यशवंत बँकेतील घोटाळा ...
नोटा घरात अन ईडी दारात; चरेगावकरांची चांगलीच "फाटली'...
शेखर चरेगावकर' यांना नागपूरातून घेतले ईडीने ताब्यात...
यशवंत सहकारी बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याची कथा म्हणजे स्वार्थी हेतूने केलेली फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि गैरव्यवहार यातून हे सार अफाट, अलबेल आणि धक्कादायक कटकारस्थान हळूहळू जिल्ह्याच्या डोळ्यावर येवू लागले आहे. त्यामध्ये बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक यांच्यासह अधिकाऱ्यांनी संगनमताने बनावट कर्ज वाटप, बनावट स्वाक्षऱ्या यांची जणू जंत्रीच जमवल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट होत आहे. हजारो ठेवीदार, विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि छोटे व्यावसायिक, त्यांचे कष्टार्जित पैसे गमावून बसले असून ते या घोटाळ्याने पुरतेच हवालदिल झाले आहेत. त्यामुळे एकेकाळच्या या नावलौकीक पात्र 'यशवंत बँके'त सहकारातील घोटाळ्याचे 'शिखर'च पार केले असल्याचे स्पष्ट होत आहे.
आता जिल्हा व जिल्ह्याबाहेर मालमत्ता घेतलेल्याचे दस्तऐवज व नोटा घरात पडू लागल्यामुळे या कारवाईसाठी मंगळच जणू मागे लागत मंगळवारी थेट ईडी दारात आली, त्यामुळे या गैरव्यवहार प्रकरणाला आणखी वेगळी कलाटणी मिळाली असून त्यामुळे संंशयितांची चांगलीच तंतरली आहे.
फलटणच्या यशवंत सहकारी बँकेवर मंगळवार, दि. २३ रोजी पहाटेच्या सुमारास कराड, सातारा, फलटण कार्यालयासह संशयितांच्या निवाससस्थानाची झाडाझडती अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडीच्या) पथकाने केली. प्रथम कराड येथील विंगमधील त्यांच्या फार्महाऊसवर तसेच सोमवार पेठेसह गजानन हौसिंग सोसायटी आणि विंग परिसरात छापे टाकले. दरम्यान, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व बँकेचे तत्कालीन चेअरमन शेखर चरेगावकर यांना नागपूर येथून त्यांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांचे बंधू शार्दुल उर्फ सुरेश चरेगावकर, शौनक उर्फ विठ्ठल गोविंद कुलकर्णी रा. पुणे आणि बँक अधिकारी संशयित वैशाली विजय पावसे, केशव गजानन कुलकर्णी यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी शौनक उर्फ विठ्ठल गोविंद कुलकर्णी यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आले आहे.
माणसाने स्वार्थी असावं पण मर्यादित राहून पण जेव्हा मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा त्याच 'शिखर' होते. यशवंत बँकेत घोटाळ्याचे शिखर चढतानाचा सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व बँकेचे तत्कालीन चेअरमन शेखर चरेगावकर यांचा राजकारणात येण्यापूर्वीच्या प्रवासानेच याला बळ दिल्याचे आज विविध पैलूतून स्पष्ट होवू लागले आहे. कराड तालुक्यातील उंडाळेनजिकचे साळशिरंबे हे आटपाट नगर अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे गाव. येथील मूळचे हे चरेगावकर यांचे कुटुंब आहे. वडील सुरेश चरेगावकर हे नोकरीनिमित्त कराड येथे राहिले. येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सैदापूर विकास सोसायटीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाहाची सांगड घालता यावी म्हणून सचिव म्हणून काम करु लागले. या दरम्यान, शेखर, शार्दुल उर्फ मुकुंद आणि शैनाक उर्फ विठ्ठल यांचे संगोपनासह शालेय शिक्षण होवू लागले. यामध्ये शिक्षण पूर्ण होत असताना शौनक उर्फ विठ्ठल हे शेखर चरेगावकर यांच्या पुणे येथील आत्याकडे दत्तक म्हणुन गेले. अन शौनक उर्फ विठ्ठल चरेगावकर हे नाव विठ्ठल गोविंद कुलकर्णी असे झाले. एव्हाना शेखर चरेगावकर यांचेही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते शालेय विद्यार्थ्यांचे क्लास घेवू लागले. आता एवढ्यावरच न थांबता त्यांनी सहकारातील पदवी जीडीसीॲण्ड ए घेतल्यामुळे या सहकारात नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिशा देण्यासाठी त्यांचेही क्लास घेवून कुटुंबाला मदत करु लागले.
