा विरोध ; कराड पालिका सभा ;
कराड पालिकेचे तत्कालीन वादग्रस्त मुख्याधिकारी शंकर खंदारे यांचा आणखी एक रस्ता घोटाळा पालिकेचा शुक्रवारी झालेल्या सभेत समोर आला. सोमवार पेठेत ६ मीटरचा रस्ता हा ९ मीटर करण्याचा ठराव तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी बिल्डरच्या फायद्यासाठी मंजूर केल्याची धक्कादायक माहिती नगरसेवक अजय पावसकर यांनी पालिका सभेत दिली. तसेच सोमवार पेठेतील सुमारे ५० ते ५५ घरे बाधित होणार असून खंदारे यांचा तो ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान शहरातील होकर झोन चा विषय पालिकेत सभेत आला त्यावरही सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी दीर्घकाळ चर्चा केली होकर झोन चे आठ झोन तयार करण्यात आले आहेत त्यातील दोन झोनना भाजपने विरोध दर्शवला
कराड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. १७ रोजी पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीस दुखवट्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष सभेस सुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीसच नगरसेवक अजय पावसकर यांनी सोमवार पेठ येथील रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी सोमवार पेठेतील रस्ता हा सहा मीटरचा असताना देखील तो नऊ मीटरचा करून त्याचा ठराव मंजूर केला आहे. यात ५० ते ५५ घरे बाधित होत आहेत. नागरिकांनी रस्त्याचा ठराव रद्द करावा, अशी देखील मागणी केली आहे. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून पैसे घेऊन रस्त्याचे काम केले असल्याचा आरोप पावसकर यांनी केला. यावर नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी मला याबाबत कालच समजले असून याची योग्य ती चौकशी केली जाईल, असे सांगितले.
त्यानंतर उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी शहरातील ड्रेनेजचा विषय मांडला असता विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी ड्रेनेजच्या कामांवर आक्षेप घेतला. रस्त्याची जी अपूर्ण कामे आहेत ती कॉन्ट्रॅक्टर नक्की स्वतः काम करणार आहेत की दुसऱ्याकडून करणार आहेत? आणि वारंवार निकृष्ट दर्जाची कामे करून ते नगरपालिकेचे आणखी किती नुकसान करणार आहेत? असा सवाल करीत अशा पालिकेचे नुकसान करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे,
कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण शहरात ड्रेनेज स्वच्छता करण्याचे काम पूर्ण केले नसून ड्रेनेज जाम होत आहे. काम नक्की केलं आहे का हे तपासले पाहिजे. ड्रेनज पाईप चौकप होत आहे.
मलकापूर नगरपरिषदेचे सांडपाणी ड्रेनेज, नाल्याद्वारे कराडच्या कृष्णा, कोयना नदीत मिसळत असल्याने नदीप्रदूषण होत असून याबाबत कठोर भूमिका पालिका प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी केली. रस्त्यावरील खोदकाम, हॉकर्स झोन, भाजी मंडईतील प्रश्न आदींसह सुमारे १५६ विषयांवर चर्चा करण्यात आली.
भाजी मंडईतील कट्टे नव्याने विकसित करण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती अल्ताफ शिकलगार यांनी दिली.
मुंडे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून मंडई परिसरातील आकर्षेही पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी नगरसेवकांनी रस्त्यावरील मंडई लवकरात लवकर मंडईच्या आत न्यावी अशा स्वरूपाच्या मागण्या केल्या.
आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी वाराणसीतील कचरा प्रकल्पाची माहिती देत हा प्रकल्प कराड नगरपालिकेने राबवावा यासाठी त्या प्रकल्पाची भेट देऊन पाहणी करावी असे सुचवले नगराध्यक्ष राजेंद्र श्री यादव यांनी कराड शहरातील सर्व नगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मंजूर झाला असल्याचे सांगितले.
कराडच्या मुख्य बाजारपेठेत हायटेक टॉयलेट्स चार ठिकाणी उभारण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंग यादव यांनी सांगितले शहरातील होकर जून चा विषय पालिकेस सभेत आला त्यावरही सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी दीर्घकाळ चर्चा केली होकर झोन चे आठ झोन तयार करण्यात आले आहेत त्यातील दोन झोनना भाजपने विरोध दर्शवला गजानन हाउसिंग सोसायटीची वाढीव पानेपट्टी रद्द करून ती पूर्वीप्रमाणे आकारण्याचा विषय ही एकमताने मंजूर झाला
लोकसभेत महिला आरक्षण सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांची मिश्किल टिप्पणी .. म्हणाले... मलाही पत्नी नाही आणि पंतप्रधानांनाही नाही,”...
