Sunday, March 31, 2024

साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी ? पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांच्यात आज कराडमध्ये बंद दाराआड चर्चा ; महाविकास आघाडीच्या सातारा आणि सांगलीच्या जागेवरून कराडमध्ये खलबतं ?;

वेध माझा ऑनलाईन। श्रीनिवास पाटलांनी प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतल्याने पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रकृतीच्या कारणामुळे श्रीनिवास पाटलांनी पुन्हा निवडणूक लढण्यास नकार दिलाय. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांची सध्या चर्चा आहे...

पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांच्यात आज कराडमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या सातारा आणि सांगलीच्या जागेवरून कराडमध्ये खलबतं झाल्याची माहिती मिळतेय. तर पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांच्यात साधारण तासभर चर्चा झाली. श्रीनिवास पाटलांनी प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतल्याने पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रकृतीच्या कारणामुळे श्रीनिवास पाटलांनी पुन्हा निवडणूक लढण्यास नकार दिलाय. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण आणि शशिकांत शिंदे या दोघांच्या नावांची चर्चा आहे. मुख्यमंत्री पदाबरोबर दिल्लीचा अनुभव म्हणून चव्हाणांचं पारडं जड आहे. स्वच्छ चेहरा आणि स्थानिक पातळीवर सर्वांशी चांगले संबंध आहेत. कराड लोकसभा अस्तित्वात असताना चव्हाण ३ वेळा खासदार राहिले. पण जर नाव ठरल्यास चव्हाण तुतारी की पंजा,कोणत्या चिन्हावर लढणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.



Thursday, March 28, 2024

कराडच्या कत्तलखान्यावर छापा ; 40 हुन अधिक जनावरांची सुटका ; कराड पोलिसांची कारवाई;

वेध माझा ऑनलाईन। कराडच्या मंडई परिसरात शुक्रवारी सकाळी डी.वाय. एस. पी. अमोल ठाकूर यांच्या पथकाने एका कत्तलखान्यावर छापा टाकून कत्तलीसाठी आणलेले सुमारे 40 ते 50 जनावरे ताब्यात घेतली. 

याबाबतची माहिती अशी की, कराड येथील मंडई परिसरात कत्तलीसाठी 40 ते 50 जनावरे घेऊन आल्याची माहिती डीवायएसपी अमोल ठाकूर यांना मिळाली त्यानुसार डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्या पथकाने व कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या पथकाने मंडई परिसरात छापा टाकला असतात त्या ठिकाणी कत्तलीसाठी कत्तलखान्यात सुमारे 40 ते 50 जनावरे असल्याचे आढळून आली पोलिसांनी सर्व जनावरे ताब्यात घेऊन जनावरे ज्यांनी आणली त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे

Wednesday, March 27, 2024

शनिवारी पाटण येथे महाविकास आघाडीचा संवाद मेळावा ; विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या नावाचा साधा उल्लेखही नाही, त्यांचा फोटोही नाही ; खासदार "पाटलांना' डावलून होणार हा मेळावा?


वेध माझा ऑनलाइन
; सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचा 'संवाद मेळावा' शनिवार दिनांक ३० मार्च रोजी ऋचा हॉल, काळोली (कराड-चिपळूण रोड) येथे दुपारी १२:३० वा. होणार आहे. 

दरम्यान खासदार श्रीनिवास पाटील तसेच त्यांचे चिरंजीव सारंग पाटील यांचे साधे नावदेखील या मेळाव्याच्या जाहीर केलेल्या उपस्थितांच्या लिस्टमध्ये दिसत नाही... तसेच या मेळाव्याची प्रसिद्धी करणाऱ्या फ्लेक्सवरही या दोघांचा फोटोही लावण्यात आलेला नसल्याने श्रीनिवास पाटील व सारंग पाटील या दोघांनाही सरळ सरळ या मेळाव्यापासून डावलल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे... ज्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली इच्छा व्यक्त केली, त्या खासदार श्रीनिवास पाटील यांनाच डावलून हा मेळावा होऊ घातल्याने संपूर्ण राज्यात याविषयी चर्चा सुरू आहे

दरम्यान आतापर्यंत श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाकडून सतत खासदारकी मिळाली मात्र त्यांनी पक्ष वाढीसाठी काय काम केले ? जिल्ह्यातील महिलांचे प्रश्न असतील तसेच शेतकरीवर्ग, बेरोजगारांसाठी ठोस असे काय केले ? जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोणते उपाय केले? किती उद्योग जिल्ह्यात आणले? किती संस्था उभ्या केल्या? शिक्षण, आरोग्य अशा अनेक विषयामधील समस्या सोडवण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील  यांनी नेमके किती उठावदार काम केले ?असे अनेक प्रश्न या मेळाव्याच्या निमित्ताने पाटण परिसरात श्रीनिवास पाटील याना विचारण्यात येत आहेत...

यापूर्वी कराड तालुक्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला देखील श्रीनिवास पाटील यांचा फोटो व नाव नव्हतं... त्यांना त्यावेळी देखील डावलल्याचे पाहायला मिळाले होते... आताही पाटणकर गटाकडून घेण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या होणाऱ्या या मेळाव्याला विद्यमान खासदारांना पुन्हा डावलल्याने त्यांच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यात प्रचंड मोठा विरोध आहे हेच स्पष्ट झाले आहे...दरम्यान संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय झाला आहे 

दरम्यान या संवाद मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चे माजी मंत्री बाळासाहेब पाटील,माजी मंत्री शशिकांत शिंदे,  माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर,   शिवसेना उ.बा.ठाकरे पक्षाचे प्रवक्ते नितीन बानगुडे-पाटील,    शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गोडसे ,  राष्ट्रीय कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हिंदुराव पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेना उ.बा.ठाकरे सातारा जिल्हा अध्यक्ष हर्षद कदम या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर व पाटण तालुका अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

आगामी सातारा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा संवाद मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या मेळाव्यातून उपस्थित मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. पाटण तालुका हा मतदानाच्या दृष्टीने फार मोठा मतदारसंघ असल्याने महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये चांगला समन्वय साधून जास्तीत जास्त मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पारड्यात पाडण्यासाठी यावेळी रणनीती तयार करण्यात येणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.  त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते, सर्व पदाधिकारी, सर्व संस्थाचे चेअरमन, व्हॉ.चेअरमन, संचालक, आजी माजी जि.प.सदस्य, आजी माजी पं.स.सदस्य, आजी माजी नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष, नगरसेवक नगरसेविका, आजी माजी सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व सर्व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन या पत्रकातून करण्यात आले आहे.

शिवसेनेतून विजय शिवतारेंची होणार हकालपट्टी ! शिवतारेंना पक्ष शिस्तभंगाची नोटीस!

वेध माझा ऑनलाईन
अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलेले विजय शिवतारे हे कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विजय शिवतारे यांना आपल्याला युतीधर्म पाळला पाहिजे, असा सल्ला दिला होता. मात्र, बारामती ही मला नियतीने दिलेली असाईनमेंट आहे, असे सांगत यांनी अजित पवार यांच्याविरोधात उपसलेली तलवार म्यान करण्यास विजय शिवतारे यांनी नकार दिला होता. त्यामुळे आता निर्वाणीचा उपाय म्हणून शिंदे गटाकडून विजय शिवतारे यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना लवकरच पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवली जाईल. यानंतरही विजय शिवतारे यांनी पक्षादेश मानला नाही तर त्यांना शिवसेनेकडून निरोपाचा नारळ दिला जाईल, असे सांगितले जात आहे. विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: विजय शिवतारे यांची मनधरणी केली होती. त्यानंतरही शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुती अस्तित्त्वात आली तेव्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर एकमेकांशी जुळवून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, आता शिवतारे यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो. ही बाब लक्षात घेऊन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी विजय शिवतारे यांच्यावर अखेर कारवाईचा बडगा उगारण्याचे ठरवल्याचे सांगितले जात आहे.

  नोटीस आली नाही...
विजय शिवतारे यांना शिवसेनेकडून त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या संभाव्य शिस्तभंगाच्या कारवाईबाबत विचारण्यात आले. तेव्हा शिवतारे यांनी म्हटले की, मला पक्षाकडून अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही. मी उद्या खडकवासला मतदारसंघाचा दौरा करणार आहे. मी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहे, असे शिवतारे यांनी सांगितले. मात्र, आता शिवसेनेने त्यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर विजय शिवतारे पुढे काय करणार, हेदेखील येणाऱ्या काळात पाहावे लागेल.

नाशिकचा तिढा सुटला ? ; नाशिकमधून छगन भुजबळ महायुतीचे उमेदवार असणार ! आज पुण्यात सातारा माढा नाशिकच्या जागेबाबत अजितदादांची तातडीची बैठक ;

वेध माझा ऑनलाइन। नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला होता. शिवसेना आणि भाजपने या जागेवर दावा केलेला असतानाच अचानकपणे राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. अखेर छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. छगन भुजबळ नाशिकमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. दिल्लीतून भुजबळांची उमेदवारी निश्चित झाल्याचं माहिती खात्रिलायक सुत्रांनी दिली आहे. आता नाशिकच्या जागेवरचा तिढा सुटला असल्याचं म्हणता येईल. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीसाठी छगन भुजबळ रवाना झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांनी आज पुण्यात महत्वाची बैठक बोलावली आहे. माढा, नाशिक आणि सातारा मतदारसंघाची आढावा बैठक आज अजित पवारांनी बोलावली आहे. या बैठकीला छगन भुजबळही उपस्थित राहणार आहेत. छगन भुजबळांसह नाशिक लोकसभेतील अजित पवार गटाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अजित पवारांनी बोलावलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाची बैठकीला नाशिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भुजबळ फार्मवरून भुजबळांसह पदाधिकाऱ्यांचा ताफा पुण्याला रवाना झाला आहे.
अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला छगन भुजबळ रवाना झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुण्याला राष्ट्रवादीची बैठक आहे. ज्या जागा आम्हाला मिळणार आहे किंवा शक्यता आहे. जिंकण्याची कितपत तयारी आहे. जिथं जिथं जागा मिळण्याची शक्यता आहे त्याबाबत बैठक अजित पवारांनी बोलावली आहे. पक्षाचा नेता म्हणून अजित दादा आढावा घेणार आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.