त्यानंतरही कुटुंबातील आर्थिक ताळेबंद चालवताना कसरत होवू लागल्यामुळे ते सुरुवातील विविध संस्थांचे पिग्मी एजंट म्हणुन काम करत पुढे पार्श्वनाथ पतसंस्थेत काम करु लागले. त्यानंतर पुढे जनकल्याण पतसंस्थेत काम करु लागले. या संस्थेने पुढे फलटण येथील यशवंत बँक चालवण्यास घेतली. त्याचवेळी शेखर चरेगावकर यांनी प्रतिष्ठा अन अर्थकारणाच शिखर म्हणुन या जनकल्याण पतसंस्थेत ते संचालक झाले. आता ही जनकल्याण पतसंस्थेत इतर मोठे व्यवहार करताना मर्यादा पडू लागल्या. शेखर चरेगावकर व त्यांच्यासह अन्य दोघां तिघांनी फलटण येथील यशवंत बँक चालवण्यास घेतली. त्यापूर्वी या बँकेची आर्थिक स्थिती पाहून त्यामधून स्वहित कसं जपता येईल, याचाही ताळमेळ त्यांनी लावला होता. यानंतर यशवंत बँकेचा कारभार हाती घेतल्यानंतर विश्वासाचे नात्याचे एक एक टप्पे पार केले.
यशवंत बँकेच्या माध्यमातुन कराड परिसरातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य म्हणुन कर्ज देवू लागले. हळूहळू या बँकेवर त्यांचाही विश्वास दृढ होवू लागला. कालांतराने सर्वच अधिकार हातात आल्यामुळे कर्जमागणीच्या अर्जावर बनावट सही करुन संपूर्ण सेट कोणत्याही तारणाशिवाय कर्ज मंजूर होवू लागले. आता सुरुवातीचे काही प्रकरणे कर्ज मंजूर होवू लागले. अन त्यामधील ही सर्व रक्कमच हातात आली. यामुळे त्याचा विनीयोग कसा कुठे करायचा, याची जंत्री सुरु झाली. काही बनावट कंपन्याही स्थापन करुन त्याचेही कर्ज मंजूर केली गेली. या कर्जाना सहकार नियमानुसार पुरेसे तारणही घेतले गेले नाही. अत्यंत घाईघाईने कर्जाचे वाटपही केले गेले. त्याच्या रककमा कर्जदारांच्या कर्ज खात्यावरुन त्यांच्या बनावट कंपनीच्या खात्यावर वर्ग केल्या. ऑडीट रिपॉर्टमध्ये त्या बाबी अनियमतीतता दर्शवूनही यंत्रणांनी हे सहकार परिषदेचे त्यावेळचे अध्यक्ष असल्यामुळे साहाजिकच पांघरुन घालून टाकले.
या कर्ज प्रकरणाच्या रक्कमेतून पुढे दापोली तालुक्यातील बुरुंडी येथे जमीन खरेदी केली. त्यासह इंदापूर, करमाळा, खेड, शिवापूर, भिगवण, विंग आणि कराडशहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे अनेकदा आरोपही यापूर्वी त्यांच्यावर झाले आहेत. त्याचप्रमाणे १९५ बोगस कर्ज त्यावेळी झाल्यानंतर याबाबत रिझर्व्ह बँकेने प्रशासक नियुक्त करावा, अशी मागणीही झाली होती. एकूणच चरेगावकर बंधूच्या कटकारस्थानाच्या या घटनांना आज ईडीच्या कारवाईने उजाळा मिळाला जात आहे.
शेखर चरेगावकर यांचे कुटुंब सुरुवातीला कराड येथील कोयना वसाहत येथे त्यानंतर विंग येथील डोंगराच्या पायथ्याजवळ श्रीकृष्ण व्हॅली वसाहतमधील एका बंगलो टाईपच्या घरात वास्तव्यास आहेत. याशिवाय सोमवारपेठसह अनेक ठिकाणी स्थावर, जंगम मालमत्ता करुन ठेवल्याची माहिती ईडीपर्यंत पोहोचली आहे. शेखर चरेगावकर हे बँकेची कारवाई लागण्यापूर्वी सातारा जिल्हाच नव्हे तर राज्यभरातील अनेक बँकांना ते मार्गदर्शन करत होते. त्यांचे बंधू मुकुंद चरेगावकर यांनी कन्स्ट्रक्शनचा व्यवसायासह गौण खनिज आणि खासगी फायनान्स यामधून लाखोंची माया जमवली असल्याची माहिती पुढे येत आहे. याशिवाय कराड येथील नवीन सर्किट हाउसची मॅनेजमेंटही तेच पाहत असतात. या सर्व बाबी विचारात करता चरेगावकर या बंधूचे कटकारस्थाने कारनामे जिल्हाभर चर्चेचा विषय ठरल्यानंतर ईडीने कारवाई केल्यानंतर या सर्व घटनांना पुष्टी मिळू लागली आहे.
