वेध माझा ऑनलाइन - शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी इडीने अटक केली. त्याआधी रविवारी मुंबई पोलिसांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एका साक्षीदाराने केलेल्या तक्रारीवरून संजय राऊतांविरोधात एफआयआर दाखल केली. या साक्षीदार स्वप्ना पाटकर आहेत, ज्यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्षीदार आहेत, तसंच त्यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. आपल्याला धमकी मिळत असल्याचा दावा स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीमध्ये केला आहे. याआधी पत्रा चाळ प्रकरणात आपण राऊतांविरोधात ईडीला दिलेला जबाब बदलावा, यासाठीही धमकी देण्यात आल्याचा दावा स्वप्ना पाटकर यांनी केला होता.
स्वप्ना पाटकर यांना एका टाईप केलेल्या पेपरमधून बलात्कार आणि हत्येची धमकी देण्यात आली होती. 15 जुलैला त्यांच्या घरी वृत्तपत्रातून धमकीचा कागद पाठवण्यात आला, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. यानंतर पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध आयपीसी धारा 504 (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), 506 (धमकी देणं) आणि 509 (महिलेचा अपमान) ही कलमं लावून गुन्हा दाखल केला आहे. रविवारी स्वप्ना पाटकर यांनी पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला. तसंच स्वप्ना पाटकर यांना सुरक्षा देण्यात आली आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे
कोण आहेत स्वप्ना पाटकर?
स्वप्ना पाटकर या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जवळचे असलेले सुजीत पाटकर यांच्या पत्नी आहेत. स्वप्ना पाटकर यांची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती, यात संजय राऊत यांनी कथितरित्या स्वप्ना पाटकर यांना धमकी दिल्याचा दावा करण्यात आला. स्वप्ना पाटकर पत्रा चाळ प्रकरणी साक्षीदार आहे, ज्यामुळे संजय राऊत इडीच्या अटकेत आहेत. स्वप्ना पाटकर या चित्रपट निर्मात्या आणि मोटिवेशनल स्पीकरही आहेत. स्वप्ना पाटकर यांचा बाळकडू हा चित्रपट काही वर्षांपूर्वी रिलीज झाला होता.
2021 साली संजय राऊत यांनी आपल्याला शिव्या दिल्याचा आरोपही स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. तसंच संजय राऊत आपल्याला 8 वर्षांपासून त्रास देत असल्याचा दावाही पाटकर यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. जी ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यात 70 सेकंदांमध्ये 27 वेळा शिव्या देण्यात आल्या आहेत. स्वप्ना पाटकर यांना मिळालेलं धमकीचं पत्र आणि ऑडियो क्लिपचा पुढचा तपास पोलीस करत आहेत.40 वर्षांच्या स्वप्ना पाटकर या मुंबईच्या सांताक्रुझमध्ये राहतात. स्वप्ना पाटकर या सायकोलॉजिस्ट असून त्यांचं मुंबईमध्ये क्लिनिक आहे. 2007 साली सामनाच्या कार्यालयात आपली आणि संजय राऊत यांची भेट झाल्याचं स्वप्ना पाटकर सांगतात
स्वप्ना पाटकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, '2007 साली आपली आणि संजय राऊत यांची भेट झाली, यानंतर कौटुंबिक संबंध वाढत गेले. संजय राऊत यांना आपण त्यांच्या बिजनेस पार्टनर व्हावं असं वाटत होतं, पण मी याला नकार दिला, त्यामुळे राऊत यांना राग आला.''20 नोव्हेंबर 2016 साली मी संजय राऊतांना भेटायला सामनाच्या कार्यालयात गेले, तेव्हा त्यांनी माझा हात पकडला आणि ते माझ्यावर ओरडले. याला विरोध करताना मी संजय राऊत यांची कॉलर पकडली आणि तिकडून निघून गेले, त्यावेळी राऊत यांनी मला पोलिसांच्या कारवाईची धमकी दिली,' असं स्वप्ना पाटकर यांनी सांगितलं.स्वप्ना पाटकर या त्यांचा पती सुजीत पाटकर यांच्यापासून विभक्त झाल्या आहेत. संजय राऊत यांच्या जवळचे मानले जाणारे सुजीत पाटकर यांनी आपल्या पत्नीसाठी काही मालमत्ताही खरेदी केल्याचं ईडी तपासात समोर आलं आहे
No comments:
Post a Comment