वेध माझा ऑनलाईन।
लोकसभेत महिला आरक्षण सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. विशेषतः विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मिश्किल टिप्पणी करत सभागृहातील वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर लगेचच विधेयकातील तांत्रिक त्रुटींवरून केंद्र सरकारवर बोचरी टीकाही केली. या चर्चेत महिलांचे महत्त्व, कौटुंबिक संस्कार आणि राजकीय आरक्षणातील जातनिहाय वाटा हे मुद्दे केंद्रस्थानी राहिले.
विधेयकावर बोलताना राहुल गांधी यांनी महिलांच्या प्रभावाचा उल्लेख केला आणि हसत हसत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी केली. “मलाही पत्नी नाही आणि पंतप्रधानांनाही नाही,” असे विधान त्यांनी करताच सभागृहात एकच हस्यकल्लोळ उडाला.
राहुल गांधींनी आपली बहीण प्रियांका गांधी हिच्या संसदेतील प्रभावी भाषणाचे जाहीर कौतुक केले. प्रियांकाने अवघ्या पाच मिनिटांत जे साध्य केले, ते आपल्याला २० वर्षांत जमले नाही, असे म्हणत त्यांनी दाद दिली. त्यांच्या या कौतुकामुळे गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक खासदारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. आपल्या आजी इंदिरा गांधी यांच्याकडून मिळालेल्या सत्याच्या आणि निर्भीडपणाच्या शिकवणीचा उल्लेख करत त्यांनी राजकीय जीवनातील संघर्षावर भाष्य केले.
भाषणाच्या उत्तरार्धात राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत हे विधेयक म्हणजे महिला सक्षमीकरण नसून ‘निवडणूक नकाशा’ बदलण्याचा कट असल्याचा आरोप केला. हे विधेयक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि विशेषतः इतर मागासवर्गीय समुदायांच्या हक्कांवर गदा आणणारे असल्याचे त्यांनी म्हटले. ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद नसल्यामुळे हे विधेयक अपूर्ण असल्याची टीका त्यांनी केली
Thursday, April 16, 2026
चांगली बातमी ; आता युद्धविराम ; डोनाल्ड ट्रम्प यांनि केली मोठी घोषणा:
वेध माझा ऑनलाईन
युद्धाने पोळलेल्या पश्चिम आशियातून आणखी एक चांगली बातमी आली आहे. लेबनॉन आणि इस्रायलने १० दिवसांचा युद्धविराम घोषीत केला आहे. या सीजफायरची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सीजफायरची घोषणा करताना सांगितले की आताच माझी लेबनॉनचे अत्यंत सन्मानित राष्ट्राध्यक्ष जोसेफ ऑन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चांगली बोलणी झाली आहेत. या दोघांनी दोन्ही देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी औपचारिक रुपाने १० दिवसांचा युद्धविरामाची सुरुवात करण्यास होकार दिला आहे. अमेरिकन वेळेनुसार युद्धविराम सायंकाळी ५ वाजल्यापासून लागू होईल. इस्रायली हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लेबनॉनींची संख्या २,१९६ इतकी झाल्यानंतर हा युद्धविराम घोषीत झाला आहे.
भाडेकरूंशी संबंधित एका प्रकरणात उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ; घरमालकांना बसणार झटका ;
वेध माझा ऑनलाईन
भाडेकरूंशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. एखाद्या भाडेकरूने ज्या घरात तो राहत आहे, त्या मालमत्तेतील काही हिस्सा कायदेशीररित्या खरेदी केला असेल, तर तो केवळ भाडेकरू राहत नाही.
।वेध माझा ऑनलाईन।
अशा परिस्थितीत त्याला घरमालक भाडेकरू म्हणून बेदखल करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
।वेध माझा ऑनलाईन।
न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वाचे निरीक्षण नोंदवण्यात आले. भाडेकरूने मालमत्तेतील मालकी हक्क मिळवल्यानंतर त्याचे भाडेकरूपद संपुष्टात येते आणि तो सहमालक बनतो.