कराडमध्ये इंडिया आघाडीचा रविवारी संयुक्त मेळावा, आ. बाळासाहेब पाटलांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

वेध माझा ऑनलाईन।  इंडिया आघाडीचा संयुक्त मेळावा येत्या रविवारी सायंकाळी ४ वाजता पंकज हॉटेलच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये होणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस संगीता साळुंखे, राष्ट्रवादी कराड शहर अध्यक्ष नंदकुमार बटाणे, शेकापचे ॲड. शरद देसाई, श्रमिक मुक्ती दलाचे ॲड. शरद जांभळे, राष्ट्रवादी काँग्रेस कराड दक्षिणचे अध्यक्ष पांडुरंग चव्हाण, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित होते.

आमदार आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, देशात सर्वत्र इंडिया आघाडीचे गठबंधन झाले आहे. महाराष्ट्रात उमेदवार निश्चिती अंतिम टप्प्यात आली आहे. दोन दिवसात उमेदवारांची नावे जाहीर होतील. तत्पुर्वी कार्यकर्त्यांचे मेळावे सुरू करण्यात आले आहेत. वाईमध्ये संयुक्त मेळावा झाला आहे. आता तालुकानिहाय मेळावे होणार आहेत. 
हर्षद कदम म्हणाले की, इंडिया आघाडीचा जो उमेदवार असेल त्याचे आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहोत. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे विद्यमान खासदार आहेत, ती जे जागा संबंधित पक्षाला देण्यात आली आहे. त्यामुळे त्या उमेदवाराचे काम करणे बंधनकारक आहे. प्रशांत यादव यांनी स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस कराड दक्षिणचे अध्यक्ष पांडुरंग चव्हाण यांनी आभार मानले.

Tuesday, March 26, 2024

राष्ट्रवादीनं साताऱ्यावरील आग्रह सोडला? "सातारा सोडतो... त्या बदल्यात नाशिक द्या... अजितदादांनी केली मागणी ? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन।
राष्ट्रवादीला बारामती, रायगड, शिरूर, नाशिक आणि परभणी या पाच जागा मिळणार, अशी माहिती मिळत आहे. म्हणूनच, राष्ट्रवादीनं साताऱ्यावरील आग्रह सोडला का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे सातारा लोकसभा भाजपला सुटत असेल, तर बदल्यात नाशिक आम्हाला सोडा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपकडे करत असल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेत नाही. अशातच अजुनही महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरुन धुसफूस सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीला एकूण पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. बारामती, रायगड, शिरूर, नाशिक आणि परभणी, अशा पाच जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण राष्ट्रवादीनं मात्र वेगळीच मागणी समोर ठेवली आहे. सातारा लोकसभा भाजपला सुटत असेल, तर त्या बदल्यात नाशिकच्या जागेची मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. 

परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार असणार आहेत. पण ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातली असेल अशी माहिती मिळत आहे. नाशिक लोकसभेत भाजपचे तीन आमदार आहेत. राष्ट्रवादीचे दोन आमदार तर काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, अशी भाजपची मागणी आहे. दुसरीकडे सातारा लोकसभा भाजपला सुटत असेल तर बदल्यात नाशिक आम्हाला सोडा अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. नाशिक लोकसभेच्या मैदानात राष्ट्रवादीकडून भुजबळ परिवारातील वरिष्ठ सदस्यांना उतरवलं जाऊ शकतं अशीही चर्चा सुरू आहे. त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदाराला संधी मिळण्याची शक्यता देखील आहे. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांची मोठी अडचण झाली आहे. नाशिकमध्ये तुमची ताकद नाही, त्यामुळे ती जागा आम्हाला सोडा, अशी भाजप आणि राष्ट्रवादीची मागणी आहे. पण हेमंत गोडसे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार असताना आम्ही नाशिक लोकसभा सोडणार नाही, अशी भूमिका शिंदेंनी घेतल्याची माहिती मिळत आहे. 

राष्ट्रवादीची नेमकी मागणी काय? 
नाशिक लोकसभेत भाजपचे तीन आमदार आहेत. राष्ट्रवादीचे दोन आमदार तर काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, अशी भाजपची मागणी आहे. दुसरीकडे सातारा लोकसभा भाजपला सुटत असेल तर बदल्यात नाशिक आम्हाला सोडा, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंची मात्र मोठी अडचण झाली आहे. नाशिकमध्ये तुमची ताकद नाही त्यामुळे ती जागा आम्हाला सोडा अशी भाजप आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे. पण हेमंत गोडसे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार असताना आम्ही नाशिक लोकसभा सोडणार नाही, अशी शिंदेंची भूमिका आहे.

Monday, March 25, 2024

सातारा जिल्ह्यात लोकसभेचा "गुलाल' कोणाच्या नशिबात ? चर्चेला जोर ;

वेध माझा ऑनलाईन। सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या उदयनराजे यांचे नाव चर्चेत आहे त्यांना भाजपचे तिकीट मिळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष आहे अजितदादा गट देखील याठिकाणी आपला क्लेम सांगत आहे... दुसरीकडे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या चिरंजीवांना शरद पवारांच्या गटाची उमेदवारी मागण्याबाबत चर्चा रंगली...मात्र त्यांना जिल्ह्यातच राष्ट्रवादी अंतर्गत विरोध झाल्याचे पहायला मिळाले...स्वतः श्रीनिवास पाटील यांनादेखील याठिकाणी निवडणूक लढवणे पहिल्यासारख सोपं राहिलेलं नाहीये... मग या मतदार संघात नेमकं काय होणार... या चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत

खासदार श्री निवास पाटील यांना पहिल्यांदाच सातारा लोकसभा मतदार संघातील सध्याची निवडणूक अवघड जाण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत पाटणकर गटाने यावेळी श्रीनिवास पाटील यांना ओपनली विरोध दर्शवला आहे तसेच कराड उत्तरच्या आमदारांचा खासदार पाटील यांना विरोध असल्याचीही मतदार संघात चर्चा झाली... दरम्यान राष्ट्रवादी च्या झालेल्या जिल्ह्यातील मेळाव्यादरम्यान चक्क जिल्ह्याच्या खासदारांचा फोटोच राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या फ्लेक्स वरून गायब झाल्याचे सर्वांनी पाहिले... त्याचवेळी श्रीनिवास पाटील यांना कराड पाटणसह जिल्ह्यातूनच विरोध असल्याचे समोर आले...

त्यानंतर त्यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना याठिकाणी तिकीट मिळावे असे मनसुबे आखले जाऊ लागले...मात्र त्यांनाही विरोध झाला... मग आता मतदार संघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कडून कोण?  हा प्रश्न उभा राहिला...तो आजपर्यंत तसाच आहे...

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे झालेले दोन तुकडे राष्ट्रवादी च्या बालेकिल्ल्याच्या ताकदिला तडा देणारे ठरल्याने आता शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजितदादाची राष्ट्रवादी अशी "शकले' पहायला मिळत आहेत... या सर्व घडामोडी भाजपच्या पथ्यावर किंवा अजितदादा यांच्या राष्ट्रवादी च्या पथ्यावर कशा पडतील याबाबत प्लॅनिंग करताना भाजप व अजितदादा दिसत आहेत... त्याचेच प्रत्यंतर म्हणून याठिकाणी भाजप बरोबर अजितदादा यांनी देखील मतदार संघावर आपला क्लेम करत आपले उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत हे दोन्ही पक्ष आहेत...

यापूर्वी राष्ट्रवादी एकत्रित असताना जिल्ह्यातील सर्व आमदार एकमुखाने शरद पवारांच्या आदेशाने श्रीनिवास पाटील यांना निवडून द्यायचे मात्र, खासदार म्हणून आजपर्यंतचे त्यांचे कोणतं काम जिल्ह्यात प्रभाव टाकणारे ठरले आहे ? किती संस्था त्यांनी उभ्या केल्या ? किती उद्योग जिल्ह्यात त्यांनी आणले ? महिला,शेतकरीवर्ग तसेच बेरोजगारांसाठी त्यांनी कोणते उठावदार काम केले ? वाढत्या गुन्हेगारी विरोधात ठोस उपाययोजना करण्यासाठी त्यांनी कोणकोणते प्रयत्न केले... हे... आणि असे अनेक प्रश्न जिल्ह्यातील जनतेत चर्चेत असतात...या प्रश्नांची उत्तरे देणे ऐन निवडणुकीत थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीला कितपत परवडणार ? अशीही चर्चा असते...

सध्या राष्ट्रवादी दोन भागात विभागल्याचे चित्र आहे त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास... जिल्ह्यातील कोण कोणत्या युत्या आणि आघाड्या एकत्रित येऊन कोणते राजकीय गणित कसे जुळवुन आणतात...यावरून कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून देणार... हे स्पष्ट कळणार आहे...मात्र अद्याप हे दोन्ही गट जिल्ह्यात एकमेकांच्या डावपेचाकडे लक्ष देऊन आहेत...भाजप- शिंदे गट- आणि अजितदादा यांचा जिल्ह्यातील गट सध्या एकत्रितपणे ज्या उमेदवारांला उचलून धरतील त्याचे पारडे जड होईल असे सध्याचे राजकीय गणित सांगते... दुसरीकडे श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटाचे उमेदवार असतील तर, त्यांना त्याच गटातून कितपत मदत होणार...की विरोध होऊन विरोधी उमेदवाराचा फायदा होणार...हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे आहे...दुसरीकडे जिल्ह्यातील काँग्रेस- व राष्ट्रवादीचे सख्य सर्वानाच परिचित आहे...त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस या निवडणुकीत महत्वपूर्ण भूमिका बजावेल असेच दिसते...उद्धव ठाकरे गट जिल्ह्यात फारसा नसला तरी मतांच्या बेरीज- वजाबाकीसाठी याही गटाची मदत महत्वपूर्ण ठरेल असेही राजकीय जाणकार सांगतात... 

दरम्यान याठिकाणी कोणत्याच पार्टीने आपले उमेदवार अद्यापतरी जाहीर केलेले नाहित...मतदारसंघात एका बाजूची उमेदवारी शरद पवार गटाकडे असेल...तर दुसरीकडे अजितदादा व भाजप यांच्यापैकी कोणत्या गटाकडे उमेदवारी जाते हेही कळणे महत्वाचे ठरेल... तरीदेखील उदयनराजे भाजप कडून तिकिटासाठी आग्रही आहेत...त्यासाठी ते दिल्लीत 3 दिवसापासून होते...श्रीनिवास पाटील यांना होणारा अंतर्गत विरोध, भाजपची जिल्ह्यातील जोरदार मुसंडी आणि मित्रपक्षांची त्यांना मिळणारी साथ... या सर्व बाबींमुळे उदयनराजेना ही निवडणूक यावेळी सोपी जाणार का? अशी चर्चा आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाने ऐनवेळी एखादा चालणारा नवीन उमेदवार दिल्यास जिल्ह्यात थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा गुलाल मिळणार का? अशाही  चर्चा जोर धरू लागल्या आहेत...पाहूया पुढे काय होतंय ते...