..................................
*सीबीआय चौकशीसाठी सात महिन्यापूर्वी केली मागणी*
गेल्या सहा सात महिन्यापूर्वी तर खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. त्या भेटीत यशवंत सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत थेट सीबीआयचीच चौकशी करण्यात आली होती. मात्र, ती या ना त्या कारणाने सतत पुढे गेली. आज मात्र, ईडीच्या कारवाईने या सर्वच बाबी उघड झाल्या असून त्यावरही चर्चेच्या फैरी गावागावातून होवू लागल्या आहेत.
...................................
*बँकेत असा झाला घोटाळा..?*
यशवंत बँकेचे संचालक शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर, विठ्ठल कुलकर्णी आणि तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर या बंधूनी बनावट कंपन्या स्थापन केल्या. त्याद्वारे १२५ कोटी रुपयांची बेनामी कर्ज प्रकरणे मंजूर झाली. या कर्जांना कोणतेही पुरेसे तारण घेतले गेले नव्हते. कोणत्याही सहकाराचे नियमांचे पालनही केले नव्हते. घाईघाईने त्या काळात कर्ज वाटपही करण्यात आले होते. त्या रकमा कर्जदाराच्या कर्ज खात्यावरुन त्यांच्या बनावट कंपनीच्या खात्यावर वर्ग केल्या. ऑडीट रिर्पार्टमध्ये ही एवढं होवूनही ग्रीन सिग्नल दिला गेला. आज मात्र, या सर्व पैलूची खुमासदार चर्चा होत आहे.
...................................
*अपहाराच्या जंत्रीनंतर ईडीची कारवाई*
यशवंत सहकारी बँकेत ११२ कोटी १0 लाख ५७ हजार ४८१ रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात भाजपचे सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ, पाच वरिष्ठ अधिकारी आणि शेखर चरेगावकर यांच्या नातेवाईकांसह ५0 जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याबाबत सातारा आर्थिक गुन्हे शाखेने यामधील अपहाराची जंत्रीच पुढे दिल्याने ईडीने ही कारवाई केली आहे.
..............................
*पिग्मी एजंट ते सहकार परिषद अध्यक्ष प्रवास चक्रावणारा*
यशवंत बँक घोटाळा प्रकरणातील शेखर चरेगावकर यांचा प्रवास हा साध्या लुनावरुन सुरु झाला होता. कुटुंबाच्या अर्थकारणाचा ताळमेळ साधणारे शेखर हे सुरुवातीला याच लुनावरुन पिग्मी गोळा करणारे एजंट म्हणुन काम करु लागले. पुढे पार्श्वनाथ पतसंस्था, जनकल्याण पतसंस्था या सर्व प्रवासात त्यावेळचे सहकार परिषदेचे अध्यक्ष अशा प्रवासाचे अनेक पैलू आज मात्र ईडीच्या कारवाईने उलगडले जात आहेत.
.........…......................
*'शेखर'चे बंधू विठ्ठल चरेगावकर यांची पोलीस कोठडीत रवानगी*
*यशवंत सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने केलेल्या कारवाईत सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व बँकेचे तत्कालीन चेअरमन शेखर चरेगावकर यांना नागपूर येथून ईडीने मंगळवारी सकाळीच ताब्यात घेतले आहे. तर त्यांचे बंधू शैनक उर्फ विठ्ठल गोविंद कुलकर्णी रा. पुणे यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, शेखर चरेगावकर यांना कराड पोलीस ठाणे येथे कधीपर्यंत आणले जाईल, असे विचारले असता. जोपर्यंत ईडी आम्हांला कळवत नाही, तोपर्यंत अटक आमच्याकडून करता येत नाही.
*-तुषार दोशी, जिल्हा पोलीस अधिक्षक, सातारा.*