।वेध माझा ऑनलाईन।
त्यामुळे त्याला घराबाहेर काढण्याचा अधिकार इतर मालकांना राहत नाही.
।वेध माझा ऑनलाईन।
हा वाद दक्षिण मुंबईतील एका जुन्या मालमत्तेशी संबंधित होता. या प्रकरणात एक व्यक्ती अनेक वर्षे भाडेकरू म्हणून राहत होती. कालांतराने त्या व्यक्तीने मूळ मालकांपैकी एकाकडून घराचा काही हिस्सा विकत घेतला.
।वेध माझा ऑनलाईन।
विधान परिषदेसाठी निवडणूक जाहीर- ९ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर ;
वेध माझा ऑनलाईन।
विधान परिषदेच्या रिक्त जागा भरण्यासाठी आता मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
।वेध माझा ऑनलाईन।
पुढील महिन्यात रिक्त होत असलेल्या ९ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
।वेध माझा ऑनलाईन।
उद्धव ठाकरे, शशिकांत शिंदे, डॉ. नीलम गोऱ्हे आदी सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना २३ एप्रिल रोजी जाहीर होणार आहे. या ९ जागांसह एका जागेसाठी पोटनिवडणूकही पार पडणार आहे.
।वेध माझा ऑनलाईन।
येत्या १३ मे २०२६ रोजी विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आणि राजेश राठोड यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
।वेध माझा ऑनलाईन।
विधानसभेतील सध्याच्या पक्षीय ।वेध माझा ऑनलाईन। संख्याबळानुसार, भाजपच्या पारड्यात ५ जागा जाण्याची शक्यता आहे,
।वेध माझा ऑनलाईन।
तर शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडी १ जागा जिंकू शकते. मात्र, राष्ट्रवादीकडे अतिरिक्त १३ मते असल्याने आणि महायुतीने अधिक उमेदवार दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर असून, चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
।वेध माझा ऑनलाईन।
विनोद कांबळीला मागचं पुढचं काहीच आठवेना… कांबळीच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती ;
वेध माझा ऑनलाईन।
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या गंभीर आरोग्य समस्यांशी झुंज देत आहेत. कांबळीच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळीला ‘ब्रेन स्ट्रोक’चा मोठा धोका असून त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ (क्लॉट) तयार झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या समस्येकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता उपचार अधिक गुंतागुंतीचे झाले असल्याचं सांगितलं जात आहे. या आजाराचा त्यांच्या स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम झाला असून त्याला मागचं काहीच आठवत नाहीये. सध्या तो स्मरणशक्तीशी झुंज देत असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिली आहे. दरम्यान, या कठीण काळात त्याचा बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकरसह अनेक माजी क्रिकेटपटूंनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.
Monday, April 13, 2026
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर ; अशोक खरातशी संबंधित १३२ खात्याचं गूढ उकलणार का?
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आज शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या आहेत. अशोक खरातशी संबंधित १३२ खात्याचं गूढ उकलणार का, याची चर्चा सुरू आहे.महिलांचे शोषण आणि अनेकांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी तुरुंगात असणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणातील चौकशीला वेग आला आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर हे शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाल्या आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आज शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या आहेत. समता पतसंस्थेतील बहुचर्चित १३२ संशयास्पद खात्यांच्या प्रकरणात ही मोठी कारवाई मानली जात आहे. अशोक खरात नॉमिनी असलेल्या या खात्यांमधून झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहारप्रकरणी पोलिसांनी चाकणकर यांची चौकशी सुरू केली आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, यापैकी चार खाती प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर आहेत. यामध्ये प्रतिभा चाकणकर यांच्या नावे दोन, तर त्यांच्या मुलांच्या नावे दोन खाती असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावावर असलेल्या या चार खात्यांमधून आतापर्यंत तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. इतकी मोठी रक्कम खात्यात कोठून आली आणि या व्यवहारांचे स्वरूप काय होते, या दिशेने शिर्डी पोलीस तपास करत आहेत.
पाकिस्तान कलाकारांनी केली आशाताईंच्या निधनावर हळहळ व्यक्त ;
वेध माझा ऑनलाईन।
दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, संपूर्ण जगभरात फार मोठी आहे. आशा भोसले यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली चाहत्यांच्या मनावर आणि संगीतविश्वावर राज्य केलं. पण अचानक आशा भोसले यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि सेलिब्रिटींसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. महत्त्वाचं म्हणजे फक्त भारतीय सेलिब्रिटींनीच नाही तर, पाकिस्तान कलाकारांनी देखील आशा ताई यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.
