वेध माझा ऑनलाइन - कराड तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीचा तिच्या माता पित्यानेच खून केल्याची खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे
अल्पवयीन मुलीचं प्रेमप्रकरण समजल्यानंतर तिचा तिच्या आई वडिलांनीच तिचा खून केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे
सदर अल्पवयीन मुलीचा मृतदेह तब्बल 14दिवसांनी पवारवाडी येथील डोंगरात पुरलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे
ही मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनीच दिली होती मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर त्या मुलीच्या वडिलांनीच सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे
आज पुरलेला मृतदेह पोलिसांचीताब्यात घेतला प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिपज्योति पाटील यांनी केला यापुढील तपास पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते करत आहेत
No comments:
Post a Comment