वेध माझा ऑनलाइन।
भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांचा वाढदिवस आज साधेपणाने साजरा करण्यात आला आज यांच्या वाढदिवसानिमित्त कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हारुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले
एकनाथ बागडी हे सामान्य कुटुंबातुन राजकारणात आलेले व्यक्तिमत्व आहे मात्र जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने अप्लावधीत भाजप नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांना संपूर्ण राज्यात मानले जाते अजातशत्रू असेही त्यांचे व्यक्तिमत्त्व जिल्ह्याच्या राजकारणात राहिले आहे स्पष्टवक्तेपणा शिस्त आणि कर्तबगारी या त्यांच्या जमेच्या बाजू नेहमीच पहायला मिळतात राजकिय विरोधक देखील त्यांच्याविषयी सन्मानाने बोलतात ही त्यांची खरी राजकीय ताकद आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही दोस्तीच्या दुनियेतील अशा या राजा माणसाचा वाढदिवस साध्या पद्धतीने आज साजरा करण्यात आला
याप्रसंगी भाजप जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद शिंदे,अनुसूचित शहराध्यक्ष विवेक भोसले,अल्पसंख्याक अध्यक्ष प्रितेंश मेहता,सरचिटणीस विश्वनाथ फुटाणे,केमिस्ट आघाडी अध्यक्ष,संजय शहा,महिला मोर्चा अध्यक्ष वर्षा सोनवणे,राजश्री कारंडे,सुधीर कांबळे,संतोष कांबळे,सुनील नाकोड भास्कर टेळे इ पदाधिकारी हजर होते.
दरम्यान दक्षिण कराडचे नेते डॉ अतुल भोसले राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर आमदार जयकुमार गोरे शिवेंद्रसिंहराजे भोसले कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे श्री वेताळ जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह राज्यभरातील अनेक भाजप नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी आज त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत
No comments:
Post a Comment