अभिनेता अहसान खान सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, “एका युगाचा अंत झाला आहे.” अभिनेता अदनान सिद्दीकी म्हणाला, “अगदी शांत क्षणांनाही भावनांनी भरून टाकण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती. आज ती शांतता खूप जड वाटत आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या भावनांसाठी, निर्माण केलेल्या आठवणींसाठी आणि मागे सोडलेल्या जादूसाठी धन्यवाद. तुमचा आवाज नेहमीच ऐकू येईल, कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या रूपात.”
Sunday, April 12, 2026
आशा भोसलेंच्या निधनाचं कारण काय? काय म्हणाले डॉक्टर ?
वेध माझा ऑनलाईन।
भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी निधन झाले. मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी वयाच्या ९३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
आशा भोसलेंच्या निधनाचं कारण काय?
ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितले की, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपत्कालीन वैद्यकीय विभागात उपचार सुरू असताना त्यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाले, त्यामुळे त्यांना वाचवणे शक्य झाले नाही.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यानुसार, त्यांचे पार्थिव सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार असून, दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार पार पडतील.
क्रिकेटच्या मैदानातच वाहिली गायिका आशा भोसलेंना श्रद्धांजली ;
वेध माझा ऑनलाईन
आयपीएल 2026 मधील 20 व्या साखळी सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन दिग्गज संघ आमने-सामने आहेत. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून, सामन्याच्या सुरुवातीला एक अत्यंत भावूक क्षण पाहायला मिळाला.
आशा ताईंच्या स्मृतीप्रित्यर्थ आजच्या सामन्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू आशा भोसले यांना श्रद्धांजली म्हणून हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. तर सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू, पंच आणि उपस्थित प्रेक्षकांनी एक मिनिटाचे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली. मौन पाळल्यानंतर संपूर्ण स्टेडियममधील चाहत्यांनी टाळ्या वाजवून या महान गायिकेच्या योगदानाचे स्मरण केले.
जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन
वेध माझा ऑनलाईन।
गेल्या काही दशकांपासून बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांचे निधन झाले आहे. काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Friday, April 10, 2026
तेजस्विनी घोरपडे यांची भाजपा महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कराडात स्वागत ;
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्षपदी मा. सौ. तेजस्विनी ताई संग्राम घोरपडे यांची निवड झाल्यानंतर कराड शहरात त्यांच्या स्वागताचा उत्साही कार्यक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
वेध माझा ऑनलाइन...वेध माझा ऑनलाइन...
यावेळी तेजस्विनी घोरपडे यांनी कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले. राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करत त्यांनी प्रेरणा घेतल्याचे सांगितले.
वेध माझा ऑनलाईन... वेध माझा ऑनलाइन...
यानंतर बोलताना तेजस्विनी घोरपडे म्हणाल्या की, सातारा जिल्ह्यात महिला सबलीकरण, महिला संघटन आणि महिलांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात अधिक संधी मिळाव्यात यासाठी पुढील काळात विशेष भर दिला जाईल. महिलांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला
वेध माझा ऑनलाइन... वेध माझा ऑनलाइन...
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे हेही उपस्थित होते. त्यांनी तेजस्विनी घोरपडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वेध माझा ऑनलाइन... वेध माझा ऑनलाइन...
कार्यक्रमाला कराड उत्तरमधील भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Monday, April 6, 2026
विद्या मोरे यांना ‘बेस्ट पीआरओ ऑफ रीजन’ पुरस्कार; पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि सामाजिक उपक्रमांमध्ये प्रभावी योगदानाची दखल ;
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा अध्यक्ष आणि युथ पदावर कार्यरत लायन विद्या मोरे यांना फलटण येथे पार पडलेल्या रिजन कॉन्फरन्समध्ये ‘बेस्ट पीआरओ ऑफ रीजन’ हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी लायन्स क्लबच्या विविध विभागीय प्रतिनिधी उपस्थित होते.