Sunday, March 24, 2024

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी ; लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने उचलले पाऊल ; वाचा बातमी

वेध माझा ऑनलाईन।
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसही महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजापाविरुद्ध मैदानात उतरली आहे. भाजपाच्या विजयाचा महारथ रोखण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडीत शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जागावाटप केलं आहे. या जागावाटपात काँग्रेस नेमक्या किती जागा मिळतील हे अद्याप निश्चित झालं नाही. मात्र, काँग्रेसने ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून आजच चंद्रपूरमधील उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच, काँग्रेसकडून आगामी निवडणुकांसाठी प्रचार आणि व्यवस्थापनाची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कॅम्पेन समिती स्थापन केली असून या कमिटीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने आणि काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या सहीने ही निवड करण्यात आली असून कॅम्पेन कमिटीमध्ये चेअरमन आणि ५७ सदस्य आणि १ समन्वयक असणार आहे. या कमिटीतील सदस्यपदी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशील कुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांची नावे आहेत. 

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होत असलेल्या पाचपैकी ४ मतदारसंघांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरमधून आमदार विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा-गोंदियामधून डॉ. प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमूरमधून डॉ. नामदेव किरसान या चार उमेदवारांची नावे आज रात्री काँग्रेसने जाहीर केली. चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव काँग्रेसने गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र, आजच चंद्रपूरमधील उमेदवाराच्या नावाचीही घोषणा होईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे, चंद्रपूरमधून निवडणुकांच्या रिंगणात कोण उतरणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यातच, आज काँग्रेसकडून कॅम्पेन कमिटीतील ६० जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.


Saturday, March 23, 2024

उदयनराजे 2 दिवसापासून दिल्लीत... तर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची सातारा लोकसभेसाठी भाजपकडे मागणी ; जिल्ह्यातील राजकारणात खळबळ ;

वेध माझा ऑनलाईन ।
सध्या साताऱ्यात वेगळ्याच घडामोडी घडत आहेत. 2019 लोकसभेला शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांचा उदयनराजे भोसले यांनी 1 लाख 26 हजाराच्या मताने पराभव केला होता. त्या माथाडी कामगार नेते तथा शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांनी सातारा मतदारसंघातून मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपाकडे केली आहे. उदयनराजे यांच्या मागोमाग आता नरेंद्र पाटील यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘गेल्यावेळी मी शिवसेनेकडून लढलो होतो. उदयनराजेंविरोधात लढायला कुणीच तयार होत नव्हता. पण मी लढलो आणि चार लाखांच्यावर मते घेतली होती. आमच्या दोघांच्या मतांमध्ये फक्त ३० ते ३५ हजारांचा फरक होता. सातारा लोकसभा मतदार संघात माझी चांगली पकड आहे. भाजपच्या चिन्हावर मला ही संधी मिळावी, अशी इच्छा आहे. खासदार म्हणून मला चांगली काम करण्याची संधी मिळेल. ग्रामीण भागासह शहरी भाग, राज्यात माझा चांगला जनसंपर्क आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे हे मला न्याय देतील अशी आशा आहे.

सातारा निवडणूक जागेसाठी पेच निर्माण झालेला आहे. मात्र, पक्षाचा निर्णय हाच अंतिम निर्णय असतो. मग तो निर्णय कोणाच्या बाजूने लागेल सांगता येत नाही. पण केंद्रात मोदी यांच्या बाजूने 405 खासदार देण्यासाठी आम्ही संयुक्तपणे काम करू. उदयनराजे हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत मुक्कामी आहेत. मात्र, त्यांना भेट मिळत नाही हे खूप वाईट आहे. उदयनराजे यांनी सबुरीने घ्यायला हवे, पक्ष जो निर्णय देईल तो मान्य करायला हवा, असे देखील नरेंद्र पाटील यांनी म्हंटले

उद्धव ठाकरे यांच्या 20 उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर ; पहा कोणाला कोठे दिली उमेदवारी ...

वेध माझा ऑनलाईन
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये अंतिम जागावाटप झालं नसलं तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या 20 उमेदवारांची संभाव्य यादी निश्चित केली आहे. यामध्ये कल्याण मधून दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे

सांगली लोकसभेसाठी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच केली आहे. मात्र सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असून येथून विशाल पाटील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तर छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे यांच्या ऐवजी अंबादास दानवे याना तिकीट मिळू शकते. तस झाल्यास खैरे काय भूमिका घेतात ते पाहण सुद्धा महत्वाचे ठरेल. मुंबईत सुद्धा आपली ताकद पुन्हा एकदा दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. मुंबईत कमबॅक करण्यासाठी ठाकरेंनी सर्व ताकद पणाला लावली आहे. मुंबईतील सहापैकी पाच जागा ठाकरेंची सेना लढवणार आहे.

ठाकरेंकडून कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी? पाहा संभाव्य यादी

मुंबई उत्तर- तेजस्वी घोसाळकर
मुंबई उत्तर पश्चिम- अमोल कीर्तीकर
मुंबई उत्तर पूर्व- संजय दीना पाटील
मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
मुंबई दक्षिण- अरविंद सावंतयवतमाळ-वाशिम- संजय देशमुख
कल्याण- केदार दिघे
ठाणे- राजन विचारे
हिंगोली- नागेश अष्टीकर
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
परभणी- संजय जाधव
रायगड- अनंत गीते
धाराशिव- ओमराजे निंबाळकर
सांगली- चंद्रहार पाटील
रत्नागिरी-सिंधुदुर्ग- विनायक राऊत
छ. संभाजीनगर- अंबादास दानवे
मावळ- संजोग वाघेरे
शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे
नाशिक- विजय करंजकर
पालघर- भारती कामडी

Friday, March 22, 2024

दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार; बोर्डाकडून शिक्षकांना सूचना ; काय आहे कारण ?

वेध माझा ऑनलाइन।  दहावीच्या विज्ञान भाग- 1 विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण दिले जाणार आहेत. आमदार कपिल पाटील  यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोर्डाकडून दखल घेत शिक्षकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. 18 मार्च रोजीच्या दहावी विज्ञान भाग 1 विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 1 मधील 'सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा' या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी व पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. या आशयाचे संदर्भीय पत्र या बोर्डाच्या कार्यालयास प्राप्त झालं आहे. 

पाठ्यपुस्तकानुसार सदर प्रश्नाचं अचूक उत्तर 'हेलियम' हे आहे. तर काही संदर्भपुस्तकांमध्ये याचे उत्तर 'हायड्रोजन' असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याअनुषंगानं पुणे विभागीय मंडळानं संबंधित विषयाच्या विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेतले असून त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, वरील दोन्ही भिन्न उत्तरांचा विचार करता आणि विद्यार्थी हिताच्या दृष्टीनं उपरोक्त प्रश्नाचे उत्तर 'हेलियम' किंवा 'हायड्रोजन' लिहिले असल्यास ते ग्राह्य धरून गुणदान करावं, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित विषयाचे सर्व नियामक आणि परीक्षक यांना उत्तरपत्रिका तपासणीसंदर्भात सूचना देण्यात याव्यात, असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

Thursday, March 21, 2024

अरविंद केजरीवाल यांना अटक ; ईडीकडून नऊ वेळा चौकशीसाठी समन्स बजावून देखील राहिले नाहीत हजर ;

वेध माझा ऑनलाईन। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. याआधी ईडीकडून त्यांना नऊ वेळा समन्स बजावण्यात आल होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यानंतर लगेचच ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहोचले होते. आप पक्षाने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. रात्रीच या प्रकरणात सुनावणी व्हावी अशी आपची मागणी आहे. पण रात्री सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उद्याच या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आम आदमी पक्षाच्या कोणत्याही नेत्याला केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचू दिले जात नाहीये. पोलिसांनी आधीच निवासस्थानापासून दूरवर बॅरिकेड्स लावले आहेत. त्यांच्या घराबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आज ईडीचे पथक दहावे समन्स घेऊन त्यांच्या घरी दाखल झाली होती. यावेळी त्यांच्यी घरी झडती देखील घेण्यात आली आहे. चौकशीदरम्यान केजरीवाल यांचा फोन देखील ईडीने ताब्यात घेतला होता.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दोन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दिल्ली दारू घोटाळ्यात ही अटक झाली आहे. या प्रकरणातील ही 16 वी अटक आहे. ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती. केजरीवाल यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यानंतर त्यांना अटक करण्यात आलीये. याआधी ईडीकडून त्यांना नऊ वेळा समन्स बजावण्यात आल होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली

काँग्रेसकडून पहिली उमेदवार यादी जाहीर ; पुण्यातून रवींद्र धंगेकर ,तर कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर

वेध माझा ऑनलाईन। महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एकूण 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी एकूण 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर पक्ष किती आणि कोणकोणत्या जागांवर लढणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


महाराष्ट्रातील ‘या’ 7 उमेदवारांची नावे जाहीर
सोलापूर – प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
पुणे – रवींद्र धंगेकर
नंदुरबार – गोवाल पाडवी
अमरावती – वळवंत वानखेडे
लातूर – डॉ. शिवाजी कलगे
नांदेड – वसंतराव चव्हाण

Wednesday, March 20, 2024

सातारा जिल्ह्यामधून सुमारे १४०० मुली, महिला बेपत्ता ; आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन ;

वेध माझा ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये मुली किंवा महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली पहायला मिळत आहे. वृत्तपत्रांमध्ये दररोज मुली अथवा महिला बेपत्ता झाल्याच्या बातम्या येत असतात. मिळालेल्या महितीनुसार आज अखेर आपल्या सातारा जिल्ह्यामधून सुमारे १४०० मुली, महिला बेपत्ता झाल्या असल्याचे समजत आहे. ही बाब अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. बेपत्ता महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा तत्काळ शोध घ्यावा, असे आवाहन भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन देत केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मुली, महिला बेपत्ता होणे यामुळे संबंधितांचे आई वडील, कुटुंब, नातेवाईक यांच्यासह समाजमानवर त्याचे विपरीत परिणाम होत असतात. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत. काही दिवसांपूर्वी किल्ले अजिंक्यतारा परिसरात एका मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला होता. सदर मुलगी सुध्दा २ महिन्यापासून बेपत्ता होती, अशी माहिती आली होती. दोन महिने बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडतो पण, तिचा शोध लागत नाही ही बाब गंभीर आहे.