विभागीय सभापती MJF लायन नीलम पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार देताना त्यांनी विद्या मोरे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक केले आणि क्लबच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रभावी प्रचारासाठी त्यांचे विशेष योगदान मान्य केले
झोन चेअरमन मंजिरी खुस्पे यांनी ही त्यांच्या कार्याचे कौतुक केले .विद्या मोरे यांनी लायन्स सोशल उपक्रमांमध्ये उत्कृष्ट (पीआरओ) चे कार्य करत संस्थेची प्रतिमा मजबूत केली आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उपक्रमांना स्थानिक तसेच प्रादेशिक पातळीवर अधिक ओळख मिळाली असून, उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
कार्यक्रमात विद्या मोरे यांचे यश साजरे करत उपस्थितांनी त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या पुरस्काराने पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला आणि सामाजिक उपक्रमांमध्ये केलेल्या योगदानाला मान्यता मिळाल्याचे ठळक उदाहरण निर्माण झाले आहे.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी असेही नमूद केले की, विद्या मोरे यांचे कार्य युवा वर्गासाठी प्रेरणादायी आहे आणि लायन्स क्लबच्या उद्दिष्टांची ओळख अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मोठे योगदान ठरते.
मनोहरभाऊ तुमच्या ड्रीष्टीने विकसनशील नेता कोण? पृथ्वीराजबाबा की अतुलबाबा?... वेध- माझा च्या प्रश्नावर मनोहरभाऊ निरुत्तर ! मलकापुरात चर्चा सुरू...मनोहरभाऊ नेमके कुणाचे?
पप्पा सांगा कुणाचे...पप्पा माझ्या मम्मी चे...मम्मी सांगा कुणाची... मम्मी माझ्या पप्पांची... हे जुने गीत आहे..आपण अनेक वर्षांपासून हे गाणे ऐकतो आहोत... पण जर तुम्ही मलकापुरात गेलात... तर ... मनोहर शिंदे सांगा कोणाचे... हे गाणे सध्या ऐकायला मिळत आहे ...त्याचे कारणही तसेच आहे...
काल संगम हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत मलकापूर चे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे याना... तुमच्या ड्रीष्टीने मलकापूरसाठी विकसनशील नेता कोण?...पृथ्वीराजबाबा की अतुलबाबा...? वेध- माझाच्या या प्रश्नावर गुळगुळीत उत्तर देत मनोहरभाऊनी पृथ्वीबाबा व अतुलबाबा या दोघांच्याही नावाचा उल्लेख करत बॅलन्स राखण्याचा प्रयत्न केला... पण...त्यांनी ठामपणे कोणा एकाचे नाव घेतलेच नाही... त्यावर तुमच्या ड्रीष्टीने...जो सत्तेत तोच तुमचा नेता, अस समजायचे का...?असे पुन्हा त्यांना विचारले असता...तुम्हीच सांगा असे ते पत्रकारांना म्हणाले...
यावर...तुम्ही कारभारी आहात... तुमचा नेमका नेता कोण हे तुम्हीच सांगा अस पत्रकारांनी म्हटले असता... ते निरुत्तर झाले... व त्यांनी नेहमीप्रमाणे तिसरीकडेच विषय नेत मूळ प्रश्नाला बगल दिली व विषय बदलण्याचा प्रयत्न केला ...
पत्रकारांना लक्षात आलं की त्यांना यावर ठोस उत्तर घ्यायचच नाहीये...म्हणून पत्रकारांनी हा प्रश्न ताणून धरला नाही...मात्र भाऊ नक्की कोणाचे ? ही चर्चा मात्र कालपासून रंगली आहे... मलकापुरात तर, पप्पा सांगा कोणाचे?...या गाण्यापेक्षा मनोहर भाऊ सांगा नक्की कोणाचे...? या गाण्याची धूम जोरात सुरू आहे...
खरतर... या प्रश्नाचे उत्तर देताना
त्यांनी त्यातील कोणा एका नेत्यांशी आपली निष्ठा आहे...हे सर्वांपुढे सांगायला पाहिजे होते...
पण तसे झाले नाही...त्यांनी सोईस्कर उत्तर दिले ...त्यामुळे ते चर्चेत आले...
दरम्यान मलकापूर शहराचा संपूर्ण देशात अत्यंत चांगला नावलौकिक आहे. 'क' वर्ग नगर परिषदांमध्ये टी डी आर देणारी राज्यातील मलकापूर पहिली नगरपरिषद आहे. शहराचा होत असलेला विकास व वाढत असलेली लोकसंख्या याचा विचार करता भविष्यात शहराला फाइव स्टार मॉडर्न शहर बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कालच्या हॉटेल संगममध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
मलकापूर नगरपरिषदेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, यांच्यासह सभापती हणमंत जाधव, सुरज शेवाळे, धनंजय येडगे, गीतांजली पाटील व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते टीडीआर प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
आ. डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, शहराचा विकास होत असताना अपुऱ्या जागेवरती टीडीआरच्या आधारावर मोठमोठ्या इमारती उभा करता येऊ शकतात. त्यामुळे शहराच्या विकासासाठी टीडीआर प्रदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टीडीआर मिळाल्यानंतर आरक्षण पडलेल्या जागा मालकाला उदाहरणार्थ दहा गुंठ्याच्या बदल्यात 20 गुंठे टीडीआर मिळू शकतो. त्यामुळे शहराचा विकास गतीने केला जाऊ शकतो. शहराचा विकास करत असताना आरक्षणामध्ये जमीन गेली असली तरी जागा मालकाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. संबंधित जागा मालकाला टीडीआरच्या माध्यमातून चांगला मोबदला मिळू शकतो. कराड विमानतळामुळे केवळ सात मजल्यापर्यंत इमारतींना परवानगी दिली जाऊ शकते, याचा विचार मलकापूर नगर परिषदेने केला पाहिजे. मलकापूरची 24 बाय 7 योजना देशात नावाजलेली आहे. मात्र पुढील 25 वर्षांचा विचार करता या योजनेचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी ही प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय सांडपाणी योजना तसेच शहरातील इतर योजनांचाही विचार करून पुढील 25 वर्षात वाढणाऱ्या लोकसंख्येच्या आधारावर या योजनांचा विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे. सरकारकडून मलकापूरसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुढील तीन महिन्यात मलकापूर नगरपरिषदेची इमारत पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. 'क' वर्ग नगरपरिषदांमध्ये राज्यातील सगळ्यात मोठी इमारत मलकापूरची असणार आहे. त्यामुळे या इमारतीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही इमारत पूर्ण करत असताना इमारतीच्या बाजूलाच लॉन, ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी जागा तसेच नगरपालिका व नागरिकांमध्ये सुसंवाद रहावा म्हणून संपर्क वाढवला जाणार आहे.
नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे प्रत्येक घरातील नळाला स्वच्छ पाणी देण्यावर नगरपालिकेचा प्रयत्न राहणार आहे. नगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या पैशावर अभ्यास सहल करण्यापेक्षा इतर खर्चातून अभ्यास दौरे केले पाहिजेत. जेणेकरून लोकांच्या पैशावरती पदाधिकारी फिरले असे आरोप होणार नाहीत. घनकचरा प्रकल्प भाड्याच्या जागेपेक्षा स्वतःच्या जागेवरती असावा. त्यासाठी जागा उपलब्ध करून घ्यावी, असा सूचनाही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी नगरपरिषदेच्या पदाधिकारी अधिकाऱ्यांना केल्या.
मलकापूर शहराला स्वच्छ, सुंदर व देखणे शहर करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. नुसत्या इमारती बांधण्यापेक्षा लोकांना चांगल्या सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. शहराच्या विकासासाठी छोट्या छोट्या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. मलकापुरच्या झोपडपट्टीतील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान आवास योजनेतून घर देण्यासाठी नगरपालिकेने सर्वे करून प्रस्ताव द्यावा.
त्याचबरोबर मलकापूर शहराची उपनगरे विकसित झाली पाहिजेत. जखिणवाडी, आगाशिवनगर यासह आजूबाजूंच्या गावांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उंडाळे पाणी योजना सुरू करून त्याचा लोकांना फायदा व्हावा यासाठीही प्रयत्न करणार आहे. नांदलापूरमध्ये भव्य व सुसज्ज असे क्रीडा संकुल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.
Sunday, April 5, 2026
मलकापूर नगरपरिषदेचे सभापती सूरज शेवाळे यांच्या आगाशिवनगर- मलकापूर येथील जनसंपर्क कार्यालयाचे आमदार अतुल भोसल यांच्या हस्तेे उद्घाटन ;
वेध माझा ऑनलाइन।
मलकापूर नगरपरिषदेचे सभापती सूरज शेवाळे यांच्या आगाशिवनगर, मलकापूर येथील नूतन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज आमदार अतुलबाबा भोसले यांच्याहस्ते करण्यात आले.