बेपत्ता मुली अथवा महिलाची नोंद त्या त्या पोलीस ठाण्यामध्ये होत असते मात्र त्याचा शोथ का लागत नाही? सबंधीत मुली, महिलांचा शोथ तत्काळ लागल्यास त्यांचा जीव वाचू शकतो अथवा पुढील अनर्थ, अनुचित प्रकार टाळला जाऊ शकतो. त्यामुळे बेपत्ता मुली अथवा महिला याचा शोध लावणे यासाठी पाठपुरावा करणे हे काम संबंधीत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचे आहे. याबाबत संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्याना योग्य त्या सुचना द्याव्यात. बेपत्ता झालेल्या मुली, महिलाचा तत्काळ शोध घेण्यात यावा आणि मुली, महिला बेपत्ता होणे अशा घटनाना आळा बसणेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पोलीस अधीक्षक शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


उदयनराजे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट ? ; साताऱ्याची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार ? काय आहे बातमी...

वेध माझा ऑनलाईन। राज्यामध्ये भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यापासूनच माढा लोकसभेला अक्षरशः रणसंग्राम सुरू आहे. या ठिकाणी महायुती धर्म संकटात आली असतानाच आता साताऱ्यामध्ये सुद्धा खासदार उदयनराजे भोसले यांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर उदयनराजे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये नुकतीच भेट झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे

साताऱ्याची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार?
या सर्व पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी सुद्धा मी अजूनही संन्यास घेतलेले नाही असे म्हणत उमेदवारीसाठी स्पष्ट इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये साताऱ्याची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे लक्ष आहे. माढामध्ये महायुतीकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील गट कमालीचा आक्रमक झाला असून त्या ठिकाणी मोहिते पाटील गट आणि रामराजे निंबाळकर सुद्धा एकत्र आल्याने माढामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

उदयनराजे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट
हा एका बाजूने संघर्ष सुरू असताना उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची काल (19 मार्च) भेट घेतल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. काल रात्री उदयनराजे आणि  देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट झाली. तब्बल दोन तास झालेल्या बैठकीचा तपशील समोर आला नसला, तरी उदयनराजे हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांनी सुद्धा उदयनराजे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली होती. मात्र, उदयनराजे यांनी थेट मुंबईमध्ये येऊन फडणसांची भेट घेतल्याने उमेदवारी कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता आहे. 

दरम्यान याठिकाणी अजित पवार गटाने सुद्धा सातारा लोकसभेला दवा केला आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी सुद्धा उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यांनी आपला नैसर्गिक हक्क असल्याचे म्हटले आहे. भाजपकडून उमेदवारीवरून उदयनराजे प्रयत्नशील असतानाच भाजपकडूनच माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सुद्धा उमेदवारीवर दावा केला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या या स्पर्धेत नेमक्या कोणाच्या वाट्याला उमेदवारी येणार? याकडे लक्ष आहे. 
 

विजय शिवतारे म्हणाले; अजित पवारांना गुर्मी आहे ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन। अजित पवार हे कसलीही माणूसकी नसलेले व्यक्ती आहेत, त्यांना प्रचंड गुर्मी आहे असं सांगत या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव होणार हे त्रिवार सत्य असल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे  यांनी केलंय. बारामतीतून मी बंड करत नाही, पवारांना नाकारणाऱ्या मतदारांसाठी मी निवडणूक लढवतोय असंही ते म्हणाले. एका माध्यम समूहाशी बोलत असताना त्यांनी अजित पवारांवर चौफेर टीका केली.

काय म्हणाले विजय शिवतारे?
माझं हे बंड नाही, पवारांच्या विरोधात बारामती मतदारसंघात साडे पाच लाख मतदार आहेत. पवारांचे समर्थन करणारे मतदार दोन भागात विभागतील, तर मग विरोध करणाऱ्या मतदारांनी काय करायचं? त्यामुळे पवारांना नाकारणाऱ्या मतदारांसाठी मी निवडणूक लढतोय.

अजित पवारांना गुर्मी 
अजित पवार युतीमध्ये आल्यानंतर मी स्वतः त्यांना भेटायला गेलो, त्यांचं स्वागत केल. पण त्यांची गुर्मी कधी जाणार नाही. माझ्याकडून हे काम करून घेण्यासाठीच मला ही संधी मिळत आहे. 2014 साली महादेव जानकरांच्या ठिकाणी मी उभा असतो तर त्याचवेळी मी निवडून आलो असतो. बारामती कुणाचा सातबारा नाही, घराणेशाहीच्या विरोधात हा लढा आहे. या निवडणुकीकडे मी वैयक्तिक वैर म्हणून लढत नाही.नमो रोजगार मेळाव्याच्या वेळी तीन बुके घेऊन मी गेलो होतो. अजित पवारांना बुके दिल्यावर त्यांनी तो लगेच बाजूला ठेवला, त्यांना कसलीही माणूसकी नाही. एवढा गर्व मी कुठेच पाहिला नाही.

पुण्यात कुणालाही मोठं होऊ दिलं नाही
अनंतराव थोपटे हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असं सोनिया गांधी यांनी 1999 साली जाहीर केलं होतं. त्यावेळी शरद पवारांनी त्यांना निवडणुकीत पाडलं आणि त्यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हिरावून घेतली. शरद पवारांनी पुण्यात कुणालाही मोठं होऊ दिलं नाही. 

अजित पवार पडणार हे नक्की
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला समजावलं. युतीधर्म पाळला पाहिजे, पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना दिलेला शब्द पाळला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक खासदार महत्त्वाचा आहे. त्यावर मी सांगितलं की, मी जरी निवडणुकीला राहिलो नाही तरी मतदार हे अजित पवारांच्या विरोधात मतदान करतील, अजित पवारांची जागा नक्की पडणार. अजित पवार जिंकू शकणार नाहीत हे त्रिवार सत्य आहे.
याविषयी जर देवेंद्र फडणवीसांनी भेटायला बोलवलं तर मी त्यांना सांगेन, मी जरी राहिलो नाही तरी अजित पवार पडतील. सुप्रिया सुळे या सहज निवडून येतील. त्यामुळे मला अपक्ष उभारू द्या, मी आपलाच आहे. मी निवडून येईन. 


Tuesday, March 19, 2024

पंकजा मुंडे यांच्या विरोधात विनायक मेटे यांच्या पत्नींना उमेदवारी ? शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक प्लॅन ?

वेध माझा ऑनलाईन। बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून  पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून, महाविकास आघाडीचा उमेदवार मात्र अजूनही ठरलेला नाही. अशात विनायक मेटेंच्या पत्नी पंकजा मुंडेंविरोधात लोकसभेत उतरणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळत होत्या. मात्र, आज मेटे समर्थकांची बैठक झाली असून, विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंनी शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवावी असा एकमताने निर्णय झाला आहे. 

विधान परिषदेमध्ये विनायक मेटे यांना भाजपने डावलण्याचं काम केलं आणि याची सल कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आजही पाहायला मिळते. दुसरीकडे भाजपने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेचे तिकीट जाहीर केल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आले आहे. 

ज्योती मेटे काय निर्णय घेतील?
ज्योती मेटे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी बीडमधील शिवसंग्राम भवन येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली पाहिजे असं एकमताने ठरविण्यात आले. त्यामुळे आता ज्योती मेटे नेमका काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत भाजपासोबत असलेला शिवसंग्राम पक्ष आता शरद पवार गटात जाणार का? असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. 

शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक ?
महाविकास आघाडीत बीडची जागा शरद पवारांना सुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीवेळी धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले. अशात धनंजय मुंडे यांची ताकद पंकजा मुंडे यांना मिळणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे आव्हान पवारांसमोर आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी देऊन शरद पवार मास्टरस्ट्रोक प्लॅन करू शकतात. कारण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, विनायक मेटे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठं योगदान आहे. मराठा आरक्षणाच्या बैठकीला जातानाच त्यांचा अपघात झाला होता. त्यामुळे ज्योती मेटेंना सहानुभूती मिळू शकते. आता शरद पवारांकडून ज्योती मेटेंना उमेदवारी जाहीर केली जाते का? आणि स्वतः ज्योती पवार देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार असतील का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

नागपुरात नितीन गडकरिंची जागा धोक्यात ? काय आहे कारण? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। काँग्रेसच्या सर्व गटांनी आपापसातले मतभेत विसरून सर्व गटांनी एकत्रित ताकतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांच्यासमोर जोरदार आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार  यांच्या घरी नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांची एक खास बैठक पार पडली. काँग्रेसच्या या बैठकीत पक्षाचे गट तट विसरून नागपुरातून एकच नाव पक्षश्रेष्ठींकडे सूचवण्याचा निर्णय झाला आहे.

विदर्भात काँग्रेसची मोठी ताकद असूनही नेत्यांमधील अंतर्गत मतभेदांमुळे काँग्रेसची चांगलीच पिछेहाट होताना दिसतेय. पण आता विलास मुत्तेमवार, नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी हे तीनही नेते एकत्रित आल्यामुळे भाजपच्या नितीन गडकरींसमोर मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. 

विकास ठाकरेंच्या नावावर एकमत ? 
नागपूरचा उमेदवार कोण असेल याबद्दल काँग्रेस नेते सध्यातरी काही बोलायला तयार नाहीत. असं असलं तरी एकच नाव पक्ष नेतृत्वाकडे सूचवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर नागपुरातील सर्व दिग्गज काँग्रेस नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे अभिजीत वंजारी यांच्या नावाचीदेखील चर्चा सुरु आहे

आता गट तट विसरून नागपूरची निवडणूक पूर्ण ताकतीने लढवू असा निर्धार काँग्रेस नेत्यांनी केला आहे. गेली दोन लोकसभा निवडणूक काँग्रेस नागपुरातून पराभूत झाली आहे. मात्र अबकी बार नागपुरातून काँग्रेस खासदार असाच आमचा निर्धार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी दिली आहे. तर आम्ही वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात निवडणूक लढण्यास तयार आहोत अशी सूचक प्रतिक्रिया आमदार विकास ठाकरे यांनी दिली आहे.

काँग्रेसची विदर्भात मोठी ताकद असतानाही त्या ठिकाणी अंतर्गत वादामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं. नागपूरमधील काँग्रेसचे नेते एकमेकांचं तोंडही बघत नसल्याचं चित्र आहे. त्यामध्ये विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांचं नाव घेतलं जातं. पण आता हे तिघेही एकत्रित आल्याने मात्र निवडणुकीमध्ये वेगळा परिणाम दिसू शकतो.

नववीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने खून ; खुनाचे कारण धक्कादायक ; कुठे घडला प्रकार ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन। पुणे शहरातील कोयता गँगची चर्चा अधूनमधून सुरु असते. कोयता विक्रीसाठी पुणे पोलिसांनी कडक नियमावली तयार केली आहे. त्यानंतर कोयता सरार्स मिळत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. दोन अल्पवयीन मुलांनी एका नववीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने खून केला. खुनाचे कारण धक्कादायक आहे. दोघांची एकच मैत्रीण होती. परंतु ती मैत्रीण बोलत नाही, म्हणून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणात दोन अल्पवयीन आरोपींना पुणे पोलिसांनी काही तासांत अटक केली आहे. दरम्यान १५ वर्षांच्या मुलांनाही कोयता सहज मिळत असल्याबद्दल पुणेकरांमध्ये चिंता व्यक्त होऊ लागली आहे. पुण्यात एकतर्फी प्रेमातून काही महिन्यांपूर्वी दर्शना पवार हिचा खून झाला होता.

पुणे शहरात सिंहगड परिसरात आनंदवन सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये प्रकाश हरिसिंग राजपूत (वय १५) परिवारासह राहतो. तो खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात नववीत शिकत आहे. त्याची आई सोसायटीत कामगार आहे. सोसायटीच्या कामगारांचा खोलीत हा परिवार राहतो. सोमवारी शाळेतून आल्यावर जेवण करुन तो झोपला. तो झोपेत असताना दोन अल्पवयीन मुलांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तो घरातून पळत सुटला. मात्र शंभर फुटावर कोसळला.

आरोपींनी का केला खून
प्रकाश आणि हल्लेखोर यांची एक मैत्रीण होती. हल्ला करणाऱ्यांपैकी एका मुलाशी ती मुलगी काही दिवसांपासून बोलत नव्हती. प्रकाश याच्या सांगण्यावरुन ती मुलगी बोलत नाही, असा त्यांचा समज झाला. यामुळे त्यांनी प्रकाश यालाच संपवण्याचा प्रकार केला. पोलिसांच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे.

मनसे महायुतीत सामील होणार ? ; राज ठाकरे अमित शहा यांची भेट ;लोकसभेसाठी मनसेला किती जागा मिळणार ?

वेध माझा ऑनलाईन। गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्याच व देशाचं लक्ष दिल्लीतील घडामोडींकडे लागलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच राजकीय भूकंपांनी बेजार झालेल्या महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप पाहायला मिळणार असं  दिसतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजप हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. तेव्हापासूनच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप शिंदे आणि पवार यांच्या महायुतीत आता मनसेही सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला होता. राज ठाकरेंचा हा प्रस्ताव अमित शहांनी मात्र फेटाळला आहे. केवळ एक जागा देणं निश्चित, पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी राज ठाकरेंना सांगितलं. तसेच, राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही, असंही अमित शाह राज ठाकरेंना म्हणाल्याची माहिती मिळत आहे.

Sunday, March 17, 2024

माझ्यासाठी हातकणंगले सोडा; आता राजू शेट्टींचा उद्धव ठाकरेंना प्रस्ताव -

वेध माझा ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला असला तरी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार कोण असणार याची शाश्वती अजूनही मतदारांना आलेली नाही. त्यामुळे लढत कशी असणार याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून शाहू महाराज यांचे नाव आणि हातकणंगलेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव निश्चित असलं तरी त्यांच्या विरोधातील उमेदवार अजूनही ठरलेला नाही. त्यामुळे ही लढत कशी होणार याबाबत अजूनही चर्चा सुरूच आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आपल्याला सोडावा
दरम्यान, राजू शेट्टी यांनी दुसऱ्यांदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने हातकणंगले मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आपल्याला सोडावा, अशी मागणी शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना मशाल चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र,राजू शेट्टी यांनी गेल्या 25 वर्षांपासून मी पक्षाच्या चिन्हावर लढत असल्याचे सांगत मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली असून आयुष्यात इतर पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली नसल्याचे त्यांनी ठाकरे यांना सांगितले. 

उद्धव ठाकरेंच्या भेटीवर काय म्हणाले?
राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बोलताना सांगितले की, याठिकाणी (हातकणंगले) तुम्ही लढू नका असे त्यांना सांगितले. हातकणंगलेत पाठिंबा मिळाल्यास राज्यात ज्याठिकाणी शिवसेना लढत आहे, त्याठिकाणी पाठिंबा देण्याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांना सांगितल्याचे शेट्टी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाईल. ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितल्याचे शेट्टी म्हणाले. मला पाठिंबा देण्याबाबत स्थानिक शिवसैनिकांची ईच्छा दिसते. संपर्कात असलेल्या शिवसैनिकांकडून मतविभागणी नको म्हणून मला पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचे शेट्टी म्हणाले.

ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील लोकसभा निवडणूक लढवणार ; सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब ?

वेध माझा ऑनलाईन। सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील लोकसभा निवडणूक लढणार आहेत. चंद्रहार पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला होता. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी त्यावेळी मोठं शक्तिप्रदर्शन करत ठाकरे गटात प्रवेश केला होता. दरम्यान, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी 11 मार्च रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार मानले. उद्धव ठाकरे यांनी आपला केलेला सन्मान हा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.

Saturday, March 16, 2024

आजपासून आचारसंहिता लागू ; सातारा जिल्ह्यातील मतदान कधी होणार ? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन । - लोकसभा निवडणूकीचा बिगूल वाजला आहे आजपासून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. दरम्यान  सातारा, सांगली, कोल्हापूर, माढा, हातकणंगले बारामती येथे तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे अशी माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे.

खालील टप्यात होणार मतदान...
 1) 19 एप्रिल
 गडचिरोली, भंडारा- 
गोदिया, नागपूर, रामटेक, चंद्रपूर,

2) 26 एप्रिल 
 यवतमाळ- वाशिम, वर्धा, 
अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड,

 3) 7 मे 
सातारा, सांगली, सोलापूर,
 कोल्हापूर, लातूर, माढा, रायगड, धाराशिव, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, बारामती, हातकणंगले

 4) 13 मे
 पुणे, शिरूर, अहमदनगर, 
शिर्डी, बीड, नंदुरबार, रावेर, जालना, छ. संभाजीनगर,   मावळ,

 5) 20 मे 
 कल्याण, ठाणे

आमदार बाळासाहेब पाटील म्हणतात ...निवडणूक आली की बाहेर पडतात अशा लोकांपासून सावध रहा ; काय आहे बातमी ...?

वेध माझा ऑनलाईन। निवडणूक जवळ आली की आपल्या कराड उत्तर विधानसभा संघामध्ये काही लोक येतात व विविध प्रकारच्या वल्गना करतात अशा लोकांपासून सावध रहा असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.

ते किरोली ता. कोरेगाव येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघातील सर्व गावे, वाड्या वस्त्यांना समान न्यायाने निधीचे वाटप केले असून त्या माध्यमातून कराड उत्तर विधानसभा मतदार संघात विकास कामांचा झंझावात सुरू आहे. परंतु विरोधक विकास कामांऐवजी भडक बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत, त्यामुळे अशा लोकांपासून सावध रहा असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले, कोरेगांव पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतीलाल पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी संभाजीराव गायकवाड, आनंदा कोरे, वसंतराव कणसे, ॲड.अशोकराव पवार, पै.संजय थोरात, सागर पाटील (दादा), अविनाश माने, भागवत घाडगे, विद्याधर बाजारे, संजय कुंभार, विष्णू गायकवाड, हिम्मत माने, राहुल निकम भरत गायकवाड, लालासो जाधव, दादासो गायकवाड, सुरेश उबाळे, श्रीरंग रेवते, पांडुरंग पवार, विलास भोसले, यशवंत चव्हाण, गोरखनाथ काळे, जयहनुमान घाडगे, अंकुश घोरपडे, अमोल चोरगे, सुनील मलवडकर, विजय गायकवाड, प्रशांत घाडगे, किरण जाधव, सौ. सरपंच अर्चना गजानन चव्हाण, उपसरपंच तुषार भिसे, बबन मुगुटराव चव्हाण, विलास चव्हाण, पांडुरंग कोळी, सतिष जाधव, संजय जगताप, अर्जुन चव्हाण, निवास कोठावले, लक्ष्मण चव्हाण, संजय बबन चव्हाण, जनार्धन चव्हाण, यासिन पठाण, कुंडलिक गोसावी, तुषार खजूरे, बाळासो चव्हाण, राजेंद्र चव्हाण, मानसिंग चव्हाण, शामराव कुंभार, हणमंत चव्हाण, नामदेव चव्हाण, दीपक जगताप, जितेंद्र पवार, जालिंदर चव्हाण, रमेश जाधव, सुनील जाधव, दादासो पवार, सुहास चव्हाण,  बजरंग पवार, दयानंद चव्हाण, अमोल भिसे, जोतिराम कुंभार, तानाजी चव्हाण, बापूसो कदम, युवराज जाधव, सागर जाधव, धीरज पवार, तुषार पवार, दादासो चव्हाण, सुनील चव्हाण, सुरज शिंदे, राजकुमार चव्हाण, शेखर पवार, सुरज जाधव, अक्षय पवार, समीर चव्हाण, जितेंद्र चव्हाण, किरण चव्हाण, सत्कारमूर्ती रिटायर्ड आर्मी संदीप आबाजी चव्हाण, माजी सरपंच सौ.प्रतिभा जाधव, सौ.साधना चव्हाण, सौ.रुक्मिणी जगताप, दुर्गा जगताप, रेखा चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता धुमाळ, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता टिकोले, पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता कारंडे तसेच परिसरातील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Sunday, March 10, 2024

सारंग पाटील यांची लोकसभेसाठी चर्चा...कशासाठी ? काय आहेत चर्चा...? वाचा बातमी सडेतोड...

वेध माझा ऑनलाईन।
सातारा लोकसभा मतदार संघातून यावेळी उमेदवार कोण असणार ...या चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत...खरतर लोकशाही मध्ये कोणालाही कोणत्याही निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे, असे असताना खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे.. त्याना थेट लोकांमधून निवडणुका लढवण्याचा स्वतःचा किती अनुभव आहे हा प्रश्न असला...तरी ते पदवीधरचे उमेदवार म्हणून पदवीधर मतदारांपुढे एकदा आले होते...पण चक्क आता खासदारकीसाठी त्यांची चर्चा होतेय याचे आसचर्य सगळीकडेच व्यक्त होताना दिसतंय. त्यांना खुद्द पाटण,कराड सह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या राष्ट्रवादीमधून मोठा विरोध होत आहे अशीही चर्चा आहे...