हे जनसंपर्क कार्यालय परिसरातील नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी आणि विविध शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक हक्काचे केंद्र ठरेल. लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा हाच यामागील मुख्य उद्देश आहे
युवा नेते सूरज शेवाळे हे आमदार डॉ अतुलबाबांचे कट्टर समर्थक मानले जातात अतुलबाबांची पहिल्यापासूनच पाठराखण करत त्यांनी आपली निष्ठा सिद्ध केली आहे सध्या ते मलकपूरचे नगरसेवक तथा सभापती म्हणून कार्यरत आहेत लोकांची सेवा करत शहराचे प्रश्न सोडवत त्यांनी आपली बांधीलकी जपली आहे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आले
लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा हाच यामागील मुख्य उद्देश आहे असे युवा नेते नगरसेवक सूरज शेवाळे यांनी वेध माझा शी बोलताना सांगितले
दादा शिंगण यांची मनोहर शिंदे यांच्यावर टीकेची झोड ; म्हणाले...मनोहर शिंदे थापा मारतात आणि सत्तेचा गैरवापर करतात... आज त्यांनी माझा अपमान केला...
वेध माझा ऑनलाइन।
मी मलकापूरचा राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे लोकांनी मला निवडून दिले आहे मात्र मलकापूर चे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी आज मला बोलू दिले नाही त्यामुळे माझा अपमान झाल्याची माझी भावना आहे मनोहर शिंदे एकाधिकारशाहीने वागतात मी त्यांच्या वागण्याचा निषेध करतो अशा भाषेत मलकापूर चे नगरसेवक दादा शिंगण यांनी आपला संताप व्यक्त केला
दरम्यान मनोहर शिंदे लोकांना फसवत आहेत त्यांनी गेली पाच वर्षे माझ्या प्रभागातील 200 हुन अधिक लोकांना नळ कनेक्शन अजूनही दिलेले नाही ,
5 वर्षे लोकांना झुलवत ठेवले आहे, तर मग, 90 दिवसात मलकापुराचे ते काय भलं करणार आहेत ? ते नुसते थापा मारतात, जनतेला मूर्ख बनवतात आणि ते सत्तेचा गैरवापर करतात... असेही दादा शिंगण यावेळी म्हणाले
आज येथील संगम हॉटेल याठिकाणी मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने 90 दिवसाच्या "अभियान ते अभिमान' या कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेनंतर त्याठिकाणी उपस्थित असलेले दादा शिंगण यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपला राग व्यक्त करत मनोहर शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली
ते म्हणाले...
एकीकडे मनोहर शिंदे म्हणतात... या उपक्रमासाठी सर्व मलकापूरवासीयांना आम्ही सहभागी करून घेणार...तर दुसरीकडे स्टेजवरच त्यांनी मला बोलण्याची संधी न देता माझ्याशी दुजाभाव केला... माझा अपमान केला...
मी लोकांनी निवडून दिलेला नगरसेवक आहे... मलाही मलकपूरच्या नागरिकांच्या भल्यासाठी माझे मत मांडण्याचा अधिकार आहे...मनोहर शिंदे नेहमीच एकधिकारशाहीने वागतात, हुकूमशहा पद्धतीने कारभार करतात असाही आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला
Friday, April 3, 2026
मुंबईतील शाळामध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे करा ; एमआयएम आणि ठाकरे गटात वादविवादाचे सत्र सुरु ; काय आहे बातमी ?
वेध माझा ऑनलाइन।
उद्वव बाळासाहेब पक्षातील प्रमुख नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या मुंबईतील शाळांसंदर्भातील प्रस्तावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांनी मुंबईतील शाळामध्ये 'मनाचे श्लोक' सक्तचे करावे, अशी मागणी केली होती. आता याच मुद्यावर एमआयएम आणि ठाकरे गटात वादविवादाचे सत्र सुरु झाले आहे.
यासंदर्भात MIM पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ‘धर्माधारित नव्हे, तर संविधानाचे शिक्षण द्या’ अशी मागणी केली आहे. या मागणीवर किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट केले की हे धर्माधारित किंवा हिंदूंचे धार्मिक श्लोक नाही. हे सर्व धर्मातील मुलांवर चागल्या संस्कारासाठी उपयुक्त ठरेल. किशोरी पेडणेकरांच्या या प्रस्तावावर 9 तारखेला BMCमध्ये चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर आता 9 तारखेला होणाऱ्या चर्चेत नेमकं काय घडेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
उद्वव बाळासाहेब पक्षातील प्रमुख नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या मुंबईतील शाळांसंदर्भातील प्रस्तावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पेडणेकरांच्या प्रस्तावानुसार मुंबईतील शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याची मागणी केली जात होती. मात्र आता यावर MIM ने तीव्र विरोध दर्शवला आहे.
Thursday, April 2, 2026
हनुमान जयंती निमित्त लोहाना परिवाराकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
हनुमान जयंतीच्या निमित्ताने योगेश्वर लोहाना परिवाराच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ ते १२ या वेळेत विधीवत पूजा-अर्चा करण्यात आली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या पवित्र दिवशी हनुमानाची भक्ती, सेवेची प्रेरणा आणि समाजसेवेची भावना जोपासत योगेश्वर लोहाना परिवाराने कराड नगरपालिका शाळा क्र. ४ येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप केले.
या कार्यक्रमाला लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. सतीश शिंदे, नगरसेवक ओंकार मुळे, जनशक्ती आघाडीचे अरुणराव जाधव, रमेश लुणिया, सुरेश लुणिया, सिंधी पंचायतीचे बलराम सचदेव, इदनदास तलरेजा, मनोहर सचदेव, अभिजीत पाडळे, समीर नदाफ, तसेच बेळगाव येथील उद्योजक आदर्श गुलबानी, चिंगळे काका आणि योगेश्वर लोहाना परिवाराचे सदस्य उपस्थित होते. यावेळी शाळा क्र. ४ च्या शिक्षिकाही उपस्थित होत्या.
कराडमधील विरोधी भाजपच्या नगरसेवकांची शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा ; भाजप नगरसेवक म्हणाले... फेरीवाला झोन डिक्लेअर करा,.. फेरीवाल्यांची योग्य ती सोय करून द्या ; व्यापाऱ्यांचे कुठेही नुकसान होऊ देऊ नका ;
आज सकाळी कराड न पा मधील विरोधी बीजेपीचे गटनेते विजय वाटेगावकर, वरिष्ठ नगरसेवक जयवंत पाटील नगरसेवक शिवाजी(तात्या)पवार, सुमित जाधव, गणेश पवार, वैष्णवी वायदंडे व आशुतोष डुबल या नगरसेवकांनी मुख्याधिकारी व्हटकर यांची समक्ष भेट घेऊन सध्या शहरात चालू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर माहिती घेऊन चर्चा केली
यावेळी या भाजपच्या सर्व सदस्यांनी खालील मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून सांगितलेल्या सर्व मुद्याबाबत शहराच्या ड्रीष्टीने उपयोगी अशा उपाययोजना त्वरित झाल्या पाहिजेत असेही या सर्व भाजप नगरसेवकांच्या वतीने प्रशासनाला सांगण्यात आले
त्यामध्ये///
अतिक्रमण नियंत्रण पथकाची स्थापना करावी व कायमस्वरूपी अतिक्रमण मुक्त कराडसाठी प्रयत्न करावे.
लवकरात लवकर फेरीवाला झोन डिक्लेअर करून फेरीवाल्यांची योग्य ती सोय करून देण्यात यावी.
फेरीवाला क्षेत्र हे सर्वे आणि चर्चा करून घोषित करण्यात यावे.
या मोहिमे मध्ये व्यापाऱ्यांचे कुठेही नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यावी.
भटक्या कुत्र्यांचे निर्भीजीकरण चालू करावे.
पार्किंग झोन डेव्हलप करावे
शहराच्या ड्रीष्टीने उपयोगी अशा अनेक सूचना कराडमधील भाजप नगरसेवकांच्या वतीने गटनेते वाटेगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज येथील मुख्याधिकारी व्हटकर यांच्याशी चर्चा करून करण्यात आल्या
आता पाहूया...
यावर... कराड प्रशासनाकडुन काय निर्णय घेण्यात येतो ते...
Subscribe to:
Posts (Atom)