अनेक राजकारण्यांच्या मुलांना राजकारणात आयत यावं...अस वाटत असते...पण ते समाजासाठी व त्या राजकीय पार्टीसाठी भविष्यात अडचणीचे ठरू शकते...असे अनेकजण आहेत जे पोलिटिकल बॅक ग्राउंड मधून राजकारणात आले आहेत...मग ते उदयसिंह पाटील असोत... किंवा पाटण मधील सत्यजित पाटणकर असोत...असे खूप जण आहेत...मग त्यांची सुरुवात पाहता त्यांनी अगदी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीपासून त्यांनी सुरुवात करून ते आमदारकी किंवा खासदारकी साठी आपली इच्छा व्यक्त करतात...
खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांच्याबाबत बोलायचं झालं तर...त्यांची राजकारणातील ओळख म्हणजे...श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव... एव्हढीच आहे...आणि एवढ्या ओळखीवर कोणी...मी खासदार होणार असे म्हणून चालणार नाही...तुम्हाला जिल्ह्याच्या राजकारणाचा अभ्यास किती?... विधानसभा, जिल्हा परिषद गट किंवा गण अशा ठिकाणी असणाऱ्या सामाजिक समस्या व त्याचे निराकरण कसे होऊ शकते त्यासाठी तेथील नेमकं राजकारण काय आहे... अशा अनेक बाबी असतात की ज्या लोकांच्या समस्यांशी संबंधित असतात... या प्रश्नाबाबत सारंग पाटील यांना किती माहीती आहे...हाही प्रश्न आहे...श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव आहेत ही ओळख खासदार होण्यासाठी पुरेशी नाही... वेळोवेळी होणाऱ्या बाजार समिती, ग्रामपंचायत ,पंचायत समिती जिल्हा परिषद अशा निवडणुकीत त्यांची ठोस भूमिका काय असते.? हाही नेहमीच विचारला जाणारा प्रश्न असतो...त्याचे उत्तर त्यांनी कधी कृतीतून दिलय असे आठवत नाही...
नुकताच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात राष्ट्रवादी चा मेळावा पार पडला त्यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या फ्लेक्सबोर्डवर श्रीनिवास पाटील व सारंग पाटील यांचा साधा फोटोही नव्हता...या गोष्टी बरच काही सांगून गेल्या...त्यांना राष्ट्रवादी मधून होणारा विरोध देखील मोठा चर्चेचा विषय आहेच...आणि हा विरोध का होत आहे? याचाही विचार व्हायला हवा...या पक्षात चार- चार वेळा निवडून आलेले अनुभवी आमदार आहेत...ते सर्वजण समाजकार्यात कच्चा अनुभव असणाऱ्या व्यक्तीला कसे काय समर्थन देतील? याशिवाय देखील बरीच कारणे चर्चेत आहेत?...असेही समजते...
त्यांच्या स्वतःच्या पाटण परिसरात तर त्यांचे राष्ट्रवादीसाठी ठोस काम काय? असेही पाटणकर गटाचे सुज्ञ लोक विचारतात ... काही ठिकाणी खासदार साहेबांनी पाटण तालुक्यात विरोधी गटाला निधी दिल्याचे पाटणकर गटाचे लोक सांगतात मग, अशावेळी त्यांना राष्ट्रवादी पक्षाची आठवण का येत नाही ? फक्त खासदार होण्यासाठी पक्षाची आठवण येतेय हे योग्य आहे का? अशी विचारणा देखील तेच लोक करताना दिसतात.
कराड उत्तर, कराड दक्षिण सह संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्याबाबत यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नाही...यापैकी अनेक ठिकाणी त्यांना स्पष्टपणे आणि उघड विरोध आहे...अशी परिस्थिती असताना... एखाद्याने मला खासदार व्हायचंय...अस म्हणणं कितपत योग्य आहे? 
अशा लोकांनी राजकारण करताना अगदी ग्राउंड लेव्हल वर उतरून  त्यातील बारकावे, समस्या, त्याचे निराकरण कसे करावे हे शिकून घेऊन मगच... खासदारकीचे स्वप्न बघायला हरकत नाही...
पदवीधरची निवडणूक हरल्यानंतरही त्यांनी लोकांशी संबंधित सामाजिक समस्यांबाबत काही उठावदार काम केल्याचेही कधीच ऐकिवात नाही...म्हणजेच...एखाद्याला सायकल चालवायचा अनुभव नसतो ...आणि तो म्हणतो मी विमानच चालवतो...पण... असं म्हणणं कितपत योग्य असते ?...आणि तसंच करायचं झालं तर,... विमानात बसलेल्या प्रवाशांचे काय होईल... हा विचार करायला नको का ?  "समझदार को इशारा काफी है'... असे म्हणत जिल्ह्यात याविषयी सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत...

यावेळी श्रीकांत शिंदेंना निवडणूक सोपी जाणार का? कुठून लढणार ? वाचा बातमी।

वेध माझा ऑनलाइन। शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी उभी फूट पडल्यानंतर आता लोकसभेच्या कल्याण आणि ठाणे येथील निवडणूकांकडे साऱ्या देशाचे लक्ष लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाणे जिल्ह्यात त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांची निवडणूक महाराष्ट्रात होणाऱ्या हायप्रोफाईल निवडणूकांपैकी एक ठरणार आहे. मात्र जर जागा वाटपात अदलाबदल झाली तर श्रीकांत शिंदे कल्याण ऐवजी ठाण्यातून निवडणूक लढवू शकतात असे म्हटले जात आहे. जर कल्याणमधून 2019 साली निवडून आलेल्या श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधूनही जर निवडणूक लढवावी लागली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुभाष भोईर किंवा सुषमा अंधारे यांना श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. स्वत: श्रीकांत शिंदे यांनी मात्र यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. जर ठाण्यातून श्रीकांत शिंदे यांना निवडणूक लढवावी लागली तर ठाण्यात त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्याशी लढत द्यावी लागेल. तसे झाले तर टफ फाईट होण्याची शक्यता आहे. राजन विचारे यांनी गेल्या निवडणूकीत सात लाख मतांच्या आघाडीने राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा पराभव केला होता. ठाणे आणि कल्याण मतदार संघ कोणाच्या वाटेला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Friday, March 8, 2024

कराडात 150 हुन अधिक लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप ; उपक्रमाचे कौतुक ; भाजपचे शहर उपाध्यक्ष अभिषेक भोसले यांचा पुढाकार ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड दक्षिणचे भाजप नेते डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या सहकार्याने आणि कराड शहर भाजप उपाध्यक्ष अभिषेक भोसले यांच्या पुढाकाराने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पालिकेच्या शाळा क्रमांक 10 मध्ये नुकताच नोंदणी कॅम्प घेण्यात आला 150 हुन अधिक लाभार्थ्यांना यावेळी आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. 
यावेळी अभिषेक भोसले यांनी डॉ अतुलबाबांच्या माध्यमातून कराड शहर व परिसरातील जनतेला या योजनेंतर्गत मोठा लाभ होत असल्याचे आवर्जून सांगितले

सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ किशोर पटेल आणि श्री किशोर आठवले यांची उपस्थिती होती त्यांच्याच हस्ते उपस्थित नागरिकांना आयुष्मान भारतचे कार्ड वितरित करण्यात आले, 

याप्रसंगी श्री विक्रम पाटील,श्री दिलीप जाधव, ओंकार ढेरे, सागर माने, मंगेश वीर, विकी वाघमारे व अभिषेक भोसले मित्रपरिवार तसेच लाभधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते

भाजपच्या विद्यमान खासदारांचीदेखील धाकधूक वाढवणारी बातमी ; स्ट्राईक रेट चांगला नसलेल्या खासदारांचं भाजप तिकीट कापणार ?

वेध माझा ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात जागावाटपासाठी जोरदार हालचाली घडत आहेत. महायुतीत तर हालचालींना जबरदस्त वेग आला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत हे दोन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळवण्यात यश मिळवतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्रात 36 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाची धाकधूक वाढल्याची चर्चा आहे. असं असताना आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भाजपच्या विद्यमान खासदारांचीदेखील धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजपच्या नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले. या सर्व्हेतून डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. स्ट्राईक रेट चांगला नसलेल्या खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.


तिकीट का कापलं जाऊ शकतं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटं कापलं जाण्याची शक्यता आहे. सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारणदेखील या सर्व्हेत पाहण्यात आलं. काही विद्यमान खासदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी या सर्व्हेमधून समोर आली आहे. निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता असल्याचं आता समोर येत आहे. 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकीटाबाबत आक्षेप घेण्यात आलाय.

कोणत्या जागांवर उमेदवार बदलण्याची शक्यता?
प्रीतम मुंडे, 
बीड
सुभाष भामरे, 
धुळे
सिद्धेश्वर स्वामी, 
सोलापूर
संजय काका पाटील, 
सांगली
सुधाकर श्रृंगारे, 
लातूर
उन्मेश पाटील,
 जळगाव
गोपाळ शेट्टी, 
उत्तर मुंबई
पुनम महाजन, 
उत्तर मध्य 
मुंबई
प्रताप चिखलीकर,
 नांदेड
सुजय विखे पाटील, 
अहमदनगर
रामदास तडस, 
वर्धा
रक्षा खडसे,
 रावेर

ईडी च्या कारवाईनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया ; काय म्हणाले; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या असलेल्या बारामीत अ‍ॅग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड साखर कारखान्यावर कारवाई केली आहे. रोहित पवार यांचा बारामती अ‍ॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी रोहित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या कारवाईनंतर रोहित पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?
माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू, माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत. या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई. परंतु मी महादेवाचा भक्त आहे. अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांचं थयथयाट झाल्याशिवाय राहणार नसल्याचं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवारांना ED चा झटका, बारामती अॅग्रोने खरेदी केलेला कारखाना जप्त!

वेध माझा ऑनलाईन।  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रोच्या संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असून रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. ईडीने रोहित पवारांशी संबंधित बारामती अॅग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकरची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, शुगर प्लंट, साखर कारखान्याची इमारत आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.

रोहित पवारांवर आरोप काय? 
कन्नड सहकारी साखर कारखाना डबघाईला आल्यानंतर राज्य सहकारी बँकेने त्याचा लिलाव केला. हा कारखाना 50 कोटी रुपयांमध्ये रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडने खरेदी केला होता. या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी ईडीने बारामती अॅग्रोची चौकशी केली. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकातले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.

बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या लिलावात सहभागी आहेत. हायटेक कंपनीने लिलावासाठी पाच कोटी रूपयांची रक्कम भरली होती. ती रक्कम बारामती अॅग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे. विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती अॅग्रोने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

रोहित पवारांची दोन वेळा चौकशी
बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. आमदार रोहित पवार यांच्याकडे बारमती अॅग्रो कंपनीची मालकी आहे. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती.आता ईडीने कन्नड कारखान्याशी संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. 

" खऱ्या शिवसेनेची ’ पुन्हा न्यायालयात लढाई, राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडून प्रश्न ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन। शिवसेना प्रकरणातील राज्यातील लढाई अजून संपलेली नाही. ‘खरी शिवसेना‘ कोणाची हा निर्णय विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने दिला आहे. परंतु विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना उबाठा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल आमच्या न्यायालयाने दिलेल्या निकालाशी विसंगत नाही का? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी ठेवली आहे.

न्यायालयाने कागदपत्रे मागवली
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला “मूळ राजकीय पक्ष” म्हणून घोषित करणारा निर्णय दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यावर म्हटले की, राहुल नार्वेकर यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मे 2023 च्या निर्णयाचे उल्लंघन असू शकतो. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मज्जाव केला होता. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयातून या याचिकेसंदर्भातील पुरावे आणि कागदपत्रे मागवली आहेत.

कपिल सिब्बल यांचा दावा
ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि ए.एम.सिंघवी यांनी न्यायालयात म्हटले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने 11 मे 2023 रोजी दिलेल्या निकालाचे उल्लंघन केले आहे. विधानसभा अध्यक्षांनी सभागृहातील बहुमताच्या आधारे निर्णय घेतला आहे. न्यायालयाने सभागृहातील बहुमताच्या आधारावर निर्णय घेण्यास मनाई केली होती. नार्वेकर यांनी निकाल देताना २०१८ ची घटना विचारात घेण्याऐवजी १९९९ ची घटना विचारात घेतली, असेही त्यांनी निर्देशनास आणून दिले.

तातडीने सुनावणी घेण्याची मागणी
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोंबर, नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेऊन निकाल द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यास फलनिष्पती शून्य ठरेल. शिंदे गटाला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे.


महायुतीच्या जागावाटपाचा मुद्दा ; शिंदे, अजित पवारांच्या जागावाटपाच काय ठरलं ?

वेध माझा ऑनलाईन । महायुतीच्या जागावाटपावर मुंबईत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर दिल्लीत भाजपच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली आणि त्यातून समोर आलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या चार खासदारांचं तिकीट धोक्यात आल्याची माहिती आहे. तर या चार मतदारसंघात भाजप आपले उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागावाटपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटले, वास्तविकेच्या आधारावर जागावाटप करा… म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची ताकद पाहूनच विजयी होऊ शकतो का? हे पाहून किती जागा द्यायच्या हे भाजप स्पष्ट करेल. विशेष म्हणजे हे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या भाजपच्या नेतृत्वाशी झालेल्या बैठकीनंतर केलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्या बैठकीत चर्चा झालेला फॉर्म्युल्यानुसार, भाजप ३५ ते ३७ जागा, शिंदेंची शिवसेना ८ ते ९ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ३ ते ४ जागा मिळणार असल्याची चर्चा आहे

Sunday, March 3, 2024

ओगलेवाडी येथे भव्य रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद ; 75 जणांनी केले रक्तदान

वेध माझा ऑनलाईन। लायन्स क्लब ऑफ कराड मेन व कलबुर्गी स्टेम्पींग यांचे संयुक्त विद्यमाने ओगलेवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
होते.यावेळी 75 जणांनी रक्तदान केले.यशवंतराव चव्हाण ब्लड बँकेचेवतीने सर्व सोय करण्यात आली होती.

यावेळी बोलताना क्लबचे अध्यक्ष ला.खंडू इंगळे म्हणाले की जगात सर्वश्रेष्ठ दान कोणते असेल तर ते रक्तदान आहे.यामुळे आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो.सध्याच्या युगात विज्ञान कितीही प्रगत असले तरी रक्त तयार करण्याचा कारखाना कोणी बनवू शकत नाही.रक्त तयार होणे एक दैवी प्रक्रिया असून त्याचा वापर इतरांचे जीव वाचवण्यासाठी होणे आवश्यक आहे.तरी प्रत्येकानी दर तीन महिन्यांनी रक्तदान
करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी हजारमाचीचे उपसरपंच कदम , सदस्य माने ,कराड लायन्स चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मावजी पटेल,क्लबचे संदिप पवार, प्रविण भोसले, मिलिंद भंडारे, कलबुर्गी स्टेम्पींगचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवीगाळ, चिथावणीखोर विधानं करणाऱ्यांना भाजपाने उमेदवारी नाकारली; पहिल्या यादीतून काढले बाहेर ; कोण आहेत ?

वेध माझा ऑनलाईन। लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असताना भाजपाने १६ राज्यातून १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत अनेक बदल केल्यामुळे ही यादी चांगलीच चर्चेत आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघात शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात भोजपुरी गायक पवन सिंह यांना उमेदवारी दिली गेली, मात्र त्यांनी आज अचानक माघार घेतली. तर दिल्लीच्या चांदणी चौक येथून माजी मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी आज थेट राजकारणातून निवृत्ती घेतली. फक्त डॉ. हर्षवर्धनच नाही तर इतरही अनेक नेत्यांना भाजपाने तिकीट नाकारले आहे. यामध्ये त्या खासदारांचाही समावेश आहे, ज्यांनी आपल्या कार्यकाळात भडकाऊ, चिथावणीखोर विधानं करून भाजपाला अडचणीत आणले होते.

भाजपाने पहिल्या यादीत काही प्रमुख खासदार जसे की, प्रज्ञा सिंह ठाकूर, रमेश बिधुरी आणि प्रवेश वर्मा यांना तिकीट नाकारले आहे. तसेच जयंत सिन्हा आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनाही उमेदवारी दिलेली नाही. मात्र जयंत सिन्हा आणि गौतम गंभीर यांनी यादी जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीतून माघार घेतली होती. प्रज्ञा सिंह, रमेश बिधुरी आणि परवेश वर्मा यांनी आपल्या कार्यकाळात संसदेत आणि संसदेबाहेर अनेकदा अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. भाजपाने यांना तिकीट नाकारून निवडणुकीच्या काळात जोखीम न उलण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते.

प्रज्ञा सिंह ठाकूर या २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी होत्या. आरोपातून मुक्त झाल्यानंतर भाजपाने त्यांना निवडणुकीतून उतरवले होते, तेव्हाही भाजपावर जोरदार टीका झाली होती. गेल्या काही काळात त्यांच्या चिथावणीखोर विधानामुळे भाजपावर विरोधकांनी टीका केली होती. ठाकूर यांनी महात्मा गांधींवर गोळ्या झाडणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त असल्याचे म्हटले होते. या विधानावर विरोधकांसह मित्रपक्षांनीही आक्षेप घेतला होता.
माजी मुख्यमंत्री स्व. साहिब सिंह वर्मा यांचे सुपुत्र आणि दोन वेळा खासदार राहिलेल्या परवेश सिंह वर्मा यांचे तिकीट कापल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परवेश सिंह यांनीही अनेकदा वादग्रस्त विधानामुळे पक्षाला अडचणीत आणले होते. २०२० साली दिल्लीच्या शाहीन बाग येथे अल्पसंख्याक महिलांचे आंदोलन सुरू असताना परवेश सिंह वर्मा यांनी वादग्रस्त विधान केले होते. दिल्ली विधानसभेत भाजपाची सत्ता आल्यास आंदोलकांना एका तासात आंदोलनस्थळावरून हाकलून लावू, असे विधान त्यांनी केले होते.
दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी यांचेही तिकीट कापण्यात आले आहे. नव्या संसद भवनात मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. या अधिवेशनात रमेश बिधुरी यांनी बसपाचे तेव्हाचे खासदार दानिश अली यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली होती. ही शिवीगाळ संसदेच्या थेट प्रक्षेपणातही ऐकू आली होती. सभागृहात उपस्थित असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रसंगाचे गांभीर्य पाहून मध्यस्थी करत स्वतः माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

राज ठाकरे संतापले, पुण्यातून तडकाफडकी मुंबईला निघून गेले; काय घडलं ?काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातून एक मोठी बातमी येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले होते. पुण्यात विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे आले होते. पण पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्तेच वेळेवर न आल्याने राज ठाकरे संतापले. त्यामुळे या संतापाच्या भरातच राज ठाकरे हे पुण्यातून तडकाफडकी मुंबईला रवाना झाले आहेत. यावरून पुण्यातील मनसेच्या संघटनात्मक बांधणी आणि नेत्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर याबाबत राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले होते. आठ विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे आढावा घेण्यासाठी आले होते. राज ठाकरे आले तेव्हा पुण्यातील पक्ष कार्यालयात कुणीही उपस्थित नव्हते. राज ठाकरे येणार माहीत असूनही एकही पदाधिकारी न आल्याने राज ठाकरे चांगलेच संतापले. दुपारी अडीच वाजताची बैठक होती. पण उशिरापर्यंतही पदाधिकारी, नेते आले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर त्यांनी तडकाफडकी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले.

विभागप्रमुख आलेच नाही
राज ठाकरे येणार हे माहीत असतानाही विभागप्रमुख पक्ष कार्यालयात आले नाहीत. इतर नेतेही नव्हते. विभागप्रमुखांना फोनही लावण्यात आले. पण कुणीच वेळेत आलं नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी अधिकवेळ वाट न पाहता ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

संघटनेत गटबाजी
दरम्यान, पुण्यातील मनसेच्या संघटनेत गटबाजी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. गटबाजीमुळे पुण्यातील मनसे संघटनेत अनेक वाद निर्माण झाले. राज ठाकरे यांच्यापर्यंत या गटबाजीच्या तक्रारी गेल्या. पण त्यावर ठोस असा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पक्षातील धुसफूस कायमच राहिल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, आजच्या प्रकाराने राज ठाकरे प्रचंड संतापले असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत आल्यावर राज ठाकरे या प्रकरणी संबंधितांकडून खुलासा घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज ठाकरे याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Saturday, March 2, 2024

एकमेकांच्या शेजारी उभं राहूनही... सुप्रिया सुळे, अजितदादांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही ; बारामतीकर आश्चर्यचकित ;

वेध माझा ऑनलाईन।  बारामतीत सुरू असलेल्या राज्य सरकारच्या नमो रोजगार मेळाव्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर होते. एकमेकांच्या बाजूलाच उभे होते. पण दोघांनीही एकमेकांकडे पाहणं आणि भेटणं टाळलं. सुप्रिया सुळे सर्वांना भेटल्या. विचारपूस केली. पण दादांची विचारपूस केली नाही. यापूर्वी पवार कुटुंबात असं कधीच घडलं नव्हतं. बारामतीकरांनी मात्र हे चित्र पहिल्यांदाच पाहिलं. त्यावेळी अनेकांना आश्चर्यही वाटलं.

बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्व मान्यवर स्टेजवर आले. यावेळी सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला. विचारपूस केली. सुप्रिया सुळेही स्टेजवर आल्या. त्यांनी स्टेजवर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार केला. मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच अजितदादा होते. त्यांना बायपास करून सुप्रिया सुळे पाठून गेल्या. समोर देवेंद्र फडणवीस येताच त्यांनाही सुप्रिया सुळे यांनी नमस्कार केला. त्यांची विचारपूस केली.

विजय शिवतारे यांचीही भेट घेतली. पण बाजूलाच असलेल्या अजितदादांची साधी विचारपूसही केली नाही. किंवा भेटल्याही नाही. सुप्रिया यांनी सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली. पण अजितदादांना भेटणं टाळलं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. इतकेच नव्हे तर सुप्रिया सुळे स्टेजवर असल्याचं अजितदादांनाही माहीत होतं. त्यांनीही सुप्रिया यांना भेटणं टाळलं. बारामतीकरांसाठी हे चित्र नवं होतं. हे चित्र पाहून बारामतीकरांनाही आश्चर्य वाटलं.

पहिल्या रांगेत सुनेत्रा पवार
यावेळी स्टेजवरील पहिल्या रांगेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार होते. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस होते. फडणवीस यांच्या बाजूला शरद पवार बसले होते. सुप्रिया सुळेही या रांगेत बसलेल्या होत्या. पहिल्या रांगेत सुनेत्रा पवारही बसलेल्या होत्या. लोकप्रतिनिधी नसतानाही त्यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. एरव्ही कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सुनेत्रा पवार नसतात. पहिल्यांदाच त्या जाहीर राजकीय कार्यक्रमात सामील झाल्या. त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामतीतून लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.




शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा ; या प्रकरणाचा तपासच थांबवण्यात आल्याचे आले समोर ;

वेध माझा ऑनलाईन। शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी मुंबईच्या विशेष न्यायालयात या प्रकरणासंदर्भात झालेल्या सुनावणीत मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. हा रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला असून यावर तक्रारदार सुरेंद्र अरोरा यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणावर पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार आहे.

हे प्रकरण आहे काय ?
25 हजार कोटी रुपयांच्या शिखर बँकेचे घोटाळा प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते. या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी काही सुत गिरणी आणि साखर कारखान्यांना कोट्यावधींचे कर्ज वाटले होते. मात्र या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे शिखर बँक घाईला आली. यामुळेच समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह शालिनी पाटील यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या याचिकांवरील सुनावणी सत्र न्यायालयात प्रलंबित असताना ‘ईओडब्ल्यू’ने अजित पवारांच्या विरोधात कोणतेही पुरावे न सापडल्याचे निष्कर्ष काळात न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यानंतर न्यायालयाने हा रिपोर्ट जमा करून घेत तक्रारदार सुरेंद्र अरोरा यांना नोटीस बजावत याप्रकरणी आपली भूमिका मांडण्यास सांगितली आहे.

दरम्यान, 2015 साली अण्णा हजारे तसेच शालिनीताई पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या आधारावर मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने राज्यातील विविध राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल केले होते. यामध्येच अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ, काँग्रेसचे दिलीप देशमुख, मधुकर चव्हाण, यांचा समावेश होता. मात्र पुढे जाऊन उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून या प्रकरणातून अजित पवार आणि इतर राजकीय नेत्यांची नावे वगळण्यात आली. यातीलच दुसरा क्लोजर रिपोर्ट 30 जानेवारी 2024 रोजी सादर करण्यात आला. यातील मधल्या काळात अजित पवार यांनी भाजप सरकारशी हात मिळवणी केली. त्यानंतर आता थेट या प्रकरणाचा तपास थांबवण्यात आल्याचे समोर येत आहे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि इतर प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. 

भाजपने पहिल्या टप्प्यात 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशाच्या 34 मंत्री आणि राज्यमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच कोटा मतदारसंघातून ओम बिर्ला यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एटा येथून राजवीर सिंह, अमेठी येथून स्मृती इरानी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


“राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशची निवडणूक समिती यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर अंतिम चर्चा ही 29 मार्चला चर्चा झाली. यावेळी 16 राज्य आणि 2 केंद्र शासित प्रदेशातील 195 जागांचा निर्णय झाला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून निवडणूक लढवणार, 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांचे नावं या यादीत आहे. लोकसभा अध्यक्षांचं नाव आहे आणि एका माजी मुख्यमंत्र्याचं नाव आहे. यामध्ये 28 मातृशक्ती (महिला), 50 पेक्षा कमी वयाचे 47 युवा उमेदवार, अनुसूचित जाती 27, अनुसूचित जनजाती 18, ओबीसी 57 अशा विविध वर्ग, समाज आणि जातींना या यादीत प्रतनिधित्व देण्यात आलं आहे”, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

विजय शिवतारे अजितदादांना बारामतीतच देणार धक्का ! काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीत मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे. बारामतीत विजय शिवतारे यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. विधानसभा जागा ठरवल्याशिवाय लोकसभेचे काम करणार नाही, नेत्यांनी सांगितले तरी काम कोण करणार नाही, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. विजय शिवतारेंनी बारामतीत मोठा निर्णय जाहीर करत ते अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

विजय शिवतारे अजित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत
विधानसभेच्या भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय लोकसभेबाबत निर्णय नाही, असं विजय शिवतारेंनी एका माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं आहे. विधानसभेच्या भूमिका आज-उद्या स्पष्ट होईल. जोपर्यंत विधानसभेच्या बाबतीत निर्णय होत नाही तोपर्यंत सबुरीची भूमिका घेतल्याचं शिवतारे यांनी सांगितलं आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत स्पष्ट करतील, तेव्हा निश्चितपणे यातून मार्ग निघेल.
त्याकाळात पक्ष वेगळे होते, आम्ही राजकीय विरोधक होतो. आता परिस्थिती बदलली आहे. तुम्ही एकमेकांच्या आवडीचे विचार केले तर लोक मदत करतील आणि जर एकमेकांच्या इंटरेस्टचा विचार नाही केला, तर मला वाटत नाही अगदी नेत्यांनी जरी सांगितलं तरी लोक ऐकतील, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे विधानसभेची खात्री देणार असाल तरच लोकसभेसाठी काम करू अशीच सर्व ठिकाणी परिस्थिती असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. 

जुने सहकारी शरद पवारांची साथ देणार?
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जुन्या सहकाऱ्यांची साथ घेत आहेत, या चर्चांवर विजय शिवतारेंनी प्रतिक्रिया देत सांगितलं आहे की, आपल्यासोबत शरद पवार किंवा अजित पवार कुणाचंही बोलणं झालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. महायुतीत असल्याने अजित पवार यांच्याशी भेटीगाठी होतात, मात्र लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कुणाशी भेटीगाठी किंवा चर्चा झाली नसल्याचं शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या विजय शिवतारे हे पडद्यामागून काम करतात, अशी चर्चा आहे. याशिवाय शरद पवारांनी जुन्या सहकाऱ्यांना साद घालण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीच्या चर्चा देखील आहेत. विधानसभेच्या बाबतीत निर्णय झाल्याशिवाय लोकसभेसाठी काम करणार नाही अशी बारामती मतदारसंघातील नेत्यांची भूमिका असल्याचं विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे.

Friday, March 1, 2024

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील नेत्यांमध्ये बाचाबाची, धक्काबुक्की ; धुसफूस आली समोर ;

वेध माझा ऑनलाईन। ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील नेत्यांमधील धुसफूस समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. विधिमंडळाच्या लॉबीमध्येच सत्ताधारी आमदार भिडले आहेत.  भरत गोगावले आणि शंभुराज देसाई यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटल्याचं बोलले जातेय. दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील वाद कोणत्या कारणामुळे झाला हे समजलं नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघातील कामासंदर्भात दादा भुसे यांच्याकडे विचारणा केली. त्यावरुन दादा भुसे यांना ही गोष्ट खटकली. त्यावरुन दोघांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. 

वादाचे नेमकं कारण काय ?   नेमकं घडलं काय?
अर्थसंकल्पीय अधिवेशानाचा आज अखेरचा दिवस आहे. पण याच दिवशी सत्ताधारी आमदारांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते, त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातले आमदार त्यांच्यासोबत होते.  पण त्याचवेळी दोन सत्ताधारी नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली. महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे काम सांगितलं होतं. ते काम दादा भुसे यांच्याकडून झालं नाही. यासंदर्भात महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे विचारणा केली. त्यामुळे दादा भुसे यांना राग अनावर झाला. महेंद्र थोरवे यांनी विचारलेला प्रश्न राग आणणारं आहे, असे दादा भुसे यांना वाटलं. त्यामुळे दादा भुसे यांना राग आला. दोघांमध्ये पहिल्यांदा बाचाबाची झाली, त्याचं रुपांतर धक्काबुक्कीमध्ये झालं. त्यावेळी उपस्थिती असणारे शंभुराजे देसाई आणि भरत गोगावले यांनी हा वाद मिटवला. पण दादा भुसे आणि महेंद्र थोरवे दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. महेंद्र थोरवे यांच्यामते हे काम लवकर व्हायला पाहिजे होते. 

आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं, हे खरंतर महायुची सरकारमधली अशी एक पहिलीच आणि एक मोठी घटना आहे. या घटनेच्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं, तर मागच्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं वेगवेगळे वाद, या सर्व आमदारांमध्ये होताना पाहायला मिळत आहेत, त्यावरुन पक्षांतर्गत कलह तर नाही ना, असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. मात्र ही जी वादावादी आहे, ती लॉबीमध्ये पार पडली आणि त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी मध्यस्थी करत महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना थांबण्याचा प्रयत्न केला.